Showing posts with label हलकं फुलकं पॊलिटिकल. Show all posts
Showing posts with label हलकं फुलकं पॊलिटिकल. Show all posts

Tuesday, 31 July 2018

रोहतांग पास बोगदा , पाऊल पडते पुढे

#रोहतांगपासबोगदा

मागच्या वर्षी अमरनाथवेळी पहलगामला तंबूत डोळे मिटून विश्रांती घेत पडलो असताना शेजारी बरेचसे गोरखपूरचे लोक होते. ते तेथील माओवाद, नेपाळमध्ये भारतीयांचा काय रोल असतो यावरही बोलत होते. जीएसटीला, नोटबंदीला कोणी चांगलं म्हणत होतं तर कोणी चुकीचं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विषय त्यांच्यात निघाला.  एकंदर सगळ्यांच्या तोंडी एक वाक्य बरेचदा ऐकू येत  होतं “मोदी बहोत जोशीला बंदा है!”

चंदीगडचा एक माणूसही तंबूत होता. तो एकटा आला होता. तोही त्यात बोलण्यात सामील झाला. स्लिम, कमी उंचीचा , फ्रेंच कट एकंदर व्यक्तिमत्वावरून , बोलण्यावरून तो शहरी आणि आधुनिक वाटत होता. तो सांगत होता “सच में मोदी बहोत जोशीला बंदा है! अभि अगले साल दो साल मे चायना और पाकिस्तान की बहोत जलाने वाला है! मनाली से लेह जाने के लिये सुरंग बन रही है! मैं जादा अभि इस बारे मे नही बता सकता ..लेकीन दो तीन सालो मे साल भर रोड से लेह, आर्मी के ट्रक्स  सियाचीन ग्लेशियर के ओर जा पायेंगे! " त्याला लोकांनी विचारल्यावर म्हणाला की तो स्वतः त्या टीमचा भाग आहे.

त्याने तेव्हा सांगितलेल्या एका बोगद्याबद्दल काल न्यूज चॅनलवर बघितलं. रोहतांग पास बोगदा.
मनाली ते लाहोल स्पिती वॅलीत जायलाच रोड ने सहा तास लागतात. शिवाय रोहतांग पास वर्षातुन तीन ते चार महिनेच उघडा असतो. वर्षभर बर्फामुळे , वादळामुळे तो बंद असतो. त्यामुळे लेहला नोव्हेंबर ते जुलै पर्यंत फक्त विमान मार्गानेच जाता येतं. एकप्रकारे आठ ते नऊ महिने एक महत्वाचा भाग देशापासून तुटला असतो. तेथील स्थानिक लोक,  मेंढीपाळ लोकांनाही कुठेही जाता येत नाहीत. आठ , नऊ महिन्याची खाद्यसामुग्री जमा करून ठेवावी लागते. त्यांना खूप अडचणी येतात.

पण आता जवळपास पूर्ण तयार झालेला हा नवा बोगदा देशाची , वाहतुकीची समीकरणे बदलवणार आहे. बातम्यात दाखवल्याप्रमाणे हा बोगदा विशेष आहे . आजवरचा वेगळा आहे. कारण या बोगद्यात दोन मजले आहेत. साडे आठ किमीच्या पीर पंजाल हिमालयाच्या उत्तर पूर्व भागातील,  मनाली आणि स्पिती वॅलीला जोडणाऱ्या या बोगद्यामुळे जिथे सहा तास लागतात तिथे आता फक्त एक तास लागणार आहे. शिवाय अपघात होण्याची शक्यता पूर्णपणे कमी. त्याशिवाय वर्षभर रोडप्रवास सुरु असेल.

वरच्या मजल्यातून लोकांना पायी जाता येईल. यात मेंढीपाळ लोक शेळ्या मेंढ्यांसकट तेथून जाऊ शकतील. तर खालून वाहने जाऊ शकतील. हिमाचल प्रदेशला आणि स्पिती वॅलीला , लडाखला जोडणारा हा विलक्षण बोगदा नागरी संस्कृतीसाठी खूप लाभकारक होणार आहे.

पण याखेरीज आणखी सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सियाचीनकडे जाणारा हा मार्ग कायम खुला राहील. अक्साई चीनकडे जाणारा हा मार्ग, या बोगद्यामुळे वाहतूक खूप सुलभ झाल्याने चीनचा चडफड होणार. कारण युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसामुग्री , खाद्यसामुग्री पोहचणेच सगळ्यात महत्वाचे असते. चीनने तिबेट, पाकिस्तानमध्ये सीमारेषेजवळपास सैन्याला सहज वाहतूक करता यावी म्हणूनच रस्त्यांवर निवेश केला आहे.

1999च्या कारगिल युद्धात लेहला जोडणारा एकमेव हायवेवर पाकिस्तानने नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले होते. पण भारतीय सैनिकांनी शौर्याने हायवे राखला होता. त्यामुळे लेहचा संपर्क आणि तो भाग देशात राहिला. असे महत्व आहे या दोन हायवेंचे.

थोडक्यात सोपी शब्दात सांगायचे तर भारतातून लडाख, सियाचीनला दोन मार्गाने जाता येतं. हिमाचल प्रदेश-मनालीतून ‘रोहतांग’ पास ओलांडून आणि काश्मीर सोनमर्गने- ‘झोझिला’ पासमार्गे. पण या दोन्ही दैत्य पासमार्गे त्यांच्या परवानगीने जाणं सोपी नसतं. कारण तेथे कायम अपघाताची , ट्राफिक जॅमची, वादळाची हिमवर्षावाची भीती असते. पण येत्या वर्षापासून मनालीमार्गे लेहला जाताना रोहतांग पासमार्गे न जाता या बोगद्यातून सहज जाता येईल. सहा तास वाचतील.

शिवाय या रोहतांग बोगद्याशिवाय आता “झोझिला पासला” बायपास करणारा बोगदाही तयार होतो आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने लेह आता वर्षभर जोडलं जाणार आहे. यामुळे नागरी आणि सरंक्षणसंबंधित अनेक समीकरणे बदलतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महेंद्रसिंग धोनीसारखा ‘#फिनिशर’ चा रोल निभावताय. ओपनरने सुरू केलेलं काम धोनी फिनिश करतो तसे आधीच्या सरकारने सुरू केलेले काम नरेंद्र मोदी तडीस नेताय. 2010 मध्ये या बोगद्याचं काम सुरू झालं होतं. यापूर्वी मागच्या वर्षी “नाशरी बोगद्याचं” मोदींनी उद्घाटन केलं. त्याचाही शिलान्यास युपीए गव्हर्नमेंटने केला होता.

या नाशरी बोगद्यातून मी गेलो आहे. काश्मीर खोऱ्याला जोडणारा हा भारतातील सगळ्यात लांब हा बोगदा आहे. आतून दर पाचशे मीटरवर टेलिफोन व्यवस्था, फर्स्ट एड व्यवस्था, शिवाय संपूर्ण बोगद्यात स्वच्छ शुद्ध हवा आत येत राहील याची व्यवस्था केली आहे. मागच्या वर्षी हा बोगदा सुरू होण्यापूर्वी , काश्मीर खोऱ्याला जोडणारा जुना #जवाहरबोगदा होता. हा बोगदा खूप अरुंद, आत प्रकाश व्यवस्था नसलेला, शिवाय आत हवा येण्याची व्यवस्था नसलेला आहे. या बोगद्यातून जाताना काही वयस्कर, वृद्ध प्रवाश्यांना श्वासाचा त्रास , छातीवर दडपण , घाबरल्याची अवस्था झाली होती. कारण बोगदा खूप लांब आहे.
त्यामुळे नवे बोगदे तयार होणे खूप आवश्यक आहे.

त्या माणसाने सांगितल्यानुसार , मोदी यांनी स्वतःच्या सरकारात काही स्वतः लडाखला जोडणाऱ्या, चीनच्या अगदी जवळून जाणाऱ्या तीन मोठ्या बोगद्याची हायवे , प्रकल्पाची सुरवात केली आहे. ज्यामुळे चीनची चरफड होणार आहे.. अनेक अभियंते, शेकडो कामगार दिवसरात्र रस्ते आणि बोगदे बनवण्यासाठी राबताहेत. प्रवासात हे स्पष्टपणे दिसून येतं.

“मोदी बहोत जोशीला बंदा है पाकिस्तान और चायना के पाससे वो और बडे रस्ते बना रहा है! हे त्या माणसाचं वाक्य होतं. हे जर खरं असेल तर नक्कीच येत्या काही वर्षांत खूप समीकरणे बदतील.

आणि हे किती सकारात्मक आहे की आज मोदी सरकार वाहतूकीसंबंधित, संरक्षणसंबंधित नवे देशहितकारक प्रकल्प सुरू करताय, काही वर्षांनी दुसरे कोणते सरकार ते पूर्ण करतील. देश असाच पूढे जात राहील.

“सरकारे आते रहेगी जाती रहेगी , लेकीन देश रहना चाहीये….! “

Abhijeet Panse

Thursday, 22 March 2018

भाजपा आणि शाहरुख

भाजपा सध्या नव्वदीतल्या शाहरूख खानसारखी झालीये, हिरॉईनचं लग्न हिरोसोबत लागणारच असायचं तर हा खान फ्रॉम द एपिक गोटीज , नेमका पोहचायचा आणि हिरोईनला गटवायचा.
कुछ कुछ होता है मध्ये काजोल आणि सलमान खानचं लग्न लागतच असतं तर हा तिथे येतो आणि काजोल सलमानला "#केन्फ्युजन केन्फ्युजन" मध्ये टाकून टाकून “नाम तो सुना ही होगा” कडे पळते.

दिल तो पागल है मध्ये माधुरी चांगला समजूतदार जुना मित्र अक्की कुमारसोबत नांदा सौख्य भरे करणारच असते तर तिथेही शेवटच्या क्षणी व्यासपीठावरच शाहरुखकडे पळते.

बाजीगरमध्ये पहिल्यांदा, प्लास्टिक सर्जरीपूर्वीच्या तत्कालीन चपट्या नाकाच्या शिल्पा शेट्टीला तिच्या मित्रापासून पळवतो नंतर जॉईंट आयब्रोजवाल्या काजोलला तिच्या फौजदार मित्रापासून. बिचारा फ्रेंडझोन्ड फौजदार  मग दुःखात “ छुपाना भी नही आता जताना भी नही आता..” गात अखख्या फ्रेंडझोन्ड दुःखी पोरांसाठी गाणं देऊन गेला.

आता मेघालयाततरी काँग्रेस सत्ता स्थापन करणार असं सगळ्यांना वाटत असतानाच बीजेपी…. असो.

#गोवामेघालय

-Abhijeet Panse

Thursday, 28 December 2017

प्र.से. मोदी जा.रा. पवार भेट जणू हरिहर भेटच जणू! 😜😜😛




नरेंद्र शरद भेट जणू हरीहर भेट

13 नोव्हेंबर 2016

आज कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे "हरीहर भेटीचा" दिवस. आज शंकर आणि विष्णू  त्यांच्या रोजच्या डेली हेक्टिक शेड्युल, ऊप्स सध्या स्केड्युल म्हणण्याचं "फ्याशन" आहे; तर आपल्या ;प्रार्थनेच्या फायली रिसिव्ह करणं,त्या चेक करून काहींवर सह्या करून त्या स्यांक्शन करणं,काही स्टँड बाय ठेवणं,तर बऱ्याच रिजेक्ट करणं इ. 24/7 बिझी हेक्टिक स्केड्युल  मधून आज वेळ काढून शंकर आणि विष्णू एकमेकास गळाभेट करतात!
 त्यांच्या मैत्रीला आज इतकं  इतकं उधाण येतं की आजच्या दिवशी शंकराला तुळस आणि विष्णूला "बेलपत्र" वाहिल्या जातं.
एकमेकास हॅंडशेक करू अवघे धरू सुपंथ !

आज नरेंद्र भाई मोदी द लॉयन आणि पवार साहेब ,द पावर हाऊस आज आपल्या याच मुहूर्तावर भेटलेत!😉😛
 "मी शरदरावांकडून राजकारण शिकलो इति नरेंद्र भाई मोदी,प.पु.प्र.
"मोदींनी पाचशे आणि हजार च्या नोटा रद्द करून योग्य केलं.मोदी देशाकरिता चोवीस तास काम करतात!इति मोठे सायेब जाणता अजाणता राज्जा!!!

हे म्हणजे फेसबुकीय संप्रदायाप्रमाणे झालं,"एकमेकांस लाईक करू अवघे धरू सुपंथ"

"बराबर छे ना शरद भाय!आव एक सेल्फी आपडु छे!!"

"अगदी बरोबर नरेंद्र भौ!! बरं आपलं ते राष्ट्रपती पदाचं बघा की आता !"

(Tek it on the light "Pink NOTE"😛)

-अभिजित पानसे

Monday, 25 December 2017

पॉलिटिकल होळी

होळी  017,

 गोवा बीजेपी :- "जय जय मोदी पर्रीकर
काँग्रेस ना लागे पार्सेकर
जो #प्याला तेरे नाम का पिया! 'गिर' जा उंगी मै मर जाउंगी
जो 'तुने' मुझे थाम ना लिया .."
पर्रीकर- "एक दे दो दो के तीन मुझको अब करने है
ऐसा हि होता है जब #त्रिशंकू होता है!...'

अखिल बबुआ आणि राहुलबाबू युपी जनता से- "अंग से अंग लगाना सजन हमे ऐसे रंग लगाना....

युपी की जनता ; 'राहुल गांधी को :- "होली रे होली मस्तो की टोली तेरे घर आई..
कुछ ना छुपा ओ (युव)राजा सामने आ!
जान ना पहचान मै तेरा मेहमान
काहे मारी पिचकारी तुने बेईमान...

मोदी टू पर्रीकर :- " डु मी या फेवर लेट्स प्ले होली
गोवा मे है सीएम कि पोस्ट खाली..

द युगपुरुस केज्रीवाल:- " ये होली के रंग मे दिल के लहू का रंग किसने मिला दिया
आयी बहार कलिया खिली तो गुलशन जला दिया
दिल मे होली जल रही है
दिल मे होली जल रही है...

भाजप समर्थक :-होरी खेले युपीविरा #अवध मे होरी खेले मोदीविरा...

पीएम मोदी टु ऑल पार्टीज अँड देस की जनता :- " मित्रो, होली के दिन दिल मिल जाते है रंगो रंग मिल जाते है..
गिले शिकवे भूल के दोस्तो दुष्मन भी गले मिल जाते छे...
होली के...रंगो मे रंग मिल जाते छे!!!

होळीच्या सर्वाना पॉली टिकल्या शुभेच्छ !

-Abhijeet Panse

Sunday, 17 December 2017

गुजरात T E S T M A T C H

गुजरात  निवडणूकचे निकाल बघता ही काही वर्षातील (रिजल्ट्स वरून) सगळ्यात सकारात्मक निवडणूक  क्रिकेट मॅच वाटतेय.
दोन्ही टीम्सला यातुन सकारात्मक शिकायला मिळालं आहे.

"होम पिच" वर टॉस जिंकून पहिली बॅटींग बीजेपीने घेतली. संपूर्ण शक्तीने सर्व "कॅबिनेट टीम" खेळवली.

एका आदर्श , टिपिकल टेस्ट मॅच प्रमाणे 'सकाळी' '#अँटीइंकंबन्सी'च्या धुक्यात, थंडीत , नव्या कोऱ्या चेंडूने अलपेश , जिग्नेश, आदर्शने आणि राहुल गांधींच्या जबरी 'स्पिन' (जनेऊ धारी, शिव भक्तीचं #वळण) बॉलिंगच्या नेतृत्वात जबरदस्त, बॉलिंग करीत होम पिच वाल्यांची पूर्णपणे तारांबळ उडवली!
आऊट साईड ऑफ स्टंप्स बॉलिंग केली , बौन्सर टाकलेत विकेट्स घेतल्यात.
होमपीच असलेल्या भाजपासाठी सकाळ , पहिलं सत्र खूप वाईट ठरलं!
सकाळी काँग्रेस एकवेळ 90+  तर बीजेपी 84 + वर अडकलेली होती.

पण सकाळचं सत्र आटोपलं, धुकं हटलं, सूर्य डोक्यावर आला आणि टिपिकल '#राजकोट'ची पिच टिपिकल "पाटा बॅटींग पिच " झाली.
तिथून बीजेपीने जबरदस्त बॅटींग करत  'आघाडी' घेत 'मॅच'  जिंकली.
आणि काँग्रेसने हाती आलेली संधी गमावली. 'इतिहास' रचता रचता "इति ऱ्हास"  झाला.

पण यामुळे  भाजपाला जबरदस्त झटका बसला आहे हे नक्की.
सत्तेचा माज आणि लोकांना गृहीत धरु नये हे कळलं.
"होम पिच"वरही अवस्था बिकट होऊ शकते हे त्यांना समजलं.

काँगेसने या मॅच मधून खूप काही कमावलं आहे हे 100 टक्के!
राहुल गांधीला आता कोणी पप्पू म्हणताना दहावेळा विचार करतील.
पण त्यांच्या मंदिरवाऱ्या बघता पप्पूचा 'पोप' झालेत , म्हणता येइल.

रागामध्ये या कठीण दौऱ्यामुळे , मॅचमुळे परिपक्वता आली. 'कॅप्टन्सी' ची सुरवात कागदावर हार पासून झाली असली तरी यातून भरपूर शिकायला मिळालं आहे.

बाकी अजून तरी '#अंपायर्स'वर ..ईव्हीएम मशिनवर बोट उगारलं नाहीये.

मेन ऑफ द मॅच :-  मॅच हारल्यावरही राहुल गांधी मॅन ऑफ द मॅच आहेच आणि नक्कीच मोदीसुद्धा मॅन ऑफ द मॅच आहेतच.
कारण प्रत्येकवेळी त्यांनाच परीक्षा द्यावी लागते.

निष्कर्ष:- "विकास 'गांडा' पूर्णपणे झाला नव्हता, मात्र विकासला #गांडेपणाचा अटॅक आला होता हे मात्र नक्की!

-अभिजित