Showing posts with label पाऊल पडते पुढे. Show all posts
Showing posts with label पाऊल पडते पुढे. Show all posts

Sunday, 9 September 2018

गणेश तत्व आणि मूर्ती

एका मैत्रिणीने आणि तिच्या मुलाने मिळून ही गणपती मूर्ती केली आहे. मागच्या वर्षीच्याच विसर्जित गणपतीच्या मूर्तीच्या मातीपासूनच त्यांनी केली. ही गोष्ट मला फार आवडली.

आपला गणपती आपल्याच घरात विसर्जित. बाहेरील नैसर्गिक जलस्रोतांना खराब करण्याचा अधिकार कोणाला नाही.

लहानपणी मुलांना घरी मोठ्या आकाराच्या गणपतीच्या मुर्ती आणण्याचं फार आकर्षण असतं. पूर्वी तर फार असायचं. शाळेतील मित्रांमध्ये तो प्रेस्टिज इश्यू असायचा.

वाहत्या पाण्यातच मूर्त्यांचं विसर्जन करायला हवं वगैरे.. या कट्टरवादी गोष्टी लॉजिकली कधीच पटल्या नाहीत. अगदी पर्यावरणसंबंधित गोष्टी थोडयावेळासाठी बाजूला ठेवल्या तरीही धार्मिक ‘टेक्निकल’ गोष्टींनुसारही पटत नाही.

मूर्तीला घरात आणून गणेश चतुर्थीला स्वतःच्या हृदयावर डावा हात ठेवून आणि गणेश ‘मूर्तीच्या’ हृदयाच्या जागी उजवा हात ठेवून प्राणप्रतिष्ठा केली जाते. (पिंडी ते ब्रह्मांडी हे इथे स्पष्टपणे कळतं.)  त्यानंतरच त्या गणेश मूर्तीमध्ये 'गणेशतत्व' प्रकट होऊन ती मूर्ती गणपतीचं रूप होते. असा भाव निर्माण होतो.

त्यामुळे गणेश तत्व, प्राण शक्ती ही मूर्तीचा आकार, रंग, मूर्ती आकर्षक की कमी आकर्षक या टेक्निकल गोष्टींना Irrespective असते. मग उपासनेच्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने मूर्ती छोटी की मोठी हा प्रश्नच राहत नाही.

कट्टर लोक वाहत्या पाण्यातच गणपती मूर्तीचं विसर्जन करायचं म्हणतात. तेही पटत नाही. एकतर  धार्मिक गोष्टी, घरचा गणपती ही वैयक्तिक बाब असते, नैसर्गिक जल स्रोत खराब करण्याचा अधिकार कोणालाच नाही.

पण भारतासारख्या कमी लोकसंख्या असलेल्या, शिस्तप्रिय, सामाजिक, पर्यावरण बांधिलकी असलेल्या ‘शांत’ देशात सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पणजोबाची मानतात. ते असो.
बंद’ असो की ‘चालू’ असो सगळं तोडफोड करायलाच हात शिवशिवतात.

गणपती मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन करणे धार्मिक टेक्निकल गोष्टीनुसारही पटत नाही.

कारण दीड, पाच, दहा दिवस गणपती पूजल्यावर शेवटच्या दिवशी अक्षता टाकून “#पुनरागमनायंचं’ म्हटल्यावर मूर्तीला हलवलं की त्यातून गणेशतत्व निघून जातं. निघून गेलं हाच समज , भाव असतो. मग पुन्हा गणपतीपासून ती गणपतीची मातीची ‘मूर्ती’ उरते. आता ती मातीची मूर्ती पाण्यात कशीही विसर्जित केली तरीही तिचा अपमान वगैरे होत नाही. वा मूर्तीला वाहत्या स्रोतात किंवा मोठ्या नैसर्गिक जलस्रोतांतच विसर्जित केली पाहिजे हा मुद्दाच संपतो. धार्मिक टेक्निकल गोष्टी जरी विचारात घेतल्या तरी लॉजिकली पटत नाही. कारण मूर्तीत प्राणतत्व, गणेशतत्व त्यावेळी नसतंच.
विसर्जन 'गणपतीचं'  करत नसतो , गणेश 'मूर्तीचं' करत असतो.

मातीचा , मातीच्या मूर्तीचा फक्त ‘आधार’ घेऊन दहा दिवसांत ते चराचरात व्याप्त गणेश तत्व, ऊर्जा त्यात प्राणप्रतिष्ठेद्वारे ‘अॅक्टिव्हेट’ होते, त्यात संचारते , पुनरागमनायंचं म्हणून अक्षता टाकल्या की ती ऊर्जा मूर्तीतून निघून जाते.

बाजारात शेकडो गणपतीच्या मुर्त्या ठेवल्या असतात, त्यावेळी त्या मूर्त्याना कोणीही नमस्कार करत नाही. कारण त्यावेळी ती फक्त ‘मूर्ती’ असते. ‘गणपती’ नसतो.

विकत घेतानाही आपण गणपतीच्या ‘मुर्ती’चा भाव विचारतो, मूर्ती विकत घेतो. ‘गणपती’  विकत घेत नाही.

सार्वजनिक गणपतीच्या मोठ्या मूर्तींनाही रस्त्यावरून मंडपात  नेताना नमस्कार करत नाही, कारण त्यांची ‘प्राणप्रतिष्ठा’ झाली नसते.

मूर्ती, माती फक्त ‘कॅरिअरचं’ काम करत असते.  मग त्या मूर्तीतून गणपती बॉसच निघून गेलेत की उरते ती फक्त माती, मातीची मूर्ती. ती कुठेही विसर्जित करता येते. पण आजच्या काळात वाढती लोकसंख्या, कमी  आणि प्रदूषीत होत चाललेले जलस्रोत बघता घरातच मूर्तीचं विसर्जन करणं सर्वोत्तम उपाय. शिवाय ती माती कुंडीत टाकल्यास त्या पार्थिव गणपतीचा घरातच एकप्रकारे सहवास आहे ही भावनाही होऊ शकते.

या मैत्रणीने तर त्याच मातीची मूर्ती केली. हाही एक सुंदर भाव निर्माण करतो. Coz at d end its only about energy n feelings.

- Abhijeet Panse

Saturday, 8 September 2018

एलजीबीटीक्यू, 377,



   मागच्या वर्षी लोकप्रभामधील लेख वाचून  मुंबईतील एका मुलाचा  फोन आला होता. त्याने सांगितलं  लोकप्रभा ऑफिसमध्ये फोन करून माझा नंबर घेतला. त्याने सांगितलं की त्याने एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. तिला कुठलातरी अवॉर्डही मिळाला आहे. ती शॉर्टफिल्म,  LGBT ग्रुपमधून त्याने फेस्टिव्हलला पाठवली होती. शॉर्ट फिल्म समलैंगिकता या विषयावर केली आहे.
तो स्वतः LGBT ग्रुपमध्ये येतो.

सुरवातीला मला हा मित्राचा प्रॅंक वाटला. म्हणून तत्कालीन उपसंपादक चैताली जोशीला विचारून पक्कं केलं की खरंच त्याने फोन करून माझा नंबर घेतला होता.

त्याच्याशी बोलून खूप छान वाटलं होतं. सगळ्यात विशेष गोष्ट ही होती की त्याच्या आईने स्वतः त्याला ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात खूप मदत केली. शिवाय त्याच्या आईनेही त्यात काम करून एक बाजू मांडली आहे.

त्याचं नाव आठवत नाही. त्याचा नंबरही आता नाही. पण आज समलैंगिकता हा अपराध नाही हे 377 कलम सुप्रीम कोर्टाने रद्द करून ‘नैसर्गिक’ LGBTना खूप दिलासा दिला आहे. त्यामुळे आज त्याची आठवण झाली.

तो जिथे कुठे असेल त्याच्यासहित
सर्व नैसर्गिक लेस्बियन्स, गे, बायदेक्शुअल, ट्रान्सजेंडर्स लोकांचे अभिनंदन.

आता त्यांना अटक होण्याची भीती राहणार नाही. .ते  उघडपणे समाजात वावरू शकतील शिवाय आपले नाते उघडपणे सांगू शकतील. फक्त याचा दुरुपयोग लैंगिक शोषणात होऊ नये ही आशा. कोर्टाने शिशुंसोबत आणि प्राण्यांसोबत केलेले लैंगिक व्यवहार हे अपराध ठरवले आहेत. हे अत्यंत योग्य.

सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक जजमेंट दिलंय. प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी भारताचा एक सकारात्मक अभिनंदनीय पुरोगामी निर्णय.

- Abhijeet Panse

Monday, 3 September 2018

भारत की छोरे छोरिया

जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेचे सुप काल वाजले. दर चार वर्षांनी होणारी ही बहूक्रीडा स्पर्धा आहे. आशियाई स्पर्धा ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या खालोखाल मानली जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पाल्य समिती “आशिया ऑलिम्पिक समिती” हीच या स्पर्धेचे आयोजन करत असते.

2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर या मोठ्या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी होईल यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भारतीय खेळाडूंनी निराश केले नाही. या आशियाई स्पर्धेत भारताने एकूण 69 पदकांची कमाई केली.

यात भारताने 15 वेळा सुवर्ण लुटले, 24वेळा भारताची चांदी झाली तर 30 वेळा भारताच्या हाती कांस्य आले. प्रथमच 1951 पासून सुरू झालेल्या या आशियाई स्पर्धेच्या इतिहासात आजवरील आशियाई स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.


या स्पर्धेतून भारताला काही नवीन चांगले खेळाडू मिळाले ज्यांच्याकडे येत्या ऑलिम्पिक्समध्ये आशेने बघता येईल.


बजरंग पुनियाने भारताकडून सुवर्णपदकाचं श्रीफळ वाढवलं. त्यानंतर , म्हारी  छोरीया छोरो से कम है के म्हणणारे महावीर फोगट यांच्या घराण्यातील छोरी विनेश फोगटने पंच्याहत्तर सेकंदात अक्षरशः मगरीप्रमाणे आपल्या विरोधी खेळाडूला फिरवून बाहेर नेले आणि ती फायनल्समध्ये प्रवेशली. फायनल्समध्ये तिने संघर्ष करून ‘सोनं’ जिंकलं. आणि भारताची आशियाई स्पर्धेतील पहिली ‘सोनपरी’ बनली. आपल्या चुलत बहिणींप्रमाणे तिनेही देशाचे नाव ‘सुवर्णाक्षरांनी’ कोरलं. महावीर फोगट हे तिचे काका आणि गुरू.


महाराष्ट्रकन्या राही सरनौबतही सोनपरी बनली. तिने लक्ष्यभेद करून सुवर्णपदक मिळवले.

रिले या खेळात भारताची कामगिरी चांगली झाली. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भारतीय अॅथलिट्सनी आश्चर्यकारक कामगिरी केली. धावपटू जीन्सन जॉन्सनने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत बाजी मारून ‘सुवर्ण’संधी साधली.  तो गोल्डन बॉय ठरला.


भारताच्या महिला रिले संघाने रिले दौड स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकवले. या सोनेरी यशात हिमा दास, पूवम्मा राजू माचेतीरा, सरिता लक्ष्मीबाई गायकवाड यांचा समावेश होता. हिमा दासने याच स्पर्धेत दोन रौप्यपदक पटकावले होते. तिने या आशियाई स्पर्धेत एकूण तीन पदक मिळवलेत.


यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके पटकावण्याचा मान भारतीय पथकातील अॅथलेटिक्स संघाच्या खेळाडूंना मिळाला. भारताने अॅथलेटिक्समध्ये सात सुवर्ण, दहा रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.

यानंतर नेमबाजीत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. नेमबाजीत दोन सुवर्ण, चार रौप्य, तीन कांस्यपदक मिळवलीत.


भारताने रोविंगमध्येही एक सुवर्णपदक मिळवलं. शिवाय टेनिसमध्येही एक गोल्ड मिळवलं..


बॉक्सिंगमध्ये भारताची कामगिरी यथातथाच राहिली. विकास कृष्णनने सेमिफायनलसाठी शारीरिकरित्या फिट नसल्याचे सांगून त्याचे सुवर्ण किंवा रौप्यपदक मिळवण्याची संधी गेली. सोनं गेलं चांदीही गेली हाती कांस्य आले. उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या बॉक्सरशी लढताना त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती.

अमित पांघळने भारताकडून बॉक्सिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.


स्क्वॅशमध्ये महिला संघाने चांगली कामगिरी केली. ज्योत्स्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लीकलने पदके कमावलीत.


कुराश या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात समस्त भारतीय क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधले ते पिंकी बलहारने. तिने रौप्यपदक मिळवले.


थाळीफेक क्रीडाप्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सीमा पुनियाने मिळालेल्या रकमेतून केरळ पूरग्रस्तां मदत करून आपली सामजिक बांधिलकीही जपली.


गोळाफेक स्पर्धेत भारताचा ताजींदर सिंग तूरने गोळा फेकून सुवर्णपदक मिळवून महाविक्रम केला.


शूटिंगमध्ये सौरभ चौधरी हा मुलगा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला. एअर पिस्तुलने त्याने लक्ष्यभेद करून सुवर्णपदक गळ्यात घातले.

भाला फेकमध्ये नीरज चोप्राने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.


या आशियाई स्पर्धेत नौकायन स्पर्धेत भारताने तीन पदकांची कमाई केली. एक रौप्य तर दोन कांस्य. वर्षा गौतम, श्वेता शेर्वेगर या जोडीने रौप्यकमाल केली. तर वरुण ठक्कर आणि चेंगप्पा केलापांडा या जोडीने कांस्य मिळवले.

हर्षिता तोमरने एक कांस्यपदक मिळवले.


दुभत्या म्हशीला टोणगा तसा भारताने कबड्डी आणि हॉकीमध्ये टोणगा मिळाला. कायम सुवर्णपदक मिळवणाऱ्या कबड्डीसंघाने यावर्षी सुवर्णपदकाची गवसणी घातली नाही. पुरुष आणि महिला दोन्ही कबड्डी संघाला सुवर्णस्पर्श झाला नाही.


स्वप्ना बर्मन ही हेप्टॉथ्लॉन प्रकारात सोनपरी बनली. तिने या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला. स्वप्ना बर्मनच्या दोन्ही पायांना सहा बोटे आहेत. या अडचणीसहित तीने आत्मविश्वासाने स्पर्धेत कामगिरी करून सुवर्ण मिळवलं. हेप्टॉथ्लॉन खेळा प्रकारात धावणे, फेकी, उड्या आदि सात प्रकारच्या खेळाचा समावेश असतो, त्यामुळे सातही खेळांचा सराव करावा लागतो. त्यामुळे स्वप्ना बर्मनची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद ठरते.


पीव्ही सिंधू अंतिम सामन्यात जिंकून सुवर्णपदक मिळवू शकली नाही, पण तिने रौप्यपदक मिळवून पहिली भारतीय महिला जिने आशियाई खेळात रौप्यपदक मिळवलं हा मान पटकावला.


ज्यूडो आणि सायकलिंगमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी अपयशी ठरली. पण ब्रीज या खेळात भारतीय खेळाडूंनी पदके कमावलीत.


या प्रकारे संमिश्र कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी या वर्षीची आशियाई स्पर्धा गाजवली. अपेक्षेप्रमाणे चीन या स्पर्धातालिकेत सर्वोच्च राहिला. त्या खालोखाल जपान तर नंतर दक्षिण कोरिया. भारत पदकांच्या तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. चीन , जपान या देशात लहानपणापासून खेळाडू , अॅथलिट्स घडवले जातात. तिथे खेळ संस्कृती खूप खोलवर रुजली आहे. भारतात मूळचे इन्फ्रास्ट्रक्चरच तितके पूरक नाही. तरीही भारतीय खेळाडूंनी या आशियाई स्पर्धेत आजतागायतच्या एशियन स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली.

जिथे आजकाल “बिग बॉस” , दस का दम सारख्या टुकार टीव्ही ‘शोज’ ला ‘खेळ’ संबोधून खऱ्या खेळाचा, खेळाडूंचा नकळत अपमान होतो. तिथे अथक मेहनत करून जिद्दीने खेळणाऱ्या , देशाचं आणि स्वतःचं नाव मोठं करणाऱ्या  या खेळाडूंचे मनापासून हार्दिक अभिनंदन.

Friday, 24 August 2018

भारत की छोरी छोरिया किसिसे कम है के!

म्हारी छोरी छोरीयोंसे कम हैं के! दंगल चित्रपटात महावीर फोगट यांची भूमिका करत असलेल्या आमीर खानने म्हटलेलं हे प्रसिद्ध वाक्य आहे. गीता बबिताला समाजाच्या , पारंपरिक मानसिकतेच्या विरुद्ध जाऊन महावीर फोगट यांनी मुलींना कुस्तीचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. संपूर्ण घराणंच हे खेळात, कुस्तीला वाहिलं आहे. देशाला अनेक मानसन्मान मिळवून दिला आहे.
महावीर फोगट यांची पुतणी आणि गीता बबिता यांची चुलत बहीण विनेश फोगटही आता आपल्या घराण्याचा वारसा पूढे चालवत आहे.  

विनेश फोगट हिने सध्या जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ स्पर्धेत भारताला फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले.
तिने फायनलमध्ये जपानच्या युकी इरी ला  या खेळाडूला हरवून सुवर्णपदक मिळवले. या सोबत ती प्रथम महिला खेळाडू ठरली जिने आशियाई खेळात भारतासाठी सुवर्णपदक मिळवले.

फायनलपूर्वी तिचा सामना झाला उजबेकिस्तानच्या महिला पेहलवान खेळाडू सोबत. तिचं नावाचा प्रत्येकाने स्वतःला जमेल तसा उच्चार करावा.

हा सामना अद्भुत होता. या सामन्यात विनेश फोगटची कला, शक्ती, तांत्रिक प्रभुत्व याचं संपूर्ण प्रदर्शन झालं. पिवळ्या रंगाचं अॅथलिट वेषात खेळताना फक्त पंच्याहत्तर सेकंदात तिने सेमिफायनलमध्ये उजबेकिस्तानच्या खेळाडूला हरवले. सुरवातीचे काही सेकंद अंदाज घेत, योग्य संरक्षण आणि आक्रमण ती करत होती. पण साठ सेकंदानंतर तिला संधी मिळाली जबरदस्त आक्रमण करायला. कुठलाही कुस्तीवीर आपले पाय प्रथम वाचवत असतो विरोधी कुस्तीवीरापासून, कारण एकदा विरोधी खेळाडूच्या पायाची पकड मिळाली की सामन्यावरची पकड घट्ट होते.

विनेश फोगटला सामना सुरू झाल्यावर एक मिनिटानंतर ती नामी संधी मिळाली. आणि अक्षरशः नागीण जशी दुसऱ्या नागिणीला अंगाला गुंडाळून पराजित करेल अश्या स्थितीत येऊन, नियमांना धरून,  तिने विरोधी खेळाडूला आडवं पडून, फिरवून पिवळ्या वर्तुळाच्या बाहेर नेले. मगर जशी आपल्या भक्ष्याला धरून , भक्ष्य विरोध करत असताना त्याला धरून उताणी आणि पालथी होत फिरवते तसं विनेश फोगटने उझबेकिस्तानच्या खेळाडूला फिरवून बाहेर नेले. तिच्या या डावाला विरोधी खेळाडूकडे काहीही उत्तर नव्हते. अद्भुत खेळून अगदी सहजरित्या; सामना सुरू होऊन पंच्याहत्तर सेकंदात विनेश फोगट फायनलमध्ये प्रवेशली होती.



दोन तासांनी तिची लढत होती जपानच्या खेळाडूशी. ही लढत होती फायनल्स. सुवर्णपदकासाठी.  
हा सामना फार चुरशीचा झाला. जपानची खेळाडूसुद्धा निष्णात कुस्तीवीर होती. निळ्या वेषात विनेश खेळत होती.
सुरवातीला आक्रमण करत विनेश फोगटने चार गुण मिळवलेत. पण त्यानंतर आपली आघाडी  कायम राहावी म्हणून तिने सतत संरक्षक पवित्रा अंगिकारला. पंचाच्या ते लक्षात आल्याने त्यांनी खेळ ऍक्टिव्ह टाईम मध्ये टाकला. जे विनेशच्या विरुद्ध जाण्याची शक्यता जास्त होती. जो खेळाडू मुद्दाम संरक्षक खेळत असेल तर पंच सामना तीस सेकंदासाठी  ऍक्टिव्ह टाईममध्ये टाकतात. यांत त्या खेळाडूला तीस सेकंदात एक गुण तरी मिळवावा लागतो , नाहीतर एक गुण विरुद्ध खेळाडूला दिला जातो. शेवटी तेच झालं. विनेश फोगटने गरजेपेक्षा जास्त संरक्षक पद्धतीने खेळल्याने पंचांनी सामना ऍक्टिव्हेट टाईममध्ये टाकल्यावर जपानच्या खेळाडूने विनेशला एक गुण मिळवू दिला नाही. परिणामी एक गुण जपानच्या खेळाडूला बहाल करण्यात आला. गुण तेव्हा चार - एक होते. तीन गुणांनी विनेश फोगट समोर होती.

शेवटच्या काही सेकंदात पुन्हा विनेशने अप्रतिम  जबरदस्त डिफेन्सचं प्रदर्शन केलं आणि आपली आघाडी कायम राखली. शेवटच्या सहा सेकंदात पुन्हा तांत्रिकदृष्ट्या दोन गुण मिळवले आणि सहा- दोन गुणांनी फायनल्स जिंकले. त्या क्षणाला ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली जिने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. भारताचा ध्वज फडकला. भारताचे राष्ट्रगीत वाजले.

काटक , अस्सल अॅथलिट शरीर , चांगली उंची, ही विनेश फोगटचे जमेची बाजू आहे. आपल्या चुलत बहिणींप्रमाणे तीनेही आता सुवर्णपदक मिळवले आहे. यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने चांगली कामगिरी केली होती.

आशियाई खेळ स्पर्धेत भारताकडे सध्या चार सुवर्णपदक आहेत. कबड्डीमध्ये भारताला कोरियाकडून एक गुणांनी हार पत्करावी लागली. साक्षी मलिकही  खूप लढून शेवटी हरली. तिचा अतिआत्मविश्वास अंगाशी आला हे तिचे सामने बघताना जाणवले.
कोल्हापूरच्या राही सरनौबतने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. बजरंग पुनियाने प्रथम सुवर्णपदक मिळवून दिले. सोळा वर्षीय सौरभ चौधरीने शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवले.
एकंदर भारतीय अॅथलिट्स आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत. येत्या काही दिवसांत पदकांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय खेळाडू छोरी और छोरिया किसिसे कम नही है!

Tuesday, 31 July 2018

रोहतांग पास बोगदा , पाऊल पडते पुढे

#रोहतांगपासबोगदा

मागच्या वर्षी अमरनाथवेळी पहलगामला तंबूत डोळे मिटून विश्रांती घेत पडलो असताना शेजारी बरेचसे गोरखपूरचे लोक होते. ते तेथील माओवाद, नेपाळमध्ये भारतीयांचा काय रोल असतो यावरही बोलत होते. जीएसटीला, नोटबंदीला कोणी चांगलं म्हणत होतं तर कोणी चुकीचं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विषय त्यांच्यात निघाला.  एकंदर सगळ्यांच्या तोंडी एक वाक्य बरेचदा ऐकू येत  होतं “मोदी बहोत जोशीला बंदा है!”

चंदीगडचा एक माणूसही तंबूत होता. तो एकटा आला होता. तोही त्यात बोलण्यात सामील झाला. स्लिम, कमी उंचीचा , फ्रेंच कट एकंदर व्यक्तिमत्वावरून , बोलण्यावरून तो शहरी आणि आधुनिक वाटत होता. तो सांगत होता “सच में मोदी बहोत जोशीला बंदा है! अभि अगले साल दो साल मे चायना और पाकिस्तान की बहोत जलाने वाला है! मनाली से लेह जाने के लिये सुरंग बन रही है! मैं जादा अभि इस बारे मे नही बता सकता ..लेकीन दो तीन सालो मे साल भर रोड से लेह, आर्मी के ट्रक्स  सियाचीन ग्लेशियर के ओर जा पायेंगे! " त्याला लोकांनी विचारल्यावर म्हणाला की तो स्वतः त्या टीमचा भाग आहे.

त्याने तेव्हा सांगितलेल्या एका बोगद्याबद्दल काल न्यूज चॅनलवर बघितलं. रोहतांग पास बोगदा.
मनाली ते लाहोल स्पिती वॅलीत जायलाच रोड ने सहा तास लागतात. शिवाय रोहतांग पास वर्षातुन तीन ते चार महिनेच उघडा असतो. वर्षभर बर्फामुळे , वादळामुळे तो बंद असतो. त्यामुळे लेहला नोव्हेंबर ते जुलै पर्यंत फक्त विमान मार्गानेच जाता येतं. एकप्रकारे आठ ते नऊ महिने एक महत्वाचा भाग देशापासून तुटला असतो. तेथील स्थानिक लोक,  मेंढीपाळ लोकांनाही कुठेही जाता येत नाहीत. आठ , नऊ महिन्याची खाद्यसामुग्री जमा करून ठेवावी लागते. त्यांना खूप अडचणी येतात.

पण आता जवळपास पूर्ण तयार झालेला हा नवा बोगदा देशाची , वाहतुकीची समीकरणे बदलवणार आहे. बातम्यात दाखवल्याप्रमाणे हा बोगदा विशेष आहे . आजवरचा वेगळा आहे. कारण या बोगद्यात दोन मजले आहेत. साडे आठ किमीच्या पीर पंजाल हिमालयाच्या उत्तर पूर्व भागातील,  मनाली आणि स्पिती वॅलीला जोडणाऱ्या या बोगद्यामुळे जिथे सहा तास लागतात तिथे आता फक्त एक तास लागणार आहे. शिवाय अपघात होण्याची शक्यता पूर्णपणे कमी. त्याशिवाय वर्षभर रोडप्रवास सुरु असेल.

वरच्या मजल्यातून लोकांना पायी जाता येईल. यात मेंढीपाळ लोक शेळ्या मेंढ्यांसकट तेथून जाऊ शकतील. तर खालून वाहने जाऊ शकतील. हिमाचल प्रदेशला आणि स्पिती वॅलीला , लडाखला जोडणारा हा विलक्षण बोगदा नागरी संस्कृतीसाठी खूप लाभकारक होणार आहे.

पण याखेरीज आणखी सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सियाचीनकडे जाणारा हा मार्ग कायम खुला राहील. अक्साई चीनकडे जाणारा हा मार्ग, या बोगद्यामुळे वाहतूक खूप सुलभ झाल्याने चीनचा चडफड होणार. कारण युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसामुग्री , खाद्यसामुग्री पोहचणेच सगळ्यात महत्वाचे असते. चीनने तिबेट, पाकिस्तानमध्ये सीमारेषेजवळपास सैन्याला सहज वाहतूक करता यावी म्हणूनच रस्त्यांवर निवेश केला आहे.

1999च्या कारगिल युद्धात लेहला जोडणारा एकमेव हायवेवर पाकिस्तानने नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले होते. पण भारतीय सैनिकांनी शौर्याने हायवे राखला होता. त्यामुळे लेहचा संपर्क आणि तो भाग देशात राहिला. असे महत्व आहे या दोन हायवेंचे.

थोडक्यात सोपी शब्दात सांगायचे तर भारतातून लडाख, सियाचीनला दोन मार्गाने जाता येतं. हिमाचल प्रदेश-मनालीतून ‘रोहतांग’ पास ओलांडून आणि काश्मीर सोनमर्गने- ‘झोझिला’ पासमार्गे. पण या दोन्ही दैत्य पासमार्गे त्यांच्या परवानगीने जाणं सोपी नसतं. कारण तेथे कायम अपघाताची , ट्राफिक जॅमची, वादळाची हिमवर्षावाची भीती असते. पण येत्या वर्षापासून मनालीमार्गे लेहला जाताना रोहतांग पासमार्गे न जाता या बोगद्यातून सहज जाता येईल. सहा तास वाचतील.

शिवाय या रोहतांग बोगद्याशिवाय आता “झोझिला पासला” बायपास करणारा बोगदाही तयार होतो आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने लेह आता वर्षभर जोडलं जाणार आहे. यामुळे नागरी आणि सरंक्षणसंबंधित अनेक समीकरणे बदलतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महेंद्रसिंग धोनीसारखा ‘#फिनिशर’ चा रोल निभावताय. ओपनरने सुरू केलेलं काम धोनी फिनिश करतो तसे आधीच्या सरकारने सुरू केलेले काम नरेंद्र मोदी तडीस नेताय. 2010 मध्ये या बोगद्याचं काम सुरू झालं होतं. यापूर्वी मागच्या वर्षी “नाशरी बोगद्याचं” मोदींनी उद्घाटन केलं. त्याचाही शिलान्यास युपीए गव्हर्नमेंटने केला होता.

या नाशरी बोगद्यातून मी गेलो आहे. काश्मीर खोऱ्याला जोडणारा हा भारतातील सगळ्यात लांब हा बोगदा आहे. आतून दर पाचशे मीटरवर टेलिफोन व्यवस्था, फर्स्ट एड व्यवस्था, शिवाय संपूर्ण बोगद्यात स्वच्छ शुद्ध हवा आत येत राहील याची व्यवस्था केली आहे. मागच्या वर्षी हा बोगदा सुरू होण्यापूर्वी , काश्मीर खोऱ्याला जोडणारा जुना #जवाहरबोगदा होता. हा बोगदा खूप अरुंद, आत प्रकाश व्यवस्था नसलेला, शिवाय आत हवा येण्याची व्यवस्था नसलेला आहे. या बोगद्यातून जाताना काही वयस्कर, वृद्ध प्रवाश्यांना श्वासाचा त्रास , छातीवर दडपण , घाबरल्याची अवस्था झाली होती. कारण बोगदा खूप लांब आहे.
त्यामुळे नवे बोगदे तयार होणे खूप आवश्यक आहे.

त्या माणसाने सांगितल्यानुसार , मोदी यांनी स्वतःच्या सरकारात काही स्वतः लडाखला जोडणाऱ्या, चीनच्या अगदी जवळून जाणाऱ्या तीन मोठ्या बोगद्याची हायवे , प्रकल्पाची सुरवात केली आहे. ज्यामुळे चीनची चरफड होणार आहे.. अनेक अभियंते, शेकडो कामगार दिवसरात्र रस्ते आणि बोगदे बनवण्यासाठी राबताहेत. प्रवासात हे स्पष्टपणे दिसून येतं.

“मोदी बहोत जोशीला बंदा है पाकिस्तान और चायना के पाससे वो और बडे रस्ते बना रहा है! हे त्या माणसाचं वाक्य होतं. हे जर खरं असेल तर नक्कीच येत्या काही वर्षांत खूप समीकरणे बदतील.

आणि हे किती सकारात्मक आहे की आज मोदी सरकार वाहतूकीसंबंधित, संरक्षणसंबंधित नवे देशहितकारक प्रकल्प सुरू करताय, काही वर्षांनी दुसरे कोणते सरकार ते पूर्ण करतील. देश असाच पूढे जात राहील.

“सरकारे आते रहेगी जाती रहेगी , लेकीन देश रहना चाहीये….! “

Abhijeet Panse

Wednesday, 27 December 2017



27 सप्टेंबर 2016

जेव्हा संपूर्ण जग निद्राधीन असतं तेव्हा स्थितप्रज्ञ जागा असतो
कुठे नेते राष्ट्रीय संवेदनशील मुद्यानवरूनही एकमेकांविरुद्ध राजकारण करीत एकमेकांवर चिखलफेक करीत असतात.
कुठे मोर्चे निघत असतात..
कोणी अतृप्त आत्मा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःची नवीन पार्टी काढतो.

कोणी पत्रकार हिरोईन खुर्चीवर बसताना तिचा स्कर्ट कधी वर जाईल आणि नेमके त्या क्षणांचे फोटो काढता येतील असल्या नीच कामात गुंतलेले असतात.

कोणी अँजेलिना सारख्या अबलेवर बॅड पुरुषाने कसा अन्याय केला यावर आंबट तुरट चर्चा करत असतात.

कुठे सुटलेल्या पोटाची ढोबळी मिर्ची ऎश्वर्या राय आता पुन्हा चवळीची शेंग कशी काय झाली यावर चोथा होईस्तोवर चर्वण सुरु असतं.

भारताने 500वी टेस्ट जिंकली त्याचा आनंद साजरा करणं सुरु असतं.

मूवी रिलीज व्हायच्या नेमक्या काही दिवस आधी  नट नटयाची लफडी बाहेर येतात वा वादग्रस्त विधानं करतात..

पण या सर्व प्रसिद्धीसाठी आसुसलेल्या गदारोळात शांतपणे आपलं कार्य करणारे नेहमी वाटतात ते #इस्रो आणि इंडियनआर्मी

#जेव्हा सर्व झोपलेले असतात तेव्हा #स्थितप्रज्ञ जागा असतो.

काल  इस्रोने आणखी एक उपग्रह अंतराळात पाठवण्याची अवघड मोहीम फत्ते केली!!

खरे स्थितप्र कर्मयोगी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO आणि  भारतीयसेना आहेत!

कुठल्या निरर्थक वादात अडकत नाहीत वा प्रसिद्धी साठी आसुसलेले नसतात.
शांतपणे आपले कार्य देशासाठी करत राहतात.खरे कर्मयोगी!!

जेव्हा सर्व देशवासी झोपलेले असतात तेव्हा #भारतीयसेना आणि ISRO हे स्थितप्रज्ञ जागे असतात.
Hats off to them!!

मानाचा मुजरा!!

-अभिजित दिलीप पानसे

पिंक प्लिज


21 सप्टेंबर 2016

पिंक कलर आजवर मुलींचीच टेरेटरी होती.पण गोष्टी आता पिंकलिप्स पर्यंतच मर्यादीत राहिल्या नाहीत!
 ढगाळलेल्या आकाशात संध्यासमयीच्या  संधीप्रकाशात एक गुलाबी रंग उमटतो.तो रंग बदलाची नांदी असतो दोन प्रहरांच्या!

हा गुलाबी रंग आता बदलाचा रंग होतोय.
बेबीपिंक रंग हा फक्त बेबींसाठीच राहिला नाही तर बाबुंसाठीही गरजेचा आहे.हे शुजितसरकारने नेहमीप्रमाणेच त्यांच्या इतरही उच्च क्रिएटिविटीजप्रमाणे दाखवुन दिलं आहे.

Pink is colour change now!
Change of rigid mentality n perspectives.

Time to go for a PINK!
A MUST WATCH MOVIE!!
Pink is for men now!

तिकडे टेस्ट क्रिकेटमध्येही पिंक हा बदलाची नांदी ठरतोय.
पारंपारिक रेड कलरला एक योग्य पर्याय म्हणुन पिंक बॉल चा वापर सुरू होतो आहे.
 नुकतंच दुलिपट्रॉफी मध्ये मोठे बदल दिसलेत. पिंकबॉलचा उपयोग आणि डे एन नाईट #टेस्टक्रिकेट.यांमुळे सर्वोत्तम क्रिकेट असलेल्या टेस्ट क्रिकेटमध्ये वेगळी उर्जा निर्माण होइल असं वाटतं.

याच मँच मध्ये #चेतेश्वरपुजाराने बिग डबल हंड्रेडही मारली आणि जडेजाने  fiveWickethaul घेतलेत.

हिरव्या ग्राउंडच्या,निळ्या आकाशाच्या आणि रात्रीच्या चकाकत्या फ्लड लाइट्स उजेडाच्या पार्श्वभुमीवर गुलाबी बॉल उठुन दिसतोय.
पुरूषांच्या जगात ,खेळात गुलाबीरंग बदल ठरतोय आणि घडवतोय.

Time to go Pink

-अभिजित पानसे

पंगुं लंघयते गिरीम्

14 सप्टेंबर 2016

* पंगुं लंघयते गिरीम् *

सध्या अपंग(??) खेळाडुंचे पँरॉलिंपिक खेळ सुरू आहेत आणि भारतीय खेळाडुंनी दोन सुवर्ण,एक सिल्वर एक ब्रॉन्झ पदक मिळवुन शारिरीक अपंगत्वाचा मनाच्या शक्तिशी काहीही संबंध नाही हे दाखवुन दिलं आहे.

पाच वर्षाचा असताना पायावरून बस गेल्याने शारिरीक अपंगत्व आलेले  मयप्पन,  देवेंद्र झाझरिया, वरूनसिंग  दिपामलिक यांनी मानसिकशक्ती  आणि इच्छाशक्ती मुळे पंगुंलंघयतगिरीम् नसिब तो उनका भी होता है जिनके हात नही होते हे दाखवुन दिलं.यांना अपंग म्हणण्याची आपली लायकी नाही.

पण याची आपल्या समाजाला तितकिशी नोद घ्याविशी वाटली नाही.
सार्वजनिक वाहनांमध्ये अपंगाकरिता राखिव जागेवरही अतिक्रमण करणाऱ्या आपल्या समाजाचं हे प्रतिबिंब आहे.

मनाने परिपुर्ण आणि सुदृढ अश्या या खेळाडुंना मानाचा मुजरा!
दिपाज्योती नमोस्तुते

-अभिजित पानसे

Thursday, 21 December 2017

रंग माझा आवडता, आत्मविश्वासाचा


.
INDIAS NEXT TOP MODEL

राज कुमार संतोषीच्या 'लज्जा' या मुवीमध्ये अनिलकपुर एक डायलॉग म्हणतो "हमारे देश मे लडका चाहे खुद काला कौवा क्यु ना हो लेकिन उसे बिवी गोरी ही चाहीए होती है!

या मानसिकतेमुळे कित्येक मुला मुलींचा आत्मविश्वास ढळतो.

स्मितापाटील यांना त्यांच्या सावळ्या रंगासाठी सुरवातीला तुच्छ लेखलं जायचं.अमिताभ बच्चनला त्यांच्या उंचीसाठी..पण पुढे त्याच गोष्टी त्यांचे USP बनलेत.

पण हा प्रवास खुप महत्वाचा असतो.सोपा तर नसतोच पण बहुतांशी एकलाच असतो.
लहानपणापासुन सुरवातीपासुन आजुबाजुचे लोक आत्मविश्वास कमी करणाऱ्या टिका ..टवाळी खिल्ली उडवत असतात.अशावेळी जो आपला हा प्रवास पुर्ण करतो ती व्यक्ती आणि त्यांचा तो प्रवास खरच आदरणीय वाटतो .अशावेळी "एन्ड रिजल्ट" महत्वाचा नसतो. 'प्रोसेस' महत्वाची.

Mtv वर 13 आठवड्यांपासुन सुरू असलेला IndiasNextTopModell चा सिजन नुकताच संपला.
यातील सर्व मुली स्पर्धकांमध्ये एक मुलगी मला पहिल्यापासुन फार आवडायची !सुरवातीपासुन प्रचंड लक्षणीय वाटली!
आसामची #जांती_हजारिका.

 अत्यंत चार्मिंग पण इनोसंट चेहरा..तुकतुकीत त्वचा आकर्षक शॉर्ट हेअरस्टाइल,गोड हास्य पण रँम्पवर जाताच जबरदस्त अटिट्युड..फोटोशुटवेळी हवा असलेली किलिंग सेंशुयलिटी!
 आणि कुठल्याही पेहरावात त्याच्याशी सात्म्य होत एलिंगंट दिसणारी ही आसामची मुलगी!!!

पण मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये येण्याचा प्रवास तिचा हा बिलकुलही सोपा नव्हता.ती  रंगाने डार्क सावळी असल्याने तिला तिच्या शाळा कॉलेजमध्ये अनेकजणं जंगली,कौवा, म्हणायचे..तिची मॉडेलिंगची इच्छा बघता मित्र ,नातेवाईक खिल्ली उडवायचे.तिच्या त्वचेच्या रंगावरून केसांवरून टर उडवायचे.ती मनाने पुर्ण खच्ची झालेली होती.#Depression मध्ये गेली होती .स्वत:चा अस्विकार केल्याने त्या काळात ती स्वत:लाच इजा पोहचवायची!

या रिअलिटी शो मध्ये आल्यावरसुद्धा तिच्यावरील टिका बंद झाली नााही.

तिचे आधीचे फोटोज बघताना कोणीही म्हणणार नाही की ही मुलगी कधी मॉडेल होउ शकेल!!

तिचा Top model मध्ये प्रवासही खडतर झाला. पण जसं जसं ती समोर जात गेली तसतसा विश्वास वाढत गेला.जांतीने सर्व राउंड्स हार्नेसफोटोशुट आउटडोअरफोटोशुट, बिकिनी राउंड्स शेवटी सर्वात महत्वाचा Lakme fashion week सर्व हळुहळु तिने जबरदस्त किलिंग पर्फॉर्मन्स दिलेत.
ते बघताना
Ohhh girl u r the besstt!! म्हणावसं वाटतं!!

एक रॉ टँलेंट मटेरिअल ते प्रोसेस्ड प्रोफेशनल मॉडेल हा प्रवास स्पष्ट दिसतो.

शेवटी तिन फायनलिस्टमध्ये आल्यावर मात्र ती स्पर्धा जिंकू शकली नाही #फर्स्ट_रनर_अप झाली. आर्मी बँकग्राउंड असलेली #प्रणति_प्रकाश ठरली.वडिल आर्मी ऑफिसर्स असलेल्या मुली यापुर्विही यशस्वी मॉडेल्स ,अँक्ट्रेसेस झाल्याहेत.कारण या मुलामुलींमध्ये पहिल्यापासुन जबरदस्त आत्मविश्वास ,बदल स्विकारण्याची वृत्ती, मोकळे विचार असतात.

पण जांतीहजारिका सारखी सर्वसामान्य मध्यमवर्गातुन आलेली #आत्मविश्वासाला आणि #आत्मसन्मानाला धक्के बसलेली काळ्या सावळ्या रंगाची मुलगी ठरावीक मानसिकता असलेल्या समाजात समोर येतेय !

PINK & DARK r colours of the #change now
Both goes hand in hand!!

Janteehazarika is #Indiasnextopmodel
LOVV u girl!!


Wednesday, 20 December 2017

मैत्रिणीचा दिवाळी अंक

माझी एक मैत्रीण आहे , ती बारावीत असतानापासून तिची एक महत्वकांक्षा होती की तिला तिचं स्वतःचं  मासिक, अंक, मॅगझीन काढायचंय. मला फार अप्रूप वाटतं तिच्या या गोष्टीचं.
तिने पुढे पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. पत्रकारितेची नोकरी केली. काही चांगले वाईट अनुभव घेतलेत. पुढे नोकरी सोडली.लग्न केलं. पण साहित्याचा व्हायरस आणि जुनी इच्छा काही मनातून जात जात नव्हतं.

ती लिहीत नाही. पण administrative गुण मात्र खूप आहेत! आणि व्याकरण , साहित्याचे बेसिक्स खूप चांगले आहेत. त्यासंबंधी ती काम करत असते.

विवाहानंतर मात्र तिच्या गोष्टी बदल्यात .तिचा नवरा अत्यन्त चांगला, आदर्श नवरा आहे.तिला प्रचंड साथ देणारा!
तिला शहरात यायला खूप दूर पडतं म्हणून ,निगडीच्या पुढे स्वतःचं घर असताना तिला त्रास होतो म्हणून भाड्याने एरंडवणेला राहू लागलेत. जिथे ते राहायला आलेत, त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तिच्याहून वयाने मोठ्या स्त्रीशी ओळख झाली. त्याही साहित्य, पुस्तक प्रकाशन यात खूप आवड असलेल्या . त्यांची एकदम गट्टी जमली. ती त्यांना ताई म्हणते. पण ती माझी तिसरी आई आहे असे गंमतीने सांगते. एक तिची आई, एक 'सासूबाई आणि तिसऱ्या या ...ताई!

तेव्हा तिने ठरवलं की स्वतःचा दिवाळी अंक काढायचा!त्या दोघीनीही खूप मेहनत करून त्यांनी सलग चार वर्षे दिवाळी अंक काढला!
 मुळात त्यांच्या अंकाचा विषय हा प्रकाशना संबंधित तांत्रिक बाजूवर असतो. त्यामुळे सर्वसामान्य वाचक ते एन्जॉय करणारनाही असं मी तिला नेहमी म्हणतो.पण तरीही तीने विषय बदलला नाही. कमर्शिअल झाली नाही.
मागच्या वर्षी तिला तिच्या अंकासाठी अवॉर्ड मिळालं.

यावर्षीची दिवाळी मात्र तिच्यासाठी खास आहे. यावर्षी अंक काढू शकू की नाही अशी धास्ती तिला वाटत होती. कारण ती गर्भवती आहे. त्यामुळे अंकाची धावपळ जमेल की नाही काळजी होती.

तिने पाचव्या , सहाव्या महिन्यात देखील जाहिरातींसाठी, अंकातील मुलाखतींसाठी लेखकांना भेटणे, आर्टिस्टकडून मुखपृष्ठ बनवून घेणे, मग घरी येऊन त्या दोघी मिळून आपापल्या लॅपटॉपवर प्रूफ रिडींग आणि इतर गोष्टींवर दिवसभर काम असा त्यांचा काही महिन्यांपासून दिनक्रम असायचा. रात्री नवऱ्या सोबत नियमितपणे चेक अप ला जायची.मग दोघे मिळून स्वयंपाक करायचे.

तिला तिच्या तब्येतीबद्दल सहज विचारलं तर ती फक्त दिवाळी अंकाबद्दल , त्याचे अपडेट्स सांगायची! ती म्हणायची पहिले डिलिव्हरी अंकाची मग माझी! तिच्या कामाकडे बघून कोणी म्हणणार नाही की ती प्रेग्नन्ट आहे. आणि ती ही पहिलीच वेळ!

आणि हे सगळं करताना ती उत्साही , गंमती मजा सगळं करत असते. एरवी चिडकी असल्याने तिची पंचाईत होतेय कारण डॉक्टरने शांत , आनंदी राहायला सांगितलं आहे. त्यामुळे तिची फार मजेदार परिस्थिती होते.
काम झाले नाही की फार संयम बाळगून न चिडण्याचा प्रयत्न करते.
पण एक दिवस भडका माझ्यावर निघाला! कारण दोन महिन्यांपासून तिने मला लेख 'द्यावाच' लागेल अशी धमकी दिली होती.आणि मी तिला प्रथम नाही म्हणून नंतर मुद्दाम "बघेन जमलं तर " म्हणालो होतो.  यावरून नियमितपणे ती स्वतःवर फार नियंत्रण ठेऊन माझ्यावर रागवायची.

शेवटी अंक छापायला द्यायच्या काही दिवस आधी रात्री 10 वाजता तिचा फोन आला तिने फक्त निर्वाणीचा इशारा, धमकी दिली की उद्या मी सकाळी उठल्यावर तुझा लेख आलेला मला दिसला नाही तर यानंतर मी बोलणार नाही!
माझ्यासारख्या दगडाला असले पुश मिळाल्याशिवाय ते काही करत नसतात.
रात्री 2 वाजता बसून तिने सांगितलेल्या विषयावर जमेल तसा लेख सकाळी 6 वाजता तिला मेल केला.

त्यांचा सलग पाचव्या वर्षी दिवाळी अंक प्रदर्शित झाला.

आता ती प्रेग्नन्ट स्त्रीने घ्यावी तशी विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे.

तिचे सासू सासरे युएस ला दुसऱ्या मुलाकडे असताना तिने आणि तिच्या नवऱ्याने मिळून गणपती गौरी चं संपूर्ण केलं होतं.

माझ्याशी चित्रपट आणि पुस्तक , साहित्य यावरून सतत वाद करणारी ही व्यक्ती. कारण मी पूर्णपणे चित्रपट किडा तर ती जातिवंत साहित्याची अभ्यासू!

मी फेसबुकवर 'टाईमपास' लिहिण्याच्या सतत विरोधात असणाऱ्या दोन व्यक्तींपैकी ही एक.
जबरदस्तीने पुस्तकं वाचायला लावणारी ही एक व्यक्ती.

असे लोक असतात आजूबाजूला त्यामुळे एनर्जी मिळत राहते.

- अभिजित पानसे

Monday, 18 December 2017

मयंती लँगर स्टार अँड स्पोर्ट्स गर्ल

मंदिरा बेदीने खूप मेहनत करून सूत्रसंचालन केले होते. पण  तिच्या अँकरिंग पेक्षा तिच्या कपड्यांचीच चर्चा अधिक झाली होती. पहिल्या मॅच मध्ये 125 रन्स मध्ये ऑल आऊट होऊन शेवटी फायनलमध्ये मॅकग्रा च्या आखूड बॉल वर तेंडुलकरचं वाकडं पडलेलं पाउल..पूल..; दोन्ही वेळा फक्त ऑस्ट्रेलियाकडून हरलेल्या 03 च्या वर्ल्डकपमध्ये मंदिरा बेदी हे भारतीय प्रेक्षकांसाठी सरप्राईज पॅकेज होतं. तिच्याकडे अँकरिंग स्किल होतं पण क्रिकेट नॉलेज नव्हतं.
ती आली आणि ती गेलीही.

त्यानंतर रोशनी चोप्रा चारु शर्मासोबत नॅशनल क्रिकेट अँकरिंग करायची. पण ती फक्त "मला पहा अन फुलं वाहा " अँकर होती.
 त्यानंतर आयपीएल मसाला क्रिकेट सुरू झाल्यावर पोली साजूक तुपातली "शिबानीदांडेकर" आली. पण ती फक्त ग्लॅम डॉल , "क्रिकेट आय क्यू! यु की ये कोन बोला?" प्रकारातच मोडते. स्पोर्ट्स नॉलेज शून्य.
फक्त स्पॉन्सर्स चे नावं घेण्याइतपत आणि मसाला क्रिकेटला शोभेल असं खिदळत टाईमपास इंटरव्यूज घेण्याचंच शिबानी दांडेकर चं काम असतं.

या सर्व महिला संचालक क्रिकेट सूत्रसंचालनाचं त्यांचं काम खूप चांगल्या प्रकारे करतात यात शंका नाहीच. पण त्या ग्लॅम डॉल, आय कँडी म्हणूनच  मैदानावर वावरत असतात. चॅनल्स ने त्यासाठीच त्यांना काम दिलं असतं.

2013 मध्ये भारत दक्षिण आफ्रिका सिरीज दरम्यान सगळ्यात पहिल्यांदा एक वेगळ्या स्त्री अँकर ला बघितलं. तेव्हा तिचं नाव काय आहे हे ही बघण्यात रस नव्हता कारण फक्त एक आय कँडी म्हणून नवी अँकर चॅनलने आणली आहे वाटलं.
पण ती आली. टिकली. तिने पाहिलं..आणि ती शिकत गेली..

अत्यंत करिझ्म्याटिक , प्रभावित करणारं व्यक्तिमत्व, भाषेवर पकड, मादक अपारंपरिक सौंदर्य ,मुद्रा आणि याशिवाय एक अत्यन्त महत्वाची गोष्ट जी आधीच्या स्त्री सूत्रसंचालकांमध्ये नव्हती ती म्हणजे "स्पोर्ट्स आय क्यू" .
तिच्यातील स्पोर्ट्स इंटलीजंट कोशंट तिला इतर कचकड्या बाहुल्यांपासुन वेगळं करतं.
तिचं नाव मयंती लँगर.

पुढे ऑस्ट्रेलिया भारत सिरीज पासून ती स्टार स्पोर्ट्स वर नियमितपणे दिसू लागली. याच काळात स्टार स्पोर्ट्सनेही कात टाकली. स्टार चे खेळा संबंधी इतर चॅनल ही सुरू केलेत. त्यानंतर ती स्टार स्पोर्ट्स वरील नियमित अँकर झालीये
ती फक्त क्रिकेट अँकर नाही तर इतर स्पोर्टस चं ही बऱ्यापैकी ज्ञान आहे.

आज मयंती लँगर क्रिकेट ब्रॉडकास्टर असली तरी तिची सुरवात फुटबॉल पासून झाली.
दिल्लीपासून फुटबॉल खेळाशी जोडल्या गेली. सूत्रसंचालन, समालोचन केलं.
त्यानंतर बीच फुटबॉल टुर्नमेंटच सूत्रसंचालन केलं. त्यानंतर ती खऱ्या अर्थाने समोर आली. फिफा वर्ल्डकपचं सूत्रसंचालन, अगदी जाणकार पॅनल म्हणून ही काम केलं. त्याच वर्षात दिल्लीला झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही संचालन केलं.

सुरवातीला झी मीडिया हाउस सोबत काम केल्यावर नंतर टेन स्पोर्ट्स आणि आता स्पोर्ट्स मधील सगळ्यात मोठी "#स्टारफिश ,सगळ्या स्पोर्ट्स हाउस गिळंकृत करणारं जायंट स्टार स्पोर्ट्स शी आता जुळली आहे. नुकतंच स्टार स्पोर्ट्स ने आयपीएलचे हक्क विकत घेतले आहे. पुढच्या वर्षी आयपीएल सोनी मॅक्सवर दिसणार नाही.

तिचा नवरा स्टुवर्ट बिनी आणि सासरे रॉजर बिनी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स असुनही मयंती लँगरने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या नवऱ्याचा स्टुव्हर्ट बिनीचा , #कर्नाटक_प्रीमिअर_लिग मध्ये बिनीने मोठी खेळी केल्याने तिने त्याचा इंटरव्यू केला. त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही होता . स्टूूवर्ट बिनीने आजचा दिवस खूप खास आहे म्हटल्यावर ती लाजत हसली.

दोनेक वर्षांपासून सुरवातीला ती सूत्रसंचालन करताना सपाट चेहऱ्याने वावरायची. कम्फर्टेबल वाटायची नाही. भाव प्लास्टिक वाटायचे. पण आता मात्र तिच्यात आमूलाग्र बदल झालाय. आता तिच्यात विनोदी बुद्धी आलीये, ती खूप रिलॅक्स्ड वाटते. पूर्णपणे समरस झालीये.

मयंती लँगरची एक मोठी कमकुवत बाजू म्हणजे क्रिकेट मेमरी. तिच्याकडे क्रिकेट मेमरी नाही.
हर्ष भोगले आणि आता नवा स्पोर्ट्स संचालक जतीन सप्रू यांच्याकडे क्रिकेट ज्ञान, आणि आठवणींचे भांडार आहे.
हर्ष भोगले तर एन्ससाक्लोपीडिया आहे. इथे तिला काम करावं लागेल.

आत्मविश्वासाने भरलेली, बुध्यांक असलेली ,करिझ्म्याटिक खणखणीत व्यक्तिमत्त्व असलेली मयंती लँगर एक अत्यन्त आकर्षक खेळ सूत्रसंचालक, ब्रॉडकास्टर, पत्रकार आणि मॉडेल खेळ विश्वात खास ओळख निर्माण करते आहे.

-अभिजित पानसे