Showing posts with label चलो अमरनाथ बर्फानी बाबा के पास (अमरनाथ यात्रा(??)..ट्रेक प्रवास वर्णन). Show all posts
Showing posts with label चलो अमरनाथ बर्फानी बाबा के पास (अमरनाथ यात्रा(??)..ट्रेक प्रवास वर्णन). Show all posts

Saturday, 24 February 2018

देव कुठे आहे?

दिवसभर प्रचंड पाऊस सुरू होता. लोक दिवसभर तरीही येत होते.कोणी  व्हरांड्यात बसलेले , दाटीवाटीने बसलेले रात्र काढण्यासाठी तिथेच कोणी प्लास्टिक अंथरून पय जवळ घेऊन झोपपेले..पावसाचं पाणी तिथपर्यंत येत होतंच. मी विचार करत होतो का हे इकडे येतात? इतका त्रास सहन करत , जीव धोक्यात घालून का ,कशासाठी येतात, काय मिळतं यातून त्यांना! खरंच देवासाठी हे येतात तर देव काय फक्त हिमालयातच आहे का? शिव, शंकर महादेव हा फक्त घराबाहेरच उंच पर्वतावर, आत गुहेतच असतो का!

मग संत लोकांनी म्हटले की ईश्वर आपल्या  आतच असतो! म्हणजे काय!

गणपती अथर्वशीर्षात म्हटलंय " त्वम मूलाधारस्थितोसी नित्यम!" म्हणजे गणपती शरीराच्या आत मूलाधार , म्हणजे शेवटच्या मणक्यात स्थित असतो.
मग मंदिरात का जातात लोक!?

दरवर्षी लोक मरतात अमरनाथ यात्रेत, केदरनाथला शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. वैष्णोदेवी, हिमालयात दर्शनाला जाताना गाड्याना अपघात होतो,काही वर्षांपूर्वी सताऱ्याजवळील काळूबाईला लोक चेंगराचेंगरीत मेले होते. अश्यावेळी देव यांना वाचवत नाहीत का!
तरीही लोक कुटुंबापासून दूर शेकडो किमी अंतरावर का जातात!
मी तरी का आलो इथे! फक्त निसर्ग बघायला? अनुभव घ्यायला!

आणि शेवटी तो नेहमीचा प्रश्न , देव खरंच आहे का?

या प्रश्नांची उत्तरे व्यक्तीपरत्वे, काळ, वेळ परत्वे, दृष्टिकोनपरत्वे कदाचित असतात.

दुसऱ्या दिवशीचं पहाटे चार वाजताच्या बसचं आरक्षण मिळालं होतं.
सर्व जण आपापल्या कुटुंबियांसोबत, सहकाऱ्यांसोबत जागा राखून झोपले, बसले होते.
प्रचंड मोठे तीन मजल्यावर एकूण 10 सभागृह होते.आणि ते सर्व गच्च भरले होते. फोन चार्जिंगसाठी प्रत्येकाची कसरत सुरू होती.

जवळच्या एका हॉलमधून घोषणा झाली यात्रेकरुंनी जेवायला यावे. सतत उत्साहाने, प्रेमाने सतत एक व्यक्ती जेवण्यासंबंधी सूचना देत होती. मुसळधार पावसात शेडमध्ये सर्व जण रांगेत लागून हॉलमध्ये प्रवेश करत होते.अत्यन्त चविष्ट उत्तर भारतीय गरम जेवण, साजूक तुपातील गोड शिरा खाउन सर्वजण तृप्त होत होते.

दिवसभर सलग पाच मिनिटे ही न थांबता रात्रभरही मुसळधार पाऊस सुरू होता .लोकांमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उठण्याच्या गोष्टी सुरू होत्या  पण मला कल्पना होती की उद्या बसेस निघणे अत्यन्त कठीण असणारे कारण राष्ट्रीय महामार्ग 1 अत्यन्त नाजूक आहे. दरडी कधीही कोसळतात.

पहाटे पाऊस थांबलेला होता.अंधारात आकाशाकडे बघता काहीही कळत नव्हतं.अंधारात तसेही सत्य कळत नाही. म्हणून प्रकाशाचं महत्व असतं.
पहाटे लोक तयार होऊन ,बॅग्स घेऊन खाली जमू लागले. मी गॅलरीतच बसून खाली चाललेली लोकांची धावपळ बघत होतो. आणि थोड्याच वेळात अपेक्षेप्रमाणे घोषणा झाली, काश्मीर खोऱ्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग दरडी कोसळल्यामुळे बंद झाला आहे.त्यामुळे आज बसेस, जथ्था जाणार नाही.

पाऊस बंद झालाय ही मनाला दिलासा देणारी एक गोष्ट होती त्यावरही पाणी पडलं. पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. पहाटे साडे चारला शक्तिशाली हॅलोजन दिव्यांच्या प्रकाशात पुन्हा पावसाच्या जोरदार धारा स्पष्ट दिसू लागल्यात.

आकाशातील कृष्ण ढग आणि मनावर निराशेचे काळे ढग आणखी गडद होऊ लागलेत. मला कदाचित यात्रा रद्द करावं लागणार हे वाटू लागलं. कारण दोन दिवस उशिरा तारीख मिळाल्याने परतीचं आरक्षण अगदी तंतोतंत होतं, आणि शिवाय इथे आदल्या दिवशीचा एक दिवस वाया गेला होता, आणि पुन्हा त्या दिवशीही जथथा निघणार नाही घोषणा झाली होती. पाऊस थांबला नाही तर अजून किती दिवस इथे अडकून राहतील नक्की नव्हतं. तब्येत अस्वस्थ दिल्लीपासूनच झाली होती. पोटाने असहकार , 'अस्वीकार' मोहीम चालवली होती. सगळं काही 'झिडकारून' टाकत होतं. फोनमधील ऊर्जेचं चैतन्य संपल्याने तो बेशुद्ध झाला होता. लोक फोन चार्ज करायला संडास बाथरूममधील सॉकेट सुद्धा तपासून बघत होते. गर्दी अजून वाढतच होती.

यावर्षीही अमरनाथला जाणं इथे येऊन रद्द होतय खात्री होऊ लागली. खूप एकाकी निराश वाटू लागलं. पाऊस मुसळधार सुरूच होता.

सकाळी चे सहा वाजलेत. गडद काळ्या ढगांची चादर अंधुक उजेडात दिसू लागली. निराशेने मी आत डॉरमेट्रीमध्ये माझ्या जागी गेलो. माझी मिलिटरी प्रकारातील दहा किलोची अवाढव्य बॅग माझ्या बेडिंगवरती पहुडली होती. रात्रभर झोप न झाल्याने आणि मनात कुठेतरी नकळत आपोआप प्रार्थना सुरू होती की पाऊस थांबावा.

थोड्यावेळाने उठलो.बाहेर आलो बाल्कनीतून समोर बघितलं की आनंदाचा आशेचा 'किरण' दिसला.
 क्षितिजावर काळे ढग दूर होऊन निळसर पिवळं आकाश दिसत होतं.त्यातून प्रकाश येत होता. प्रकाशाचं असं असतं तो कधीच नष्ट होत नाही जिथून जागा मिळेल तिथून बाहेर येतो. चिवट असतो. सकारत्मक असतो.

 सकाळी नऊ वाजेपर्यंत छान ऊन पडलं. जम्मूला आल्यापासून सतत पाऊस ,दमट वातावरण अनुभवल्यावर चार दिवसानंतर आकाश जरा स्वच्छ होऊन सूर्यप्रकाश दिसत होता. आल्हाददायक आणि उत्साह दाटला. लोक खाली येऊ लागलेत. आजचा दिवस रिकामा होता. खलील सभागृहात कीर्तन, प्रवचन सुरू होत. तेथील भंडारात सकाळचा चहा, दुपार रात्रीचं जेवण मिळत होत. पण मी माझ्या पोटाच्या असहकार मोहिमेत भरडला जात होतो. दिवसभर मी काहीच खाल्लं नाही. रात्री संध्याकाळी स्टेजवर काही कलाकारांनी शंकर पार्वती वेशात सुंदर नृत्य सादर केले. दिवसभर न्यूज चॅनलचे पत्रकार येत होते.
पण अजून दुसऱ्या दिवशी बद्दल ही साशंकता होती.

रात्रीचे साडे आठ झाले मी गळून गेलो होतो. पण रात्री एक चक्कर मारायला खाली आलो.तेव्हा लाऊड स्पीकरवर घोषणा झाली की सगळ्या यात्रेकरूंनी तयार असावे आज रात्रीच अडीच वाजता बसेस पहलगाम, ला निघणार!

लोक उत्साहात बम बम भोले चा बोलू लागलेत!
 वातावरण उत्साहपूर्ण झालं मी ताबडतोब जिथे मिळेल तेथे मोबाईल चार्ज करण्यासाठी सॉकेट शोधू लागलो. लोक रात्री अकरा वाजतपासून अंघोळीला जाऊ लागलेत. बरेचजण जितका आराम करता येईल तितका घेण्यासाठी झोपलेत कारण हा जम्मू ते पहलगाम दहा अकरा तासांचा असणार होता.
मी एकटा असल्याने झोपण्याचा धोका पत्ककरणार नव्हतो.

रात्री पाऊण वाजताच मी तयार होऊन बाहेर पडलो. काही अंतरावर बसेस एक मोकळ्या मैदानात लागल्या होत्या. आपापल्याला पावतीवर दिलेल्या क्रमांकाच्या बसमध्येच आणि दिलेल्या सीट नंबरच बसायचं होतं.

जवळपास शंभर बसेस मैदानभर लागल्या होत्या. मी माझी बस शोधत होतो पाठीवर वजनदार सॅक उचलून मी संपूर्ण मैदान, पुन्हा पुन्हा सर्व बसेस बघितल्यात पण माझ्या क्रमांकाची बस काही दिसली नाही. दमट वातावरणात घामाने चिंब झालो होतो, शिवाय खूप थकलो ,अस्वस्थ वाटू लागलं. भीतीही दाटली की मला माझी बस दिसली नाही आणि संपूर्ण जथा निघाला तर! कारण लोक आता आपल्या बसेस मध्ये बसले होते. तेवढ्यात एक काश्मिरी माणूस हातात कागद घेऊन क्रमांक तपासून चालकसोबत बोलताना दिसला. शक्ती एकवटून त्याच्यापर्यंत जाऊन चौकशी केली.तेव्हा त्याने कागद बघून सांगितलं अजून त्या क्रमांकाची बस यायची आहे.
हुश्श मला खूप  हायसं वाटलं पण इतक्या लवकर येऊन इतकी मेहनत वाया गेली होती. शिवाय प्रचंड थकवा, घामामुळे बरं वाटत नव्हतंच.

पाच मिनिटात बस आली. नशिबाने विंडो सीट मिळाली. तोवर साडे तीन वाजले होते. आर्मी च्या गाड्या, खूप सैनिक, मोठ्या हुद्द्यावरचे ऑफिसर्स दिसत होते.
प्रत्येक बस ची कसून तपासणी झाली. बसचं इंजिन सुरू झाल्याचा आवाज आला ,समोर शस्त्रसज्ज सैनिकांची एक गाडी सर्वात पुढे  निघाली त्यामागे आमच्या बसेस निघाल्यात. आणि सर्वात शेवटी शस्त्रसज्ज जवानांची गाडी असा आमचा jathha निघाला. संपूर्ण परिसर बम बम भोले जयजयकराने निनादला!

सकाळी सूर्यप्रकाशात जे दिसलं ते रौद्र हिमालयाचे दर्शन होतं.
मोठ्या घराएवढे दगडं,पाषाण, दरडी रस्त्याच्या बाजूला लागले होते. प्रचंड चिखल, माती होती. स्पष्टपणे कळत होतं या दरडी परवाच्या पावसामुळे वरून कोसळल्या आहेत. आदल्या दिवशी
यात्रा रद्द करणे किती योग्य होतं हे कळलं.

Thursday, 22 February 2018

चलो अमरनाथ

"मी त्याला बघितलं! तो मला स्पष्ट दिसला!हो मी त्याला बघितलं!" स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या काश्मीर यात्रेमध्ये अमरनाथाचे दर्शन घेतल्यावर भगिनी निवेदितांना म्हटलेले हे वाक्य मी त्यांच्यावर लिहिलेल्या एका चरित्रात्मक पुस्तकात , मी दहावीत असताना वाचले त्यातील काश्मीर निसर्ग वर्णन वाचून अमरनाथ या काहीही माहिती नसलेल्या 'गोष्टीबद्दल' आकर्षण निर्माण झाले. आणि स्वामी विवेकानंद त्या काळात खडतर यात्रा करून अमरनाथचे दर्शन घेऊ शकतात तर मग आज आधुनिक काळात आपण नक्कीच अमरनाथला एकदा जायचंच हे तेव्हा ठरवलं होतं.

 शालेय वयात जे वाचतो त्याचा मनावर प्रभावी ठसा उमटतो. त्याच काळात कैलास मानस सरोवरावरील एक पुस्तक वाचून कैलास मानस यात्रा करण्याचं ठरवलं होतं. सिंदबादच्या सफरी वाचताना मी ही, त्याच्यासोबत समुद्र पादाक्रांत करायचो. तेव्हा ज्या ज्या प्रवासासमबंधीत इच्छा निर्माण झाल्या त्यातील अमरनाथ यात्रा ही त्यातल्या त्यात सोपी आणि छोटी आहे आणि आवाक्यातील आहे हे पुढे कळल्यावर अमरनाथ यात्रा करायचीच हे ठरवलं होतं.

'यात्रा' या शब्दाचा अर्थ फार संकुचित वाटतो. एक ठिसूळ धार्मिक आवरण असतं या शब्दाला सतत. त्यामुळे हा यात्रा शब्द तरुण लोक एन्जॉय करत नाही.

शिवाय कोणी तरुण कोण्या 'यात्रेला' जायचं म्हणतो तर वयाने मोठ्या लोकांकडून म्हटलं जातं की यात्रा वगैरे हे म्हातारपणी करायच्या असतात.
पण मला ही गोष्ट कधीच पटत नाही. यात्रा असो वा व्यायाम, वा अभ्यास यासाठी शरीर आरोग्य महत्वाचे असते त्यामुळे या गोष्टी योग्य मेळ साधून तरुण वयातच करता येऊ शकतात. करायला हरकत नसते.

 त्यामुळे मी यात्रा या धार्मिक आवरणाखाली असलेल्या शब्दाला 'ट्रेक' संबोधतो. ट्रेक म्हटलं की एक एनर्जी मिळते, तरुण शब्द वाटतो, शिवाय शब्द 'सेक्युलर' वाटतो.

हिमालयाचं एक आकर्षण मला लहानपणापासून होतं. 2013 पासून मी अमरनाथला जाण्याचा प्रयत्न करत होतो. 2013 वेळी सर्व तयारी झाली होती. पण जुलै 2013 ला केदारनाथ प्रलय झाला , कुटुंबीयांनी स्पष्टपणे मला जाउ देण्यासाठी नकार दिला. 2014 मध्ये सर्व कागदी औपचारिकता पूर्ण झालेली, रेल्वे आरक्षण झाले. जाण्याच्या दोन दिवस आधी कधी नव्हे ती तब्येत खूप खराब झाली. त्यामुळे रद्द करावं लागलं.
2015 मध्ये नेपाळ मध्ये भूकंप झाला. हिमालय हादरला. त्याचे पडसाद उमटतातच सर्व पर्वतरागांमध्ये !तरीही जाण्याचे ठरवले पण जाण्याच्या तीन दिवस काही कारणांमुळे पुन्हा रद्द झाले. तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू होता. खूप नाराज झालो.
पुन्हा घरुन कडक विरोध नेमीप्रमाणे झालाच.
 2016 मध्ये पुन्हा नेहमीप्रमाणे तारखेसंबंधीत सर्व कागदी औपचारिकता पार पाडली.आरक्षण झालं. सगळं ठरलं 11 जुलै हा निघण्याचा दिवस जवळ आला. आणि 8 जुलै ला "बुऱ्हाण वाणी" चा खातमा झाला. संपूर्ण काश्मीर खोरं पेटुन उठलं,

 संचारबंदी झाली. अमरनाथ यात्रा खोळंबली. मी आरक्षण रद्द केलं.
दरवर्षी मी अमरनाथ ला जातोय हे एक दोन महिन्यांपासून बऱ्याच जणांना सांगायचो. घरील मंडळी कायम विरोधी पक्षाप्रमाणे विरोधात असायची. 'एकट्याने ' जाण्याचा ठराव मंजूर करायची नाही.

सलग चार वर्षे जाण्यात अपयश आल्याने  यावर्षी 2107 मध्ये मी खूप उत्सुक नव्हतो. मीच स्वतः न जाण्याचा निर्णय घेतला. पण जसजसा मे महिना सरू लागला. पुन्हा नेहमीप्रमाणे इच्छा होऊ लागली. तरीही मी त्या उत्साहाला , इच्छेला दुर्लक्ष करीत गेलो. जून महिण्याचा एक आठवडा संपला आणि मी किमान नेहमीप्रमाणे औपचारिकता पूर्ण करून आपली बाजू सुरक्षित करून टाकावी म्हणून यावेळी प्रथम रेल्वे आरक्षण केले. मी नेहमी अमरनाथयात्र सुरू होते त्या पहिल्या दिवसासाठीच माझी नोंदणी करत होतो. यावेळी ही मला पहिल्या दिवशीच निघायचे होते. त्यामुळे यात्रेचा पहिला दिवस धरून त्याप्रमाणे चार दिवसाआधीचं आरक्षण केलं. आणि त्यानंतर काही दिवसांनी बँकेतील औपचारिकता, परवाना काढला. यावेळी अमरनाथ यात्रा 29 जून पासून सुरू होणार होती. आणि मला यावेळी प्रथम बँकेतूनच अडथळा आला, 29 ,30 जून तारखा भरल्या होत्या. 1 जून उपलब्ध होतं.मी यांत्रिकतेने होकार दिला. माझं रजिस्ट्रेशन 1 जून चं झालं. आणि आरक्षण झाले होते 28जून नुसार!
पण मी यावर्षीही जाण्याची शक्यता आणि उत्साह कमीच होता त्यामुळे मी जास्त विचार केला नाही.

यावेळी मी कोणालाही माझ्या जाण्याबद्दल बोललो नाही.महेंद्रसिंग धोनीसारखं अति आवाज उत्साह न प्रदर्शित करता शांतपणे खेळत शेवटपर्यंत सामना न्यायचा आणि मग 'अटॅक' करायचा ठरवलं.

25 जून तारीख चार दिवसांवर येऊन ठेपली तोवर सगळं ठीक होतं.आणि मी क्रीज सोडून पहिला अटॅक केला, घरी सांगितलं मी अमरनाथ ला जातोय. घरन काही विशेष विरोध झाला नाही उलट पाठिंबा मिळाला! बॉल सीमारेषेपलीकडे जाऊन पडला! सिक्सर! पूर्वी सेहवागप्रमाणे सुरवातीलाच अति आक्रमक खेळायचो आणि माझी विकेट जायची! यावेळी धोनीच्या टेक्निकप्रमाणे खेळलो! महेंद्रसिंग धोनी जिंदाबाद!

 पण मी स्वतः कुठलीही तयारी यावेळी केलेली नव्हती. दोन दिवसंपूर्वी कपडे, गरम कपडे , रक सॅक धुतली, आणि पाऊस सुरू झाला! कपडे वाळतील की नाही याचा ताण आला! यावेळी पावसामुळे मॅच हारतो की काय परिस्थिती निर्माण झाली! यात तर डकवर्थ लुईस सिस्टम सुद्धा मदतीला येत नाही!

पण सूर्यदेव यावेळी प्रसन्न झालेत. वरूण देव आणि सूर्य देवमध्ये मांडवली होऊन, वरूणाने आपली झड थांबवून , घट्ट जाड कापसासारखी ढगांची दुलई दूर सारून सुर्याला पुन्हा निळ्या आकाशात तळपू दिले.

 आदल्या दिवशी घरी पी
पोहचलो. दुसऱ्या दिवशी 25 तारखेला दिल्लीपर्यंतच रेल्वे चे आरक्षण होते. दिल्ली ते जम्मू  आरक्षण उशीर केल्याने मिळाले नव्हत

सव्वीस तारखेला सकाळी साडे नऊ वाजता पाठीवर रक सॅक सखीला उचलून इंद्रप्रस्थाच्या जमिनीवर पाऊल ठेवले.
मला गाडीतच कळले होते की घाईत मी मोबाईलचं चार्जर, पॉवर बँक चा बॉक्स घरीच विसरलोय.पुढील 8दिवस विना मोबाईल राहायचा मी निर्णय गाडीतच घेतला होता. पण काहीतरी आठवण म्हणून फोटोज हवेतच! शिवाय घरी आई बाबा आजीला कशाला ताणात ठेवायचं म्हणून मोबाईल चार्जर शोधू लागलो. पण आश्चर्य म्हणजे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आजूबाजूला कुठेही मोबाईलचे दुकाने नव्हती.

10 किलो वजन असलेली सॅक पाठीवरू घेऊन मी आजूबाजूला चालत चालत जुन्या दिल्ली स्टेशनला जाऊन पॊहचलो तरीही एकही दुकान सापडलं नाही. मला  आश्चर्य वाटत होतं .तिथून ऑटो करून काश्मिरी गेट ला पोहचलो. कारण बस तिथूनच मिळणार होती. बसचे पाच पट वाढून सांगितलेले भाव बघता "दिल्ली के ठग" ही संकल्पना एकदा पूर्ण पटली. पावणे साडेतीनला शालिमार एक्सप्रेस जम्मूसाठी होती. 3 वाजता एक मोठं दुकान मला दिसलं तिथून चार्जर घेतलं आणि वेगाने रेल्वे स्टेशनकडे ऑटो करून निघालो. पोहचलो तेव्हा पंधरा मिनिटं बाकी होते आणि तिकीट लाईन ची लांबी बघता गाडी मिळने कठीण वाटत होते. पावसाळ्यातील दमट वातावरणातील ऊन स्वास्थ्यासाठी घातक असतं. दिल्लीच्या विषम वातावरणातील ते ऊन आधीच जालीम!
मला ताप आल्याप्रमाणे अस्वस्थ वाटू लागलं. उगीचच मी खूप अतिमेहनत केली होती.
मी अस्वस्थतेमुळे तिथेच तिकीट रांगाजवळ खाली अर्धा तास बसून राहिलो. पाच वाजता ट्रॅव्हल बस कंपनीने

बस निघेन म्हणून सांगून रात्री साडे बाराला गाडी निघाली.दुसऱ्या दिवशी एक वाजता कटराला पोहचलो.माझ्याकडे दोन पर्याय होते ,1 तारखेला पहलगाम हुन निघायचे असल्याने 2 दिवस मला कुठेतरी घालवायचे होते. जम्मूहुनच पुढे काश्मीरमध्ये जाण्यासाठी गाड्या मिळणार होत्या पण जम्मूला यात्रेकरुंची प्रचंड गर्दी असणार म्हणून मी कटराला गेलो. समोर मोठा वैष्णो देवीचा पर्वत दिसत होता.

जम्मू आणि काश्मीर राज्यात आपले सिमकार्ड्स चालत नसल्याने फोन बंद झाला होता. पण एकदा सोशल मिडियाची चव लागली की व्यक्ती त्याशिवाय जास्त काळ राहू शकत नाही. मी आधी 10 दिवस फोन शिवाय राहण्याचे ठरवले होते पण न राहवून तेथील नवं सिमकार्ड घेतलं. आणि ते योग्यच झालं.दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सूरु झाला त्यामुळे एकाजागी बसून सोशल मीडियावर , फोन वर वेळ घालवला.
30 तारखेलाही सकाळपासून खूप पाऊस सुरू होता पण मला लवकरात काश्मीर खोऱ्यात जायचं होतं.मी जम्मूला पोहचलो पण मला कोणतीही लोकल सुमो गाड्या मिळाल्या नाहीत. नंतर कळलं की यात्रेच्या काळात गाड्या सहज मिळत नाहीत. ऑटोवाल्यानीही मला जम्मू प्रवासी केंद्र, अमरनाथ यात्रेकरूंच्या बेस कॅम्पलाच जायला सांगितले. शहराच्या बाहेर असलेल्या कॅम्पच्या 2 किमी बाहेर आवारात पोहचलो आणि इथून मला खऱ्या अर्थाने अमरनाथ यात्रा म्हणजे काय आणि ती खास याचा अंदाज येऊ लागला. जागोजागी यात्रेकरुंची ,बॅगेची तपासणी सुरू झाली.कॅम्पच्या आत प्रवेश करण्यापूर्वी पाच ठिकाणी माझी, बॅगेची, आणि राजिस्ट्रेशन कार्डची कसून तपासणी झाली.

पाऊस सुरूच होता.
इथून सुरू झाला एक वेगळा अनुभव.. सर्वार्थाने काहीसा वेगळा, विचार करायला लावणारा..माणुसकीचे, दातृत्वाचे प्रदर्शन करणारा..समृद्ध करणारा..

Sunday, 14 January 2018

चंदनवाडीकडे


 मी उठून आजूबाजूला बघू लागलो माझी बॅग दिसली नाही. समोर बघितलं ..डावीकडे  उजवीकडे शेजारी बघितलं.. पण बॅग नव्हती!

मागे वळून बघितलं आणि!

 हुश्श !बॅगवती डोक्याच्या मागे शांतपणे बसली होती. बॅग मी उशाशी ठेवली होती . आणि मी शेजारी आणि समोर बघत होतो.
“उशाशी बॅगळसा आणि तंबूला वळसा !”


माझ्या जीवात जीव आला . काही सेकन्ड्ससाठी छातीत श्वास अडकला होता. आय रिअली हॅड हार्ट इन माय माउथ!

मनगटावरील घड्याळ आपल्या दोन काट्यानी  सात वाजून पंधरा मिनिटे झाली दाखवत होते.
उशीर झाला होता. मी साडेसातला निघण्याचं ठरवलं होतं. तंबूतील इतर तिघेजण तेव्हाही झोपलेच होते. पण त्यांच्याकडे यात्रेचा बराच अनुभव होता. ते निश्चिंत लोक होते.

मला उठल्यापासूनच बरं वाटत नव्हतं. डोकं, शरीर जड झालेलं..खूप अस्वस्थ वाटत होतं. सगळयात त्रासदायक म्हणजे घसा खूप दुखत होता. आणि अजून तर यात्रा सुरूही झाली नव्हती.

थंडी खूप होती. मी बाहेर जाऊन प्रथम फ्रेश झालो. पाण्याची व्यवस्था छान होती. खूपसारे पोर्टेबल टॉयलेट्स होते. मला तेव्हा दिसलं की माझ्या तंबूच्या मागेच शौचालयाची ओळीने चाळ आहे. किती ती काळजी माझ्या पोटाची तंबुवाल्याला, देवाला बरे! सगळे लोक चंदनवाडीला जाणाऱ्या मार्गाने निघाले होते. मला उशीर झाला होता. याची किंमत नंतर चुकवावी लागेल याची कल्पना नव्हती तेव्हा मला!

मी मुखमार्जन आटोपलं, 'दशमद्वारमार्जन' मात्र केलं नाही. सिस्टम एकंदरीतच बिघडलं होतं.
पण मला सगळ्यात जास्त काळजी होती ती घश्याची. त्यामुळे मी काहीच खाऊ गिळू शकत नव्हतो.
तंबूत येऊन मी प्रथम घरून आणलेला 'आलेपाक' तीन चमचे खाल्ला. त्याने अंगात आतून गरमीही आली. बॅग उचलून निघालो. आतले तिघे जण तेव्हाही झोपलेच होते.

आदल्या दिवशीच जिथे लॉकररूममध्ये मोठी सॅक ठेवली होती तिथूनच जायचं होतं.
 लाऊडस्पीकरवरून सतत सूचना सुरू होत्या.
रस्त्यात फुलांनी डवरलेली गुलाबाची खूप झाडे होती. जवळील मेडिकल सर्टिफिकेट आणि अमरनाथ श्राइन बोर्डाकडून मिळालेला परवाना, जो मिळवायला मला काय काय 'जुगाड' करावा लागला तो असा सार्वजनिक मी नाही करू शकत, तो परवाना चेकिंग पोस्ट वर दाखवावा लागला. आणि तिथून बाहेर पडलो. मागे पहलगामचं तंबूस्तान राहीलं. "बचेंगे तो फिर मिलेंगे" मनात म्हणून मी समोर चालू लागलो.

थोड्याचवेळात लिडर नदी काठी डांबरी रोडवर आलो. तिथून प्रत्येकी शंभर रुपये घेऊन चंदनवाडीपर्यंत काश्मिरी लोकांच्या गाड्या सोडत होत्या. खरी चालण्याची  यात्रा चंदनवाडीपासूनच सूरु होते.

  सर्वजण आपापल्या समूहात आले असल्याने त्यांना प्रथम प्राधान्य मिळत होतं. मी एकटा असल्याने मला 'सिंगल' सीटसाठी खूप अडचण येऊ लागली. अर्धा तास गेला पण एकाही गाडीत एक सीट रिकामी मिळत नव्हती. वेळ भराभर जात होता. साडेनऊ वाजायला आलेत.


तेवड्यात एक गंमत झाली. काही संन्यासी साधू लोकांनी, त्यांच्याजवळ पैसे नाही म्हणून कोणी त्यांना गाडीत घेत नव्हते , म्हणून ते रस्त्यावर आडवे झोपलेत , रस्ता अडवून धरला. शेवटी पोलीसांनी मध्ये पडून  त्यांना उठवलं आणि एक गाडीवाल्याने बसवून त्यांना घेऊन गेला.
मीसुद्धा  रस्त्यावर आडवा झोपू का मला कोणी गाडीत घेत नाही म्हणून विचार केला! " निषेध निषेध ! ओरडू का! " अरे कोणी जागा देता का रे जागा !या तुफानाला! हे तुफान आता थकलंय! पोट बिघडलेल्या अवस्थेने गळंलंय!
आवो कुछ तुफानी करते है! असं वाटून गेलं. पण पोलीस पार्श्वभागावर लाठीप्रहार करतील ही जाणीव झाल्याने मी विचार सोडून दिला.

तेवढ्यात एका चालकाने मला आवाज दिला, त्याच्या गाडीत एक जागा रिकामी होती.
 आमचा रथ चंदनवाडीकडे , लीडरनदीच्या साक्षीने दौडू लागला. शब्द अपुरे पडतात असं अप्रतिम , सुंदर सृष्टीसौंदर्य दिसू लागलं. चंदनवाडीला जाताना उंचावर वळवळणाचा रस्त्याने जात होतो. खाली खळाळत लिडर, वर निळंशार आकाश, उंचच हिमालय पर्वताची शिखरे, त्यावर घनदाट देवदारचं जंगल.
मध्ये पुन्हा एकदा तपासणी झाली. चंदनवाडीला पाऊणतासात पोहचलो. प्रचंड गर्दी. मी रांगेत उभा राहिलो. ती शेवटची आणि महत्वाची तपासणी रांग होती. चंदनवाडीलाही तंबू आणि लंगर दिसलेत.
तेवढ्यात एक लाठी विकणारा छोटा मुलगा दिसला. दोन हातात दोन जाड्या देवदारच्या लाठ्या विकत घेतल्या.
 तपासणी होऊन बाहेर आलो. आता शड्डू मांड ठोकण्याची वेळ आली होती. अभि तो पार्टी सुरू हुई थी!


अमरनाथयात्रा का खास आणि वेगळी आहे याचं पुन्हा एकदा दर्शन झालं. अनेक लोक हातात फ्रुटी, चॉकलेट्स , टॉफिज, बिस्किटचं पाकिटं आणून देत होते. कोणी अॅपल ज्यूसची बाटली आणून दिली.  लंगरमध्ये गरम जेवण, न्याहारी सगळं मिळत होतं.  एक ठिकाणी मला "बनारसी पान" चंही लंगर दिसला.
चहा , कॉफी, सरबते  सगळ्यांची सरबराई होती. आपण फक्त तिथे जाऊन हवं ते घ्यायचं . हे सर्व देताना कुठलाही वागण्यात कोरडेपणा, किंवा तुसडेपणा दिसत नव्हता, तथापि अत्यन्त अर्जवतेने ते बोलावत होते, खाण्यास आवाहन करत होते.
कलियुगातील कर्ण अमरनाथ यात्रेत दिसत होते.
मी त्या सगळयांना मनोमन नमस्कार केला आणि पूढे चालू लागलो.
सगळ्यात मोठं उभं उंचंच उंच संकट, टास्क, चॅलेंज पुढे उभं ठाकलं होतं. त्याचं नाव म्हणजे "पिस्सु टॉप". अमरनाथ यात्रेत जे दरवर्षी मृत्यू होतात त्यात दोन ठिकाणी सगळ्यात जास्त मृत्यू होतात, एक पिस्सु टॉप, दुसरा शेषनाग.
पिस्सु टॉपच्या खडतरपणाबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. मी जन्मभर कधीही विसरणार नाही असा अनुभव पिस्सु टॉपने दिला.

Thursday, 4 January 2018

गेली बॅग कुणीकडे

शेकडो तंबूंचं ते छोटंसं गाव होतं. पण मला छोटी पाठीवरील बॅग घायची होती, त्यासाठी मला पुन्हा बाहेर जावं लागेल का, किंवा याक्षणी बॅग कुठे मिळेल, नुकताच थकून सर्व तपास यंत्रणेतून मी तपासल्या जाऊन आत बेसकॅम्पमध्ये आलो होतो, आता कुठे बॅग मिळेल, पुन्हा कॅम्पच्या बाहेर जावं लागेल का, या विचारात पडलो.
पण परत आल्यावर आपला तंबू नेमका लक्षात येणार नाही, सापडणार नाही याची शंका मला होतीच कारण सर्व तंबू एकाच जवळपास रंगाचे होते. देवदार वृक्षांच्या भागात वसलेलं ते  'तंबूस्तान' होतं. शेतात वा जंगलात एखादी पगदंडी-पायवाट जावी तशी त्या तंबूस्तानात ओळीने तंबू लागलेले होते त्यात प्रत्येक ओळीत एक पायवाटसदृश एक अगदी अरुंद रस्ता होता.

माझा तंबू लक्षात ठेवण्यासाठी मी एका देवनार वृक्षाची खूण लक्षात ठेवून बाहेर पडलो त्या अरुंद पायवाटने बाहेर पडलो .
तंबूस्तानातून बाहेर येताच आश्चर्याचा
धक्का बसला! उजवीकडे दुकाने लागले होते, तिथे गरम कपडे, टॉर्चेस, फळफळावळ , बॅग्स, आणि विविध स्टेशनरी दुकाने होती. संपूर्ण वैद्यकीय सुविधा, दवाखाने होते. पोलीस आणि आर्मीने संरक्षण केलेलं ते एक छोटंसं तात्पुरतं तयार केलेलं छोटंसं गावच होतं. समोर रस्ते मिळणारा एक छोटा चौक होता. सगळीकडे लाईट्सचा चकचकाट होता.
दुकानांना लागूनच दुसऱ्या भागात खुपसारे लंगर होते.

तिथे अगदी मोबाईल चार्ज करण्यासाठीही दुकान होतं. जे माझ्यासाठी खुप महत्त्वाचं होतं, कारण माझा मोबाईलच्या चार्जिंगचा मोठा प्रश्न होताच.
मी प्रथम माझ्यासाठी एक छोटी बॅग घेतली, एक केशरी रंगाची लोकरीची कानटोपी घेतली. तोवर सूर्यास्त होऊन अंधार पडला होता आणि लंगरमध्ये जेवणाची गडबड सुरू झाली. झकासपैकी मोठयाने गाणे वाजू लागलेत. मी सर्व लंगरला बघून आलो. प्रत्येक लंगरमध्ये प्रथमदर्शनी भागात शंकराची मूर्ती होती. मराठी लोकांत शंकराची पूजा फक्त शिवपिंडीनेच करतात, मूर्ती घरात ठेवत नाहीत, कारण ती फक्त स्मशानात असावी असा एक विचार आहे पण उत्तर भारतात शंकराची मूर्ती असते.

मी नवी घेतलेली माझी बॅग माझा तंबू शोधून  ठेऊन आलो, हवं ते महत्वाचं गरम कपडे , चेहऱ्याला लावायचे क्रीम्स, खाण्याचं सामान त्या छोट्या बॅगेत ठेवलं आणि पाठीवरील वेताळ म्हणजे मोठी रक सॅक त्या बेसकॅम्पमधील लॉकर रूममध्ये ठेवायला निघालो. तंबूवाल्याने सामान चोरीला जाऊ नये म्हणून काही सूचना दिल्या होत्या. टेंटच्या शेवटच्या भागात वस्तू ठेवू नये वगैरे. शेवटी आपल्या सामानाची जबाबदारी आपणच घ्यावी सांगितलं होतं. तंबुवाला जबाबदार नसेल हे स्पष्ट सांगितलं होतं.

लॉकर रूम खूप समोर होती. त्याच रस्त्याने दुसऱ्या दिवशी चंदनवाडीला जायचंय हे कळल्यावर उत्साह आला. लॉकररूम मध्ये बॅग ठेवली. आजवर माझी ही रकसॅक माझ्या सर्व प्रवासात सोबत असायची, पण यावेळी प्रथमच ती नसणार होती. कारण ती प्रचंड वजनदार होती. समानासकट दहा ते बारा किलो वजन होतं.

परत बेसकॅम्पच्या प्रमुख भागात आलो. आजूबाजूला चैतन्याने भारलेलं वातावरण होतं
लंगरमध्ये आरती सुरू होती. "बम बम भोले" ने वातावरण भारलेलं होतं. सुग्रास जेवणाचा सुगंध येत होता. अस्सल उत्तर भारतीय जेवण सगळीकडे होतं. दाल फ्राय, पनीर, बटाट्याची भाजी, "सरसो का साग" आणि  "मक्के की रोटी" पंजाबी लंगरला मिळत होती. जेवण्यासाठी टेबल खुर्च्याही मांडलेल्या होत्या. याशिवाय चहा, कॉफी, आटीव दूध सगळीकडे उपलब्ध होतं.

कोणाही व्यक्तीला प्रथम बघता वाटेल हे हॉटेल्स किंवा धाबे आहेत, आणि येथे खायचे पदार्थ, अन्न विकत घ्यावं लागेल. पण इथेच भारतीय, हिंदू संस्कृतीचं दर्शन होतं. अमरनाथ यात्रा म्हणूनच महान आहे. या सर्व सुसज्ज लंगरमध्ये "मोफत' खायला मिळतं. इतक्या उंचावर जेथे सर्व अति महाग मिळतं, तिथे हे लंगरवाले यात्रेकरूंना मोफत चविष्ट अन्न खाऊ घालतात. आश्चर्य म्हणजे अन्न वाढताना कुठलाही अहंकार नाही का कटू, कोरडा व्यवहार नसतो, अत्यन्त प्रेमाने, आर्जवतेने ते यात्रेकरूंना आपल्या लंगरमध्ये बोलावत असतात. जणू त्यांच्यातच एक सशक्त स्पर्धा असते कोण जास्त यात्रेकरूंना खाऊ घालेल, कोणाचं अन्न जास्त रुचकर.
मला हे दृश्य प्रचंड आवडलं , भावना उचंबळून आल्यात. पाऊस, थंडी सहन करत ते मोफत चाळीस दिवस अन्न खाऊ घालत असतात. याबदल्यात ते यात्रेकरूंकडून काहीही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा करीत नाहीत.  फक्त जेवण झालं की किमान आपलं ताट, वाटी बाहेर ठेवलेल्या योग्य डब्यात टाकावेत.
मी माझं आवडतं सरसो का साग आणि पोळी जेवलो. पोटाचं टेन्शन मला होतंच, कारण ते सुरवातीपासूनच माझ्यावर चिडलेलं, बिघडलेलं होतं.
तेवढ्यात एक गुजराती लंगर दिसला. त्यात सुग्रास मऊ गरम खिचडी आणि गरम कढी मिळत होती. तिथेही जेवलो. एका लंगरमध्ये गरम दूध प्यायलो.

एव्हाना थंडी वाढायला लागली. मी माझा मोबाईल तेथील काश्मिरी दुकानात चार्जिंगसाठी ठेवला होता. पण तो चार्ज व्हायला बराच वेळ असल्याने मी परत माझ्या तंबूत आलो. आत आणखी तिघेजण वाढलेले दिसलेत. ते पन्नाशीतील तिघेजण गोरखपूरचे होते. काही जुजबी विचारपूस झाल्यावर कळलं की त्यांची ही दुसरी यात्रा आहे.
आमच्या तंबूत  अगदी कमी व्होल्टेजचा बल्ब लावलेला होता. पांघरायला ब्लॅंकेट्स दिले होते.
रात्री तंबूत त्या गोरखपूरच्या एका माणसाने नेपाळ आणि उत्तर प्रदेशातील माओवादी आणि भारतीय लोकांचं नेपाळमध्ये वर्चस्व याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ते ऐकताना मजा वाटली.

रात्री मोबाईल घेऊन आलो. पूर्ण चार्ज झालाच नव्हता, कारण माझं चार्जर मी घरीच विसरलो होतो.
थंडी बरीच वाढली होती. तंबूत येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं होतं. पायी यात्रा दुसऱ्या दिवशी सुरू होणार होती, याचं थ्रील वाटत होतं पण तब्येत ठीक वाटत नव्हती. सर्वजण आपापल्या ग्रुप्समध्ये, लोकांसोबत आले होते; मी एकटा आलो होतो.
उशिरा रात्री झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा शेजारील गोरखपूरचे लोक जागेवर नव्हते. मी माझ्या डोक्याजवळील बॅग बघितली. माझी  बॅग शेजारी नव्हती.आत्मीयतेने मोफत जेवू घालणारे लंगरवाले... - http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5193975874055472746

Tuesday, 26 December 2017

शैतानी..खुनी नाला

भूतांनी पछाडलेल्या जागा याबद्दल कथा दंतकथा भारतात तसेच जगभरात प्रसिद्ध आहेत. ,भूतकथा, 'हॉंटेड' जागा यांचं वर्णन लेखकांनी भयरस पुरेपूर ओतून अंगावर शहारे येतील असं रसभरीत वर्णन केलेलं असतं.
मुंबईतील काही जागा, देशातील, महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध किल्ले, वाडे, हॉटेल्स मधील विशिष्ट खोली, हे सुद्धा बाधित स्थळं आहेत याबद्दल बरेचदा    ऐकायला, वाच्यायला मिळतं.
यातील किती विश्वसनीय, खोटं हे लेखकाला , त्या त्या स्थळांना आणि तेथील असलेल्या नसलेल्या
 भूतांनाच माहिती.
पण अगदी लिखाणातील भीष्माचार्य गो. नि. दांडेकरांनी सुद्धा किल्ले भ्रमंती वेळी आलेले गूढ अनुभव सांगितले आहेत.
अभिनेता ,लेखक आणि ट्रेकर मिलिंद गुणजीनेही त्यांच्या पुस्तकात महाराष्टातील काही प्रसिद्ध स्थळांबद्दल गूढ, अमानवी अनुभव विशद केले आहेत.
एकंदर यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पण भ्रमंती करणाऱ्या व्यक्तींना अश्या स्थळांबद्दलच्या कथा बरेचदा माहिती असतात.

याचप्रकारे  "खुनी नाला" आणि "शैतानी नाला" हे दोन विचित्र , गूढ भीतीदायक नावांची स्थळे काश्मीर खोऱ्यात शिरायच्या आधी लागतात.
या  जागा बाधित आहेत असे म्हणतात. नवख्या प्रवाशाला या दोन वेगवेगळ्या जागा कळून येत नाहीत. एकाच जागेला हे दोन नावे आहेत असेही काही लोक  म्हणतात.

खुनी नाला, शैतानी नाला हे काही नदी नाले नाहीत तर वाहन आतून जाईल असे एक प्रकारचं पुलासारखं छोटं बांधकाम आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात एका इंग्रज अधिकाऱ्याचा इथे अपघाती मृत्यू झाला तेव्हापासून या जागेला बाधित समजून या जागेबद्दल बरेच कथा दंतकथा तयार झाल्यात.

जवळ तान्हं बाळ असलेली एक स्त्री रात्री येथून प्रवास करताना 'लिफ्ट' मागते आणि अमानवी अनुभव येतात असं काही लोक म्हणतात, मानतात.
खुनी , शैतानी नाला पार करताना ते इंग्रजी अधिकाऱ्याचं भूत समोरील बांधकाम दृष्टीस पडू देत नाही, सरळ रस्ता दिसतो आणि चालक समोरील पुलावर धडकतो आणि अपघाती मृत्यू होतात अशी एक वदंता आहे.
पण खरोखर या भागात अपघातांचं प्रमाण जास्त आहे. हे सत्य आहे.

बुद्धीने विचार करताना एक कळतं ,खुनी नाला आणि शैतानी नाला या स्थळांची भौगोलिक स्थितीही या अपघाताना कारणीभूत आहे. ही जागा बर्फाच्या सुनामीसाठी 'प्रोन' आहे.
बर्फाची सुनामी म्हणजे 'अॅवलॉन्च' या भागात होतात. या बांधकामाला , पुलाला लागूनच डोंगर आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, अॅवलॉन्चेस  येणे हे या भागात होत असतं. शिवाय रात्री धुक्यामुळे अनोळखी प्रवास्याला येथील पुरेपूर माहिती नसते त्यामुळे येथे अपघात होतात.
रात्रीच्या प्रवासात या भागात कृत्रिम दिवे नाहीत त्यामुळे पावसाळ्यात, हिवाळ्यात दरडी कोसळल्याने, अरुंद जागेमुळे रहदारी खोळंबते यातूनही अपघात होतात. या सगळ्या नकारात्मक भावनेतून खुनी नाला, शैतानी नाला या भुताने बाधीत जागा आहेत हे भूतबाधित क्षेत्र आहे ही कथा, दंतकथा, वदंता निर्माण झाली आहे.
पण तरीही कुठल्याही गोष्टीवर निष्कर्षाचं शिक्कामोर्तब करताना व्यक्तिपरत्वे  अनुभवासाठी एक छोटी पोकळी , जागा रिक्त ठेवावी लागते. ठेवायला हवी कारण अनुभव घेणाऱ्याने तो प्रत्यक्ष घेतला असतो तर इतर फक्त बुद्धी, अंदाज, आणि लॉजिक साहाय्याने त्यावर निष्कर्ष काढून एक सोयीस्कर शिक्कामोर्तब करत असतात.

 आमच्या दुपारी दोन वाजता आमच्या बसने खुनी आणि शैतानी नाला पार केला.

थोड्याच वेळात आम्ही प्रसिद्द जवाहरलाल बोगद्यापाशी येऊन थांबलो. हा बोगदा भारतातील अत्यन्त महत्वाचा आणि संवेदनशील स्थळ आहे.
हा एकमेव बोगदा भारताला आणि काश्मीर खोऱ्याला जोडतो. या जागेला सामरिक दृष्ट्या, राष्ट्रीय दृष्टीने अत्यन्त महत्व आहे. या बोगद्यातूनच काश्मीर खोऱ्यात प्रवेश करता येतो. या बोगद्यावर पाकिस्तानचे लक्ष असतं.
कारण इथून पाकिस्तान सीमारेषा अगदी जवळ आहे.
कारगिल युद्धात "जवाहरलाल टनेल " ज्याला बनिहाल बोगदा ही म्हणतात या बोगद्यवर ताबा मिळवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता. हा बोगदा एकदा नष्ट केला की भारताचं काश्मीर खोऱ्यात परिवहन बंद होईल, भारतीय सैन्य वाहनाद्वारे काश्मीरमध्ये प्रवेश करू शकणार नाही , परिणामी पाकिस्तानला काश्मीरवर ताबा मिळवणे खूप सहज होईल यामुळे कारगिल युद्धात या बनिहाल बोगद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते ; पण भारतीय सैन्याने संपूर्ण शक्तीनिशी या बोगद्याचे रक्षण केले .
या टनेलला बनिहाल टनेलही म्हणतात कारण बनिहाल नावाच्या टुमदार पर्वतीय आणि भारत आणि काश्मीर खोऱ्याला जोडणाऱ्या सीमेवर वसलेल्या गावात हा बोगदा सुरू होतो.
आजूबाजूला उंच उंच विशाल पर्वत, घरे, हॉटेल्स, दवाखाना, दुकाने , शाळा, मेडिकल स्टोअर्स आणि मोठा बाजार असलेलं हे गाव आहे.पण जितकं सुंदर गाव तितकिच अशांतता येथे नांदते. जणू येथूनच शापित सौंदर्य असलेल्या काश्मीरच्या नंदनवनाची सुरवात होते. येथे बरेचदा आतंकवादी चकमक, अपघात, अॅवलॉन्चेस होतात. गावात चुकूनही कुठेही हिंदी भाषेत काहीही आढळत नाही , दरवाज्यावरील  प्रत्येक पाटी, दुकानावरील प्रत्येक बोर्ड, भिंतीवरील लिखाण सर्वकाही उर्दु भाषेतच वा क्वचित इंग्रजीमध्ये.

बनिहाल गावाला निरोप देऊन ,सैन्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आमच्या बसने बनिहाल बोगद्यात प्रवेश केला.
हा मे 2017 पर्यंत भारतातील सगळ्यात लांब बोगदा होता. जुना बोगदा असल्याने आतून अरुंद आणि हवा येण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने आत काही प्रवाश्यांना गुदमरायला होत होतं. शिवाय आतमध्ये उजेड नाही . अरुंद असल्याने आत काहीवेळा रहदारी ठप्प होऊन थांबावे लागत होते.परिणामी काही प्रवाश्याचा जीव घाबरा झाला.
एकदाचं आम्ही त्या अंधेरी गुंफेतून बाहेर आलो.

बसने एक वळण घेतलं, समोर लिहिलं होतं ," वेलकम टु काश्मीर!" " काश्मीर घाटीचं प्रथम दर्शन करवणारी ही जागा आहे!" असं एका मोठ्या शिळेवर लिहीलं होतं.
खाली काश्मीर खोरं दिसत होतं. वरून शांत , सुंदर निसर्ग असलेलं काश्मीर खोरं आणि प्रत्यक्षात....

आम्ही काश्मीर मध्ये प्रवेशते झालो. अमरनाथ यात्रेला खरी सुरवात आता होणार होती.देशाला काश्मीरशी जोडणारा बनिहाल बोगदा... - http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5451589720613916801http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5451589720613916801&title=Amarnath%20Yatra%20%E2%80%93%20Part%208&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=Amarnath%20trek

अमरनाथ यात्रिक सैनिक..


सने जवाहर बोगदा पार केला आणि आम्ही काश्मीर खोऱ्यात प्रवेशते झालो. सहा तासांपासून असलेला घाटरस्ता संपून सरळ रस्ता सुरु झाला. पोटातील स्नायूंचा वळणदार व्यायाम संपला एकदाचा! या व्यायामामुळे अनेक यात्रेकरूंनी प्रवासात 'उलट' उत्सर्जन कर्म केले होते.
पुढे एक गाव लागलं ,इथून बसेसचे रस्ते वेगळे झालेत. आमची बस पहलगामला जाणार होती तर बाकी काही बसेस बालतालला जाणार होत्या.
बालतालला जाताना श्रीनगरहुन जावं लागतं तर
पहलगामला जाताना अनंतनाग पार करावं लागतं.
त्या गावापासून अनंतनागकडे जायचा फाटा फुटतो. आमच्या आणि काही बसेसने उजवीकडे वळण घेतलं आणि अनंतनागकडे आमचा छोटा ताफा धावू लागलो.

सामान्य ज्ञानात अगदीच सर्वसामान्य असलेल्या व्यक्तीलाही अनंतनागबद्दल ,तेथील आतंकवादी चकमकींबद्दल माहिती असतं, कारण वर्तमानपत्रात काश्मीरमधील नकारात्मक बातम्या काही असतील तर त्यात अनंतनाग जिल्हा बरेचदा आढळतोच .
अनंतनाग हे दक्षिण काश्मीरातील एक स्फोटक, विघटनवाद्याचा खूप जास्त प्रभाव असलेलं शहर आहे.
यावर्षी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला झाला ; ज्यात काही यात्रेकरू 'शहीद' झालेत, तो हल्ला अनंतनागजवळच याच फाट्यावर झाला होता.
मी यात्रेकरूंना 'शहीद' म्हटलं कारण अमरनाथ ही यात्रा धार्मिक न राहता राष्ट्रीय यात्रा हळूहळू व्हायला लागते. आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी, राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच पण दरवर्षी  आतंकवादी कारवायांना न जुमानता, धमक्यांना न घाबरता 'आपल्या' देशातील जमीनीवर जाऊन शंकराच्या पिंडीचे दर्शन घेणारा सामान्य माणूस, भारतीयही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो.

या अमरनाथ यात्रेमुळे दरवर्षी हजारो लोक त्या विघटनवादी भागात जाऊन बम बम भोले ची आरोळी देतात यामुळे भावनीकरित्या नकळतपणे तो भाग देशाशी पक्का जोडला जातो. कारण फक्त भारतीय सैन्य आणि तिरंगा फडकत ठेऊन तो भाग कागदावरजरी भारतातील असला तरी जोवर कन्याकुमारी, कांचीपुरम ,म्हैसूर ते मुंबईपासून देशभरातील सर्वसामान्य भारतीय नागरिक काश्मिरात जात नाही तोवर तो शेवटचा भाग भारतात असल्याचे मनाला भासत नाही. म्हणून ही यात्रा नकारात्मकतेविरुद्ध, हिंसेविरुद्ध, द्वेषाविरुद्ध आहे आणि प्रत्येक यात्रेकरू हा त्यातील एक सैनिक असतो. म्हणून आजवर अमरनाथ यात्रेकरूंवर अनेक हल्ले झालेत , त्यात मृत्यमुखी पडलेले सर्व यात्रेकरू हे सैनिकाप्रमाणे 'शहीद' ठरतात.

 बस अनंतनागमध्ये शिरली . पहलगामच्या दिशेने शहरातून बाहेर पडत धावू लागली. अनंतनाग शहर मोठं, आणि स्वच्छ दिसत होतं. मी तिसऱ्यांदा इथे आलो होतो . पण यावेळी मला जे दिसलं ते भयप्रद होतं, धक्का होता बसमधील प्रत्येक यात्रेकरूंना!
जवळपास पाच एक ठिकाणी घरावर, चौकातील भिंतीवर लिहिलेलं होतं ," बुऱ्हान वाणी इज अवर नॅशनल हिरो!"
"इंडिया गो बॅक"
"हिंदुस्तान मुरदाबाद"!
ज्या ज्या यात्रेकरूंनी बसच्या खिडकीतुन हे बघितलं त्यांनी इतरांना ते दाखवलं, कुजबुज सुरू झाली.

8 जुलै 2016 साली लष्करे तोयबाचा प्रमुख बुऱ्हाण वाणीचा खातमा भारतीय लष्कराने केला होता. त्यावेळीही अमरनाथ यात्रा सुरू होती. त्या क्षणापासून काश्मीर खोऱ्यात संचारबंदी , चकमकी झाल्या होत्या . जवळपास दोन महिने तेथे संचारबंदी, हिंसा सुरू होती. त्यावेळी अमरनाथ यात्रा रद्द झाली होती पण त्यानंतर खोऱ्यातून बाहेर पडेपर्यंत जे यात्रेकरूंचे हाल झाले ते ऐकून थरकाप उडतो. हजारो यात्रेकरू बालतालच्या छोट्या कॅम्पमध्ये अडकले होते. सर्व सुविधा, परिवहन ठप्प झाले होते. असो तो वेगळा विषय आहे. त्यावर पुढे कधीतरी.
पण तरीही यावर्षीही यात्रेकरू न डगमगता , आतंकवादी धमक्यांना न घाबरता यात्रेला आले होतेच. म्हणूनच ते 'सैनिक' वाटतात.

8 जुलैला बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूला एक वर्ष होणार होतं. त्यामुळे पुन्हा काहीतरी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
पण ते भारताविरुद्धची जाहिरातबाजी, फलक बघून अमरनाथ यात्रेची दुसरी बाजू लक्षात आली. सगळेजण तोवर प्रवासाची मजा घेत होते पण आपण नक्की कुठे आलो आहोत , येथील धोके काय आहेत हे आता सगळ्यांच्या लक्षात आले होते.

अनंतनागच्या बाहेर येताच ,पहलगामच्या रस्त्यावर येताच निसर्गाचे रूप पालटले, सुंदर हिरवा निसर्ग, मोठमोठे पर्वत दिसू लागले.
दोन्ही बाजूंना अत्यन्त सुंदर शेती होती. लाकडी बांधकाम जास्त असलेली घरं होती. धिप्पाड चिनार वृक्ष उभे होते आणि इथून दिसू लागली एक उनाड अवखळ , चैतन्याने भारलेली एक सखी, लिडर नदी.
अत्यन्त वेगवान प्रवाहात ती वाहत होती. पाणी शुभ्र , निळसर, आणि अत्यन्त फेसाळत होतं कारण वेग प्रचंड होता. ही लिडर नदी मैत्रीण संपूर्ण यात्रेमध्ये सोबत असणार होती.
बस पहलगाम बेस कॅम्पला थाम्बली.
आजूबाजूला प्रचंड सैनिकी संरक्षण.
अमरनाथ यात्रेचा सगळ्यात मोठा बेस कॅम्प हा पहलगाम बेस कॅम्प असतो.
जम्मू बेस कॅम्पमधून महत्वाचा टप्पा पहलगाम बेसकॅम्पमध्ये आलो होतो. आजूबाजूला खूप तंबू होते. दुसऱ्या दिवसापासून खरी पायी यात्रा सुरू होणार होती. फक्त एक  रात्र या बेसकॅम्पमध्ये तंबूत घालवायची होती. आणि एक सुंदर अनुभव घ्यायचा होता.http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5061818157954376371&title=Amarnath%20Yatra%20%E2%80%93%20Part%209&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=Amarnath%20trek

विक्रमादित्य आणि पाठीवरील वेताळ

http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5422318523962953798

बेसकॅम्पच्या बराच आधी बस थांबली. माझी जड बॅग उचलायचं जीवावर येत होतं, खूपच थकवा जाणवत होता, पण पर्याय नव्हता, पाठीवर रकसॅकचा संसार उचलून "मै बंजारा".." "दिवाना मैं चला उसे ढुंढने बडे प्यार से.." भाव मनात दाटीत चालू लागलो. डाव्या हाताला वेगाने खळाळत, आवाज करत लिडर  नदी वाहत होती. पर्वतांमध्ये तिचा जन्म झाला होता , आकाशाचा फिरोजा रंग आणि अवतीभोवतीच्या निसर्गाच्या हिरवा रंग स्वतःत शोषून घेत वाहत होती. किंचित हिरवा जास्तीत जास्त फिरोजा रंग , आणि फेसाळता शुभ्र रंग असे त्रिरंगी नदी आपल्याच नादात धावत होती.
वाहताना नाद खळाळता नाद निर्माण करीत होती. तो खळखळाट , नाद खूप कर्णमधुर वाटत होता. वातावरणात चैतन्य ओतत होता.

प्रवाहाचा हिरवा ,निळा रंग हा शेवाळाचा नव्हताच!
 पाण्याचा नदीत कुठेही शेवाळ साचलं नव्हतं, शेवाळाला साचायला संधीच देत नव्हती ती, ती वेगाने जात होती, जगत होती, वर्तमानात राहून मार्गकंठीत होती. भूतकाळात वा भविष्यकाळात जगताना उदासीनतेचं शेवाळ साचत असतं, ती मात्र हातात नसलेल्या या दोन्ही काळांना फाट्यावर मारून फक्त वाहण्यावर, वर्तमानात लक्ष केंद्रित करत होती.

काही मूर्ख लोक तिच्यात प्लास्टिक बॅग्स , वस्तू टाकीत होते. भारतीयांची ही खोड सतत शिक्षा मिळाल्याशिवाय जाणार नाही.

मी समोर पोहचलो तेव्हा प्रथम आर्मीचे तपासणी केंद्र दिसलं. तिथे मेटल डीटेक्टरद्वारे बॅगेची, माझी तपासणी झाली. एका बाजूने खूप तंबू लागलेले दिसत होते.

 पुढे दोन किमी चालल्यावर बेस कॅम्पची प्रवेश स्थानापाशी पोहचलो, येथेही खूप आर्मी सैनिक होते, सतत लाऊड स्पीकरवरून सूचना सुरू होत्या. पुन्हा कसून तपासणी झाली आणि आत प्रवेश मिळाला.
समोर एक छोटासा रिकामा भाग असलेला चौक होता. तिथे एका भागात अमरनाथ गुहेपर्यंत जाण्याचा रस्ता, किती फूट रास्ता ,काय काळजी घ्यावी यामबंधी मोठा फोटो आणि  फलक लावला होता. दोन मोठया तंबूत पलंगासहित दवाखाना, मेडिकल स्टोअर होतं.

समोर जाताच काही काश्मिरी तरुणांनी तंबूसाठी गळ घालत विचारणे सुरू झाले , किती जण आहात, आमच्या तंबूत सीएफएल लाईट आहे, कोणी म्हणत त्यांच्या तंबूत मोबाईल चार्जिंगची सोय आहे.एकटा आल्याचा तंबू मिळवताना अडचण होऊ शकते हा अंदाज होताच. पण कुठलिही अडचण न येता तंबू ठरला आणि त्या काश्मिरी मुलासोबत तंबूस्तानाकडे जाऊ लागलो.  खूप एकसारखेच दिसणारे तंबू लागले होते. उंचच उंच वृक्षांमध्ये छोट्याश्या जंगलामध्ये तंबू ठोकले होते. ते एक टुमदार तंबूंचं छोटं गावच वाटत होतं.
मी त्या काश्मिरी माणसामागे चालत होतो. अनेक तंबू मागे पडल्यावर  शेवटी त्याने त्याचा टेंट दाखवलं. त्याला ठरल्याप्रमाणे पैसे देऊन पावती घेतली.
तंबूत जाऊन मी माझ्या पाठीवरील वजनदार वेताळाला खाली उतरवले.

आत दोघेजण होते. ते खूप निवांत बसले होते. जणू या यात्रेचा पूर्वानुभव त्यांच्याकडे होता.
त्यांच्याशी  बोलणं झाल्यावर कळलं की ते बरेच अनुभवी आहेत. त्यांनी काही मौलिक अनुभवी बोल, सूचना दिल्यावर मला मी जम्मूतच केलेल्या एका मोठ्या चुकीची जाणीव झाली. ते म्हणाले इतकी मोठी बॅग सोबत बाळगून जाणं केवळ अशक्य आहे, त्यापेक्षा इथेच बॅग लॉकरमध्ये ठेवा आणि परत येथेच येऊन बॅग घेऊन जम्मूला परत जा.

मला संपुर्णपणे जाणीव झाली मी केलेल्या मोठ्या चुकीची! मी जम्मू बेसकॅम्पमध्येच बॅग ठेवली नाही ही मोठी चूक झाली होती. तेव्हा आठवलं होतं की बहुतेक लोक मोठ्या बॅग्स , सामान जम्मूतच लॉकरमध्ये ठेवून पायी चढण्यासाठी पाठीवर छोटी बॅग घेऊन आले होते.

सगळयात मोठा हिमालयाइतका प्रश्न हा पडला की मी माझा पाठीवरचा वजनदार वेताळ इथेच ठेवला तर मला परत येथे यावं लागेल, आणि दर्शनानंतर गुफेपासून माझा परतीचा मार्ग पहलगाम नसून बालताल होता. आणि बालताल आणि पहलगामचा दूर दूर जवळपास संबंध नाही.
काय करावं! माझी अवस्था पाठीवरील वेताळाने प्रश्न विचारलेल्या , संभ्रमात पडलेल्या विक्रमादित्यासारखी झाली.
 पहलगाम ते अमरनाथ गुंफा हा तीन रात्री मुक्काम असलेला दूरचा मार्ग आहे.
मी त्या मार्गाने जात होतो.
अमरनाथ गुंफा ते बालताल हा फक्त सात ते आठ तासांचा प्रवास आहे , त्यामुळे जवळपास शंभर टक्के पहलगामहुन जाणारे लोक त्या मार्गाने परतीचा प्रवास करतात. यामुळे  त्यांचे दोन्ही रस्त्यांवरील प्रवास होऊन वर्तुळ पूर्ण होतं. मी ही तेच करणार होतो. परंतु मी जर इथेच पहलगामला माझी वजनदार मोठी बॅग ठेवली तर मला पुन्हा याच दूरच्या रस्त्याने परत येथे पहलगामला यावं लागणार होतं !
बॅगरूपी वेतळाला पाठीवरून वर गुफेपर्यंत घेऊन जाणे केवळ त्रिकाळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला तरी मृत्यू शंभर टक्के !
काय करावं! वेताळाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी अडचण नाही दिलं तर मस्तकाचे शकलं होणार,  संकटात सापडलेल्या राजा विक्रमादित्याप्रमाणे माझी अवस्था झाली!

तेव्हा मी पाठीवर रकसॅक घेऊन जीवावर उदार होण्यापेक्षा जीवावर मोठा दगड ठेऊन , गुफेतील दर्शनानंतर बालताल या छोट्या रस्त्याने सगळ्यांसोबत परत जाणे रद्द करून  ज्या मार्गाने गेलो पुन्हा त्याच दूरच्या मार्गाने परत येथे पहलगाम बेसकॅम्पलाच यायचे ठरवले.

तंबुतील त्या दोघांनी सुचवल्याप्रमाणे पाठीवरील मोठा वेताळाला पहलगामला लॉकरमध्ये सुरक्षित ठेऊन छोटी बॅग विकत घेउन त्यात अगदी कामाचे गरम कपडे घेऊन चढायचं ठरवलं , आणि एक पाठीवरील छोटी हलकी 'बॅगवती' घेण्यासाठी मी बाहेर पडलो.https://m.facebook.com/story.php?story_fbid=1780627652233761&id=1654907014805826