Showing posts with label दीन दिन. Show all posts
Showing posts with label दीन दिन. Show all posts

Tuesday, 17 July 2018

इमोजी मुद्रा दिन

मला वाटतं इमोटीकॉन्समध्येही स्त्रियांचा राखीव कोटा आहे.

यातील खास दोन इमोटीकॉन्स हे स्त्रियांकडुनच जास्त वापरले जातात.

एक दात विचकणारी मुद्रा.  गेले  दोन वर्षे तिचं फार मार्केट होतं. मला कधी कळलं नाही, अजूनही कळत नाही,  प्रत्येक वाक्यानंतर मुली त्या दात विचकणाऱ्या चेहऱ्याच्या इमोटीचं ‘संपूट’ का लावतात!

मला पूर्वी वाटायचं फक्त भारतीय मुलीनाच ही भीतीदायक दात विचकणाऱ्या स्मायलीची (?) बाधा झालीये का!

पण नाही तसे.

एक आयर्लंडची जुनी मैत्रीण, तिने दोन वर्षांपूर्वी फक्त माझ्या सांगण्यावरून तात्पुरतं वॉट्स अॅप डाउनलोड केलं होतं. आणि ही दात विचकणारी विकट हास्यमुद्रा मार्केटमध्ये तेव्हा आली . तेव्हा तीसुद्धा प्रत्येक वाक्यानंतर ती दातांवर दात ठेवलेली स्मायली पाठवू लागली. तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. कानामागून आली आणि दात विचकट तिखट झाली.

आता मात्र कोणी मला ते दात दाखवणारी मुद्रा पाठवली की म्हणतो , “गूड असेच दात रोज घासत जा!

लहान मुले ‘ई’ केल्यावर तसे दात दाखवतात बा!

पण दीड दोन वर्षे तिचं मार्केट चाललं पण त्यानंतर ‘ती’ आली तिने डोळे ‘वर’ करून बघितलं आणि ती जिंकली.

स्त्री वर्गात सगळ्यात तुफान चालणारी मुद्रा, इमोटीकॉन वर डोळे करणारी ‘#चेटकीण’ स्मायली. दिवस रात्रीस खेळ चाले हिचा.

दररोज ठराविक संख्येत डोळे वर केलेली ती चेटकीण स्मायली पाठवण्याचं काही मुलींचं व्रतच असतं बहुतेक. बुबुळे वर केलेली ती भयप्रद स्मायली वापरताना काय आनंद मिळतो कोण जाणे.

स्मायलींच्या दुकानात आता शेकडो भावमुद्रा आल्यात. मी मात्र सलमान खान , बाबी देवल प्रमाणे फक्त बेसिक दोनच मुद्रा वापरतो. वापरू शकतो. एकतर आनंदी चेहऱ्याचा स्मायली  नाहीतर रक्त-लाल संतापी चेहऱ्याचा #संतापली  .
एकतर उत्तर ध्रुव नाहीतर दक्षिण ध्रुव. बाकी इमोटीकॉन्सचे माईंड गेम्स मजला जमत नाही. इमोतीकॉन्सचे ते गेम्स कॉन्स लोकांनाच  जमतात बरें . ते सेक्रेड ईमोजी गेम्स अस्सल प्लेयर्सनाच जमू शकतात. असो तिकडे सेक्रेड गेम्सची वांधे झाले आहेत. कोर्टाने त्याला नाहीचा इमोजी दाखवलाय.

😒-😏 या दोन इमोटी राण्यांची जोडीची बाय डिफॉल्ट सेटिंग असते कित्येक जणांकडे.

आजकाल सगळयांना मान द्यावा लागतो. कनेक्टिव्हिटीला थ्रीजी, फोरजी , बिस्किटला पार्लेजी. स्पॉट ला जी- स्पॉट,म्हणून इमोटीकॉन्सला ‘#इमोजी’.

पण मला एक कळत नाही;  सर्व मिनरल वॉटर बॉटल्सला बिसलेरी म्हटल्या जातं तसं सर्व इमोटीकॉन्सना ‘स्मायली’ का म्हणतात!

अश्रूपात करणाऱ्या, दुःखी मुद्रा करणाऱ्या इमोजीना ‘#क्रायली’ का म्हणत नाही!!??

#EmoticonsDay

- Abhijeet Panse

Thursday, 22 March 2018

हीच ती वेळ हाच तो क्षण

'हीच ती वेळ हाच तो क्षण"

त्यालाही ती आवडायची. लवकरच तिलाही तो आवडु लागला होता. शेवटी मागच्यावर्षी त्याने तिला औपचारिकरित्या प्रपोज केलंच.
बरेच हिंदी चित्रपट बघितल्याने तिनेही गालावर दोन हात ठेवून सरप्राईजड झाल्यासारखं “ओह माय गॉड!” वाले भाव देऊन ‘हो’ म्हटलं होतं.
‘अशावेळी’ दोघांनाही किस करायचं होतं पण त्यांना प्रायव्हसी  मिळाली नव्हती.

आणि हेच त्याच्या महादुःखाचं कारण होतं. प्रायव्हसी न मिळणे!
वर्ष झालं पण दोघेही आपापल्या कामात, आणि मित्र आणि लोकांच्या गराड्यात !
 आजवर एकांत मिळाला नसल्याने दोघेही, विशेषतः तो फार वैतागला होता.

14 फेब्रुवारीलाच ती बऱ्याच महिन्यांसाठी शहराबाहेर जाणार होती. म्हणून दोघांनीही ठरवून तेरा फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन्स डे च्या आदल्या दिवशी सुटी घेऊन बाहेर भेटायचं ठरवलं.

 आज त्याने तिला ‘किस’ करण्याचा चंग बांधलाच होता! सोशिअल मीडिया अपडेट्सवरून आज “किस डे” आहे हे कळलं होतं.
वाह आज छान इंग्लिश मुहूर्तही आहे तर! तो स्वतःशीच खुष होता.
तिचीही ‘ना’ नसणारच होती.
“पण किस करणार कुठे?” हा प्रश्न त्याला नेहमीप्रमाणे सतावत होता.

संपूर्ण दिवस आज सोबत घालवायचा ठरवलं होतं.
त्याने क्लुप्ती लढवली, मुव्ही हॉलमध्ये तिला किस करता येईल म्हणून मुव्ही 'ऐकायचा' ठरवलं! त्याने दुपारी तिला तिच्या बिल्डिंगखालून तिला पिक अप केलं. वर फ्लॅटमध्ये तिच्या मैत्रिणी, फ्लॅटमेट्स असल्याने वर जाण्यात काहीच अर्थ नव्हता.

ती खाली आली. तीने नवा हेअरकट केला होता. कॅजुअल्समध्येही ती नेहमीप्रमाणे आकर्षक दिसत होती.
ते मॉलच्या पार्किंगमध्ये पोहचले. त्याने बाईक मुद्दाम बेसमेंटला पार्किंग भागात अगदी शेवटी एका मोठ्या पिलरच्या मागे लावली. तो सतत संधीच्या शोधात होताच.
ती चेहऱ्यावरील स्कार्फ काढत असताना त्याने आजूबाजूला  सगळीकडे दृष्टी फिरवली. कोणीही दिसलं नाही. हीच ती वेळ हाच तो क्षण! तो तिच्या जवळ गेला. तिलाही ते अगदी अनपेक्षित होतं. तो तिला किस करणार तर …
“कौन है उधर पिछे! इतना टाईम क्यू लग रहा है पार्किंग मे!”

“हा बस चाबी गिर गयी थी! जा ही रहे है!”

तिथल्या सिक्युरिटीगार्ड ने त्याचं “#मिशनचुंबन” काही पूर्ण होऊ दिलं नाही.
ती ही या सगळ्या मजेदार प्रकारामुळे हसत होती.

ते वरच्या मजल्यावर मुव्ही हॉलपाशी पोहचले. "हो हीच ती जागा! जी अजरामर होणार आठवणीत! प्रथम चुंबन स्थळ!"
कुठल्या तरी फ्लॉप मुव्हीचं तिकीट काढायचं त्याने ठरवलं होतंच.
पण सर्व चित्रपट याच आठवड्यात रिलीज झालेले.

“टू कॉर्नर सीट्स प्लिज !” त्याने काचेपलीकडील नेव्ही ब्ल्यू कॅप घातलेल्या मुलाला सांगितलं.
“सॉरी टॉपमोस्ट कॉर्नर सीट्स आर नॉट अवेलेबल!” ओन्ली एट मिडल सीट्स आर अवेलेबल!

अरेरे हे काय! ही संधीही जाते काय! बघू आत जाऊन तर!
पण काम-देवाचं नाव घेऊन त्याने उपलब्ध सीट्सपैकी दोन सीट्स बुक केल्यात.

आत संपूर्ण हॉल भरला होता. ते आपल्या सीट्स वर जाऊन बसलेत. हॉलमधील दिवे हळूहळू धूसर होत काळोखाची चादर पसरली. शेजारच्या आणि मागच्या जागेवर कोणीही नव्हतं. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. तिलाही झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, ती मात्र नॉर्मल होती.

 तितक्यात एक घोळका आला. एक मोठं कुटुंब आलं. त्यात काही वृद्ध बायका माणसेही होती. ते त्यांच्या मागे पुढे रिकाम्या आसनावर जाऊन बसलेत.
त्याचा पुन्हा हिरमोड झाला.

पण तिचं अगदी निकटचं सानिध्य अनुभवताना तो रोमांचित झाला होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. बस आता वाट बघायची होती नेमक्या क्षणाची!
लोक चित्रपट बघण्यात गुंग असताना , हीच ती वेळ हाच तो क्षण , तो तिच्या अगदी निकट पोहचला. त्याने हळूच मागे वळून बघितलं तर मागे दोन म्हातारे भिंगाच्या चष्म्यातून एकटक समोर याच्याकडेच बघत होते.
तो एकदम शरमून बाजूला झाला.
संपूर्ण चित्रपट त्याने चरफडत त्या दोन मागच्या आजोबांसोबत आणि शेजारच्या सतत आवाज करणारया चिल्लर पार्टी मुलांसोबतच बघितला.

एकदाचा रटाळ चित्रपट सम्पला. दोघे बाहेर आलेत. मग मॉलमध्ये गप्पा, इकडे तिकडे फिरून झालं पण त्याला एकांत काही केल्या मिळत नव्हती. त्याचं लक्ष बाकी कश्यातच नव्हतं. तिची घरी परत जायची वेळ आली.
सगळ्यात वरच्या मजल्यावरून खाली जाताना येताना त्याच्या डोक्यात एक अजून अनप्रॅक्टिकल आयडिया सुचली. कॅप्सूल लिफ्ट ऐवजी त्याने नॉर्मल लिफ्टने खाली जायचं ठरवलं.

आह वाह संपूर्ण लिफ्ट रिकामी! आत ते दोघेच!
त्याने ‘G’ च्या लाल बटणावर दाब दिला. लिफ्ट खाली जाऊ लागली.

“बस साठ सेकंदस है तुम्हारे पास , इस साठ सेकन्ड्स में अगर तुमने किस कर लिया तो ये साठ सेकंदस जिंदगी भर तुमहें याद रहेंगे! “तो स्वतःला मनातल्या मनात बजावू लागला. ती मात्र त्याच्या या क्लुप्तीपासून अनभिज्ञ होती.
हीच ती वेळ हाच...
 त्याने तिला हळूच जवळ घेण्याचा प्रयत्न केला . तिने सरळ त्याला दूर केलं. “अरे काहीही काय सीसीटीव्ही कॅमेरा असतो लिफ्टमध्ये! ती विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जाहिरात आठवत नाही का!

 ”हम्म.. त्यांचं त्या जाहिरातपासून सेटिंग जमलं ना..पण आपलं सेटिंग कधी जमणार!”
तो चरफडत स्वतःशीच बोलत दूर झाला.

ते बाईकवरून तिच्या बिल्डिंगजवळ पोहचले. तो प्रवासभर नाराज होता. खाली बिल्डींगपाशी अंधार होता. झाडे वृक्षांमुळे ते जरा आडोश्यात उभे राहिलेत. त्याला पुन्हा संधी मिळाल्याची, पुन्हा एकदा हाच तो क्षण हीच ती वेळ असल्याची भावना झाली. “वृक्षवल्ली खरंच सोयरे असतात तरुण लोकांचे नाही! !” त्याने कामदेवाचं स्मरण करून तिच्या जवळ गेला.
तेवढ्यात एक माणूस बाईक थांबवून तिथे फोन वर बोलत राहिला.

त्याची शेवटची आशाही धुळीस मिळाली.
“या देशात कोणी शांत चित्ताने एक किसही नाही करू शकत का!”

तिला तितक्यात एक फोन आला. तो नाराजीने तिला बाय म्हणत जाऊ लागला. त्याची नाराजी, दुःख तिला कळत होतं.
तिचं फोन वर एक मिनिट बोलणं झाल्यावर, चेहऱ्यावर आणि डोळ्यात खट्याळ भाव आणत म्हणाली, “आज फ्लॅटमेट्स बाहेर गेले आहेत ट्रिपला! आज रात्री कोणीही नसणार वर! तू आज रात्री राहू शकतोस! आत्ता मैत्रिणीचाच फोन होता!”

शेवटच्या क्षणाला मरणाऱ्याच्या तोंडी अमृत पडावं आणि तो पुन्हा टवटवीत व्हावा अशी त्याची अवस्था झाली.
त्याने हवेत जोरदार उडी मारली त्याने! उडी मारून हवेत मागे पायाला पाय लावण्याचा, स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला . पण जमले नाही. पायात पाय अडकून आपटायचा राहिला. पण आता त्याची कसलीच तक्रार नव्हती.
"मिशन चुंबन" आज शांतपणे, पूर्ण प्रायव्हसीमध्ये पूर्ण होणार होतं.

त्याला हॉलमध्ये बसवून ती तिच्या खोलीत गेली. आता त्याला घाईगडबड नव्हती संपूर्ण रात्र त्यांचीच होती! ती काही वेळाने बाहेर आली.
तिने गुडघ्यापर्यंत वन पिस घातलं होतं. केस ओलसर होते. हलकंसं लिपस्टिक लावलं होतं.
ती अत्यंत मादक दिसत होती.
त्याने तिला जवळ ओढलं. तिच्या मानेजवळील परफ्युमचा सुगंध त्याच्या गात्रा गात्रांना, संपूर्ण संवेदनांना पुलकित..जागृत करून गेला.

तो आणखी  तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा त्याने दोन्ही हाताने हलकंसा धरून तिला किस करण्यासाठी सावधान झाला! हो हो हीच ती वेळ हाच तो क्षण!

तिने त्याला दूर केलं.
“ यु गॉट प्रोटेक्शन नो?”

“भुकेला मागतो एक किस आणि देव देतो..” अशी त्याची मनातल्या मनात अवस्था झाली.

तो अगदी चेहऱ्यावर स्वतःबद्दल अभिमानाचे भाव आणून तिच्या दोन्ही खांद्याना दोन हाताने पकडत म्हणाला,
“ तु माझा हा मोबाईल बघितलास?  सहा महिने झालेत अजून त्याचं स्क्रीनकव्हर मी काढलं नाही! मी कधी हेल्मेटशिवाय गाडी चालवताना तुला दिसलो का?  नवी बाईक घेतली तेव्हा कित्येक दिवस तिचं कव्हर काढलं नव्हतं! मित्र त्याला काँडम कव्हर म्हणायचे..बाईकला व्हर्जिन बाईक म्हणायचे!  अगं प्रोटेक्शनशिवाय तर मी काहीच करत नाही! प्रोटेक्शन इज मस्ट!
रुबाबात पॅन्टच्या खिशातून त्याने प्रोटेक्शनचं पाकीट काढलं! तिला दाखवलं!

“ओह्हो”! ‘क्या बात है!”
तिनेच त्याला ओढून आपल्या खोलीत घेऊन गेली. त्याला बेडवर ढकललं. ती त्याच्या संपूर्णपणे जवळ आली..पुन्हा एकदा त्याच्या संवेदना जागृत झाल्यात..जोरदार उफाळून आल्यात..त्याला किस करण्यासाठी ती त्याच्या अगदी निकट आली.. बस्स हीच ती वेळ हाच तो क्षण!
ती त्याला किस करणार तितक्यात..
त्याने तिला थांबवलं..

“एक मिनिट! तू आज मला दुपारी भेटायच्या आधी काय खाल्लं होतं? तू जेवली होतीस का?”

“किती रे काळजी करतो माझी!
हो मी तेव्हा घरून फिश आणि चिकन करी खाऊन आले होते! आय एम फुल नाव!
त्याच्या ओठांवर बोट ठेऊन म्हणाली ,
“नाव डोन्ट टॉक ..जस्ट एन्जॉय धिस मोमेंट! वि हॅव ओन्ली वन नाईट फॉर अ लॉंग टाईम!”

त्याला किस करण्यासाठी त्याच्या चेहरा घट्ट तिने पकडला..कोणत्याही क्षणी त्याच्या आयुष्यातील त्याचं पाहिलं किस होणार होतं. दुष्काळ संपला होता. घनन घनन घन गिर जाये बदरा..पार्श्वसंगीत सुरू होतं.
आणि त्याने तिला त्याच क्षणी बाजूला केले . तो उठून बसला.

“काय तू आज चिकन खाल्लंस!
आज महाशिवरात्रीचा उपास आहे मला! मी तुला किस नाही करू शकत! माझा उपास मोडेल ना!
जातो मी! जय शंभो! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
बाय!

आणि तो तडक निघून गेला. तीला काही कळेनासं होऊन ती बघत राहिली!
 आज दुसऱ्यांदा शंकराने कामदेवाला भस्म केलं होतं.

समाप्त.

#किसडे #महाशिवरात्रीपेशल.
१३ फेब्रुवारी 018

-Abhijeet Panse

Tuesday, 27 February 2018

मराठी दिन

*मराठीदिन*

Poetry is the spontaneous overflow of powerful emotions recollected at the time of tranquility-
"William Wordsworth".

 इंग्लिश कवी वर्डस्वर्थने सांगितलेली कवितेची ही व्याख्या जगविख्यात आणि प्रमाण आहे.
पण तुकाराम महाराजांनी त्यापूर्वीच हाच भावार्थ मांडणारे शब्द ..कविता कशी स्फुरली हे सांगीतले आहे.

"माझी मज झाली अनावर वाचा अंतरेची धावे स्वभावे बाहेर.."
-तुकाराम महाराज


मराठी दिन

'सत्तावन' म्हणजे सेवंटी वन का??''
असं विचारणाऱ्या मराठी लहान मुलांकडे आणि काही तरूण तरूणींकडे मी दयार्द्र दृष्टीने पाहुन हसण्यावर नेतो.

भारतीय शब्दांचा उच्चार करताना इंग्रजांची जीभ वळत नव्हती म्हणुन त्यांनी मद्रासचं चेन्नई, कोलकाताचं कलकत्ता वगैरे आणि इतर अनेक शब्दांचं त्यांच्या 'सोयीसाठी 'रुपांतर केलं.
पण साहेब गेल्यावरही त्यांनी मागे टाकलेलं त्यांचं उष्टं खरकटं चिवडताना; 'अजिंठा- वेरूळ' लेण्यांना साधं बोलतानाही सतत Ajanta& Ellora म्हणण्यात गर्व बाळगणाऱ्या अर्ध्या हळकंडाने पिवळे होणाऱ्यांची कीव येते.

पण गंगा नदीला Ganges ,ग्यांजेस म्हटल्यावर मात्र तळपायाची आग मस्तकात जाते.

आणि जेव्हा कोणी मराठी व्यक्ती मुंबईला '#बाॅम्बे' म्हणतं तेव्हा मात्र त्याचा मानसीक रोग आता मर्यादेच्या पलीकडे गेला असुन त्याला उपचाराची नाही तर प्रार्थनेची गरज आहे असं खुशाल समजावे आणि त्याला त्याच्या प्राप्त अवस्थेत तसेच सोडुन द्यावे.

(त.टी-ह्यात इतर कुठल्याही भाषेबद्दल वा भाषिकांबद्दल  आकस राग दुर दुर नाही.
हे फक्त उथळ मराठी लोकांसाठीच.)
इंग्रजी,हिंदीसहित सर्व भाषांचा चाहता,सर्वांच्या 'मातृभाषेचा' आदर करणारा आणि मराठीवर प्रेम करणारा

-अभिजित पानसे

Wednesday, 14 February 2018

हीच ती वेळ हाच तो क्षण"

त्यालाही ती आवडायची. ती ही त्याला हळूहळू लक्षात घ्यायला लागली. लवकरच तिलाही तो आवडायला लागला होता. शेवटी मागच्यावर्षी त्याने तिला औपचारिकरित्या प्रपोज केलंच. बरेच हिंदी चित्रपट बघितल्याने तिनेही गालावर दोन हात ठेवून सरप्राईजड झाल्यासारखं “ओह माय गॉड!” वाले भाव देऊन ‘हो’ म्हटलं होतं.
‘अशावेळी’ दोघांनाही किस करायचं होतं पण त्यांना प्रायव्हसी  मिळाली नव्हती.

आणि हेच त्याच्या महादुःखाचं कारण होतं. प्रायव्हसी न मिळणे!
वर्ष झालं पण दोघेही आपापल्या कामात, आणि मित्र आणि लोकांच्या गराड्यात !
 आजवर एकांत मिळाला नसल्याने दोघेही, विशेषतः तो वैतागला होता.

14 फेब्रुवारीला ती बऱ्याच महिन्यांसाठी शहराबाहेर जाणार होती. म्हणून दोघांनीही ठरवून तेरा फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन्स डे च्या आदल्या दिवशी सुटी घेऊन बाहेर भेटायचं ठरवलं.

 आज त्याने तिला ‘किस’ करण्याचा चंग बांधलाच होता! सोशिअल मीडिया अपडेट्सवरून आज “किस डे” आहे हे कळलं होतं.
वाह आज छान इंग्लिश मुहूर्तही आहे तर! तो स्वतःशीच खुष होता.
तिचीही ‘ना’ नसणारच होती.
“पण किस करणार कुठे?” हा प्रश्न त्याला नेहमीप्रमाणे सतावत होता.

संपूर्ण दिवस आज सोबत घालवायचा ठरवलं होतं.
त्याने क्लुप्ती लढवली, मुव्ही हॉलमध्ये तिला किस करता येईल म्हणून मुव्ही बघायचं ठरवलं! त्याने दुपारी तिला तिच्या बिल्डिंगखालून तिला पिक अप केलं. वर तिच्या मैत्रिणी फ्लॅटमेट्स असल्याने वर जाण्यात काहीच अर्थ नव्हता.

ती खाली आली. तीने नवा हेअरकट केला होता. कॅजुअल्समध्येही ती नेहमीप्रमाणे आकर्षक दिसत होती.
ते मॉलच्या पार्किंगमध्ये पोहचले. त्याने बाईक मुद्दाम बेसमेंटला पार्किंगच्या भागात अगदी शेवटी एका मोठ्या पिलरच्या मागे लावली. तो सतत संधीच्या शोधात होताच.
ती चेहऱ्यावरील स्कार्फ काढत असताना त्याने आजूबाजूला  सगळीकडे दृष्टी फिरवली. कोणीही दिसलं नाही. हीच ती वेळ हाच तो क्षण! तो तिच्या जवळ गेला. तिलाही ते अगदी अनपेक्षित होतं. तो तिला किस करणार तर …
“कौन है उधर पिछे! इतना टाईम क्यू लग रहा है पार्किंग मे!”

“हा बस चाबी गिर गयी थी! जा ही रहे है!”

तिथल्या सिक्युरिटीगार्ड ने त्याचं “मिशन चुंबन” काही पूर्ण होऊ दिलं नाही.
ती ही या सगळ्या मजेदार प्रकारामुळे हसत होती.

ते वरच्या मजल्यावर मुव्ही हॉलपाशी पोहचले. बस हीच ती जागा! जी अजरामर होणार आठवणीत! प्रथम चुंबन स्थळ!
कुठल्या तरी फ्लॉप मुव्हीचं तिकीट काढायचं त्याने ठरवलं होतंच.
पण सर्व चित्रपट याच आठवड्यात रिलीज झालेले.

“टू कॉर्नर सीट्स प्लिज !” त्याने काचेपलीकडील नेव्ही ब्ल्यू कॅप घातलेल्या मुलाला सांगितलं.
“सॉरी टॉपमोस्ट कॉर्नर सीट्स आर नॉट अवेलेबल!” ओन्ली एट मिडल सीट्स आर अवेलेबल!

अरेरे हे काय! ही संधीही जाते काय! बघू आत जाऊन तर!
पण काम-देवाचं नाव घेऊन त्याने उपलब्ध सीट्सपैकी दोन सीट्स बुक केल्यात.

आत संपूर्ण हॉल भरला होता. ते आपल्या सीट्स वर जाऊन बसलेत. हॉलमधील दिवे हळूहळू धूसर होत काळोखाची चादर पसरली. शेजारच्या आणि मागच्या जागेवर कोणीही नव्हतं. त्याला खूप आनंद झाला. तिलाही झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, ती मात्र नॉर्मल होती.

 तितक्यात एक घोळका आला. एक मोठं कुटुंब आलं. त्यात काही वृद्ध बायका माणसेही होती. ते त्यांच्या मागे पुढे रिकाम्या आसनावर जाऊन बसलेत.
त्याचा पुन्हा हिरमोड झाला.

पण तिचं अगदी निकटचं सानिध्य अनुभवताना तो रोमांचित झाला होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. बस आता वाट बघायची होती नेमक्या क्षणाची!
लोक चित्रपट बघण्यात गुंग असताना ,हीच ती वेळ हाच तो क्षण , तो तिच्या अगदी निकट पोहचला. त्याने हळूच मागे वळून बघितलं तर मागे दोन म्हातारे भिंगाच्या चष्म्यातून एकटक समोर याच्याकडेच बघत होते.
तो एकदम शरमून बाजूला झाला.
संपूर्ण चित्रपट त्याने चरफडत त्या दोन मागच्या आजोबांसोबत आणि शेजारच्या सतत आवाज करणारया चिल्लर पार्टी मुलांसोबतच बघितला.

एकदाचा रटाळ चित्रपट सम्पला. दोघे बाहेर आलेत. मग मॉलमध्ये गप्पा, इकडे तिकडे फिरून झालं पण त्याला प्रायव्हसी काही केल्या मिळत नव्हती. त्याचं लक्ष बाकी कश्यातच नव्हतं. तिची घरी परत जायची वेळ आली.
सगळ्यात वरच्या मजल्यावरून खाली जाताना येताना त्याच्या डोक्यात एक अजून अनप्रॅक्टिकल आयडिया सुचली. कॅप्सूल लिफ्ट ऐवजी त्याने नॉर्मल लिफ्टने खाली जायचं ठरवलं.

आह वाह संपूर्ण लिफ्ट रिकामी! आत ते दोघेच!
त्याने ‘G’ च्या लाल बटणावर दाब दिला. लिफ्ट खाली जाऊ लागली.
“बस साठ सेकंदस है तुम्हारे पास , इस साठ सेकन्ड्स में अगर तुमने किस कर लिया तो ये साठ सेकंदस जिंदगी भर तुमहें याद रहेंगे! “तो स्वतःला मनातल्या मनात बजावू लागला. ती मात्र त्याच्या या क्लुप्तीपासून अनभिज्ञ होती.
हीच ती वेळ हाच...
 त्याने तिला हळूच जवळ घेण्याचा प्रयत्न केला . तिने सरळ त्याला दूर केलं. “अरे काहीही काय सीसीटीव्ही कॅमेरा असतो लिफ्टमध्ये! ती विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जाहिरात आठवत नाही का!

 ”हम्म.. त्यांचं त्या जाहिरातपासून सेटिंग जमलं..पण आपलं सेटिंग कधी जमणार!”
तो चरफडत स्वतःशी बोलत दूर झाला.

ते बाईकवरून तिच्या बिल्डिंगजवळ पोहचले. तो प्रवासभर नाराज होता. खाली बिल्डींगपाशी अंधार होता. झाडे वृक्षांमुळे ते जरा आडोश्यात उभे राहिलेत. त्याला पुन्हा संधी मिळाल्याची, हाच तो क्षण हीच ती वेळ असल्याची भावना झाली. “वृक्षवल्ली खरंच सोयरे असतात तरुण लोकांचे नाही! !” त्याने कामदेवाचं स्मरण करून तिच्या जवळ गेला.
तेवढ्यात एक माणूस बाईक थांबवून तिथे फोन वर बोलत राहिला.

त्याची शेवटची आशाही धुळीस मिळाली.
“या देशात कोणी शांत चित्ताने एक किसही नाही करू शकत का!”

तिला तितक्यात एक फोन आला. तो नाराजीने तिला बाय म्हणत जाऊ लागला. त्याची नाराजी, दुःख तिला कळत होतं.
तिचं फोन वर एक मिनिट बोलणं झाल्यावर, चेहऱ्यावर आणि डोळ्यात खट्याळ भाव आणत म्हणाली, “आज फ्लॅटमेट्स बाहेर गेले आहेत ट्रिपला! आज रात्री कोणीही नसणार वर! तू आज रात्री राहू शकतोस! आत्ता तिचाच फोन होता!”

शेवटच्या क्षणाला मरणाऱ्याच्या तोंडी अमृत पडावं आणि तो पुन्हा टवटवीत व्हावा अशी त्याची अवस्था झाली.
त्याने हवेत जोरदार उडी मारली त्याने! उडी मारून हवेत मागे पायाला पाय लावण्याचा हिरोची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला . पण जमले नाही. पायात पाय अडकून आपटायचा राहिला. पण आता त्याची कसलीच तक्रार नव्हती.
मिशन चुंबन आज शांतपणे, पूर्ण प्रायव्हसीमध्ये पूर्ण होणार होतं.

त्याला हॉलमध्ये बसवून ती तिच्या खोलीत गेली. आता त्याला घाईगडबड नव्हती संपूर्ण रात्र त्यांचीच होती! ती काही वेळाने बाहेर आली.
तिने गुडघ्यापर्यंत वन पिस घातलं होतं. केस ओलसर होते. हलकंसं लिपस्टिक लावलं होतं.
ती अत्यंत मादक दिसत होती.
त्याने तिला जवळ ओढलं. तिच्या मानेजवळील परफ्युमचा सुगंध त्याच्या गात्रा गात्रांना, संपूर्ण संवेदनांना पुलकित..जागृत करून गेला.

तो आणखी  तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा त्याने दोन्ही हाताने हलकंसा धरून तिला किस करण्यासाठी सावधान झाला! हो हो हीच ती वेळ हाच तो क्षण!

तिने त्याला दूर केलं.
“ यु गॉट प्रोटेक्षन नो?”

“भुकेला मागतो एक किस आणि देव देतो..” अशी त्याची मनातल्या मनात अवस्था झाली.

तो अगदी चेहऱ्यावर स्वतःबद्दल अभिमानाचे भाव आणून तिच्या दोन्ही खांद्याना दोन हाताने पकडत म्हणाला,
“ तु माझा हा मोबाईल बघितलास?  सहा महिने झालेत अजून त्याचं स्क्रीनकव्हर मी काढलं नाही! मी कधी हेल्मेटशिवाय गाडी चालवताना तुला दिसलो का?  नवी बाईक घेतली तेव्हा कित्येक दिवस तिचं कव्हर काढलं नव्हतं! मित्र त्याला काँडम कव्हर म्हणायचे..बाईकला व्हर्जिन बाईक म्हणायचे!  अगं प्रोटेक्शनशिवाय तर मी काहीच करत नाही! प्रोटेक्शन इज मस्ट!
रुबाबात पॅन्टच्या खिशातून त्याने प्रोटेक्शनचं पाकीट काढलं! तिला दाखवलं!

“ओह्हो”! ‘क्या बात है!”
तिनेच त्याला ओढून आपल्या खोलीत घेऊन गेली. त्याला बेडवर ढकललं. ती त्याच्या संपूर्णपणे जवळ आली..पुन्हा एकदा त्याच्या संवेदना जागृत झाल्यात..जोरदार उफाळून आल्यात..त्याला किस करण्यासाठी ती त्याच्या अगदी निकट आली.. बस्स हीच ती वेळ हाच तो क्षण!
ती त्याला किस करणार तितक्यात..
त्याने तिला थांबवलं..
“एक मिनिट! तू आज मला दुपारी भेटायच्या आधी काय खाल्लं होतं? तू जेवली होतीस का?”

“किती रे काळजी करतो माझी!
हो मी तेव्हा घरून फिश आणि चिकन करी खाऊन आले होते! आय एम फुल नाव!
त्याच्या ओठांवर बोट ठेऊन म्हणाली ,
“नाव डोन्ट टॉक ..जस्ट एन्जॉय धिस मोमेंट! वि हॅव ओन्ली वन नाईट फॉर अ लॉंग टाईम!”

त्याला किस करण्यासाठी त्याच्या चेहरा घट्ट तिने पकडला..कोणत्याही क्षणी त्याच्या आयुष्यातील त्याचं पाहिलं किस होणार होतं. दुष्काळ संपला होता. घनन घनन घन गिर जाये बदरा..पार्श्वसंगीत सुरू होतं.
आणि त्याने तिला त्याच क्षणी बाजूला केले . तो उठून बसला.

“काय तू आज चिकन खाल्लंस!
आज महाशिवरात्रीचा मला उपास आहे! मी तुला किस नाही करू शकत! माझा उपास मोडेल ना!
जातो मी! जय शंभो! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
बाय!

आणि तो तडक निघून गेला. तीला काही कळेनासं होऊन ती बघत राहिली!
 आज दुसऱ्यांदा शंकराने कामदेवाला भस्म केलं होतं.

समाप्त.

#किसडे #महाशिवरात्रीपेशल.
१३ फेब्रुवारी 018

-Abhijeet Panse

Monday, 12 February 2018

किस डे

हग डे किस डे, वगैरे थेरं हे सोशिअल मिडीयामुळे बळावलेत , यावर बाहेर कोणाशी तरी वाद घालून वैतागुन गुरुजी वर्गात आलेत.
“पोरांनो हे किस डे वगैरे आजचे थिल्लर चाळे आहेत, तुम्ही याच्या नादी लागून बिघडू नका!

एक विद्यार्थी उठून, “ नाही गुर्जी चुंबन दिन यापूर्वी खूप वर्षांपूर्वी साजरा झालाय! तेव्हा चुंबन दिन कदाचित शुक्रवारी साजरा व्हायचा!
'अमिताभ बच्चन आजोबांनी  किमी काटकर काकूसोबत चुंबनदिन साजरा केला होता गुर्जी "!

"किमी काटकर मावशी आपल्या प्रॉमिसवर कायम राहत नव्हत्या म्हणून टायगर अमिताभ
त्यासाठी तिला दिल्या घेतल्या वचनांची ,चुम्बनांची शपथ तुला आहे,  जाणीव करून दिली.

दुसरं पोरगं उठून उभं राहत जोरात ओरडलं, “ अरी ओ जानेमन ! बाहर निकल
तू तर म्हटली होतीस
पिछले जुम्मे को
अगले जुम्मे को चुम्मा दुंगी
तो आज जुम्मा है
जुम्मा चुम्मा दे दे

एक पोरगी मध्येच चिरकली “गुर्जी तेव्हाही असे #ऱ्हाईमिंग शब्दात नावं ठेवले जायचे , जुम्मा चुम्मा !
जुम्मा चुम्मा दे!
आपल्या वर्गातही बबन आहे गुर्जी!
त्याची मैत्रीण त्याला म्हणते,” बबन चुंबन दे!”
अपर्णाला तिचा मित्र म्हणतो
"अप्पी पप्पी दे"!

गुर्जी चाट पडले!

दुसरं एक पोरगं आणखी मध्येच बोलू लागलं ,
गुर्जी त्यानंतर विरारच्या एका उडाणटप्पू पोराने शिल्पा शेट्टी आंटीकडे चुम्बनांची याचना केली. त्या उडाणटप्पू गोविंदा काकांकडे
 तेव्हा शेट्टी काकीला व्हॅलेंटाइन्स डेचं गिफ्ट द्यायला पैसे नव्हते म्हणून त्याने उधारी सुरू केली.

“एक चुम्मा तू मुझको उधार दै दे!
और बदले मे युपी बिहार लै ले!

गोविंदा काकांच्या या वागण्याने भैय्या लोकांच्या भावना दुखावल्यात गुर्जी ! त्याने चक्क उत्तर प्रदेश, बिहारला तारण म्हणून तेलुगू शेट्टी काकूकडे ठेवलं.
भैय्या लोक कित्ती काम करतात माहिती!

तेव्हा एक पोरगी चिरकली, " हो सर हे भैय्ये लोक कित्ती काम करतात! सक्काळी उठून माझ्यासाठी दूध आणतात! आमचे कपडे इस्त्री करतात! मला चना जोर गरम खूप आवडतं गुर्जी!”

पुन्हा आधीचं पोरगं बोलू लागलं “ गोविंद काकांचे सततच्या एक चुम्मा तू मुझको उधार दै दे या "चुंबन उधारी"मुळे कंटाळून शिल्पा काकीने “उधारी बंद” “आज नगद कल उधार!” “उधार मागून आम्हाला लाजवू नका!” असे बोर्ड लावलेत!

आणखी एक पोरगं बोलू लागलं, "पण पूढे काही वर्षांनी याच शिल्पा शेट्टी काकीने खिलजीप्रमाणे उत्तर प्रदेश बिहारवर स्वारी केली!
"दिलवालो के दिल का करार लुटने मैं आयी हु युपी बिहार लुटने!” पण त्या काळात लालूप्रसाद आजोबांनी मध्यस्थी करून ती डील रोखली.

बघीतलंत गुर्जी #आंतरराष्ट्रीयकिसडे खूप आधीपासूनच साजरा होतो आहे !

गुर्जी शब्दातीत!

पोट्टे रॉक्स गुर्जी इन शॉक!
या वाक्याशिवाय पूर्णाहुती होत नसते. म्हणून हे.

-Abhijeet Panse

Wednesday, 27 December 2017

"व्हॅलेंटाईन डे"च्या मुहूर्तावर "संकष्ट चतुर्थी"



14 फेब्रुवारी 2017

"सृष्टीची उलथापालथ तर नाही ना झाली! मुंग्यान मेरू पर्वत तर गिळला नाही! वडवानलाने समुद्र तर जाळला नाही ना
मग रा.... आम्हीच  अशे का रे वॅलेनटाइन्स डे च्या दिवशी सिंगल कर्मदरिद्री...!!!"

"असा मी सिंगल आसामी" व्हॅलेंटाईन दिनी दीन मी!

किती कल्पना केली होती की आजच्या दिवशी एका  गुडघ्यावर डगमगत तोल सांभाळत बसुन हाती गुलाबाची कळी घेऊन "आय लब्यु"ची महिनाभरापासून रेटलेली स्पीच खडानखडा तिच्यासमोर म्हणेन पण काही नाही..शेवटी अंगणात दोन्ही गुडघ्यात वाकून उकिडवे बसत 21 दुर्वा खुडून

"..लाटेमागुनी लाट धावते
परी किनारा भेटेना...
पाप धावते पुण्यक्षेत्री...
तरीही साठा संपेना...

काळ कावळा भरतो रांजण...
खड्यामागुनी पडे खडा...
पुण्यवान मी कसा राहिलो...
कसा भरेना अजुनी घडा...

हे पाप नको...ह
हे पाप नको हे पुण्य नको...
हा जीव नको जगणेच नको...
या सर्वातुनी मोक्ष मागतो करुनी अष्टांगाची घडी...
वाहतो ही दुर्वांची जुडी . . . !!🙏🙏👏👏

वॅलेन्टाईन्स डे ला तरी "व्हॅलेंटाईन दे "
रे देवा महाराजा! प्रार्थना केली.

-अभिजीत पानसे.

विलक्षण नजाकत असलेले डावखरे; "आंतरराष्ट्रीय डावखरे/लेफ्टी दिन"

13 ऑगस्ट 016

काहींचं वैशिष्ठ हे त्यांच्या वेगळेपणात असतं.त्यांचं वेगळेपण हेच त्यांचं सौंदर्य असतं.तसंच बहुतांश 'उजव्या' मेजरिटीमध्ये 'डावखरे' हे जरा अल्पसंख्यांक पण वेगळे आणि सुंदर वाटतात. त्यांच्या हालचालींमध्ये एक नजाकत आकर्षण असतं.

मला स्वत:ला लेफ्टी लोकं फार आवडतात. माझी फार इच्छा की मी लेफ्टी असावा. पण ती खुमखुमी क्रिकेट खेळताना पूर्ण करायचो.

मोनालीसा (चित्रवाली) आणि
रशियाचे राषट्राध्यक्ष ब्लादिमिरपुतीनच्या जुळे बहिण भाऊ वाटतात! तर त्यांचं चित्र काढणारा लिओनार्डो हा सुद्धा डावखोराच होता.

हा लिओनार्डो ..;ज्याची हॉटेलमधील ; वापरुन चुरगाळलेली बेडशीट त्याचा वापरलेला  ओलसर टॉवेल असलेली खोलीच मिळण्यासाठी लिलाव केला जातो .आणि अमेरिकेतल्या पोरी त्या खोलीसाठी वाटेल तितेक पैसे देतात! हा तो स्त्रीयांसाठी मदनाचा पुतळा असलेला लिओनार्डोडिकार्पिओ नाही! हा लिओनार्डो दा विंसी.
शाळेत असताना याला आम्ही लिओनार्डोदा विंचू म्हणायचो.हा सुद्धा लेफ्टी होता.

मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबुमामा सुद्धा लेफ्टी.
अमिताभ बच्चन..चित्रकार मायकल एंजिलो..जगविख्यात कॉमेडियन; कास्टिंगकाउच चा जनक आणि मुळ आयुष्यात लैगिंक विकृत  #चार्लीचाप्लीन ही डावखोराच!

अलेक्झांडर द ग्रेट; ज्याची शेवटची इच्छा होती की मृत्यु झाल्यावर दफन करताना शवपेटीतुन त्याचा एक हात बाहेर असावा.कारण जगाला समजावे की मेल्यावर माणुस रिकाम्या हातानेच जातो.
कदाचित तो बाहेर असलेला हात डावा असेल.

पण आमच्यासारख्या क्रिकेटप्रेमींना इग्लंड वा ऑस्ट्रेलिया ची राजधानी कोणती विचारल्यावर  ते आठवणार नाही पण लंडन म्हटलं की ताबडतोब आमच्या डोळ्यांसमोर येते ते #लॉर्डस स्टेडियम! तेथील बालकनी..#सौरवगांगुलीच गरागरा टिशर्ट फिरवणं .

सिडनी म्हटलं की पटकन आठवतात सचिनचे २४१नॉट आउट..स्टिव्ह वॉची शेवटची मँच..

तसंच लेफ्टी हा शब्दही आम्हा क्रिकेटप्रेमींच्या कानावर पडला तरी आमच्या डोळ्यासमोर येतात ते दिग्गज लेफ्टीक्रिकेटर्स!

खानदानी अरबी सुरईमधुन उच्च मद्य स्मुदली पेल्यात पडावं तसा स्मूद दिलखेचक ऑफ ड्राइव्ह मारणारा लेट नाइन्टिजमधला सौरव गांगुली ज्यांनी पाहिला.. एक पाय समोर करून पाईंट वा गलीवरून सिक्स उचलणारा जयसूर्या ज्यांनी पाहिला..एखाद्या बँले डान्सरला लाजवेल असं across खेळतानाचं  ब्रायन लाराचं पदलालित्य पाहिलं असेल ..युवकाजसिंगची हाय ब्याकलिफ्ट पाहिली असेल त्यांना लेफ्टिंची नजाकत कळेल.

 पण क्रिकेटमध्ये लेफ्टिंचे अजिबोगरिब permutations& combinations  सापडतात!!

सर्वसामान्यपणे #फूडी लोकांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकार असतात.पण (फक्त) आपल्याकडे(च) मांसाहारींमध्ये बरेच permutations & combinations असतात.

" मी झणझणीत चिकन.. मटण नियमीत खातो.." म्हणणारे..

"मला चिकन मटण फिश काहीही चालत नाही नाही हॉ पण मला अंड चालतं.."

" नो वे आय डोन्ट इट नॉववेज आय अँम स्ट्रिकली वेजी! हॉं बट फक्त चिकन मटणाचा रस्सा..करी मी खाते!"
अशा प्रकारे स्ट्रिक्ट;लुज; कंडिशन्स अपलाईड असलेले विविधतापुर्ण मांसाहारी आढळतात.

त्याच प्रकारे क्रिकेटमध्येही लेफ्टींचे काही प्रकार असतात.

काही लेफ्टीज ब्याटिंग डाव्या हाताने करतात पण बॉलिंग उजव्या हाताने करतात!

काही बॉलर्स बौलिंग डाव्या हाताने करतात पण ब्याटिंग उजव्या हाताने!!

सौरव गांगुली ब्याटिंग डाव्या हाताने करायचा  पण बॉल मात्र दुडूदुडू धावत उजव्या हाताने टाकायचा!

झहीर खान वेगवान बॉलिंग डाव्या हाताने  पण ब्याट उजव्या हाताने फिरवायचा!

पुलं नि जसं; गादीचापानवाला आणि पट्टीचापानवाल्या बद्दल सांगितलंय! गादीचा पानवाला तपकीर तंबाखू ;पोष्टाची पाकिटं ; मेणबत्त्या सारं काही विकतो आणि पट्टीचा पानवाला फक्त पानाशीच इमान राखून असतो तसे काही गादीचे पानवाले लेफ्टीज असतात तर काही अस्सल जातिवंत पट्टीचे लेफ्टीक्रिकेटर्स असतात!
  ते ब्याटिंग ;बॉलिंग; थ्रो सारं काही डाव्या हातानेच करतात! त्यांच्या खेळातील सौंदर्यही तितकं च आकर्षक असतं!

असा जातिवंत लेफ्टी म्हणजे युवराजसिंग
सनथजयसूर्या मिशेलजॉन्सन
आणि बरेच.

पण या सगळ्यांमध्ये एक युनिक लेफ्टी आहे! आणि तो म्हणजे सचिनतेंडुलकर!
ह्याचं सारं काही वेगळंच असतं!

सचिन ब्याटिंग बौलिंग थ्रो सर्व उजव्या हाताने करतो पण #लिहितो मात्र लेफ्टहॅन्डने !

शेवटी डावा हात असो वा उजवा हात कोणी यात श्रेष्ठ कनिष्ठ नाही दोघेही एकमेकांस पुरकच! Both goes hand in hand

कारण मिठी मारताना दोघांचीही गरज असते!
मिठी टू ऑल लेफ्टीज!


-अभिजित पानसे

Monday, 25 December 2017

मराठी दीन की दिन

'सत्तावन' म्हणजे सेवंटी वन का??''
असं विचारणाऱ्या मराठी लहान मुलांकडे आणि काही तरूण तरूणींकडे मी दयार्द्र दृष्टीने पाहुन हसण्यावर नेतो.

भारतीय शब्दांचा उच्चार करताना इंग्रजांची जीभ वळत नव्हती म्हणुन त्यांनी मद्रासचं चेन्नई,कोलकाताचं कलकत्ता वगैरे आणि इतर अनेक शब्दांचं त्यांच्या 'सोयीसाठी 'रुपांतर केलं.
पण साहेब गेल्यावरही त्यांनी मागे टाकलेलं त्यांचं उष्टं खरकटं चिवडताना; 'अजिंठा- वेरूळ' लेण्यांना साधं बोलतानाही सतत Ajanta& Ellora म्हणण्यात गर्व बाळगणाऱ्या अर्ध्या हळकंडाने पिवळे होणाऱ्यांची कीव येते.

पण गंगा नदीला Ganges ,ग्यांजेस म्हटल्यावर मात्र तळपायाची आग मस्तकात जाते.

आणि जेव्हा कोणी मराठी व्यक्ती मुंबईला '#बाॅम्बे' म्हणतं तेव्हा मात्र त्याचा मानसीक रोग आता मर्यादेच्या पलीकडे गेला असुन त्याला उपचाराची नाही तर प्रार्थनेची गरज आहे असं खुशाल समजावे आणि त्याला त्याच्या प्राप्त अवस्थेत तसेच सोडुन द्यावे.

(त.टी-ह्यात इतर कुठल्याही भाषेबद्दल वा भाषिकांबद्दल  आकस राग दुर दुर नाही.
हे फक्त उथळ मराठी लोकांसाठीच.)
इंग्रजीसहित सर्व भाषांचा चाहता,सर्वांच्या 'मातृभाषेचा' आदर करणारा आणि मराठीवर प्रेम करणारा

-अभिजित पानसे

चिऊताई



चिऊताई चिऊताई दार उघड थांब!"
"थांब माझ्या बाळाला उपीट खाऊ घालतेय!"
इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती
"चिऊताई चिऊताई दार उघड!"
"थांब माझ्या बाळाला मी जेवू घालतेय!"
कावळा भुकेने हैराण होऊन "चिऊ ताई ..."
"थाम्ब माझ्या बाळाला मी तीट लावतेय..!"
..
अखेर चिऊताईने दार उघडले.कावळा आत आला.भुकेने तळमळत असलेल्या कावळा चिउताईच्या स्वयंपाकघरातून दरवळणाऱ्या सुग्रास जेवणाच्या सुगंधाने खूष झाला.
चिऊ ताई ने प्रथम प्रेमाने पाण्याचा पेला कावळ्याला दिला.आणि मंद स्मित करत म्हणाली " कावळे दादा तुम्ही जेवून तर आलातच असाल ना!

तात्पर्य: युगानुयुगे सांगितल्या जाणाऱ्या त्या गोष्टीतील चिऊताई अस्सल अट्टल पुणेरी सदाशिवपेठी होती.

चिऊताई ची "चिउताईगिरी" कथेतून.

- Sparrowday

-  अभिजित 

ख्रिसमस इव्ह

"मेरी ख्रिसमस मे तू नही शायद क्यू तेरा इंतजार करता हु मैं तुझे कल भी प्यार करता था! मैं तुझे अब भी प्यार करता हूं!"

ख्रिसमस ला गोव्याला असण्याची इच्छा यावेळीही पूर्ण न झालेल्यांचा एक प्रतिनिधी.
"Goa lovers'

-Abhijeet Panse

Saturday, 23 December 2017

मराठी रंगभूमी दिन

5 नोव्हेंबर
मराठी रंगभूमी दिन
एका पुस्तकातील कृष्णभक्त गुजराती मुसलमान संताचे हे वाक्य मला फार आवडलेत.
 तो कृष्णाला प्रार्थना करत म्हणतो, "आजवर अनेक जन्मांपासून तू दिलेली प्रत्येक भूमिका जगाच्या या रंगभूमीवर शक्य तितक्या उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तेव्हा मी भूमिका साकारताना कमी पडल्याने माझा वाईट अभिनय बघून तू नाराज झाला असशील तर  माझी एक विनंती आहे की आता पुढे मला  कोणतीही भूमिका वठवायला देऊच  नकोस!
आणि जर आजवर साकारलेल्या भूमिकेतील माझ्या अभिनयाने तू प्रसन्न झाला असशील तर माझं तुला एकच मागणं आहे की आता मला कुठलीही भूमिका देऊ नकोस.पुन्हा मला या रंगभूमीवर पाठवू नकोस!"

रंगभूमी दिन.


-अभिजित पानसे

एप्रिल फूल

*एप्रिल फूल*

1 एप्रिल 017

रोज डे ला ज्या गुलबकावलीवर मी गुलाबाची फुलं उधळलीत,कालपर्यंत जिने माझ्याशी प्रेमाच्या गुलुगुलू गप्पा केल्यात  तिने आज मला सरळ फ्रेंडझोन करून 'वी आर ओन्ली गुड फ्रेंड्स म्हणून मला पूर्णपणे  'फूल' बनवलं.
किमान 'वी आर जस्ट गुड फ्रेंड्स " असं "नरो वा कुंजरो वा .." सारखं निसरडं ,लवचिक वाक्य तरी म्हणायला हवं होतं ,एक चटोर आशा तरी जिवंत राहिली असती.

अच्छा सिला दिया तुने मेरे फुल का यार ने ही बना दिया ब्लडीफूल यार!!

एक फ्रेंन्झोन्ड 'फूल'



              ***


इथे (म्हणजे प्रत्यक्ष जगात) प्रत्येक जण दुसऱ्यास फूल बनवत असतो.  फूल बनवणाऱ्यालाही "फुलास सव्वाफुल" भेटून त्याचाही फूल होतो
फूल बनलेल्यासाठीही दयास्पद भाव ठेवायची गरज नाही .जो फूल बनला तो " Karma will serve him/her right.. " वगेरे कर्म सिद्धांतांच्या फुंकर स्वतःच्या जखमांवर घालून स्वतःलाच फुल बनवत असतो ,आणि तो स्वतःच दुसऱ्याला फूल बनवण्याच्या फूल शिकारीवर निघतो. फुल बनलेला तो दुसऱ्याला फूल बनवतो. तेव्हा तो स्वतःच्या जखमांवर घातलेली फुंकर विसरून गेला असतो.

"एकमेकांस फूल बनवू अवघे बनु मूर्ख" हे 'फूलांचे' रहाटगाडगे या जगण्याच्या राहाटगाडग्यासोबत पूर्वीही असेच सुरु होते. सुरु राहणार.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- Abhijeet Panse

आंतरराष्ट्रीय जलदिन

22 मार्च ,आंतरराष्ट्रीय जलदिन

" मिनरल वॉटर" विकणाऱ्या कंपन्यांमध्ये सगळ्यात जास्त नशीब काढलंय ते 'बिस्लरी' कम्पनीने! किनले घ्या, अक्वाफिना , belley बॉटल घ्या किंवा रेल्वेत "रेल्वे नीर" वा कोणताही लोकल ब्रँडचं पाणी बॉटल मागताना लोक एकच वाक्य म्हणतात " एक बिसलेरी दे भौ!!"

                ***

सगळ्यात जास्त पाणी वाया जातं ते बॉलीवुड चित्रपटांतील गाण्यांमध्ये! हिरोइनींवरच!किती ती पाण्याची उधळपट्टी गाण्यांमध्ये!
शिवाय आमच्या जीवाची, शरीराची लाही लाही होते ती वेगळीच!😆😣

टिप टिप बरसा पाणी पाणीने आग लगा दी!!
आणि मग काटे नही कटते ये दिन ए रात..
                    ***
worldwaterday स्वदेस मधला हा सीन आजवर बघितलेल्या चियत्रपटांच्या सर्वोत्तम सीन्स पैकी एक आहे. आशुतोष गोवरीकरच दिग्दर्शन आणि शाहरुख खानचा सर्वोत्तम अभिनय, सशक्त विषय,मांडणी आणि पार्श्वसंगीत!!!

Friday, 22 December 2017

"टाका मॅट करा योगा नीट"-यो यो योगा डे

१) आपापले भोग आणि आपला योग हे स्वतःच स्वतः भोगावे आणि करावे लागतात. तिथे तोंडी 'शुभेच्छा' देऊन नाही चालत.so no 'शुभेच्छा' फॉर योग डे

2) आपले शरीर हे श्री नरेंद्र मोदींमुळे वा कुठल्या धर्मामुळे लाभले नाही तेव्हा मोदी टीकाकारांनीही योग करून आपले शरीर आरोग्य राखावे .

3) योग करायला "योग डे"चा 'योग' यावा लागत नाही, वा योगायोगाचीही गरज नाही,
उचला मॅट करा योगा नीट!

4) "मेलोडी खाओ खुद जान जाओ
योग करो खुद जान जाओ!"

5) लग्नात 'नागीणडान्स' करणे म्हणजे योग नाही. त्यासाठी भुजंगासनच करावे लागते.

6) एरवी रोज मानसिक शीर्षासन करत प्रत्येक गोष्टीकडे उलट बघताना कधीतरी शारीरिक शीर्षासनही करावे.

ये आसन नही आसान शरीर एक जरिया है और पेट को मरोडना है!

योग दे योग ले

- अभिजित पानसे

Saturday, 17 June 2017

"फादर्स डे"

Fathers Day

हा वृक्ष वरवरून बघता टवटवीत वाटतो.बहरेलेली पानं चमकातेहेत.
पण ह्याचं 'खोड' आता वयोमानानुसार पोखरलं जातय.

पण हे तो त्याच्या त्याच्यापासुन दुर गेलेल्या फांद्या..पानांना जाणीवही होउ देत नाही.कितीही दुर..उंच गेलेल्या शेवटच्या पानालाही जीवनरस पोहचवतोय..

कुठलंही झाड असो ते मजबुत उभं राहतं ते त्याच्या पक्क्या खोडामुळेच!

फुलं..पानांना वाटतं आपल्या अन्नाला..यशाला कारक आम्हीच!आम्ही आमचं ''फोटोसिन्थेसिस'' करतो..स्वत:चं अन्न स्वत: मिळवतो..पण त्यांना सिन्थेसिस च्या 'लायकीचं' बनवणारा असतो तो वृक्षाचं 'खोड'!

मजबुत उभा राहुन आपल्या मुळांद्वारे रसवहन करून आपल्या पानं..फुलांना वाढवणारा 'तो' असतो.

फांद्या..पान..फुलं ह्यांचं अस्तित्वच मुळात 'खोडावर' अवलंबुन.

आताही हा वृक्ष आपल्या मुला बाळं रूपी फांद्या पानांचा भार वाहुन त्यांना बहरवतो आहे.स्वत: पोखरल्या जातोय पण आपलं काम..प्रेम मात्र शांतपणे करतो आहे.

पण आपलं लक्ष जातं ते वरती..स्तुती केली जाते पान फांद्यांची.& Trunk  always remains unsung hero!

मला हा वृक्ष सोनमर्गला दिसला.त्याच्या खोडाला पाहताच क्षणी एकच Unsung Hero आठवला बाप नावाचा माणुस!दोघेही अगदी सारखेच!वृक्ष रूपी आपल्या घराला.. मुलंबाळं रूपी त्याच्या फांद्या..फुलं पानांना जगवणारा..मोठं करणारा.

स्वत: पोखरल्या जात असुन आपल्या मुलांना त्याची झळ ही पोहोचु न देणारा बाप नावाचा माणुस..वृक्षरूपी घराचा मजबुत खोड.

सर्वांच्या वडिलांना..तसंच सिंगल मदर असलेल्या वडिलांचा रोल निभवणाऱ्या सर्व आयांना समर्पीत.

Happy Fathers Day.

-अभिजीत पानसे.

Tuesday, 13 June 2017

फ से फॅन्टम क से काँडम

"फ से फॅण्टम क से काँडम "

06 च्या सुरवातीला JNU आणि दिल्ली युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्य दिल्ली एड्स कन्ट्रोल कमिटीने "काँडम वेंडींग मशीन" लावल्याने वर्षभर बराच गदारोळ झाला होता. कोणी त्यास पाठिंबा दिला कोणी चुकीचा संदेश जात असल्यचे सांगुन त्याला विरोध करत DACकमिशनर ला  ते कसं संस्कृती आणि वारसा परंपरा दृष्टीने चुकीचे हे सांगणारे पत्र लिहिले.

शोभा डे च्या एका पुस्तकात त्या त्यांच्या एका मैत्रिणीबद्दल लिहितात की त्यांची मैत्रीण म्हणते "मी तर माझ्य मुलाला स्पष्ट सांगते की घरातून बाहेर पडताना खिश्यात काँडमस ठेवत जा!हॅव सेफ सेक्स ऑलवेज!ही मुलं कुठे कुठे फिरतात कधी गरज पडेल सांगता येत नाही.नसती रिस्क नको! "
त्यांचा मुलगा टीन एजर असतो.

दहा एक वर्षांपूर्वी समुद्र किनाऱ्यावरील कंडोम ची जाहिरात गाजली होती "पता नही कब कहा जरूरत पड जाये!" त्या ऍड वरही वादंग माजल्याने तीला बॅन करण्यात आले होते.

07 पासून काही वर्षे कंडोम वरून काही फेमस जाहिरातींद्वारे भरपूर जनजागृती करण्यात आली.मजूर वर्ग ते अशिक्षित ते नियमित रेड लाईट एरियात जाणारे  पुरुष, सेक्स वर्कर्स यांना "कंडोम मस्ट" चं महत्व पटवून देण्यात आले.देण्यात येते.

पण आजही कोणत्याही शासकीय रुग्णालयात HIV + पेशन्टसच्या रांगाच रांगा असतात.
HIV ची लागण होण्यास  HIV + blood transfusion, बाधित व्यक्तीला टोचलेलं निडल वापर ही करणे ही असतात पण त्याचं प्रमाण फार नगण्य असतं. महत्वाचं कारण "असुरक्षित संबंध" हेच आहे.

दहा वर्षांपूर्वी शोभा डेंच्या मैत्रिणीचे शब्द आगाऊ वाटले होते.
पण आज परिस्थिती ,मानसिकता बदलेली आहे.

पूर्वी ब्लॅक आणि व्हाईट असे स्पष्ट वैचारिक, सैद्धांतिक रंग होते. आता ते एकमेकात मिसळून त्याचा 'ग्रे' रंग झाल आहे.

मल्टी पार्टनर्स सोबत शय्यासोबत हे चांगलं की वाईट यांतील पूर्वीची रेषा हि ब्लर, धूसर झाली आहे.
यात योग्य अयोग्य हा मुद्दा नाही.
मुळात कुठलीच गोष्ट ही पूर्णपणे फक्त चांगली किंवा फक्त वाईट  असं hardcore rigid equation नसतं.प्रत्येक गोष्ट ही व्यक्ती,परिस्थिती ,काळ सापेक्ष असते. म्हणून कुठलाच गोष्टींचा ,मताचा अट्टाहास नको.
पण फ्री सेक्स, फ्रेंड्स with बेनिफिट्स ,casual sex किंवा Heat of the moment मुळे एखादी चूक आजन्म महागात पडू शकते.

अजूनही काँडमकडे प्रमुख्याने  "गर्भ निरोधक" म्हणूनच पाहिले जाते.त्यामुळ काँडम न वापरता #क्लायमॅक्स पर्यंत काळजी घेण्याचाही एक मार्ग अवलम्बला जातो.

नुकत्याच झालेल्या ओळखीतून सेक्सशुअल रिलेशन्स तयार होतात तेव्हा काही वेळा त्या करस्पॉंडिंग व्यक्तीचा इतिहास माहिती नसतो.किंवा ती व्यक्ती बाधित असेल अशी जराही कल्पना नसते आणि फक्त गर्भधारणा नको हाच विचार ठेऊन म्हणून नाजूक वेळी काँडोम शिवाय संबंध केले जातात.आणि "एक गळती ..गलती की किंमत तुम क्या जानो.. "म्हणण्याची दोघांवरही येऊ शकते.

कित्येक शिक्षित ,अशिक्षीत पुरुषांमध्ये कॉन्डोम वापरल्याने "एन्जॉयमेन्ट' कमी मिळतं असा समज असतो.त्यामुळे ते टाळतात आणि STD (sexually transmitted diseases) चे बळी पडतात.

कित्येक शिक्षित लोकांचाही हा गैरसमज आहे की फक्त वीर्या मधेच HIV विषाणू असतात.पण संभोगापूर्वी होणारं स्त्री पुरुष दोघांच्याही सेक्रेशन मधेही HIV विषाणू असतात.

अगदी धक्कादायक गोष्ट म्हणजे काही मुलींनाही "काँडम फोबिया" असतो.त्या सुद्धा निरोधाला विरोध करतात.

या सर्व अक्षम्य हलगर्जीपणामुळे #एड्स ची लागण होऊ शकते.

काळ वेगाने बदलतोय मानसिकता,विचार बद्दलताहेत.Gadgets and social media,internet , technology do take their tolls on mentality n thought process.त्यामुळे काय वाईट काय योग्य हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण बदलत्या काळानुसार काळजी म्हणून काँडम सहज  accessible असणं गरजेचं आहेच.आणि ते आहेत सुद्धा.फक्त वापरायला हवं.
त्यामुळे दहा वर्षांपूर्वी ज्या कंडोम वेण्डिंग मशीन मुळे गदारोळ माजला होता तो आता कदाचित होणार नाही.

गुरुचरित्र ग्रंथात चार युगाची एक  रुपकात्मक कथा संगीतली आहे.ज्यात सुरवातीचे तीन युग आपापल्या हातात सात्विक वस्तू घेऊन प्रकट होतात.शेवटी कलियुग हातात 'शिस्न' ,लिंग धरून प्रगट होतं. आणि याच्या जोरावर संपूर्ण जगाला मी नाचवेन म्हणतं. लैंगिक रोग,एड्सचे रुग्ण ,लैंगिक विकृती बघता ती रूपकात्मक कथा खरी वाटू लागते.त्यामुळे अशा वेळी आज precaution is the best measure" हेच खरं आहे.

उद्या चौकात वा कॉलेजमध्ये काँडम वेण्डिंग मशीन लावल्या गेलं आणि मिसरुड ही ना फुटलेला पोरगा त्यातून कंडोम घेतानाचे दृश्य दिसल्यास त्याला संस्कार आणि संयमाची अधोगती म्हणायचं की प्रॅक्टिकली घेतलेली काळजी हे ज्याचं त्यानी ठरवायचं.
कारण It is bad enough that people r dying of AIDS.but no one should die of ignorance.-Elizabeth Tailor

- Abhijeet Panse


Sunday, 4 June 2017

जागतिक पर्यावरण दिन

छपरावरचं ओझोनचं आवरण टराटरा फाटतंय .आपापल्या वर्णांची काळजी करण्यापेक्षा पर्यावर्णाची काळजी घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पर्यावरणास..जीवनास दुसरा पर्याय आहे का?

जागतिकपर्यावरणदिन