Showing posts with label गांभीर्य आजूबाजूचं. Show all posts
Showing posts with label गांभीर्य आजूबाजूचं. Show all posts

Saturday, 8 September 2018

एलजीबीटीक्यू, 377,



   मागच्या वर्षी लोकप्रभामधील लेख वाचून  मुंबईतील एका मुलाचा  फोन आला होता. त्याने सांगितलं  लोकप्रभा ऑफिसमध्ये फोन करून माझा नंबर घेतला. त्याने सांगितलं की त्याने एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. तिला कुठलातरी अवॉर्डही मिळाला आहे. ती शॉर्टफिल्म,  LGBT ग्रुपमधून त्याने फेस्टिव्हलला पाठवली होती. शॉर्ट फिल्म समलैंगिकता या विषयावर केली आहे.
तो स्वतः LGBT ग्रुपमध्ये येतो.

सुरवातीला मला हा मित्राचा प्रॅंक वाटला. म्हणून तत्कालीन उपसंपादक चैताली जोशीला विचारून पक्कं केलं की खरंच त्याने फोन करून माझा नंबर घेतला होता.

त्याच्याशी बोलून खूप छान वाटलं होतं. सगळ्यात विशेष गोष्ट ही होती की त्याच्या आईने स्वतः त्याला ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात खूप मदत केली. शिवाय त्याच्या आईनेही त्यात काम करून एक बाजू मांडली आहे.

त्याचं नाव आठवत नाही. त्याचा नंबरही आता नाही. पण आज समलैंगिकता हा अपराध नाही हे 377 कलम सुप्रीम कोर्टाने रद्द करून ‘नैसर्गिक’ LGBTना खूप दिलासा दिला आहे. त्यामुळे आज त्याची आठवण झाली.

तो जिथे कुठे असेल त्याच्यासहित
सर्व नैसर्गिक लेस्बियन्स, गे, बायदेक्शुअल, ट्रान्सजेंडर्स लोकांचे अभिनंदन.

आता त्यांना अटक होण्याची भीती राहणार नाही. .ते  उघडपणे समाजात वावरू शकतील शिवाय आपले नाते उघडपणे सांगू शकतील. फक्त याचा दुरुपयोग लैंगिक शोषणात होऊ नये ही आशा. कोर्टाने शिशुंसोबत आणि प्राण्यांसोबत केलेले लैंगिक व्यवहार हे अपराध ठरवले आहेत. हे अत्यंत योग्य.

सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक जजमेंट दिलंय. प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी भारताचा एक सकारात्मक अभिनंदनीय पुरोगामी निर्णय.

- Abhijeet Panse

Tuesday, 31 July 2018

रोहतांग पास बोगदा , पाऊल पडते पुढे

#रोहतांगपासबोगदा

मागच्या वर्षी अमरनाथवेळी पहलगामला तंबूत डोळे मिटून विश्रांती घेत पडलो असताना शेजारी बरेचसे गोरखपूरचे लोक होते. ते तेथील माओवाद, नेपाळमध्ये भारतीयांचा काय रोल असतो यावरही बोलत होते. जीएसटीला, नोटबंदीला कोणी चांगलं म्हणत होतं तर कोणी चुकीचं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विषय त्यांच्यात निघाला.  एकंदर सगळ्यांच्या तोंडी एक वाक्य बरेचदा ऐकू येत  होतं “मोदी बहोत जोशीला बंदा है!”

चंदीगडचा एक माणूसही तंबूत होता. तो एकटा आला होता. तोही त्यात बोलण्यात सामील झाला. स्लिम, कमी उंचीचा , फ्रेंच कट एकंदर व्यक्तिमत्वावरून , बोलण्यावरून तो शहरी आणि आधुनिक वाटत होता. तो सांगत होता “सच में मोदी बहोत जोशीला बंदा है! अभि अगले साल दो साल मे चायना और पाकिस्तान की बहोत जलाने वाला है! मनाली से लेह जाने के लिये सुरंग बन रही है! मैं जादा अभि इस बारे मे नही बता सकता ..लेकीन दो तीन सालो मे साल भर रोड से लेह, आर्मी के ट्रक्स  सियाचीन ग्लेशियर के ओर जा पायेंगे! " त्याला लोकांनी विचारल्यावर म्हणाला की तो स्वतः त्या टीमचा भाग आहे.

त्याने तेव्हा सांगितलेल्या एका बोगद्याबद्दल काल न्यूज चॅनलवर बघितलं. रोहतांग पास बोगदा.
मनाली ते लाहोल स्पिती वॅलीत जायलाच रोड ने सहा तास लागतात. शिवाय रोहतांग पास वर्षातुन तीन ते चार महिनेच उघडा असतो. वर्षभर बर्फामुळे , वादळामुळे तो बंद असतो. त्यामुळे लेहला नोव्हेंबर ते जुलै पर्यंत फक्त विमान मार्गानेच जाता येतं. एकप्रकारे आठ ते नऊ महिने एक महत्वाचा भाग देशापासून तुटला असतो. तेथील स्थानिक लोक,  मेंढीपाळ लोकांनाही कुठेही जाता येत नाहीत. आठ , नऊ महिन्याची खाद्यसामुग्री जमा करून ठेवावी लागते. त्यांना खूप अडचणी येतात.

पण आता जवळपास पूर्ण तयार झालेला हा नवा बोगदा देशाची , वाहतुकीची समीकरणे बदलवणार आहे. बातम्यात दाखवल्याप्रमाणे हा बोगदा विशेष आहे . आजवरचा वेगळा आहे. कारण या बोगद्यात दोन मजले आहेत. साडे आठ किमीच्या पीर पंजाल हिमालयाच्या उत्तर पूर्व भागातील,  मनाली आणि स्पिती वॅलीला जोडणाऱ्या या बोगद्यामुळे जिथे सहा तास लागतात तिथे आता फक्त एक तास लागणार आहे. शिवाय अपघात होण्याची शक्यता पूर्णपणे कमी. त्याशिवाय वर्षभर रोडप्रवास सुरु असेल.

वरच्या मजल्यातून लोकांना पायी जाता येईल. यात मेंढीपाळ लोक शेळ्या मेंढ्यांसकट तेथून जाऊ शकतील. तर खालून वाहने जाऊ शकतील. हिमाचल प्रदेशला आणि स्पिती वॅलीला , लडाखला जोडणारा हा विलक्षण बोगदा नागरी संस्कृतीसाठी खूप लाभकारक होणार आहे.

पण याखेरीज आणखी सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सियाचीनकडे जाणारा हा मार्ग कायम खुला राहील. अक्साई चीनकडे जाणारा हा मार्ग, या बोगद्यामुळे वाहतूक खूप सुलभ झाल्याने चीनचा चडफड होणार. कारण युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसामुग्री , खाद्यसामुग्री पोहचणेच सगळ्यात महत्वाचे असते. चीनने तिबेट, पाकिस्तानमध्ये सीमारेषेजवळपास सैन्याला सहज वाहतूक करता यावी म्हणूनच रस्त्यांवर निवेश केला आहे.

1999च्या कारगिल युद्धात लेहला जोडणारा एकमेव हायवेवर पाकिस्तानने नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले होते. पण भारतीय सैनिकांनी शौर्याने हायवे राखला होता. त्यामुळे लेहचा संपर्क आणि तो भाग देशात राहिला. असे महत्व आहे या दोन हायवेंचे.

थोडक्यात सोपी शब्दात सांगायचे तर भारतातून लडाख, सियाचीनला दोन मार्गाने जाता येतं. हिमाचल प्रदेश-मनालीतून ‘रोहतांग’ पास ओलांडून आणि काश्मीर सोनमर्गने- ‘झोझिला’ पासमार्गे. पण या दोन्ही दैत्य पासमार्गे त्यांच्या परवानगीने जाणं सोपी नसतं. कारण तेथे कायम अपघाताची , ट्राफिक जॅमची, वादळाची हिमवर्षावाची भीती असते. पण येत्या वर्षापासून मनालीमार्गे लेहला जाताना रोहतांग पासमार्गे न जाता या बोगद्यातून सहज जाता येईल. सहा तास वाचतील.

शिवाय या रोहतांग बोगद्याशिवाय आता “झोझिला पासला” बायपास करणारा बोगदाही तयार होतो आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने लेह आता वर्षभर जोडलं जाणार आहे. यामुळे नागरी आणि सरंक्षणसंबंधित अनेक समीकरणे बदलतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महेंद्रसिंग धोनीसारखा ‘#फिनिशर’ चा रोल निभावताय. ओपनरने सुरू केलेलं काम धोनी फिनिश करतो तसे आधीच्या सरकारने सुरू केलेले काम नरेंद्र मोदी तडीस नेताय. 2010 मध्ये या बोगद्याचं काम सुरू झालं होतं. यापूर्वी मागच्या वर्षी “नाशरी बोगद्याचं” मोदींनी उद्घाटन केलं. त्याचाही शिलान्यास युपीए गव्हर्नमेंटने केला होता.

या नाशरी बोगद्यातून मी गेलो आहे. काश्मीर खोऱ्याला जोडणारा हा भारतातील सगळ्यात लांब हा बोगदा आहे. आतून दर पाचशे मीटरवर टेलिफोन व्यवस्था, फर्स्ट एड व्यवस्था, शिवाय संपूर्ण बोगद्यात स्वच्छ शुद्ध हवा आत येत राहील याची व्यवस्था केली आहे. मागच्या वर्षी हा बोगदा सुरू होण्यापूर्वी , काश्मीर खोऱ्याला जोडणारा जुना #जवाहरबोगदा होता. हा बोगदा खूप अरुंद, आत प्रकाश व्यवस्था नसलेला, शिवाय आत हवा येण्याची व्यवस्था नसलेला आहे. या बोगद्यातून जाताना काही वयस्कर, वृद्ध प्रवाश्यांना श्वासाचा त्रास , छातीवर दडपण , घाबरल्याची अवस्था झाली होती. कारण बोगदा खूप लांब आहे.
त्यामुळे नवे बोगदे तयार होणे खूप आवश्यक आहे.

त्या माणसाने सांगितल्यानुसार , मोदी यांनी स्वतःच्या सरकारात काही स्वतः लडाखला जोडणाऱ्या, चीनच्या अगदी जवळून जाणाऱ्या तीन मोठ्या बोगद्याची हायवे , प्रकल्पाची सुरवात केली आहे. ज्यामुळे चीनची चरफड होणार आहे.. अनेक अभियंते, शेकडो कामगार दिवसरात्र रस्ते आणि बोगदे बनवण्यासाठी राबताहेत. प्रवासात हे स्पष्टपणे दिसून येतं.

“मोदी बहोत जोशीला बंदा है पाकिस्तान और चायना के पाससे वो और बडे रस्ते बना रहा है! हे त्या माणसाचं वाक्य होतं. हे जर खरं असेल तर नक्कीच येत्या काही वर्षांत खूप समीकरणे बदतील.

आणि हे किती सकारात्मक आहे की आज मोदी सरकार वाहतूकीसंबंधित, संरक्षणसंबंधित नवे देशहितकारक प्रकल्प सुरू करताय, काही वर्षांनी दुसरे कोणते सरकार ते पूर्ण करतील. देश असाच पूढे जात राहील.

“सरकारे आते रहेगी जाती रहेगी , लेकीन देश रहना चाहीये….! “

Abhijeet Panse

Thursday, 22 March 2018

सोशिअल मीडियावरील लिखाण चोरी

लहानपणी मुलं पळवुन नेणारी टोळीवरून नेहमी भीती वाटायची. बऱ्याच जुन्या चित्रपटांमध्ये लहानपणी मुलांना कोणीतरी पळवून, चोरून नेत, मग संपूर्ण चित्रपटात हरवले ते गवसले का सुरू व्हायचं.

अगदी अपत्य समोर आलं तरी त्याची ओळख करणे कठीण व्हायचं..मग कुठेतरी कुंभमेळ्यात हातावर, पायावर काहीतरी गोंदवलेली खूण दिसायची..आणि हरवलेलं अपत्य गवसायचं..

सगळ्यात वाईट दुःख म्हणजे आपलं अपत्य समोर दिसतंय, पण कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये..याहून वाईट म्हणजे आपल्या अपत्याला कोणी गुंड, एखाद्या ‘बस्ती’ का दादा पळवून आणलेल्या अपत्याला आपलंच अपत्य सांगून सरळ त्याच्यावर स्वतःचाच हक्क दाखवायचा.

किती वाईट वाटत असेल चित्रपटातील बिचाऱ्या त्या पालकांना!

च्या मारी असंच फिलिंग येतं जेव्हा कोणी तुमचं #पोस्टापत्य कॉपी पेस्टरूपी चौर्यकर्म करून त्यावर खऱ्याखुर्र्या पोस्टकर्त्याचं..पालकाचं नाव कट करून सगळीकडे पाठवतात.

कुठेतरी हॅशटॅगचं गोंदण सापडतं. आणि हरवलेल्या पोस्टापत्याचा पत्ता लागतो.

किँवा बहुतेकवेळा काही सदवृत्तीचे लोक चोरीचा माल लक्षात आणून देतात.

पण कुठल्या तरी ‘पेज’ ‘ग्रुप’ च्या बस्ती, झोपडपट्टीचा दादाने ते पळवलं असतं. तो त्यावर आपला हक्क सांगत असतो. स्वतःचं नाव दिलेलं असतं.

कुठे वॉट्सपअप रुपी खिडक्यांमधून त्याला राउंड अँड राउंड अँड राउंड  फिरवलं जातं.

काहीजण, अचानक अनपेक्षितपणे बाळ सापडलं   म्हणून बाहुबलीला पाळणाऱ्या पालकांप्रमाणे आपलं नाव देतात. कोणी प्रामाणिकपणे हे आमचं बाळ नव्हे आम्हाला ते नदीकाठी, जंगलात, दारात मिळालं असं प्रामाणिकपणे “ Copied & pasted” “Forwarded as received” सांगतात.

कॉपीराईट © चं कितीही राक्षणात्मक कवच दिलं तरीही पोस्टमार ती चोरतातच.

शेवटी या पोस्टापत्यचोर टोळीपासून सावधान राहण्यासाठी एक अत्यन्त संरक्षणात्मक असं ब्लॉगघर देणंच श्रेयस्कर राहील असं वाटतं.

हे आकाशातील जिझसा यांना माफ करू नकोस कारण त्याना माहिती आहे ते काय करताय..

पालकाचे नाव काढून ते पोस्टापत्य व्हायरल करणाऱ्याला व्हायरल फिवर होऊ दे रे जिझस महाराजा!

फेसबुकवर फेसबुकच्याच , लाईक्स, पोस्ट्स,  कमेंट्स, सेलेब्स, कंटेटच्या रडक्या गोष्टी करून कधीही इश्यू न करणारा

Abhijeet Panse

हे म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडा खाये काफिर!

सोशील मीडिया लिखाण चोरी

लहानपणी मुलं पळवुन नेणारी टोळीवरून नेहमी भीती वाटायची. बऱ्याच जुन्या चित्रपटांमध्ये लहानपणी मुलांना कोणीतरी पळवून, चोरून नेत, मग संपूर्ण चित्रपटात हरवले ते गवसले का सुरू व्हायचं.

अगदी अपत्य समोर आलं तरी त्याची ओळख करणे कठीण व्हायचं..मग कुठेतरी कुंभमेळ्यात हातावर, पायावर काहीतरी गोंदवलेली खूण दिसायची..आणि हरवलेलं अपत्य गवसायचं..

सगळ्यात वाईट दुःख म्हणजे आपलं अपत्य समोर दिसतंय, पण कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये..याहून वाईट म्हणजे आपल्या अपत्याला कोणी गुंड, एखाद्या ‘बस्ती’ का दादा पळवून आणलेल्या अपत्याला आपलंच अपत्य सांगून सरळ त्याच्यावर स्वतःचाच हक्क दाखवायचा.

किती वाईट वाटत असेल चित्रपटातील बिचाऱ्या त्या पालकांना!

च्या मारी असंच फिलिंग येतं जेव्हा कोणी तुमचं #पोस्टापत्य कॉपी पेस्टरूपी चौर्यकर्म करून त्यावर खऱ्याखुर्र्या पोस्टकर्त्याचं..पालकाचं नाव कट करून सगळीकडे पाठवतात.

कुठेतरी हॅशटॅगचं गोंदण सापडतं. आणि हरवलेल्या पोस्टापत्याचा पत्ता लागतो.

किँवा बहुतेकवेळा काही सदवृत्तीचे लोक चोरीचा माल लक्षात आणून देतात.

पण कुठल्या तरी ‘पेज’ ‘ग्रुप’ च्या बस्ती, झोपडपट्टीचा दादाने ते पळवलं असतं. तो त्यावर आपला हक्क सांगत असतो. स्वतःचं नाव दिलेलं असतं.

कुठे वॉट्सपअप रुपी खिडक्यांमधून त्याला राउंड अँड राउंड अँड राउंड  फिरवलं जातं.

काहीजण, अचानक अनपेक्षितपणे बाळ सापडलं   म्हणून बाहुबलीला पाळणाऱ्या पालकांप्रमाणे आपलं नाव देतात. कोणी प्रामाणिकपणे हे आमचं बाळ नव्हे आम्हाला ते नदीकाठी, जंगलात, दारात मिळालं असं प्रामाणिकपणे “ Copied & pasted” “Forwarded as received” सांगतात.

कॉपीराईट © चं कितीही राक्षणात्मक कवच दिलं तरीही पोस्टमार ती चोरतातच.

शेवटी या पोस्टापत्यचोर टोळीपासून सावधान राहण्यासाठी एक अत्यन्त संरक्षणात्मक असं ब्लॉगघर देणंच श्रेयस्कर राहील असं वाटतं.

हे आकाशातील जिझसा यांना माफ करू नकोस कारण त्याना माहिती आहे ते काय करताय..

पालकाचे नाव काढून ते पोस्टापत्य व्हायरल करणाऱ्याला व्हायरल फिवर होऊ दे रे जिझस महाराजा!

फेसबुकवर फेसबुकच्याच , लाईक्स, पोस्ट्स,  कमेंट्स, सेलेब्स, कंटेटच्या रडक्या गोष्टी करून कधीही इश्यू न करणारा

Abhijeet Panse

हे म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडा खाये काफिर!

Thursday, 8 March 2018

*फिरुनी नवे जन्मेन मी*



          *फिरुनी नवे जन्मेन मी*

27 मार्च 2016ला केरळ एक्सप्रेसमध्ये दिल्लीहून सकाळी अकरा वाजता बसलो. आवडती साईड लोवर विंडो सीट मिळाली होती. गाडी झांशी शहराबाहेर काही मिनिटांसाठी थांबली. समोर उंचावर झांशीचा किल्ला खिडकीतून दृष्टीसमोर होता. खिडकीच्या बाहेर रुळांजवळ छोटंसं तळं होतं. सूर्यास्त व्हायला पाऊण एक तास बाकी असेल. सूर्य झांशीच्या किल्ल्याच्या मागे दडत होता. त्या पिवळ्या केशरी प्रकाशात, चमकणाऱ्या पाण्याच्या मागे किल्ला अंधारात राकट काळा दिसत होता.

त्या दिवशी वर्ल्डकपमधील सेमी फायनल , भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डू ऑर डाय मॅच होती.
एरवी मी मॅचचे अपडेट्स घेत बसलो असतो. पण माझ्या डोक्यात तेव्हा वेगळे विचार सुरू होते.

इतर कोणत्याही दिवशी समोर किल्ला दिसत असता तर  मी मनाने, कल्पनेने राणी लक्ष्मीबाईने किल्ल्यावरून कशी अश्वउडी घेतली असेल याची कल्पना मी करत राहिलो असतो. पण त्या दिवशी झांशीच्या किल्ल्याकडे बघताना एका वेगळ्याच ‘व्यक्तीची’ आठवण मला येत होती. त्याच व्यक्तिबद्दल माझ्या मनात आदल्या दिवशीपासून विचार सुरू होते. मित्राला 'त्या' व्यक्तीबद्दल एक वाक्य ही बोललो होतो..आणि काय आश्चर्य डोळ्यासमोर तेव्हा झांशीचा किल्ला होता. गाडी थांबलेलीच होती.

डोळ्यासमोर व्यक्ती येत होती ती “अरुणिमा सिन्हा”.

23 वर्षाची ही नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू मुलगी 12 एप्रिल 2011ला घरून दिल्लीला नोकरीच्या मुलखतीसाठी निघाली. सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन घरातून निघताना तिच्या घरच्यांना किंवा तिलाही कल्पना नव्हती नियतीने तिच्यापुढे काय वाढून ठेवलंय.

लखनऊहुन ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात चढली. रात्री डब्यात काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले. सगळयांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही.

तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती.
ते दरोडेखोर तिच्याजवळ आलेत. एकाने तिला चेन देण्यासाठी दरडावले. दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला.

तीने विरोध केला. ती म्हणाली ,”मैं अपनी चेन नही दुंगी!”

ती विरोध करू लागली. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली. तिच्या गळ्यातील चेन ओढून घेतली. पण ते पिसाळले होते. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करतेय हे त्यांना पचलं नाही. ट्रेन भरधाव सुरू होती. त्या नीच उलट्या काळजाच्या लोकांनी तिला ओढत दरवाज्यापाशी नेले आणि भरधाव वेगातील रेल्वेतुन बाहेर ढकलून दिले.

रात्रीची वेळ..ती जोराने आदळली. कंबरेपासून पायाचे  हाड मोडलेत. चेहऱ्यावर जखमा..ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वेमार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला. पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्यापायांवरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळांखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर, अंगावर पडत होतं. बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली.

एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आलं आहे. हे तिला जाणवलं. सकाळी कोणालातरी ती ट्रॅकवर पडलेली, भेसूर अवस्था झालेली दिसली.

तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला. तिच्या समोर तिचं व्हॉलीबॉल करिअर संपताना तिला दिसत होतं.

“सर अपने पास क्लोरोफॉम नही है!” तिच्या कानी कोणाचेतरी शब्द पडलेत. लवकरात लवकर, विष पूढे जाण्यापूर्वी पाय कापणं गरजेचं होतं. तिने डॉक्टरांना स्वतः सांगितलं “मी रात्रभर इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता मी हे सुद्धा सहन करू शकते. तुम्ही क्लोरोफॉर्मशिवाय माझा पाय कापा..!”

तिचा पाय कापण्यात आला. क्लोरोफॉमशिवाय.त्याही वेदना सहन केल्या तिने. काय मानसिक अवस्था झाली असेल तिची त्या वेळी! शारीरिक वेदना तर सहन करण्यापलीकडे होत्या.

त्यानंतर तिला दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. या काळात मीडियाने अत्यंत नीच आरोप करत तिलाच दोषी ठरवू लागले. “अरुणिमाकडे तिकीट नव्हतं म्हणून तिनेच बाहेर उडी मारली” अश्या बातम्या वर्तमानपत्रात, न्यूज चॅनल्सवर आल्यात.

ती आतून तुटत होती..मरत होती. त्यावेळी तिने एम्स हॉस्पिटलमध्ये स्वतःपुढे एक विलक्षण एम ठेवलं.  आयुष्यातील सगळ्यात मोठी खेळी खेळण्याचं ठरवलं!

तिने ठरवलं “माउंट एव्हरेस्ट” सर करण्याचं!

सगळयांनी तिला मूर्खात काढलं. अरुणिमा या अपघातामुळे ठार वेडी झालीये लोक म्हणू लागले.

सामान्य लोकांना, हिशोबी, सुरक्षित जगणाऱ्यांना हे माहिती नसतं की वेडे लोकच इतिहास घडवतात. क्रांती घडवतात. वेगळी पाऊलवाट तयार करतात.

अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला.
ती हॉस्पिटलमधून भावासोबत मच्छीन्द्र पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली. “मच्छीन्द्र पाल” या प्रथम भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्टवीर आहेत.

त्यांनीही तिला प्रथम विरोध केला. पण अरुणिमाची जिद्द बघून त्या म्हणाल्या ,” तू आधीच तुझ्या मनात एव्हरेस्ट सर केलंय! आता फक्त लोकांना ते दाखवायचं शिल्लक आहे!

त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. पण कर्म तर तिचं तिलाच करायचं होतं.

भारतात एकूण चार केंद्र सरकार आणि संरक्षण मांत्रालयाखाली येणारे पर्वतारोहन केंद्रे आहेत.

येथील प्रशिक्षण किती कडक आहे हे ट्रेकिंग ग्रुप्स सोबत मजा मस्ती करायला, सेल्फी काढायला जाणाऱ्या लोकांना कळू शकणार नाही.

या चारमध्येही सगळयात कडक आणि कठीण दोन केंद्रे, दार्जिलिंगचं आणि उत्तरकाशीचं जवाहरलाल नेहरू पर्वतारोहन केंद्र .

अरुणिमाची रवानगी उत्तर काशीच्या केंद्रात झाली. अत्यन्त कठीण ,कडक प्रशिक्षण सुरू झालं. चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची कारण मध्येच पाय मांडीतून निघून जायचा. तिला खूप उशीर होऊ लागला. ती तीन ते चार तास उशीर व्हायचा.  पायातून रक्त यायचं.

या केंद्रात एक नियम असतो, संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचे निरीक्षण करायला सांगितलं जातं. कारण पायाला बारीक फोड ज्यांना ‘ब्लिस्टर्स’ म्हणतात, ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात. कारण ते खूप धोक्याचं , सेप्टिक होण्याचा धोका आणि वेदनादायी असतं.
मी हा कोर्स केला असल्याने मला याची संपूर्ण जाणीव आहे.

अरुणीमा सिन्हाच्या पायातून तर रक्त येत होतं. ती सतत मांडीतून कृत्रिम पाय काढायची ,रक्त पुसून पुढे चालायची.

तिने दुसऱ्या दिवसापासून ठरवून टाकलं की काहीही होवो आता पाय काढून बघायचा नाही.
वेदना सहन करत चालत, हळूहळू तिची प्रगती होऊ लागली. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ती प्रथम येऊ लागली. सगळेजण थक्क झालेत तिच्या इच्छाशक्तीपुढे.

“अरुणिमा तुम क्या खाती हो?” विचारू लागलेत.

अरुणिमाचं एक महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं. परीक्षा A ग्रेडने पास झाली.
आता लक्ष होतं ‘एव्हरेस्ट’. या पृथ्वीवरील सगळ्यात उंच जागा! टॉप ऑफ द वर्ल्ड!

“टाटा स्टील”कडून तिला प्रायोजकत्व मिळाले. आणि अरुणिमा निघाली नेपाळकडे.

काठमांडुला पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन दुसऱ्या  दिवसापासून तिची चढाई सुरू झाली. शेर्पा तिच्या मदतीला होता. पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पायाबद्दल कळलं, त्याने एका अपंग मुलीसोबत जाण्यास नकार दिला. अरुणिमाने विनवण्या करून शेर्पाला राजी केले. ती म्हणाली तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की तुम्ही एका अपंग मुलीसोबत चाललाय.

काही दिवसांच्या चालण्यानंतर , संकटं झेलत ,मृत्यूच्या दाढेतुन वाचत ती शिखरापासून काही मिनिटांवर येऊन पोहचली. रस्त्यात अनेक प्रेते दिसलीत. तेव्हा तिच्या समोर एक जर्मन पर्वतारोही पाय घासून मरताना दिसला.

एका ठिकाणी बर्फावर रक्त सांडलेलं दिसलं. पुनः काही प्रेते दिसलीत.
त्या सर्व प्रेतांना ओलांडून ती समोर गेली.
आणि शेवटी एव्हरेस्ट शिखर सर केलं..

एप्रिल 2011ला तिचा अपघात झाला आणि 21 मे 2013ला सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ती पृथ्वीवरील सर्वात उंच जागेवर उभी होती. शी वॉज अॅक्च्युअली ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड.

पण…

पण अजूनही एक फार मोठं संकट बाकी होतं. तिचा प्राणवायू संपत आला होता. तिला जाणीव झाली होती की  ती जिवंत परत जाऊ शकणार नाही.

म्हणून किमान जगाला आपला व्हिडीओ दिसावा म्हणून  तिने शेर्पाला कॅमेराने तिला चित्रित करायला सांगितलं.

शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला. आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होतं. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, “अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटं सोडणार नाही! तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन!”

वेगाने ते परतीला निघालेत. पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता. त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता. पण तिची शर्यत लागली होती मृत्यूबरोबर! तोही वेगाने तिच्या मागे येत होता. तिला बाद करण्यासाठी. झडप घालण्यासाठी.

तिच्या डोळ्यातुन अश्रू येत होते..उंच ठिकाणी चालताना तोंडात लाळ निर्माण होत असते. तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना ‘टक’ असा आवाज येई, कारण खाली पडेपर्यंत त्याचा बर्फ होत होता. अश्रूही खाली ओघळताना बर्फ होत होते.

तिचा हात काळा निळा पडला होता. फ्रॉस्ट बाईट, बर्फ बाधा म्हणतात. हातसुद्धा कापावा लागणार होता. पण ती जिवंत राहिली तर..
चालता येत नव्हतंच.

शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला, तिने पाय काढून टाकला..आणि तशीच स्वतःला घासत चालू लागली. एका हातात स्वतःचा एक पाय..काय दृश्य असेल ते!

देव जगात असेल तर तो ही इतक्या उंचावर ,’जवळून’ तिला बघत असेल तर त्यानेही तोंडात बोट घातलं असेल!

एव्हरेस्ट मोहिमे दरम्यान सगळ्यात जास्त मृत्यु हे  परत येताना होत असतात.
त्या क्षणी अरुणिमाकडे फक्त पाच मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता. दोघांनाही माहिती होतं आता तिचा मृत्यू अटळ.

आणि नेमका तेव्हा एक ब्रिटिश पर्वतवीर जास्तीचा प्राणवायू सिलेंडरसोबत दिसला. त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्याने त्याने तो सिलेंडर तिथेच टाकून दिला. शेर्पा धावत तिथे गेला, सिलेंडर अर्ध भरलं होतं. त्याने ते प्राणवायूचं सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला जोडलं. अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले.

अरुनिमा सिन्हाला 2015 मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले.

मी आदल्या रात्री एका कार्यक्रमात प्रत्यक्ष अरुणिमा सिन्हाला ऐकून, बघून आलो होतो. तेव्हा मी मित्राला ओरडून म्हणालो , “ही आजच्या काळातील झाशीची राणी आहे!”

त्यावेळी संध्याकाळी मी झाशीच्या किल्ल्यासमोर होतो. खिडकीतून बघत होतो. पण डोळ्यासमोर राणी लक्ष्मीबाई येत नव्हती. दिसत होती ती आजच्या काळातील झाशीची राणी, एव्हरेस्टवीर, पद्मश्री अरुणिमा सिन्हा!

त्या काळात मी खूप नैराश्याने ग्रासलो होतो.
करिअरपासून सगळीकडेच नकारत्मक वाटत होतं.
पण अरुनिमा सिन्हाला ऐकल्यावर माझ्यात उत्साह संचारला. मी दररोज व्यायाम, सूर्यनमस्कार, आणि धावण्यास सुरवात केली. भीती दूर पळत गेली. इतकं कोणासोबत वाईट घडल्यावरही त्यातून एक व्यक्ती इतक्या पूढे जाऊ शकते तर मी तर धडधाकट आहे. कारण तिच्या इतक्या शारीरिक आणि मानसिक वेदना सहन केलेली मी तरी कोणी व्यक्ती आजवर बघितली नाही.

अरुणिमा सिन्हा हे जिवंत उदाहरण आहे सकारात्मकतेचं..जिद्दीचं..विलक्षण इच्छा शक्तीचं..

वाईट लोकांनी तिला अपंग केलं. तिने भारतातील कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर केलेली प्रथम व्यक्ती, हा इतिहास, रेकॉर्ड करून दाखवला.
या दिव्य स्त्री आजच्या जागतिक महिला दिनी साष्टांग नमस्कार! दंडवत! टेक अ बाव लेडी!

मी या जन्मात आधुनिक झांशीच्या राणीला बघितलं आहे. जेव्हा जेव्हा वेदना होतात मनाला तर अरुनिमा सिन्हा आठवते. कारण तिच्या मानसिक आणि शारीरिक वेदनांपुढे माझ्या वेदना मला तृणवत वाटू लागतात.



-Abhijeet Panse

Tuesday, 2 January 2018

आमच्या येथील माती दुर्गा मातेला चालते पण समाजाला नाही..!


"हमारे यहा की मिट्टी माँ दुर्गा को चलती है लेकिन समाज को नही.."

जसा जसा सूर्य पश्चिमेच्या क्षितीजाकडे कलु लागतो..सावळी सांज आकाशात  दिवा लावत जाते..हळुहळु आकाशातील तारेही विश्वाचं आळसावलेलं रूप पाहुन सुखावतात..सामान्यत: आपल्या पांढरपेशा समाजाचे दैनंदिन व्यवहार रात्रीच्या दहाच्या ठोक्याला निवृत्त होतात. परंतु शहरातील काही वस्तींमध्ये जशी जशी रात्र अधिकाधीक गहिरी होत जाते तसा तेथील व्यवहारांचा "लाल" रंग अधिक गडद होत जातो..

स्त्रीला दुर्गेचे आदिशक्तिचे रूप आपल्या समाजात मानले जाते. लक्ष्मी पार्वती..सौम्या रौद्रा..निरनिराळे रूपं देवी महात्म्यात सांगितलेय. समाजात जगताना स्त्रीचे अनेक रूप बघायला मिळतात.

पण फक्त उदरभरणासाठी जेव्हा स्त्रीला याच देवीच्या रूपाला रात्री रस्त्याच्या कडेला "उभं" राहावं लागतं. तेव्हा अंतर्मुख करणाऱ्या या दुर्गेच्या रूपाला "वारांगना" म्हणतात..आणी रात्रीच्या वाढत्या काळ्या रंगाबरोबर ज्या वस्तीचा "लाल" रंग चेहऱ्यावर लावलेल्या लालीसकट गडद होत जातो त्या भागाला म्हणतात रेड लाइट एरिआ!

जेव्हा व्यवसायाचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे भांडवल! परंतु जेव्हा उदर भरणासाठी कुठलंही भांडवलच मिळत नाही तेव्हा या वारांगनांना "स्व देहाचे" भांडवल करून त्यालाच व्यवसायाचे साधन करावे लागते.
जिथे व्हाइट कॉलर समाजासाठी रात्र ही निवृत्तीची वेळ असते तिथे या स्त्रियांसाठी  त्यांच्या  अर्थाजनाच्या दिवसाची सुरवात असते.
वाढत्या रात्रीच्या काळोखासोबत वर्षांनुवर्षे यांच्या जीवनातील काळोखही कायम आहे. त्याला शेवट नाही.

कोणी नाट्यकार "वसंतसेना" नामक पात्र रचुन वारांगनेला एक "उत्सव"मुर्ती ग्लॅमरस लूक देतो. परंतु प्रत्यक्शात मात्र या कमर्शिअल सेक्स वर्कर्सच्या आयुष्यात दु:ख वैषम्य गरिबी पिळवणुक रोगराई याशिवाय काहीच नसतं.

दोन वर्षापुर्वी आम्ही ४५ मित्र मैत्रिणी पुण्याला ट्रिपला गेलेलो असताना , उशीरा परताना बुधवार पेठेतील लक्ष्मी रोडवरील "लाल" माहोल पाहुन मी पुर्ण अंतर्मुख झालो. इतर मित्रांसाठी तो टेहाळणीचा उत्सुकतेचा विषय होता. पण माझं डोकं विचारांनी आक्रंदुन गेलं होतं. 'बारा' वर्षांपासुन 'साठ' वर्षांपर्यंत प्रत्येक वयोगटातील 'स्त्री' स्वदेहाचा लिलाव करत होती. उजेडात एरवी उथळ माथ्याने वावरणारे सुटाबुटातील तथाकथित शुभ्र कॉलर माणसे तिथे 'भाव' करत होते. वरवरून भडक वर्तवणुक करणाऱ्या या वारांगनांच्या डोळ्याच्या आड मात्र प्रचंड दु:ख जाणवलं. ज्या  समाजात स्त्रीला दुर्गेचे रूप समजले जाते त्या समाजात हाता तोंडाची गाठ पडण्यासाठी स्त्रीला देह विक्रय करावा लागतो हे आपल्या समाजाचे दुर्दैव्य.

मी समोरच्या दगडुसेठ गणपतीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात कुठलेच भाव नव्हते. तो निर्विकार दृष्टीने समोर पाहात होता.
देव इतका अलिप्त कसा काय राहु शकतो? की फक्त देवच इतका अलिप्त..'अलुफ' राहु शकतो! कर्म आणि प्रारब्ध यात त्याची स्वत:ची काहीच भुमिका नसते का? असे शेकडो अनेक विचारांनी डोक्यात वादळ उठलं होतं. त्या वेळी प्रथमच त्या प्रसिद्ध गणपतीचं दर्शन घेत होतो पण कुठलाच आनंद होत नव्हता.

रात्रभर मी झोपू शकलो नाही. डोळ्यांसमोर रस्त्यावरच ते चित्र येत होतं. मनात शेकडो विचार येत होते. दुःख वाईट वाटत होतं. पाहिल्यादाच सुरक्षित घराच्या वातावरणातून बाहेर येऊन जगाची हि काळी लाल बाजू पहिली होती. मन वेदनांनी भरून गेलं होतं.

वर्षानवर्षे ह्या वारांगना गरिबीच्या घाणीच्या साम्राज्यात शरीराला झीजवत खितपत पडलेल्या असतात. जो पर्यंत शरीर तरूण आहे तो पर्यंत हाता तोंडाची गाठ पडते. समस्या व दु:ख अपमान यांच्या पाजविलाच पुजले असतात. पोलीसांचे हप्ते त्यांच्याकडुन होणारी पिळवणुक खोलीचे भाडे मधल्या दलालांची वसुली लैंगिक रोग यांच्या समस्यांना अंत नसतो.

भौगोलीक अंतरानुसार या समाजाची वस्ती आपल्या पांढरपेशा वस्तीपासुन फार दुर नसते. परंतु मुळ प्रवाहापासुन मात्र हा समाज पुर्णपणे कोसो मैल दुर आहे.
प्रत्येक मानव प्राण्याची मुलभूत  मानसिक गरजा म्हणजे प्रेम आदर काळजी..यापैकी कोणतीही गरज या स्त्रीयांची कधीच पुर्ण होत नाही.

स्त्रीचे मातृत्व हे तर विधात्याचेही आहे. प्रत्येक स्स्त्री ही मुळात अनंत काळची माता असतेच. छोटी मुलगीसुद्धा तिच्या बाहुलीला प्रेमाने थापटते..खाउ घालते. पण स्त्रीचे हे बेसिक इंस्टिक 'मातृत्व' सुद्धा या कमनशिबी वारांगनांना 'परवडत' नाही. कारण गर्भवासातील त्या महिन्यांमुळे व्यवसायावर परिणाम होतो. आणि जगायचे तर असते....
ह्या वारांगना "वोट बँक" नसल्याने कुठलिही राजकीय कृपा यांना मिळत नाही.

"मुलगी झाली हो..!" म्हणताना अजुनही काही पुरातन मनोवृत्तीचा उत्साह ओसरतो. जेथे आपल्या पांढरपेशांच्या समाजात "मुलाच्या" हव्यासापोटी स्त्रीभुणहत्या केली जाते. तेथे वारांगनांच्या वस्तीमध्ये मात्र "कन्या रत्नाचं" देवी रूपाचं सहर्ष मनापासुन स्वागत केलं जातं. तिथे एक "मुलगी" आपल्या "अम्माचा" आपल्या घराचा भार समर्थपणे वाहते.कारण तीच त्यांची "कुलदिपीका" असते. कदाचीत म्हणुनच या वारांगना आत्मिक पातळीवर देवीच्या अधीक जवळ वाटतात.

हाय सोसायटीतील पार्ट्यांमध्ये 'रूचीपालट' म्हणुन  wife/husbnd swapping प्रकार घडतात तेेव्हा मुळात खऱ्या वेश्या कोण हा प्रश्न पडतो.
  नृृत्यांगना प्रोतिमा बेदी जी गोव्याला कलंगुट बीचवर नग्नावस्थेेत मॉर्निंग वॉक घ्यायची(reff श्री प्रमोद नवलकराचं मासीक) ती आपल्या इंटरव्युहमध्ये म्हणली होती "जेव्हा माझी कार कामाठीपुऱ्याजवळील फोरास रोडवरून जाते तेव्हा माझ्यात एक वेश्या संचारते...त्या वेश्यावस्तीतील पान दुकानावरील पान खाण्याची व लोकांनी माझ्याकडे 'त्या' नजरेने पाहावे असे खुप वाटते!"

एक कादंबरी वाचण्यात आली होती; त्यात एका गोष्टीत समोरासमोरील घरांमध्ये एका घरात एक लग्न झालेली स्त्री आपल्या नवऱ्यासोबत राहात असते. तर समोरील घरात एक वारांगना. कालांतराने दोघेही मृत्युमुखी पडतात. पहिल्या घरंदाज स्त्रीला नरकप्राप्ती होते तर वारांगनेला स्वर्ग प्राप्ती. तेव्हा चित्रगुप्त सांगतो; पहिली लग्न झालेली स्त्री रोज रात्री समोरच्या वारांगनेला पाहुन "मत्सर" करायची तर वारांगना त्या पतिव्रतेला पाहुन रोज मनोमन नमस्कार करीत.

यावरून एक पटतं वेश्यावृत्ती ही एक मनोवृत्ती 'प्रवृत्ती' असते. मग ती स्त्रीची असो वा पुरूषाची. वेश्या बनायला "रेड लाइट" एरिआतच राहवे लागते असे नाही.

एकीकडे वारांगना उदर भरणासाठी;घऱ चालवण्यासाठी लज्जेचा त्याग करून "देहदान" करते.तर दुसरीकडे फक्त एन्जॉयमेंट म्हणुन वा उच्चभ्रु आयुष्य जगता यावे म्हणुन एक कॉलेज गर्ल कॉलगर्ल होते. वा जस्ट एन्जॉयमेंट म्हणुन स्वैराचार करतेे.

अल्ट्रा मॉडर्न समजणारे तरूण तरूणींचे फ्रेंड्स गृप "गृप सेक्स" पार्टीज फ्लँटमध्ये आयोजीत करतात.मग अशा समाजातील 'वेश्याप्रवृत्तीपेक्षा' त्या रेड लाइट एरिआमधील 'अधिकृत' वारांगना पटीने पवीत्र वाटतात.

दुर्गा देवीचा उत्सव नवरात्र सुरू आहे. दुर्गा देवीची मातीची मुर्ती तयार करताना त्या मातीत वारांगनांच्या वस्तीतील थोडी माती मिसळली जाते. पश्चिम बंगालमधील कुंभार वेश्यावस्तीतुन माती आणुन त्यापासुन दुर्गा देवीची मुर्ती तयार करतात. कारण Durga is an eternal mother of the universe & these commercial sex workers representing procreation. पण या वारांगनाचं म्हणनं असतं "हमारे यहॉं की मिट्टी मॉ दुर्गा को चलती है पर समाज को नही."

पायातील वाहणसुद्धा एअऱ कंडिशन्ड शोरूम्समधुन विकली जाते. पण ते म्हणतात ८३ लक्ष योनीनंतर मनुष्य देह प्राप्त होतो, तो मनुष्य देह मात्र रस्त्यावर कवडीमोलात विकला जातो. हे आपल्या समाजाचं विडंबन.

गौरांगप्रभुंनी पिंगळा नामक वेश्येचा उद्धार केला.परंतु या अहिल्यांचा उद्धार करण्यासाठी राम कधी येणार याचे उत्तर त्या दुर्गा देवीलाच माहित.

(१४ ऑक्टोबर 2007, लोकसत्ता)

-अभिजित पानसे

Wednesday, 27 December 2017

"सोनम गुप्ता" :- सोशल मीडियाचा दुरूपयोग

"सोनम" हे काही फक्त कोण्या हिंग लावुन न विचारणाऱ्या पेज थ्री  अभिनेत्रीचंच नाव असू शकतं असं नाही,
ते एका सर्वसामान्य घरातील मुलीचही नाव असू शकतं. असणारच.
'गुप्ता' आडनावाचे देशभरात सर्व सामान्य लोक ही असू शकतात!महाराष्ट्रातही!!आहेच.

मुळात "सोनम गुप्ता" नावाच्या मुली, स्त्रीयाही असू शकतात.असणारच!

अश्यावेळी सतत त्या नावावरून थिल्लर जोक्स करून ते व्हायरल करणं ही सामाजिक आणि नैतिक विकृती आहे.

कोण व्यक्ती कसल्या स्वभावाचे असू शकतं याची कोणाला कल्पना नसते. मृदू , हळव्या स्वभावाची मुलगी स्त्रीच्या किंवा तिच्या कुटुंबियांच्या मनावर या सर्व थिल्लर विनोदाचा किती वेगळा वाईट परिणाम होऊ शकतं याची कोणाला कल्पना केली आहे का? ज्या प्रकारे यावर जोक्स सुरु आहेत हे असंच सुरु राहिलं तर पुढे 'या नावाच्या " व्यक्तींना घरातून बाहेर पडणं कठिण होऊन जाईल!

दुसऱ्याच्या जखमांवर खिल्लीच्या चोचा मारणारे #गिधाडं हजारो लाखोंनी अवतीभवती असतातच.ते लोक "या नावाच्या " मुलींचं जगणं दुष्कर करतील.

 एरवी गंमती, विनोद,खिल्लीउडवणे,शाब्दिक चिमटे घेणे घ्यायला पब्लिक फिगर्स,राजकारणी, सेलेब्स, आजूबाजुची परिस्थिती, होणारे बदल  आपल्यासाठी आहेच.कारण त्यांच्यावर यांचा काहीही परिणाम होणार नसतो.

पण ज्या नावाच्या मुलींना ,स्त्रीयांना बघितलही नाही.त्यांच्यांवर असले जोक्स पसरवुन त्यांची "बदनामी "करणे सामाजिक नैतिक  गुन्हाच आहे.

आणि याला "सेन्स ऑफ ह्यूमर" समजणाऱ्यांसाठी त्याच्या नावावर खपवणाऱ्या  लोकांना फक्त दया भाव दाखवायला हवा!

आता तर कोण्या विकृताने "सोनम गुप्ते" या मराठी नावाचं फेक अकौंट सुरु करून एका खऱ्याखुऱ्या स्त्री चा फोटो ही अपलोड केलेलाय!
मुलींच्या नावांनी फेक अकौंट उघडून त्यावर स्त्री,मुलीचा फोटो ठेवणे म्हणजे पूर्णपणे विकृतीच वाटते!हे लोक मानसिकरित्या नपुंसक असतात!

विचार करा आज सोनम गुप्ता नावाने जोक्स सुरु आहेत .उद्या तुमच्या आपल्या आई,बहीण मैत्रिणींचे नाव असलेले जोक्स होतील.तेव्हा परिस्थिती फक्त हसत असेल.

सोशिअल मीडिया द्वारे आधीच बरीच विषारी भावना पसरवल्या जाताहेत त्यात अश्या थिल्लर विनोदामुळे कोण्या अनोळखी मुलींची आणि तिच्या घरच्यांची बदनामी  करायला नको!
शाकाहारी ,मांसाहारी जोक्स, विनोदांसाठी हजारो आजूबाजूला 'विषय'आहेत. विनोद करणे टर उडवणे ही नैसर्गिक प्रवुत्ती. पण कोणाची चुकी नसताना अशी बदनामी नको! एरवी स्त्री दक्षिण्याच्या गप्पा आणि आता असली विकृती!

नाहीतर उद्या या दुधारी तलवारीची आतील धार ती तलवार चुकीच्या पद्दतीने वापरणाऱ्या व्यक्तीचा गळा चिरल्याशिवाय राहणार नाही.

 सामाजिक आणि नैतिक जाणीव ठेऊन सर्वांनी हे जोक्स व्हायरल करणं, लाईक करणं आता बंद करायला हवं. हा संदेश जास्तीत जास्त पसरायला हवा!

-अभिजीत पानसे.

पाम्पोर केशराचं ठिकाण, धुसमसणारं

पाम्पोर PAMPUR

12 सप्टेंबर 2016

आज काश्मिरमध्ये पांपोर येथे आतंकवाद्यांविरूद्ध मोहिम सुरू आहे.पांपोर नाव ऐकलं मन एक वर्ष मागे गेलं.जगात फक्त इराण ,स्वित्जर्लंड आणि भारताशिवाय एक दोन ठिकाणीच केशर Saffron तयार होतं.भारतात केसर फक्त काश्मिरला होतं हे बऱ्याच जणांना माहितिये.

पण केशर पुर्ण काश्मिरमध्ये नाही तर फक्त #पांपोर या खेडे गावीच उत्पादीत होतं.

काश्मिर खोऱ्यात ट्रेन चालते हे बऱ्याच जणांना माहिती नाही.कारण जम्मु नंतर आता उधमपुर हे उत्तर रेल्वचं शेवटचं स्थानक आहे.

 बनिहालहुन ट्रेनने भारतातील सर्वात लांब जवाहरबोगदा पार केला की आपण खोऱ्यात प्रवेश करतो. श्रीनगरच्या तेरा किमी अलिकडे पांपोर हे छोटंसं रेल्वे स्थानक लागतं.
हा फोटो मी माउंटेनियरिंगचा कोर्स करून परत येताना  ट्रेनच्या खिडकीतुन काढला होता.

हे अगदी छोटं गाव आहे.तेथिल केसराची शेती दिसते.ती बघताना वेगळ्याच देशात आल्याची भावना होते.
वर्षभरात फक्त दोन ते तीन महिने कालावधी असतो.अप्रतीम सुंदर असे छोटे जांभळे फुलं येतात.पोर्णिमेला रात्री फुले व परागकण, stigma चमकतात!!
त्या फुलांना वाळवुन त्यातुन केसराच्या काड्या मिळतात.

भारतातील एकमेव केसर उत्पादनाचं ठिकाण म्हणजे पांपोर!!
पण आतंकवादामुळे हे सुंदर केशराचं गाव आज  रक्ताने लाल होतंय.

आई बाबा मला मारू नका


ऑक्टोबर 2006 लोकसत्ता

10 ऑक्टोबर 2016

 * आई बाबा मला मारू नका *

आज पुन्हा उल्हासित सकाळ झाली !!आई बाबांनी मला गुडमॉर्निंग केल्याने मला जाग आली!सध्या माझ्या घरचे सगळेजण माझ्यामुळे खूप आनंदात उत्साहात आहेत!

बाबांना तर काय करू काय नाही असे झालेय!बाबा ऑफिसला जायच्या आधी माझा पापा घेतात.दिवसातून कित्येक वेळा फोन करून माझी चौकशी करतात!आत्त थोड्यावेळापूर्वीच आईबाबांनी माझ्याशी खूप लाडिवाळपणे गप्पा केल्या!

आई माझी दिवसभर काळजी घेत असते.
 बाबांना तर काय करू काय नाही असं झालंय!आई बाबा रोज माझे खूप लाड करतात !मला जे हवं असतं ते मी त्यांना सांगण्यापूर्वीच ते मला खाऊ घालतात.

आई माझी दिवसभर खूप काळजी घेत असते!मला थोडाही धक्का लागू देत नाही!
ते माझ्यावर इतकं प्रेम करतात  की माझी कोणतीही इच्छा त्यांना ना सांगताच कळून जाते!
परवा मला आइस्क्रीम खावेसे वाटले तर बाबांनी ताबडतोब माझी इच्छा पूर्ण केलीसुद्धा!

आणि काल तर मज्जाच आली! संध्याकाळी बाबांनी घरी येताना खुपसारी खेळणी माझ्यासाठी आणलीत!संपूर्ण घर खेळ णया  नी भरलं!आईने म्हटलं "अहो कशाला....इतके सारे..?"
तेव्हा बाबानी आईकडे पाहून फक्त हसलेत व तिला शांत राहण्यास सांगितले...

खरंच कित्ती प्रेम करतात माझ्यावर!!

"अरे आजी आजोबा आलेत वाटतं!रोज सकाळी ते फिरायला जातात ना!फिरून आल्यावर माझ्याशी गप्पा करतात माझी काळजी चौकशी करतात!आजी आजोबांना तर आकाश ठेंगण झालंय सध्या!
माझी आजी तर आई आणि माझी दोघांचीही खूप काळजी घेते ,मला हवं नको ते बघते!
ती मला रामायणाच्या, शिवाजी महाराजांच्या छान छान गोष्टी ऐकवते!

आजोबा मला  रामरक्षा म्हणून दाखवतात!

या सगळ्यांचं माझ्यावरचं  प्रेम बघून मला खूप आनंद होतो मी कित्ती नशीबवान आहे

 मला इतका छान कुटुंब लाभले !खरंच किती प्रेमळ आहेत माझे आई बाबा आजी आजोबा !सगळेजण..!
मी खूप खूप सुरक्षित आहे इथे!

पण..पण.. आता मला राहवतच नाहीये!असं वाटतं आत्ता ,अगदी आत्ताच टुमकन उडी मारून बाहेर यावं....आणि सगळयांना प्रेमाने बिलगावं!!सगळ्यनाशी खूप बोलावं!

मग नाही तर काय!
" मी अजून माझ्या आईच्या पोटातच आहे ना!
मी माझ्या आईच्या  पोटातूनच बोलतेय तुमच्याशी!!

आईच्या प्रेमाची ऊब,बाबांची काळजी,अजीआजोबांचा उत्साह मला येथून जाणवतो! कारण मला सगळं कळतं!! मला सगळं कळतं!!
मी खूप सुरक्षित आहे इथे!इतके प्रेम करणारे व काळजी घेणारे आहेत जे माझ्याभोवती!!!

.............…......................................

आज पुन्हा सकाळ झाली....मला जग आली!!
पण हे काय..??कुठेतरी उदासीनता #जाणवतेय मला! रोज सकाळी बाबांच्या गुडमॉर्निंगने जागी होणारी मी,आज आईच्या हुंदक्यांमुळे जागी झाले!बाबा आईला काहीतरी कठोर शब्दात समजावून सांगत होते!

मी कान देऊन ऐकू लागले...!

"तू आजच डॉक्टरकडे जाऊन ये!
मला मुलगी नकोय!बरं झालं वेळच्या आत कळलं!...लवकरात लवकर सर्व आटोपायला हवं..मला मुलगी नकोय!!!!

माझ्यावर तर आभाळच कोसळले!!यांना.. यांना माझ्या येण्याचा काहीच आनंद झाला नाही का???मग माझ्या जन्मानंतर तरी मला हे स्वीकारतील का!मला कशी वागणूक देतील!माझा राग करतील का!!

आई हुंदके देऊन रडत होती.बाबा पुढे बोलू लागले..

"मला मुलगाच हवा आहे!माझ्या सर्व मित्रांना भावांना मुलंच आहेत!!
तू अबोर्शन करून घे!मी सर्व बंदोबस्त केलाय!!कोणाला काहीही कळणार नाही!!"

..............

आता मला भीषण परिस्थितीचा अंदाज आला आहे!!हेच का ते माझे आईबाबा जे माझ्यावर एवढं प्रेम करायचे! आणि मी मुलगी आहे कळल्यावर त्यांना माझा इतका तिटकारा यावा!!??
त्यांचे प्रेम क्षणात आटून तेथे तिरस्कार निर्माण व्हावा!आणि हे काय!!!!!
आजी आजोबा काय म्हणताहेत!!!!कमीत कमी ते तरी....!!!

"आम्हाला वंशाचा दिवा हवाय सुनबाई!" तू आजच गर्भपात करून घे!!आम्हला नातू हवाय नातू!!

आजी आजोबा ,बाबांनी मिळून सगळयांनी आईवर खूप दबाव आणला आणि शेवटी आईसुद्धा नाईलाजाने तयार झाली!..
माझ्या काळजात धस्स झाले!!आता मला वास्तव परिस्थितीची दाहक जाणीव झाली!
या लोकांना मी नकोच आहे तर!!

 मी फक्त आवडली नाहीये तर ते मला मारूनच टाकणार आहेत!!आता मला बाबांच्या 'बंदोबस्त' शब्दाचा खरा अर्थ कळला!कालपर्यंत मला जीव की प्राण समजणारे आजच माझ्याच जीवावर उठले आहेत....!! केवळ मी मुलगी आहे म्हणून???

इतके दिवस स्वतःच्या पोटात काळजीने प्रेमाने मला वाढवणारी माझी आई जिच्या हृदयाशी मी जोडल्या गेलेय

 तीच माझी आई स्वतःच्या पोटच्या गोळ्यालाच संपवणार आहे!!पण या सगळ्यात माझी काय चूक काय???
प्लिज आईबाबा मला मारू नका!!
तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का??
तुम्हाला माहिती आहे का मला इथून सर्व कळतंय!!

प्लिज आईबाबा मी तुम्हला विनंती करतेय मला मारू नका!!!!

#मला_सगळं_कळतंय_तुमचं!!

कालपर्यंत मला माझे वाटणारे आज हे सगळे जण मला अनोळखी दृष्ट वाटताहेत!या सगळ्यांमध्ये मी खूप एकटी आहे!मला खूप भीती वाटतेय!!!!मी खुप असुरक्षित आहे इथे!!खरच मी किती दुर्दैवी की मला अशा कुटुंबात जन्म मिळावा!!

तुम्ही लोक "देवीचं नवरात्र" साजरं करताय आणि तिच्याच रुपाला मारून टाकता आहात!!
माझ्या  काहीही चूक नसताना स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोक माझा जीव घेणार आहेत मग नकळतपणे माझ्या हृदयातून निघणाऱ्या शपवाणीमुळे यांचे कधीतरी भले होऊ शकेल का!!???

10 ऑक्टोबर 2006
लोकसत्ता
-अभिजित दिलीप पानसे

क्रिकेटमधील 'हेल्मेट'संबंधित चुकीचा नियम


23 सप्टेंबर 2016


क्रिकेटमध्ये Duckworth Lewis मेथड सोडल्यास सर्वच नियम हे पुर्णपणे योग्य आणि खेळासाठी पुरक आहेत.पण आज भारत न्युझिलंड टेस्टच्या दुसऱ्या दिवशी एक वेगळाच नियम कळला आणि जो खेळासाठी बिलकुलही योग्य वा  सकारात्मक नाही.

आज लंचनंतर; जडेजाच्या एका बॉलवर ओपनर लेथमच्या बँटला बॉल लागुन उडालेल सहज catch क्लोज इन फिल्डर  केएलराहुलने  पकडला.कँच करताना बॉलचा स्पर्श त्याने घातलेल्या हेलमेटच्या कापडी पट्टीला हलकासा स्पर्श झाला. ग्राउंड आणि थर्ड अंपायरने बँटस्मनला नॉटआउट दिले.

कारण तसा नियमच आहे हे आजच कळलं.

सिलीपॉइंट वा फॉरवर्ड शॉर्त लेग इ.जवळचे फिल्डर्स हे आधीच बॉल लागण्याचा ताणात असतात.
(फक्त भारतीय क्रिकेट टीममध्येच)नव्या खेळाडुंनाच तिथे लावलं जातं.

यापुर्वी हेल्मेट न घातल्याने अपघात झाले आहेत.
#रमणलांबा हा भारतीय खेळाडु याच जागेवर फिल्डींग करताना बॉल लागल्याने मृत्युमुखी पडला होता.
#साबाकरिमला हेल्मेट न घालता किपींग करताना डोळ्याला बॉल लागल्यान त्याचे संपुर्ण करिअर संपलं होतं.

हेल्मेट अत्यंत गरजेचच असतं या जागी फिल्डिंग करताना!!

पण असे नियम असल्यास कँप्टन तिथे खेळाडु ठेवायला टाळेल.
किंवा विना हेल्मेट कोणता खेळाडू तिथे उभा राहील?

टेस्ट क्रिकेटची शान असतात close in fielders!

हा नियम नक्कीच चुकीचा आहे.

पिंक प्लिज


21 सप्टेंबर 2016

पिंक कलर आजवर मुलींचीच टेरेटरी होती.पण गोष्टी आता पिंकलिप्स पर्यंतच मर्यादीत राहिल्या नाहीत!
 ढगाळलेल्या आकाशात संध्यासमयीच्या  संधीप्रकाशात एक गुलाबी रंग उमटतो.तो रंग बदलाची नांदी असतो दोन प्रहरांच्या!

हा गुलाबी रंग आता बदलाचा रंग होतोय.
बेबीपिंक रंग हा फक्त बेबींसाठीच राहिला नाही तर बाबुंसाठीही गरजेचा आहे.हे शुजितसरकारने नेहमीप्रमाणेच त्यांच्या इतरही उच्च क्रिएटिविटीजप्रमाणे दाखवुन दिलं आहे.

Pink is colour change now!
Change of rigid mentality n perspectives.

Time to go for a PINK!
A MUST WATCH MOVIE!!
Pink is for men now!

तिकडे टेस्ट क्रिकेटमध्येही पिंक हा बदलाची नांदी ठरतोय.
पारंपारिक रेड कलरला एक योग्य पर्याय म्हणुन पिंक बॉल चा वापर सुरू होतो आहे.
 नुकतंच दुलिपट्रॉफी मध्ये मोठे बदल दिसलेत. पिंकबॉलचा उपयोग आणि डे एन नाईट #टेस्टक्रिकेट.यांमुळे सर्वोत्तम क्रिकेट असलेल्या टेस्ट क्रिकेटमध्ये वेगळी उर्जा निर्माण होइल असं वाटतं.

याच मँच मध्ये #चेतेश्वरपुजाराने बिग डबल हंड्रेडही मारली आणि जडेजाने  fiveWickethaul घेतलेत.

हिरव्या ग्राउंडच्या,निळ्या आकाशाच्या आणि रात्रीच्या चकाकत्या फ्लड लाइट्स उजेडाच्या पार्श्वभुमीवर गुलाबी बॉल उठुन दिसतोय.
पुरूषांच्या जगात ,खेळात गुलाबीरंग बदल ठरतोय आणि घडवतोय.

Time to go Pink

-अभिजित पानसे

कुतुब मिनारवरील गणपती

*कुतुब मिनार चा विध्वंसीत गणपती*
एक धक्कादायक अनुभव( किमान माझ्यासाठीतरी)

इतर देशावर आपलं राज्य स्थापन करताना तेथील सांस्कृतिक , धार्मिक वास्तू नष्ट करत जाण्याला कोणी चुकीचं समजतात तर काही त्याला प्रक्रियेचा भाग म्हणतात.

संपूर्ण भारतात डोळसपणाने पाहिलं तर दिसेल आणि लवचिक विचारांनी अवलोकन केलं तर हे स्वीकारावच लागेल की आक्रमकांनी आणि नंतर त्याच राज्यकर्त्यांनी या अनेक जागा हिंदू धार्मिक स्थळांना नष्ट करून तिथेच  वास्तू उभारण्यात आले आहे. त्यावर आपापल्या धर्मातील काही वचन कोरले.

पण अनेक वर्षे एकच रंग असलेल्या भिंतीला दुसरा रंग फासला तरी काही काळाने आधीचा मूळ रंग कुठून तरी पृष्ठभागावर येतो.

संपूर्ण देशात असे अनेक विध्वंसित वास्तु दिसतात. ते बघताना लोक कधी तटस्थपणे , कधी हळहळत बघतात.  पण कधी जगविख्यात वास्तू बघताना , खरेतर फक्त सेल्फीज, ग्रुप फोटोज काढताना कित्येक गोष्टीकडे, मूळ रंग बाहेर आलेला याकडे साफ दुर्लक्ष होतं. आणि अनावधानाने त्या आधीच्या इतिहासाची पायमल्ली, अपमान करत जातात. तुडवत जातात.

मी 'कुतुबमिनार' बघायला भावासोबत गेलो होतो.मिनार आणि कॅम्पसचा भाग जबरदस्त सुंदर वाटला. अक्षरश: फोटोग्राफी पॅराडाईझ!
मी तर पूर्णतः हरवून गेलो ते सारं बघताना आणि त्याचं कौतुक करताना!

तिथला सुप्रसिद्ध #लोहस्तंभ बघतांना समोर लक्ष गेलं तेव्हा एक दोन यंग मुलं बुटांना लागलेली माती जवळच्या कलाकुसरच्या पुरातन शिल्पकामातुन वेगळी झालेल्या एका शिळे ला पुसत होते.
हे फक्त आपल्याकडेच होउ शकतं.ते पाहुन मित्राला म्हणालो हे बघ ते **** काय करताय!

थोडया वेळात सर्व परिसर , कुटूंब मिनारची सुंदर वास्तुकला बघत तिथे पोहोचलो.आजूबाजूचं इतकं अप्रतिम काम आहे की खालील त्याच बांधकामापासुन वेगळ्या झालेल्या 'त्या' शिळे कडे कोणाचंही सहसा लक्ष जात नव्हतं.जात नाही.लोकं त्यावर बसत होते.त्यावर उभे राहुन फोटोज काढत होते.

मला तो भाग दिसला तसा प्रचंड आश्चर्याचा सुखद आणि दुःखद धक्का बसला!
कारण स्पष्टपणे त्यावर 'गणपती' कोरलेला दिसत होता!

पण माझा 'देऊळ' मधील औदुंबरावरील ओरखड्यांमध्ये दत्त बघणारा भाबडा गावकरी होऊ नये म्हणून मी अनुरागला ला जोरात आवाज दिला कारण त्याला असल्या गोष्टीत ,सोशिअल थिंग्स, पुरातन वास्तुकला, यात काहीही रस नसल्याने आणि त्याचा आस्तिकता वगैरे शी दूरदूर संबंध नसल्याने मी त्याला बोलावलं.
 तो एका जापनिज मुलीशी बोलण्यात मग्न होता.
तो आल्यावर त्याला दाखवलं तर तोही आश्चर्यचकित होउन उद्गारला " **  हा तर गणपती आहे!इथे कसा काय?"

मग मी आजुबाजुला नीट लक्षपुर्वक बघु लागलो तर आजुबाजुला कित्येक खांबांवर हिंदु मंदिरांवर असते तसं कार्विंग्स..कलाकुसर शिल्पकला दिसु लागली.

आणखी धक्का बसला त्याच खांबावर एक कंबरेवर हात असलेलं  पांडुरंगाचं शिल्प दिसलं.
पण दक्षिणेतला विठ्ठल इथे उत्तरेकडे कसा! हा प्रश्न पडला.तेव्हा क्लीक झालं की हे विठ्ठलाचं नाही तर नरसिंहाचं आहे.मांडीवर झिज झालेला हिरण्यकश्यपु दिसतो.

कारण पुर्वी मंदीरांमध्ये 'दशावतरांचे' शिल्प कोरलेले असायचे.

मला कुतुब मिनारासम्बंधीची ही बाजू बिलकुलही माहिती नव्हती.सर्वप्रमाणेच मीही या मिनारला मुघलांची कलासक्ती आणि देण समजयचो. किंबहूना ती आहेच. पण हा मिनार हिंदू वास्तू विध्वंसित करून निर्माण केला आहे याची कल्पना नव्हती. त्यामुळे तो मोठा धक्का होता.

नंतर माहिती शोधली तेव्हा कळलं कुतुबुद्दीन ऐबकने आणि त्याच्या नंतरच्या पिढीने;कुतूब मिनार आहे तेथिल २७ हिंदु आणि जैन मंदिरांचा विध्वंस केला आणि तिथे हा मिनार उभारला.

मुघल राज्यकर्त्यांचा हा विध्वंस किंवा स्ट्रेटजी संपुर्ण भारतात दिसते.अगदी नागपुरजवळील छोटंसं गणपतीचं ठिकाण आदासा तिथेही कित्येक मुर्ती धडापासुन खंडीत केलेल्या दिसतात.मथुरेतील राजस्थानी लाल दगडांचं अप्रतिम सहा मजली मंदीराचा औरंगजेबाने विध्वंस केला होता. जे आताही बघण्यासारखं आहे. त्यावरून आधी ते किती सुंदर असेल याची कल्पना करता येते.

हे फोटोज विद्वेष पसरवायला नाही तर खरा इतिहास आणि भारतीय पुरातन संपन्न वास्तुकला, लिगसी लोकांपर्यंत पोहचावी आणि समजावी यासाठी.

जेव्हा मी अनुरागला हे सगळं कुतूब मिनारासहित सांगितलं तेव्हा त्याच्यासारखा फक्त गॅजेटफ्रिक ही  आश्चर्यचकित होउन बोलला "साला माहिती नव्हतं बे हे !या नंतर कधी कोणासोबत कुतूब मिनारला आलो तर हे गणेश कार्विंग नक्की दाखवीन! **** इतर मित्रांनाही सांगतो!

भारतीय पुरातन वास्तुकला,ग्रंथालये हे खूप अद्वितीय होते.आक्रमकांनी, राज्यकर्त्यांनी त्याचा सतत फक्त देशभर विध्वंस केला. हे अश्यावेळी दिसून येतं. मग एकतर तटस्थपणे फक्त बघता येतं किंवा हळहळता येतं.

पण दुर्लक्ष केल्यामुळे , फोटोज मध्ये गुंग असल्यामुळे मात्र त्या शिळेवरील दुर्लक्षित गणपतीला मात्र लोक पायाने तुडवतात. बसतात, शु लेस बांधतात. याकडे तटस्थपणे बघायचं , हळहळ व्यक्त करायची की दुर्लक्ष करून समोर जायचं ही ज्याची त्याची विचार प्रक्रिया.

-अभिजित पानसे

आयपीएल फायनल वरून 'बावळट' राडा


21 मे 2007

 मी खूप गांभीर्याने आजच्या आयपीएल फायनल मध्ये पुणे किंवा मुंबई ला सपोर्ट करणार आहे कारण प्रत्येक खेळाडू त्यांना मिळणाऱ्या धन राशीचा अर्धा भाग महाराष्ट्रातील जल शिवार योजनेसाठी, रस्ते दुरुस्ती, पाटबंधारे विभागाला देणार आहेत.

मुंबई इंडियन्स चे खेळाडू मिठी नदी स्वच्छतेसाठी आणि येऊ घातलेल्या पावसाळ्यात आपल्या लाडक्या शहरवासीयांना त्रास नको म्हणून नाले, गटारे सफाई साठी रक्कम देऊन "करून दाखवलं" म्हणणार आहेत.

पुणे जायंट्स खेळाडू पुण्यात मेट्रो आलीच पाहिजे चे नारे देत सरकारी कामकाज पाहता स्वतः कमावलेल्या रक्कमेतून मेट्रो निधी उभारणार आहेत.
हे सगळं ते करणार आहेत कारण
कारण दोन्ही टीमच्या विदेशी खेळाडू आणि इतरही OMS खेळाडू पैश्यांसाठी खेळत नसून मराठी माणसाच्या 'जाज्वल्य' अभिमानाठी खेळताहेत. माहिनाभर मराठी मातीत खेळून " छाती ला माती" लावून , मराठी संस्कृतीचा अभ्यास केला आहे ते पूर्णतः मराठमोळे झाले आहेत.

 राखीव दिवसात स्टीव्ह स्मिथ आदी विदेशी खेळाडू पुण्यात ज्ञान प्रबोधिनीत जात. वसंत व्याखान मालेतील सर्व व्याख्याने त्यांनी ऐकलीत.
स्टीव्ह स्मिथ , डु प्लेसिस , मिचेल मार्श यांना आळंदीमध्ये गोपीचंदन लावून ,वासुदेवाच्या वेशात टाळ वाजवत बघितल्या गेलंय.

'मुंबईचा' पोलार्ड तर रात्री मुंबईत पायी फिरून आपल्या मुम्बैवासीयांचे दुःख जाणून घेतो आणि तिथल्या तिथे आर्थिक मदतही करतो. हां कधी तो फोरस रोडवर दिसतो पण तिथे तो फक्त मसाला पान खायला जातो. असं म्हण्टात.

 स्टीव्ह स्मिथ ने मराठी आपली प्रथम भाषा मानायला लागले आहेत आणि ऑस्ट्रेलियात सिडनी आणि मेलबर्नमध्ये मराठीचा प्रचार ,प्रसार करण्यासाठी मराठी संस्कृती केंद्र उघडणार आहे. तसेच प्रमाण मराठी भाषेचा प्रसार करणार आहे.

इतकच नाहीतर स्टीव्ह स्मिथने आणि केरन पोलार्ड यांनी पुणे , मुंबई कचेरीत ऍफेडेवीट करून आपापले नावं बदलून अनुक्रमे " सतीश् सोनारे " आणि "किरणराव पोलार्डेकर ही नावे वापरायला सुरवात केली आहे.

किरणराव पोलार्डेकर चाही वेस्ट इंडिजमध्ये "मराठी सांस्कृतिक मंडळ " काढण्याचा मानस आहे पण वेस्ट इंडिजच्या जमैका की त्रिनिनाद कोणत्या बेटावर मराठी भाषा केंद्र उघडावे या गोंधळात आहे. लवकरच तो ; मागील महिन्यात एका मराठी वर्तमानपत्रात गाजलेल्या प्रमाण मराठी भाषेवरील लेखाला आणि स्टीव्ह स्मिथ उर्फ श्री सतीश सोनारे यांना प्रत्युत्तर देणार आहे.

सर्व विदेशी खेळाडूंना चुलीवरील मटन, कोंबडी वडे इतके आवडले की मराठी आचाऱ्याला ते सोबत नेणार आहेत. यानंतर चुलीवरील बर्गर , चुलीवरीलपिझ्झा, पास्ता त्यांना खाण्याची इच्छा आहे.

सर्व विदेशी खेळाडूं सकाळी उठून तुकाराम महाराजांचे अभंग गातात , मुंबईचे खेळाडू पसायदान म्हणतात.

डुप्लेसिस आणि मार्शची मोबाईल कॉलर ट्यून " मराठी पाऊल पडते पुढे"..'' वेडात वीर दौडले एकसाथ.."
तर मिचेल जॉन्सन ची " जय जय महाराष्ट्र माझा..." ही आहे . #लासीथमलिंगा ने मात्र खास "अजय अतुल" कडून  " रम्य ही स्वर्गाहुनी मुंबा...." हे गाणं रेकॉर्ड करून घेतले आहे. तीच त्याची कॉलर ट्यून आहे.

शिवाय सतीश सोनारे पूर्वाश्रमीचे स्टीव्ह स्मिथ प्रत्येक वेळी टॉस नंतर, मॅच सुरु होताना मैदानावर प्रेझेन्टेशन मध्ये, जय शिवाजी जय भवानीची आरोळी देतात!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजची फायनल मुंबई इंडियन्स चे सर्व खेळाडू 'मुंबईचा डबेवाल्याच्या " पेहरावात खेळणार आहे.

सतीश सोनारे aka स्टीव्ह स्मिथ यांनीही "पुणेरी पगडी" घालून खेळण्याचा हट्ट केला पण काही सामाजिक संघटनांनी यात सतीश सोनारेंचा ब्राह्मणी कावा असल्याचे सांगून विरोध केल्यावर तो रद्द केला .शिवाय पुणेरी पगडी धावताना कधी ही पडू शकते हे ही त्यांना जाणवलं.

जस्टीन बार्बर च्या एका दिवशीच्या कार्यक्रमावरून, तिकिटांचे दरावरून मी टीका केली , हे पैसे शेतकऱ्याना द्यावे वगैरे ठेवणीतले कार्ड वापरले पण दरवर्षी लाखो रुपये विदेशी खेळाडुना इथे दिले जातात , मी दरवर्षी तिकिटे काढून आयपीएल मॅचेस बघतो कारण या दोन टीम्समध्ये जाज्वल्य मराठी अभिमान आहे शिवाय या दोन्ही टीमचे खेळाडू पूर्णतः मराठी संस्कृतीमय झाले आहेत आणि सामाजिक कामात ते मदत करतात.
तेव्हा आज मी ज्या माझ्या आवडत्या टीमच्या विरुद्ध टीमच्या सपोर्टर्स ची खूप टिंगल टवाळी करणार!
कारण तो "माझ्या" शहराच्या इभ्रतीचा प्रश आहे!!!

मुंबई इंडियन्स आणि पुणे जायंट्स या टीम चा खरच माझ्या आवडत्या मुबई आणि पुणे शहराशी  संबंध आहे हा या त्रिकालाबाधित सत्यावर माझा डोळे मिटून विश्वास आहे.

माझ्या आवडत्या शहराचं नाव असलेल्या टीमला मी सपोर्ट करिनच शिवाय विरुद्ध टीम च्या समर्थकांची शाब्दिकरित्या खांडोळी खांडोळी करेन!!

आणि हो मी अत्यंत हुशार व्यक्ती आहे.

जय हायपीएल
जय मुम्बै
जय पुणे
जय 'श्रीकिरणरावपोलार्डेकर'!! जय म्हाराष्ट्र

- अभिजित पानसे

शिवाजी महाराज , दक्षिणेतील मंदिरे आणि महाराष्ट्र



मागे एका दाक्षिणात्य मित्राने उपहासाने म्हटलं होतं ,"आमच्याकडे किती प्रचंड मोठे सुंदर मंदिरे आहेत.तुमच्या महाराष्ट्रात काहीही नाहीत.फक्त खूप भग्न अवशेषच आहेत!"
त्याला सांगितले ,जेव्हा उत्तरेपासून मध्य भारत ,कर्नाटक दक्षिणेपर्यंत मुघलांचे आणि इतर पातशहांचे साम्राज्य पसरले होते.पसरत होते.तेव्हा केवळ महाराष्ट्रात या गुलामगिरीविरुद्ध एक ताठ कण्याचा राजा उभा राहिला.स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून येथील प्रजेला आश्वासित केले.त्यामुळे स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या मातीत संघर्ष झाला.म्हणून  येथील मंदिरे ,वास्तू उध्वस्त करण्यात आलीत. अनेक युद्ध महाराष्ट्राने छातीवर झेलली कारण "शिवाजी महाराजांनी "या मातीतल्या माणसात स्वाभिमान, आणि स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवले.

जेथे हाडाचे लढवय्ये #राजपूत सुद्धा मुघलांची 'जी हुझूरी 'करत होते तेथे शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर कोणत्याही पातशहाची जहागिरी स्वीकारून आरामात आजन्म चाकरी करू शकले असते.पण त्यांनी संघर्षाचा, आत्मसन्मानाचा ,स्वराज्याचा मार्ग स्वीकारला.म्हणून इथल्या मातीत मोडेन पण वाकणार नाही ही कडवी वृत्ती निर्माण झाली.

महाराष्ट्रात शिवाजी जन्मला आणि लढला म्हणून मुघल दक्षिणेकडे संपूर्ण शक्तीनिशी आणखी सरकू शकले नाही.निजामशाही ,आदिलशाही बुडाली,मुघलांची सर्व शक्ती महाराष्ट्रात शिवाजी महाराजांमुळे खर्ची पडत गेली.म्हणून #तामिळनाडू ,केरळ वाचलेत.
महाराष्ट्रने स्वतःच्या छातीवर वार झेलून एकप्रकारे टोकाच्या दक्षिणेकडील राज्यांचे रक्षण केले.आणि तेथील वास्तूंचे, अवाढव्य अप्रतिम मंदिरांचे रक्षण झाले.

महाराष्ट्रातही सिन्नरचे गोंदेश्वर, खिद्रपूरचे कोपेश्वर, बदलापूरचे अप्रतिम असे स्थापत्त्यपूर्ण वास्तु, मंदिरे आहेत. आणि जे हजारो उध्वस्थ मंदिरे, वास्तू अवशेष आहेत ते योध्याच्या अंगावरील युद्धातील जखमेचे व्रणाप्रमाणे आहेत.

लोक दक्षिणेकडील मंदिरांचे कौतुक करतात.पण त्यामागे अप्रत्यक्षरित्या शिवाजी महाराजांचे ,महाराष्ट्राचे कर्तृत्व आहे हे लक्षात येत नाही.

जय शिवाजी !

- अभिजित पानसे

Tuesday, 26 December 2017

सुमोना चक्रवर्ती ..सिगरेट..वायरल व्हिडीओ

27 जुलै 2016

काही दिवसांपासुन दैनिक भास्करच्या अॅपवर सुमोना चक्रवर्तीची एक न्युज फिरतेय "देखिए कपिल शर्माके कॉमेडी शो की बिवी के सिगरेट पिते हुए व्हिडीयो.. फोटोज!"

मिडीयाच्या आणि आपल्या प्रेक्षकवर्ग समाजाच्या घसरलेल्या जाणिवेचं; अभिरूची;मानसिकतेच्या स्तराचं हे एक उत्तम उदाहरण.

सुमोना चक्रवर्ती स्मोकिंग करो वा दारू पियो...ती तिची वैयक्तिक बाब आहे.जोवर ती पब्लिक प्लेसमध्ये उघडपणे हे करत नाही.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती सार्वजनिक स्थळी सिगरेट ओढत नाहीए.
सेटवर कोण्या मुर्खाने लपुन ते शुट केलं आहे.

फक्त ती "स्त्री" आहे आणि पब्लिक फिगर; सेलिब्रिटी आहे म्हणुन त्याची असली स्वस्त न्युज करायची!!!
Sheer disgusting!

पुरूष सिगरेट दारू ड्रग्स काहीही करो ते नॉर्मल मानलं जातं.पण तेच स्त्रीने केलं तर त्याची आंबट बातमी करायची!!
वाचक प्रेक्षक गोळा करण्याची स्वस्त न्युज!!!

ती किंवा कोणीही actor  actress सार्वजनिक ठिकीणी सिगरेट ओढताना आढळला असता तर ती न्युज नक्कीच झाली असती!

मुख्य म्हणजे इतर न्युज चॅनल्स हे एकता कपुरच्या  डेली सोपसारखे उथळ आणि कर्कश झालेले आहेतच पण दैनिक भास्करसारख्या ब्रँन्डेड वर्तमानपत्रानेही अश्याप्रकारे खालच्या दर्जावर जावं!
फक्त एक स्त्री आहे म्हणुन ती न्युज करावी!!

 टिआरपी के हमाम मे सब नंगे!

पण ते असं करू शकतात कारण त्यांना भारतीय पुरूषांची ..समाजाच्या मानसिकतेची जाणिव आहे.

हिरोज ने सिगरेट ओढत इंटरव्यू केला तरी तो कूल ठरतो पण फिमेल एक्ट्रेसने ने सिगरेट ओढली तर ती आंबट बातमी!!

(त.टी.-इथे स्मोकिंगला पाठिंबा नाही.मी आजवर एकदाही स्मोक केलेलं नाही.
फक्त एक स्त्री त्यातही सेलेब आहे म्हणुन त्याची न्युज करावी.याचा धिक्कार!
SMOKING IS INJURIOUS TO HEALTH)

Monday, 25 December 2017

मी निवासी अभारतीय


26 जानेवारी 2008, सोमवार

''मी निवासी (अ)भारतीय''

 परवा काॅलेजमध्ये फाइन न भरावा लागावा फक्त याकारणासाठीच प्रजासत्ताक दिनी झेंडावंदनाला गेलो.

नाहीतर घरीच 'नॅशनल हाॅलीडे ' मस्त बिछान्यात व टीव्हीसमोर एन्जॉय करण्याची इच्छा होती, असा मी अभारतीय.

 पण सकाळी व्हाइट कुर्ता, ब्लु जिन्स घालून, इतरांना हाय... हॅलो करत रांगेत लागल्यावर जेंव्हा ध्वजारोहण झाले, तालबद्ध राष्ट्रगीत म्हटलं गेलं, तेंव्हा मात्र नकळत अंगावर रोमांच उठले. छाती ताठ झाली. माझ्यातील लयास जाऊ पाहणारे 'भारतीयत्व' पुन्हा उचंबळून आले.

 'प्रोग्रॅम' संपला. सर्व फ्रेंड्सना बाय करून घरी आलो. वाटेत चौकातले सिग्नल्स
'समथिंग अँडव्हेंचरस' म्हणून तोडले, कायदे सहज धुडकावले, शेवटी मला भारतीय नियम कायद्यांशी काय देणं घेणं?
मी तर फक्त निवासी भारतीय, मनाने तर अभारतीयच.

 थिएटरमध्ये मुव्ही बघायला जातो, मुव्ही सुरू व्हायच्या आधी 'राष्ट्रगीत' होतं. भल्या मोठ्या शुभ्र पडद्यावर राष्ट्रध्वज डौलाने हवेत फडकताना दिसतो. तेंव्हाही अशाच भावना उचंबळून येतात. अंगावर रोमांच दाटतात. शेवटची धुगधुगी लागलेले माझ्यातील 'भारतीयत्व ' तात्पुरती चेतना मिळून माझ्यातील अभारतीयत्वावर स्वार होते. मी तेंव्हा 'सेंटी' वगैरे होतो.
'काँर्नर सीटवर' बसलेली माझी गर्लफ्रेंड मला म्हणते, "हे, व्हाॅट हॅपन्ड? डोन्ट गेट सो सेन्टी अोके! .. कम आॅन.. गेट ओव्हर इट यार.. !".
मग मी पुन्हा ''ताळ्यावर'' येतो. असा मी एक निवासी भारतीय!

कामानिमित्त किंवा काही अपरिहार्यतेने भारताबाहेर स्थायिक झालेले एनआरआय 'नाॅन रेसिडेन्शियल इंडियन्स' तिथेही सातासमुद्रापार राहून आपले 'भारतीयत्व' जपण्याचा प्रयत्न करतात. मात्र मी व माझ्यासारखेच भारतात राहून फक्त भारताला क्षुद्र व तुच्छ लेखतात.

विदेशात असताना भारतभूमीच्या आठवणीन व्याकुळ होऊन सावरकरांनी म्हटले 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ' मी मात्र मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर बसुन पश्चिमेकडे डोळे लावून 'ने मजसी ने अमेरिकेला, सागरा प्राण तळमळला' असं आळवतो.

 पण कधी मीच अंतर्मुख होतो, माझ्या बदलत्या मनोवृतीवर चिंतन करतो तेंव्हा पुन्हा एकदा माझं भारतीयत्व उचंबळतं. स्वतःचीच लाज वाटते, कधी तिरस्कारही वाटतो.

 भारताबाहेर सेटल होण्याचं स्वप्न गैर नाहीच, पण स्वतःच्या देशाबद्दल, त्याच्या प्रश्नांबद्दल अलिप्तता ठेवण्याच्या माझ्या वृत्तीचा मात्र मलाच कधी कधी संताप येतो.

 माझ्यासारखेच इतर 'निवासी अभारतीय ', आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट ज्ञान असलेले ब्राइट जेनरेशन असतीलही, पण आमच्यामध्ये आपण समाजाचं, या देशाचं काही देणं लागतो ही भावनाच नाही. असे वेल एज्युकेटेड, उच्च बुद्ध्यांक असलेले आम्ही 'महानिर्बुद्ध'... 'रेसिडेन्शियल नाॅन इंडियन्स '!

परवा काॅलेजमधला 'रिपब्लिक डे'चा प्रोग्रॅम संपवुन कट्ट्यावर थांबलो तर तिथला प्रसंग धक्कादायकच. अॅन आय ओपनर!

काही तरूण तरूणींचा घोळका जमलेला, त्यांच्यात चर्चात्मक वाद सुरू होता. एका पोनी टेल टॅटु काढलेल्या मुलाला राष्ट्रगीत अर्धवट येत होतं. पुढचं 'कडवं' कोणतं यावरून वाद!

 सगळेजण कोल्ड्रिंक्सच्या घोटाबरोबर स्वतःचा 'अंदाज' व्यक्त करत होते. माझंच बरोबर म्हणून त्यावर 'बेटिंग' सुरू.

मीही मुद्दाम मनातल्या मनात पूर्ण राष्ट्रगीत आठवून पाहू लागलो, त्यांना मदत करावी म्हणून..

 पण हे काय..? मला स्वतःलाच पूर्ण राष्ट्रगीत आठवत नव्हते ! मला माझीच चीड, तिरस्कार, लाज वाटू लागली.

शाळा सोडल्यापासून वर्षातून दोनवेळाच आमचा आणि राष्ट्रगीताचा संबंध येतो ना!

 मला एकदम आठवलं, कॉलेजमध्ये रोज 'राष्ट्रगीत' म्हणणे कॉलेजने कम्पल्सरी केल्याबद्दल, त्याच्या विरोधात 'संप' पुकारण्यात मीच आघाडीवर होतो.

तेवढ्यात दुसरीतल्या शाळकरी मुलाने येऊन त्यांची 'चूक' दुरूस्त केली. त्याक्षणी तो सच्चा भारतीय शाळकरी मुलगा आमच्याहून लाख पटीने महान भारतीय  होता!

 भारतीय घटनेने मला दिलेला 'मतदानाचा' अधिकार म्हणजे माझ्या दृष्टीने केवळ वेळेचा अपव्यय! आयुष्यात मी कधी मतदान करणार नाही, पण कट्ट्यावर बसून इतरांसोबत "इस देश का कुछ नहीं हो सकता.. क्या रखा है इस देश में! "
असली वायफळ बडबड मात्र करणार.

 रस्याने जाताना कुठला सार्वजनिक नळ चालू जरी दिसला तरी तो बंद करायचे कष्ट मी का घेऊ? मला काय त्याचे? माझ्या देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे? असा मी तिरस्करणीय, युजलेस 'रेसिडेंन्शियल नाॅन इंडियन'!

 हां! भारत पाकिस्तानला तुडवत ट्वेंटी -20, वर्ल्डकप जिंकतो तेंव्हा..
पर्थवरील फास्टेस्ट पिचवर जेंव्हा माझी भारतीय टीम आस्टेलियाची मस्ती जिरवते तेंव्हा माझा सो काँल्ड 'इंडियनिजम' उगाच उचंबळून येतो.

काही दळभद्री विघ्नसंतोषी समाजकंटक कुठल्या मूर्तीचा अपमान करतात तेंव्हा दुकानांची तोडफोड करण्यात, जाळपोळ करण्यात, दगडफेक करण्यात मीच तर आघाडीवर असतो. त्या क्षणी मी माझ्या देशाच्या संपत्तीचे अतोनात नुकसान करतो. कुठल्या समजामुळे त्याच्या प्रक्षोभक भावनांनी पेटून माझी तारुण्याची उर्मी मी विध्वंसक कार्यात उपयोगी आणतो. ते समाजकंटक तिकडे आमच्या मूर्खपणावर हसत असतात. माझ्या अश्या विध्वंसक कृत्यामुळे देशाची 'अर्थव्यवस्था' कोसळते... जाळपोळीने हजारो निष्पाप जीव भरडले जातात, पण मी हातात तलवार घेऊन रस्यावर उतरत फक्त विध्वंसच करतो, असा मी पूर्णतः एक देशद्रोही अभारतीय!

     ज्या देशात सेटल् व्हायच स्वप्न पाहतो, त्या देशातील नागरिक मात्र त्यांच्या देशाची प्रामाणिक असतात हे, मला का कळत नाही? ते त्यांच्या देशाच्या प्रतिमेबाबत नेहमीच जागरूक असतात. मात्र आम्ही इथे दारुच्या नशेत तर कधी पूर्ण जाणिवेत विदेशी महिलेचा, अतिथींचा बलात्कार करतो!

 आणि जगभरात आमच्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे नाव खराब होते. देशातील कीड, भ्रष्टाचाराचे मूळ आम्हीच, असे निवासी अभारतीयच!

    'वंदे मातरम् ' हे काही कुठले ईश्वरी गीत नाही किंवा कोण्या विशिष्ट धर्माचे स्तुती गीत नाही. ते माझ्या देशाचे गीत आहे, ज्या गीताने मला, आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते हे गीत! या गीताला मीच 'देशद्रोही', भारतात राहून अभारतीय असणारा विरोध करतो.

मी निवासी अभारतीय हीन दर्ज्याच्या राजकारणापोटी आतंकवाद्यांच्या फाशीला विरोध करतो.

सोशिअल मिडीयावरून थोर लोकांची फक्त जाती द्वेषावरुन गलिच्छ टीका करतो आणि समाजात देशात नकारात्मकताच पसरवतो.

मीच अमर ज्योतीला लाथाडतो.

माझ्या या अभारतीयत्वाच्या दर्गुर्णांची यादी अजुन फार मोठी आहे.

 प्रस्तुत माझी प्रत्येक गोष्ट ही 'नकारात्मक' आहे, वाईट आहे पण, मला पूर्ण विश्वास आहे की हा नकारात्मक भावनांचा अंधार एका पातळीवर पोचून नक्कीच नष्ट होईल. स्वच्छ, सात्विक सूर्योदय होईल.

अभारतीयत्वाच्या समुद्राच्या पृष्ठभागावर तात्पुरतं, क्षणिक उचंबळून येणारं, काही क्षण तरंगणारं व क्षणात पुन्हा खोल विलीन होणार माझं भारतीयत्व कायम स्थिर होईल! मी पूर्ण भारतीय बनेन!

सैन्यात भरती होऊनच मी माझे 'भारतीयत्व' सिद्ध करण्याची गरज नाही ते मी माझ्या नैमित्तिक कार्यातूनही सिद्ध करू शकतो!

मला विश्वास आहे उद्या मी निवासी पूर्ण 'स्वयंसिद्ध भारतीय ' सच्चा कणखर भारतीय बनेनच! आणि उद्या मी हृदयापासून म्हणेन "भारत माता की जय..!" भारतीय प्रजासत्ताक चिरायु हो! हँपी रिपब्लिक डे..!

(28 जानेवरी 2008 लोकसत्ता.
काही वर्तमानीय गोष्टी वाढवल्या आहेत.)

-अभिजित पानसे

"आमच्याकडील माती दुर्गा देवीला चालते पण समाजाला नाही"!

14 ऑक्टोबर 2007
लोकसत्ता

"हमारे यहा की मिट्टी माँ दुर्गा को चलती है लेकिन समाज को नही.."

जसा जसा सूर्य पश्चिमेच्या क्षितीजाकडे कलु लागतो..सावळी सांज आकाशात  दिवा लावत जाते..हळुहळु आकाशातील तारेही विश्वाचं आळसावलेलं रूप पाहुन सुखावतात..सामान्यत: आपल्या पांढरपेशा समाजाचे दैनंदिन व्यवहार रात्रीच्या दहाच्या ठोक्याला निवृत्त होतात.परंतु शहरातील काही वस्तींमध्ये जशी जशी रात्र अधिकाधीक गहिरी होत जाते तसा तेथील व्यवहारांचा "लाल" रंग अधिक गडद होत जातो..

स्त्रीला दुर्गेचे आदिशक्तिचे रूप आपल्या समाजात मानले जाते.लक्श्मी पार्वती..सौम्या रौद्रा..निरनिराळे रूपं देवी महात्म्यात सांगितलेय.समाजात जगताना स्त्रीचे अनेक रूप बघायला मिळतात.

पण फक्त उदरभरणासाठी जेव्हा स्त्रीला याच देवीच्या रूपाला रात्री रस्त्याच्या कडेला "उभं" राहावं लागतं.तेव्हा अंतर्मुख करणाऱ्या या दुर्गेच्या रूपाला "वारांगना" म्हणतात..आणी रात्रीच्या वाढत्या काळ्या रंगाबरोबर ज्या वस्तीचा "लाल" रंग गडद होत जातो त्या भागाला म्हणतात रेड लाइट एरिआ!

जेव्हा व्यवसायाचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे भांडवल!परंतु जेव्हा उदर भरणासाठी कुठलंही भांडवलच मिळत नाही तेव्हा या वारांगनांना "स्व देहाचे" भांडवल करून त्यालाच व्यवसायाचे साधन करावे लागते.
जिथे व्हाइट कॉलर समाजासाठी रात्र ही निवृत्तीची वेळ असते तिथे या स्त्रियांसाठी  त्यांच्या  अर्थाजनाच्या दिवसाची सुरवात असते.
वाढत्या रात्रीच्या काळोखासोबत वर्षांनुवर्षे यांच्या जीवनातील काळोखही कायम आहे.त्याला शेवट नाही.

कोणी कादंबरीकार "वसंतसेना" नामक पात्र रचुन वारांगनेला एक "उत्सव"मुर्ती  glamourous look देतो.परंतु प्रत्यक्शात मात्र या कमर्शिअल सेक्स वर्कर्सच्या आयुष्यात दु:ख वैषम्य गरिबी पिळवणुक रोगराई याशिवाय काहीच नसतं.

दोन वर्षापुर्वी आम्ही ४५ मित्र मैत्रिणी पुण्याला educationl tourला गेलेलो असताना उशीरा परताना बुधवार पेठेतील लक्ष्मी रोडवरील "लाल" माहोल पाहुन मी पुर्ण अंतर्मुख झालो.इतर मित्रांसाठी तो टेहाळणीचा उत्सुकतेचा विषय होता.पण माझं डोकं विचारांनी आक्रंदुन गेलं होतं."बारा"वर्षांपासुन "साठ" वर्षांपर्यंत प्रत्येक वयोगटातील "स्त्री" स्वदेहाचा लिलाव करत होती.उजेडात एरवी उथळ माथ्याने वावरणारे सुटाबुटातील तथाकथित शुभ्र कॉलर माणसे तिथे "भाव" करत होते.वरवरून भडक वर्तवणुक करणाऱ्या या वारांगनांच्या डोळ्याच्या आड मात्र प्रचंड दु:ख जाणवलं.ज्या  समाजात स्त्रीला  दुर्गेचे रूप समजले जाते त्या समाजात हाता तोंडाची गाठ पडण्यासाठी स्त्रीला देह विक्रय करावा लागतो हे आपल्या समाजाचे दुर्दैव्य.

मी समोरच्या दगडुसेठ गणपतीकडे पाहिलं.त्याच्या डोळ्यात कुठलेच भाव नव्हते.तो निर्विकार दृष्टीने समोर पाहात होता.
देव इतका अलिप्त कसा काय राहु शकतो?की फक्त देवच इतका अलिप्त..अलुफ राहु शकतो!कर्म आणि प्रारब्ध यात त्याची स्वत:ची काहीच भुमिका नसते का?असे शेकडो अनेक विचारांनी डोक्यात वादळ उठलं होतं.त्या वेळी प्रथमच त्या प्रसिद्ध गणपतीचं दर्शन घेत होतो पण कुठलाच आनंद होत नव्हता.

रात्रभर मी झोपू शकलो नाही.डोळ्यांसमोर रस्त्यावरच ते चित्र येत होतं. मनात शेकडो विचार येत होते.दुःख वाईट वाटत होतं. पाहिल्यादाच सुरक्षित घराच्या वातावरणातून बाहेर येऊन जगाची हि काळी लाल बाजू पहिली होती.मन वेदनांनी भरून गेलं होतं.

वर्षानवर्षे ह्या वारांगना गरिबीच्या घाणीच्या साम्राज्यात शरीराला झीजवत खितपत पडलेल्या असतात.जो पर्यंत शरीर तरूण आहे तो पर्यंत हाता तोंडाची गाठ पडते.समस्या व दु:ख अपमान यांच्या पाजविलाच पुजले असतात.पोलीसांचे हप्ते त्यांच्याकडुन होणारी पिळवणुक खोलीचे भाडे मधल्या दलालांची वसुली लैंगिक रोग यांच्या समस्यांना अंत नसतो.

भौगोलीक अंतरानुसार या समाजाची वस्ती आपल्या पांढरपेशा वस्तीपासुन फार दुर नसते.परंतु मुळ प्रवाहापासुन मात्र हा समाज पुर्णपणे कोसो मैल दुर आहे.
प्रत्येक मानव प्राण्याची मुलभूत  मानसिक गरजा म्हणजे प्रेम आदर काळजी..यापैकी कोणतीही गरज या स्त्रीयांची कधीच पुर्ण होत नाही.

स्त्रीचे मातृत्व हे तर विधात्याचेही आहे.प्रत्येक स्स्त्री ही मुळात अनंत काळची माता असतेच.छोटी मुलगीसुद्धा तिच्या बाहुलीला प्रेमाने थापटते..खाउ घालते.पण स्त्रीचे हे बेसिक इंस्टिक "मातृत्व"सुद्धा या कमनशिबी वारांगनांना "परवडत" नाही.कारण गर्भवासातील त्या महिन्यांमुळे व्यवसायावर परिणाम होतो.आणि जगायचे तर असते....
ह्या वारांगना "वोट बँक" नसल्याने कुठलिही राजकीय कृपा यांना मिळत नाही.

"मुलगी झाली हो..!"म्हणताना अजुनही काही पुरातन मनोवृत्तीचा उत्साह ओसरतो.जेथे आपल्या पांढरपेशांच्या समाजात "मुलाच्या" हव्यासापोटी स्त्रीभुणहत्या केली जाते.तेथे वारांगनांच्या वस्तीमध्ये मात्र "कन्या रत्नाचं" देवी रूपाचं सहर्ष मनापासुन स्वागत केलं जातं.तिथे एक "मुलगी" आपल्या "अम्माचा" आपल्या घराचा भार समर्थपणे वाहते.कारण तीच त्यांची "कुलदिपीका" असते.कदाचीत म्हणुनच या वारांगना आत्मिक पातळीवर देवीच्या अधीक जवळ वाटतात.

हाय सोसायटीतील पार्ट्यांमध्ये "रूचीपालट" म्हणुन  wife/husbnd swapping प्रकार घडतात तेेव्हा मुळात खऱ्या वेश्या कोण हा प्रश्न पडतो.
 वादग्रस्त नृृत्यांगना प्रोतिमा बेदी जी गोव्याला कलंगुट बीचवर नग्नावस्थेेत मॉर्निंग वॉक घ्यायची(reff श्री प्रमोद नवलकराचं मासीक)ती आपल्या इंटरव्युहमध्ये म्हणली होती "जेव्हा माझी कार कामाठीपुऱ्याजवळील फोरास रोडवरून जाते तेव्हा माझ्यात एक वेश्या संचारते...त्या वेश्यावस्तीतील पान दुकानावरील पान खाण्याची व लोकांनी माझ्याकडे 'त्या' नजरेने पाहावे असे खुप वाटते!"

एक कादंबरी वाचण्यात आली होती;त्यात एका गोष्टीत समोरासमोरील घरांमध्ये एका घरात एक लग्न झालेली स्त्री आपल्या नवऱ्यासोबत राहात असते. तर समोरील घरात एक वारांगना.कालांतराने दोघेही मृत्युमुखी पडतात.पहिल्या घरंदाज स्त्रीला नरकप्राप्ती होते तर वारांगनेला स्वर्ग प्राप्ती.तेव्हा चित्रगुप्त सांगतो;पहिली लग्न झालेली स्त्री रोज रात्री समोरच्या वारांगनेला पाहुन "मत्सर" करायची तर वारांगना त्या पतिव्रतेला पाहुन रोज मनोमन नमस्कार करीत.

यावरून एक पटतं वेश्यावृत्ती ही एक मनोवृत्ती "प्रवृत्ती"असते.मग ती स्त्रीची असो वा पुरूषाची.वेश्या बनायला "रेड लाइट" एरिआतच राहवे लागते असे नाही.

एकीकडे वारांगना उदर भरणासाठी;घऱ चालवण्यासाठी लज्जेचा त्याग करून "देहदान" करते.तर दुसरीकडे फक्त एन्जॉयमेंट म्हणुन वा उच्चभ्रु आयुष्य जगता यावे म्हणुन एक कॉलेज गर्ल कॉलगर्ल होते.वा जस्ट एन्जॉयमेंट म्हणुन स्वैराचार करतेे.

अल्ट्रा मॉडर्न समजणारे तरूण तरूणींचे फ्रेंड्स गृप "गृप सेक्स" पार्टीज फ्लँटमध्ये आयोजीत करतात.मग अशा समाजातील "वेश्याप्रवृत्तीपेक्शा" त्या रेड लाइट एरिआमधील "अधिकृत" वारांगना पटीने पवीत्र वाटतात.

दुर्गा देवीचा उत्सव नवरात्र सुरू आहे.दुर्गा देवीची मातीची मुर्ती तयार करताना त्या मातीत वारांगनांच्या वस्तीतील थोडी माती मिसळली जाते.पश्चिम बंगालमधील कुंभार वेश्यावस्तीतुन माती आणुन त्यापासुन दुर्गा देवीची मुर्ती तयार करतात.कारण Durga is an eternal mother of the universe & these commercial sex workers representing procreation. पण या वारांगनाचं म्हणनं असतं "हमारे यहॉं की मिट्टी मॉ दुर्गा को चलती है पर समाज को नही."

पायातील वाहणसुद्धा एअऱ कंडिशन्ड शोरूम्समधुन विकली जाते.पण ८३ लक्ष योनीनंतर प्राप्त होणारा मनुष्य देह मात्र रस्त्यावर कवडीमोलात विकला जातो.हे आपल्या समाजाचं विडंबन.

गौरांगप्रभुंनी पिंगळा नामक वेश्येचा उद्धार केला.परंतु या अहिल्यांचा उद्धार करण्यासाठी राम कधी येणार याचे उत्तर त्या दुर्गा देवीलाच माहित.

(१४ ऑक्टोबर 2007, लोकसत्ता)

 -अभिजित पानसे

Thursday, 21 December 2017

दोन भाऊ

15 ऑगस्ट 2017

दोघांचाही जन्म खूप गरिबीत झाला. दोघांच्या जन्मात फक्त 24 तासांचं अंतर. 24 तासानंतर जन्मलेल्याने लवचिक, मोठे विचार ठेवलेत, हळूहळू प्रगती करत गेला, शहरात ,आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाला. वेळ पडल्यास अडचणीच्या काळात गरीब शेजाऱ्यांनाही थोडीफार आर्थिक मदत केली. कोणाही शेजाऱ्यांसोबत उगीच संबंध खराब न करण्याची वृत्ती , नियमितपणे व्यायाम करत बलदंड झाल्याने कोणी उगीच खुसफट काढल्यास त्याच्या कानफटात देऊन स्वतःचा स्वतंत्र बाणा कायम ठेवला. निरुपद्रवी ,शांत समंजस व्यक्ती म्हणून समाजात मान मिळवला आणि आपल्या #मोहल्ल्यात बडा प्रस्थ बनला.

24 तासाच्या आधी जन्मलेला मात्र जन्मपासूनच कुत्सित, सतत आधीच्याचा जळफळाट करणारा , अत्यन्त ठिसूळ जुनकट विचारांचा , शेजाऱ्यांना त्रास देणारा, नशेबाज ,लपून छपून सतत दुसऱ्याच्या घरात घुसून त्रास देणारा, आणि मुळात अत्यन्त भेकड , डोळे वटारले तरी शेपूट वर करून पळणारा झाला. सतत जळफळाट , भांडणे करणारा, त्रासदायी असल्याने स्वतःच्या घरातील लोकही सतत दुःखी, कष्टी, उपाशी..
बड्या शेजाऱ्यांकडे जाऊन सतत भीक मागणारा त्यामुळे समाजात त्याची अत्यन्त खराब प्रतिमा निर्माण झाली आणि आता तो ज्या बड्या श्रीमंत शेजाऱ्याकडून सतत आर्थिक, इतर भीक घेत राहिल्याने तो आता त्याचा अप्रत्यक्ष गुलाम होण्याच्या मार्गावर आहे.

असा तो आज #सत्तर वर्षाचा झाला पण कुठलंही शहाणपण न आल्याने शहरात, समाजात आणि स्वतःच्या मोहोल्ल्यात एक अत्यन्त वाईट , त्रासदायी माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला.
आज त्याचा वाढदिवस.

दोघेही आता सत्तरीत गेले. आज एक कुठे आणि दुसरा कुठे आहे!

Independence(?))day of pakistan.



Monday, 18 December 2017

पु.लं चा कुत्रा आणि गुर्मीत सिंग



15 सप्टेंबर 017

"....आमच्या कुत्र्याच्या अंगात येतं अशी समजूत त्याने करून दिली होती त्यामुळे तो ज्याला चावतो तो भाग्यवान!असाही त्याने लौकिक वाढवून ठेवला होता.त्या 'कुत्र्याला' हे लोक टीळा लावायचे , माळा घालायचे.
एके दिवशी मी या श्वान महाराजांना आमच्या गल्लीच्या नाक्यावरच त्या टीळे माळासकट आपल्या स्वजातीय गरीब शिष्येवर अनुग्रह करताना पाहिलं आणि त्याच्या महाराजपणाची खात्रीच पटली मला!"

हे ऐकताना डोळ्यासमोर "गुर्मीत राम रहीम" नावाचं अस्वल आलं!

 किती द्रष्टे होते पु.ल.देशपांडे! किती रिलेवंट लिहायचे!

- अभिजित पानसे

रामदास आठवले आणि रम


रामदास आठवले आणि रम

"इंडियन आर्मी क्यू जॉईन करना चाहते हो?"
- "देश की सेवा करना चाहता हु"
 एकच एक पुस्तकी वाक्य ऐकल्यामुळे इंटररव्यू घेणाऱ्याचा चेहरा कोरडा.

नेक्स्ट.

"आर्मी मे क्यू आना है?"
थोडासा बिचकत ,"आर्मी मे बहोत अच्छे इन्सेटिव्हज.. सुविधाये मिलते है?

..."डेली नॉन व्हेज खाने मिलता है सर!"

.."
 "सर आर्मीमे फ्री मे रेड वाईन , रम पीने को मिलती है!"

'क्यू आना चाहते हो?"
"सर दुसरा कुछ आता भी नही! बॉडी , स्टॅमिना अच्छा है! दोस्तो ने कहा आर्मीचे चला जा लाईफ सेट हो जायेगी! इसलीये आर्मी मे आना चाहता हु!"

"सर लडकिया युनिफॉर्मपे मरती है! लडकीयो पे इम्प्रेशन मारने के लिये आर्मी मे आना चाहता हु!"

असे अनेक , ऐकायला विचित्र वाटणारे पण प्रामाणिक उत्तरे सैन्य भरतीच्या निवड प्रक्रियेत मुलाखतीवेळी होतात.

हे सर्व गंमती एका मित्राने ज्याचे वडील आर्मीमध्ये मोठ्या पदावर अधिकारी आहेत आणि जो स्वतः या प्रक्रियेतुन गेला त्याने हे सांगीतले.
तो म्हणाला होता जेव्हा मुलाखतीत '#देशभक्तीसाठी, देशसेवेसाठी आलो वगैरे उत्तरे दिलेत तर मुलाखत घेणारा हसतो नाहीतर "खोटं बोलू नकोस" म्हणत उलट अनेक प्रश विचारून भांबावून सोडतो. आणि बरेच जण यात नापास होतात.

जे मुलं बिनधास्तपणे सर आर्मीमे खाना ,पीना, आर्मी लाईफ, एन्जॉय करने की इच्छा है सांगतात ते बहुतेक सिलेक्ट होतात. पुढे मग पुन्हा मेडिकल टेस्टची चाळणी असते तो भाग वेगळा.

रामदास आठवलेंनी काही दिवसांपूर्वी तरुणांना उद्देशून म्हटले की चांगली दारू पिण्यासाठी तरी आर्मीमध्ये जा. हातभट्टीची पिण्यापेक्षा तिथे चांगली रम मिळते.
यावरून त्यांच्यावर फार टीका होतेय.
यात टीका करण्यासारखं काहिच नाही आहे. मुळात 'प्रथम' स्वतःच्या फायद्यासाठीच,  'सुरक्षित' करिअर साठी, सुरक्षा सेवेत मिळणाऱ्या विविध सुविधांसाठीच मुलं आर्मीमध्ये जात असतात.
देशभक्ती हा फॅक्टर त्यात फार कमी, क्वचित असतो. त्यात काहीही चूक नाही.

देशभक्ती, सेवा हा 'एलिमेंट' त्यांच्यात आपोआप निर्माण होतो त्याचे कारण निवड झाल्यावर होणारी त्यांची जीवनशैली!
रोजचं आयुष्य मग बदलून जातं. कडक शिस्त, रोजच्या कवायती, त्यातील घोषणा, हातात शस्त्र , तेथील वातावरण, आर्मीची लेगसी यामुळे 'प्रोसेस्ड' होऊन हळूहळू त्यांच्यात देशाबद्दल भावना जागृत होत जाते.

सैन्यातील जवान सतत चोवीस तास देशभक्तीने धगधगत नसतात. तेही नियमितपणे 'सिविलियन' प्रमाणे नोकरी करावी तश्या प्रकारे आपापले काम करत असतात. फक्त त्यांची जीवनशैली ही कडक शिस्तीत , कवायतीत असते.
रोज युद्ध होत नसतात. बीएसएफ आणि सिआरपीएफ मधील काही काळ सोडल्यास सैनिकीआयुष्य रोजचा दिनक्रम एकसारखाच जगत असतो.

पण वेळ आल्यास संकट आल्यास मात्र हे सैनिक देशभक्ती भावनेने पेटून उठतात प्रत्यक्षात 'कृती' करतात आणि त्याला तसे अधिकार मिळतात. हा फरक आहे सैन्यातील जवान आणि सिव्हिलियन व्यक्तीमध्ये.

सैन्यात जाण्यासाठी बरेच आमिष असतात .त्या अमिषांसाठी तरुण सैन्यात भरती होतात. आणि प्रोसेस्ड होऊन 'जवान' होतो.

म्हणून रामदास आठवलेंनी तरुणांना दारू पिण्यासाठी तरी सैन्यात जा हे सांगून काहीही चूक केली नाही . त्यांची उगीचच टीका केली जात आहे.
कारण प्रत्यक्षात असेच प्रामाणिक खरे बिनधास्त उत्तरे द्यावेत हेच निवड प्रक्रियेत अपेक्षित असतं.

-Aअभिजित पानसे