Showing posts with label वाढदिवसाच्या शुभेच्छा. Show all posts
Showing posts with label वाढदिवसाच्या शुभेच्छा. Show all posts

Thursday, 16 August 2018

अजित वाडेकर सुनील, गावस्कर , गॅरी सोबर्स

अजित वाडेकर,  सुनील गावस्कर, गॅरी सोबर्स , 1971 , खास आठवण.

सुनील गावस्कर नावाचा एक तरुण मुलगा प्रथमच वेस्ट इंडिजच्या टूरला गेला होता. तोवर त्याने एकही टेस्ट मॅच खेळली नव्हती. कॅप्टन होते अजित वाडेकर.

पहिली टेस्ट मॅच किंगस्टन येथे सुरू झाली. पण पहिला संपूर्ण दिवस किंगस्टन येथे पावसाने धुमाकूळ घातला. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मध्ये कायम हा त्रास असतोच.  टॉससुद्धा न होता पहिला दिवस संपूर्ण वाया गेला. असा एकही वेस्टइंडिज , इंग्लिश दौरा झालेला नाही ज्यात पावसाने खेळखंडोबा केला नाही.

दुसऱ्या दिवशी टॉस  झाला. भारताची पहिल्यांदा बॅटिंग सुरू केली. भारतीय इनिंग संपल्यावर वेस्टइंडिजची बॅटिंग सुरू झाली. वेस्टइंडिज टीम भारतापेक्षा 170 रन्स कमी काढून ऑल आऊट झालेत. सर्व आपापल्या ड्रेसिंग रूममध्ये परतले.

साहजिकच दुसरी इनिंग भारत सुरू करणार यामुळे वेस्टइंडिज टीम ड्रेसिंग रूममध्ये निवांत उघड्या अंगाने शीतपेये पीत बसली होती. भारतीय ड्रेसिंग रूममध्येही भारतीय ओपनर्स दुसरी इनिंग सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये वेगाने ड्रेसिंग रूममध्ये परतले होते. त्यांची तयारी सुरू होती.

पण कॅप्टन  अजित वाडेकर यांचा वेगळी आखणी होती. त्यांनी सुनील गावस्कर यांना बोलावले. सुनील गावस्कर यांची कारकीर्दही तेव्हा सुरू व्हायची होती. त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काहीही ओळख नव्हती. त्या टेस्टमध्ये ते खेळत नव्हते.

अजित वाडेकर यांनी सुनील गावस्कर यांना वेस्टइंडिज ड्रेसिंग रूममध्ये जायला सांगून “भारताने वेस्टइंडिजला फॉलो ऑन देण्याचा निर्णय घेतलाय” हे सांगायला  सांगितले.

सुनील गावस्कर विंडीज रूममध्ये गेले असता सर्व खेळाडू धिप्पाड, उघड्या अंगाने बसलेले. समोर खुर्चीत क्रिकेटचे देवाधिदेव महादेव गॅरी सोबर्स बसलेले होते. सुनील गावस्कर ज्यांनी तोवर एकही मॅच खेळली नव्हती त्यांनी #कॅप्टनगॅरीसोबर्सला घाबरत नम्रतेने सांगितलं सर u wud follow on!

तेव्हा गॅरी सोबर्स गावस्करांवर खेकसलेत , फॉलो ऑन कसं काय शक्य? कारण विंडीज 170 रन्सने मागे होतं. आणि टेस्ट मॅचमध्ये फॉलो ऑन लादण्यासाठी विरुद्ध पक्षाचे किमान 200 रन्स कमी असावे लागतात.

नवोदित, अननुभवी सुनील गावस्कर घाबरून गॅरी सोबर्सपुढे काहीही न बोलता ड्रेसिंग रूममध्ये परत आलेत.

“आपने कभी देखा है 70s के वेस्ट इंडिज का ड्रेसिंग रूम, शर्ट निकालके बैठे हुये छे फिट के खिलाडी….
मैं तो भाग निकला वहा सें! काही दिवसांपूर्वी गावस्कर ही आठवण सांगताना म्हणाले होते.

सुनील गावस्कर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये परत आल्यावर  कॅप्टन अजित वाडेकरांना भेटून गॅरी सोबर्स काय म्हणालेत ते सांगितलं .
"फॉलो ऑन द्यायला 200 किंवा जास्त रन्सने मागे असावं लागतं, वेस्टइंडिज 170 रन्स ने मागे होतं."

ते ऐकून  पाहुण्या भारतीय टीमचे स्कीपर अजित वाडेकर यजमान विंडीज ड्रेसिंगरूममध्ये गेलेत. गॅरी सोबर्सला म्हणालेत फॉलो ऑन देण्यासाठी 200 रन्सने पूढे असावेत हा नियम आहे, पण जर मॅचचा पहिला सम्पूर्ण दिवस पावसाने वाया गेला असेल तर फॉलो ऑन विरुद्ध टीमचे 150 रन्स कमी असताना देता येतो.

हा खेळाचा तांत्रिक नियम कॅप्टन  अजित वाडेकर यांनी कॅप्टन गॅरी सोबर्स या अत्यंत मोठं नाव असलेल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वास समजावून सांगितला.
आणि वेस्टइंडिज ने निमूटपणे दुसऱ्या इनिंगमध्ये ‘फॉलो’ केलं.

हे सौंदर्य आहे टेस्ट क्रिकेटचं . बारीक नियम, तांत्रिक गोष्टी. सगळ्या प्रकारे ‘कसोटी’ लागते.

जो छुपा नियम गॅरी सोबर्स यांना माहिती नव्हता तो भारतीय कॅप्टन अजित वाडेकर यांना नीट माहिती होता. आणि तो त्यांनी प्रसंगावधान राखून वापरलासुद्धा.
किंगस्टनची ती कसोटी विंडीजने प्रयत्नांती अनिर्णित राखली.

 पुढची कसोटी होती पोर्ट ऑफ स्पेनला.
या सामन्यात एक मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली पहिली मॅच खेळला.

अजित वाडेकरांनी विंडीज रूममध्ये ज्याला पाठवलं होतं तो पाच फूट पाच इंची उंची असलेला लिटल मॅन सुनील गावस्कर.  त्याने विंडीज माऱ्यासमोर दोन्ही इनिंगमध्ये साठच्या वर रन्स काढलेत. दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद राहून शेवटचा विजयी रन त्याने काढला. आणि भारताने पहिला विजय साकारला विंडीज भूमीवर. कॅप्टन होते #अजितवाडेकर.

त्याच कसोटी मालिकेत त्या लिटल मॅनने वेस्टइंडिज भूमीवर वेस्टइंडिजच्या भेदक माऱ्यापुढे शतके काढलीत. त्यात एक डबल सेंच्युरीही होती. आपल्या पहिल्याच मालिकेत नेत्रदीपक कामगिरी केली त्या लिटल मॅनने. पुढे त्याला “लिटल मास्टर सुनील गावस्कर” म्हणू लागले.

ती वेस्टइंडिजमधील मालिका भारताने जिंकली. भारताने पहिली मालिका जिंकली विदेशी भूमीवर. बिग जायंट विंडीजविरुद्ध. कॅप्टन होते अजित वाडेकर.

दोन महिन्यांनी भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली. भारतीय टीमने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्येही मालिका जिंकली.
विजयी होऊन परतताना दिल्ली विमानतळावर पंतप्रधान इंदिरा गांधी स्वागत करायला आल्या होत्या.

भारताचा पहिला ओव्हर्सिज विजय नवाब पतौडींच्या नेतृत्वात झाला न्यूझीलंडविरुद्ध. त्यातही अजित वाडेकर यांचा बॅट्समन म्हणून मोठा वाटा होता.

पूर्णपणे डावखोरे खेळाडू, त्या काळातील आक्रमक बॅट्समन.
भारतीय टीमचे कॅप्टन, कोच, मॅनेजर , निवड समितीचे अध्यक्ष अशी भूमिका पाडणारे अजित वाडेकर.

जेव्हा क्रिकेट बघणं सुरू केलं तेव्हा अजहर कॅप्टन आणि मॅनेजर / कोच अजित वाडेकर असं वाचायला मिळायचं.

भारतीय क्रिकेट टीमचा विदेशातील मालिका विजयाचा आगाज करणाऱ्या अजित वाडेकरांना श्रद्धांजली.

-  Abhijeet Panse

Thursday, 11 January 2018

*ये दिवार टुटती क्यू नही *



"ये दिवार टुटती क्यू नही!"

शाळेत असताना मी सचिन भक्त होतो, मैदानावर सतत वैतागलेला जग्गुदादा श्रीनाथ माझा आवडता भारतीय खेळाडू होता..गांगुलीचे ऑफ ड्राईव्हज आवडायचे, आपला तो अज्ज्या आगरकर दुसऱ्याचा तो #अजहरमहमूद असल्याने  अजितभाऊ आवडायचे.. यांचे स्टिकर्स मी मिळवायचो आणि शाळेतील पुस्तकाच्या हलक्या ब्राऊन कागदावर चिकटवायचो.

पण स्टिकर्स मिळाले नाहीत तर फक्त एका खेळाडूचे वर्तमानपत्रातील कृष्णधवल फोटो कापून मी नोटबुकमध्ये लावायचो तो फक्त राहुल द्रविड.
 बहुतेक सर्व नोटबुक्समध्ये आतमध्येही
राहुल #जॅमीचे वर्तमानपत्रातील कापलेले फोटोज चिकटवलेले असत.

तो जेव्हा आला तेव्हा त्याचं खेळण्याचं तंत्र वेगळं वाटायचं. त्याची बॅट तिसऱ्या, चवथ्या स्लिपमधून यायची. बघतानाही ते वेगळंच वाटायचं. खेळताना बॅटने तो एक अर्धचक्रच काढायचा.

आणि त्याकाळी क्रिकेटमधील मी कॉपी मास्टर असल्याने, जे क्रिकेटर्स आवडायचे त्यांच्या बॅटींग आणि बॉलिंग ऍक्शनची कॉपी ग्राउंडवर करायचो.

जग्गु दादा श्रीनाथची ऍक्शन, अजित आगरकरची , दुदुदुडू धावत नाजूक बॉलिंग करणाऱ्या गांगुलीच्या बॉलिंग ऍक्शन कॉपीही करायचो.
पण बॅटिंगमध्ये (फक्त ऍक्शनची) कॉपी करायचो ती राहुल द्रविडचीच! त्याची ती तिसऱ्या स्लीपमधून येणारी अर्धवर्तुळ निर्माण करत येणारी बॅट , मी ही तसाच बॅट फिरवत बॅटींग करण्याचा प्रयत्न करायचो. मित्रांनाही हे माहिती असायचं मी हे मुद्दाम करतोय.

मॅचमध्ये नियमितपणे पहिला ओव्हर टाकणारा फास्ट बॉलर आणि ओपनिंग बॅट्समन असण्याचा रेकॉर्ड मनोज प्रभाकर आणि माझ्याच नावाने आहे. 😛😎
शेवटी कॅप्टनही मीच होतो.

राहुल द्रविडकडे एक बॅट्समन म्हणून फार कमी स्ट्रोक्स होते

पण त्याचा खास गुण म्हणजे त्याला त्याच्या मर्यादा माहिती होत्या. त्याच मर्यादेत तो खेळला.
टेस्टमध्ये आपला "ऑफ स्टंप" नक्की कुठे आहे हे त्याच्याइतकं कुणाला माहिती नसेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राहुल द्रविडचं पहिलं वहिलं टेस्ट शतक, पाकिस्तानविरुद्ध पहिली वनडे सेंच्युरी बघता आली. याचा आनंद आहे.

त्याच्यावर स्लो खेळण्यावरून टीका नेहमीच व्हायची. पण याच राहुल द्रविडने न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून फास्टेस्ट हाफ सेंच्युरी मारलीये.

द्रविडकडे आकर्षक स्ट्रोक्स नव्हते. पण त्याचा पूल शॉट खूप आकर्षक वाटायचा. सचिन तेंडुलकरच्या पूल हूक शॉट्समध्ये एक राजेशाही थाट असायचा.
सौरव गांगुली जेव्हा हुक पूल मारण्याचा अट्टाहास करायचा तेव्हा वाटायचं ,"राहू दे रे दादू ये तेरे बस की बात नही है!"
लक्ष्मण च्या पूलमध्ये अजहरुद्दीन झळकायचा.
 राहुल द्रविडचा पूल खास वाटायचा, आकर्षक आणि सुरक्षित वाटायचा.
आज विराट कोहली टेस्टमध्ये जेव्हा पुल मारतो तेव्हा ते  राहुल द्रविडचं अगदी सेकंड व्हर्जन वाटतं.

जुन्या खेळाडूंची महानता सांगताना सध्याच्या खेळाडूंची टीका केली जाते, हे सर्वसामान्य आहे, पण मला हे बिलकुलच पटत नाही. आधीपेक्षाही आज भारतीय टीम बॅलन्स्ड आहे. पण राहुल द्रविडची सगळ्यात जास्त आठवण येते ती सध्याचे "स्लिप फिल्डर्स" बघताना!
#शिखरधवनला स्लिप्समध्ये फिल्डिंग करताना बघणे, कॅच सोडल्यावर फिदीफिदी हसताना बघणे याहून  गलिच्छ दृष्य होऊ शकत नाही. पण सध्या तेच दिसतंय.

राहुल द्रविडचं स्लिप्समधील योगदान हाच एक स्वतंत्र विषय आहे. अनिल कुंभलेला त्याच्या फ्लिपर आणि टॉप स्पिन नंतर राहुल द्रविडनेच जास्त विकेट्स मिळवून दिल्या असतील.

राहुल द्रविडच्या शेवटच्या वनडे सामन्यात कॅप्टन धोनीने  शेवटच्या ओव्हर्समध्ये कप्तानी त्याला दिली होती. तो एक भावनिक क्षण होता.

 द्रविडच्या भल्या मोठ्या जोड्यांमध्ये सध्या माझा आवडता पूजारा पाय टाकण्याचा प्रयत्न करतोय. पण ते सोपं नाही.

" ये दिवार टुटती क्यू नही!" विरोधी टीमला असे म्हणायला लावणाऱ्या रडकुंडीला आणणाऱ्या राहुल द्रविडला हॅपीवाला बर्थडे!

-अभिजित दिलीप पानसे

Friday, 5 January 2018

बिष्ट प्लिज

वकील ते कास्टिंग डिरेक्टर - अभिजीत पानसे.
इन्ट्रो- वेब सीरिज च्या डिजिटल जगात आज निधी बिश्त हे महत्त्वाचं नाव बनलंय.

ते म्हणतात इंटरनेट इज फुल ऑफ इंटलीजन्ट पिपल स्टक इन डिफ्रंट जॉब!

थ्री इडीएट्स मध्येही बाबा रनछोडदासांनी आपली मूळ आवड ,आपले पॅशन आणि आपले करिअर यावर ज्ञानामृत दिले आहे.

पण प्रत्येकातच ही हिम्मत नसते.हातचं सरळ साधं करिअर, नोकरी सोडून आतल्या उर्मी ला बाहेर येऊ देऊन तिचा पाठलाग करत आपला रस्ता स्वतः तयार करणे हे चित्रपटात बघायला  छान वाटतं पण प्रत्यक्षात करताना मात्र पाय लटपटतात.

पण कधी नियती, तर कधी कितीही दमन केलं तरी उफाळून येणारी आतील उर्मी, कधी परिस्थिती ही त्या व्यक्तीला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात आणते. आणि ती व्यक्ती त्या क्षेत्रात मोलाची भर टाकते.

अशीच गोष्ट आहे निधी बिष्तची!

वेब सीरिज या क्षेत्रात आज निधी बिश्त हे महत्वाचे नाव आहे.

पर्मनंट रूममेट्स, पिचर्स , उम्रीका यावेब सीरिजची कास्टिंग डिटेक्टर आणि त्यात काम कारणारी असलेली ही निधी बिश्त!

कास्टिंग डिटेक्टर चे काम म्हणजे एकप्रकारे थॅंकलेस जॉब असतो.त्यांचं काम प्रेक्षकांच्या लक्षातही येत नाही !पण कास्टिंग डिरेक्टर ने योग्य कास्टिंग केलं असेल तरच ती मालिका, चित्रपट आणि त्यातील पत्रे हृदयाला भिडतात.खरे वाटतात. महाभारत आणि रामायण हे एकेकाळीविक्रमी लोकप्रिय झालेले दुरदर्शनवरील कार्यक्रम ,यातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे या महामालिकांमधील कास्टिंग!यातील प्रत्येक पात्र हे जणू ती भूमिका साकारणारा एक वाटतो असे सर्व म्हणतात.हेच काम असतं कास्टिंग डायरेक्टरचं. निधी बिश्तने पर्मनंट रूममेट्स मध्ये निधी सिंग, आणि प्रफुल व्यासचे प्रमुख रोलसाठी कास्टिंग केले आणि आज ते पात्र त्यांची ओळख बनलंय. ' पिचर्स 'या उत्तम कलाकृती असलेल्या वेब सीरिजमधील प्रत्येक पात्र जणू त्या त्या अभिनेत्या अभिनेत्रीसाठीच तयार केले आहे असे वाटते.हे सर्व श्रेय जातं कास्टिंग डायरेक्टर निधी बिश्तला!

कास्टिंग डायरेक्टरकडे एक अंतःप्रेरणा हवी असते. निधीला जणू हे ईश्वरी वरदान लाभलेय. ती म्हणते मी जेव्हा संहिता वाचून काढते तेव्हा त्याक्षणी मला आतून प्रेरणा, इंस्टीनक्ट्स मिळतात की ही भुमिका कोण योग्य रीतीने करू शकेल!

पण पूर्वी ही मुलगी दिल्लीला वकिली पेशात होती.एक सर्वसामान्य शुभ्र कॉलर नोकरी,आयुष्य जगत होती.दिल्लीला वकिलीचे शिक्षण घेऊन एक वर्ष दिल्ली हायकोर्टात नोकरी करताना आतील अभिनयाची उर्मी मात्र तिला शांत बसू देत नव्हती.

वकिली करताना तिने अभिनयाचा एक सप्ताहाच्या शेवटी दोन दिवस असणारा कोर्स केला.आणि तिचे हिंदी नाट्यरंगमंचावर आगमन झाले. नाट्य प्रयोग करताना तिला तिचे सुप्तगुण समजू लागलेत. नवनव्या कल्पना तिला सुचू लागल्यात, त्यावर ती काम करू लागली.

नाट्यभूमीवर काम करताना तिला तिच्यातील अभिनेत्री गवसली.

आवाजावर ,शब्दांवर, संवादावर  प्रचंड नियंत्रण असलेल्या या मुलीला , तिची अभियानाचे प्रचंड आवड,प्रेम पाहून या क्षेत्रात येण्याचे सुचवलेही.

एक दिवस तिने निर्णय घेतला आणि सामान भरून मुंबईकडे प्रस्थान केले.रेल्वेच्या आवाजापेक्षा मनात चाललेल्या वैचारिक वादळाचा,आंदोलनाचा गदारोळ जास्त होता.

मुंबईला आल्यावर मात्र तिला सगळीकडे नकार मिळू लागला.तिचा चेहरा गोल प्रकारात मोडत असल्याचे कारण सांगून तिला प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी अपात्र ठरवू लागलेत.पण ती तग धरून राहिली.पुढे तिची ओळख "टीव्हीएफ या वेब सिरीज कंपनी चे संस्थापक 'अरुणाभ कुमार"शी झाली आणि तिथून ती टीव्हीएफ या वेब सिरीज निर्मिती मधील ब्रँड असलेल्या निर्मिती  चॅनलची प्रमुख घटक झाली.निधी बिश्त ने सुपरहिट सीरिज पर्मनंट रूममेट्स ,ट्रिपलिंग मध्ये काम ही केलं आहे. "माँ के हात की सिगारेट" , " कॉलर नैना" हे  विडंबनात्मक व्हिडीओज आणि तिची एकता कपूर ची भूमिका नेटिझन्सला प्रचंड आवडली आहे. आता अनुष्का शर्मा च्या फिलोरी या चित्रपटातही तिची भूमिका आहे. 

वेब सीरिज सारख्या डिजिटल , चित्रपटसारख्या व्यवहारी माध्यमांत काम करतानाही तिचे रंगभूमीवरील प्रेम कायम आहे.स्वतःची नाट्य कंपनी असावी त्यात नवोदित कलाकारांना संधी मिळावी हे तिचं स्वप्नही तिने पूर्ण केलंय.तिचे नाट्य रंगमंचावर मनापासून प्रेम असल्याने तिची आज स्वतःची "न्यू ब्रेन थिएटर वोक्स" ही कम्पनी सुरु केली आहे.आजच्या पिढीची स्वतःचा रस्ता स्वतः बनवणारी ही मुलगी निधी बिश्त सर्व तरुणांसाठी प्रेरणा आहे.

Sunday, 24 December 2017

अटलबिहारी वाजपेयी कविता

अटलबिहारीवाजपेयींच्या  एका कवितेचा व्हिडीओ तयार करण्यात आला होता, त्यात शाहरुख खानवर चित्रीकरण झालं होतं.
माझी हिंदीतली खूप आवडती कविता ती! अटलबिहारी वाजपेयींमधील सुफीयाना टच त्यात दिसतो!
शाहरुख खान ही त्यात ओव्हर अॅक्टिंग न करता genuine वाटला होता.

क्या खोया क्या पाया तुमने
मिलते और बिछडते पग मे

मुझे किसीसे नही शिकायत
यद्यपी चला गया पग पग मे

एक द्रीष्टी बीती  पर डाले
यादो की पोटली खोले
अपने ही मन से कुछ बोले,

प्रिथ्वी लाखो वर्ष पुरानी
जीवन एक अनंत कहानी
......

जनम मरन का अभिवत फेरा
जीवन बंजारो का डेरा

आज यहा कल कहा कुछ नही
कोन जाने कहा सवेरा

अपने ही मन को टटोले....
.......

- श्री अटलबिहारी वाजपेयी

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

-अभिजित पानसे

Saturday, 23 December 2017

इट्स अ सनी डे

12 मे 2017
 अन्नात आणि आयुष्यात (काल आणि वय) सुसंगत गोड,तिखट ,तुरट आणि आंबट अश्या सहा चवी लागतात.अश्या आंबट चवीची रसद पुरवणाऱ्या सर्वांगाने अत्यन्त सुंदर अश्या स्ट्रॉंग स्त्रीचा हॅप्पी वाढदिवस. नितळ सौंदर्य असलेली ,स्वतःच्या हिंमतीवर एका चाकोरीबाहेरील क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण करणारी ,सामाजिक भान ,जाणीव असलेली , पूर्वग्रह दूषित असलेल्या मुलाखतकाराने उपहासात्मक अपमानकारक प्रश्न विचारूनही शांतपणे उत्तर देत कामावर लक्ष केंद्र करणारी" , बोल्ड दृश्याचे चित्रीकरण होत असताना त्यावेळी तिथे कोणी लहान मुलं नसतील याची काळजी घेणारी सनी लिओनी!"

"गडे आपला गावच बरा " म्हणत आता त्या त्यांच्या दुसऱ्या इंनिंगसाठी स्वदेशात आल्या आहेत.आणि भारतीय लोक हाडाचे सौन्दर्योपासक, #आम्लशौकीन !!त्यांनी या सन्नटे को चिरती हुई सनसनी लिओनी जो आपको सुन्न कर देती है मोठ्या मनाने स्वीकार केला! तिला मान दिला.

पण माझ्या सारख्या व्यक्तीला एक प्रश्न पडतो एका ग्लॅमरस पॉर्न ऍक्टर ला भारतीय समाजात मान सन्मान आदर मिळतो पण रेड लाईट भागातील एका वारंगणेला मात्र तुच्छ नजरेनेच बघितलं जातं. तिला स्वीकार्हता मिळत नाही.

हॅप्पी बड्डे सन्नुडी!!

Its a Sunny day!

- Abhijeet Panse