Showing posts with label "आयरनी च्या देवा तुला पोस्टी पोस्टी वाहू दे" (विरोधाभास). Show all posts
Showing posts with label "आयरनी च्या देवा तुला पोस्टी पोस्टी वाहू दे" (विरोधाभास). Show all posts

Saturday, 7 April 2018

"कोणता झेंडा घेऊ हाती!", आयपीएल.

कोणता झेंडा घेऊ हाती

आयपीएलच्या वारीत मिळे ना ही वाट
साचले मोहाचे धुके घनदाट
आपलेच खेळाडू ..आपलीच माती तरी फ्रेंचाईजची खेळाडूंना भीती
बीसीसीया कोणता झेंडा घेऊ हाती!

आजवर ज्यांची वाहिली पालखी
भलताच त्यांचा देव होता
कुठे ऑप्पो कुठे विवा कुठे नोकिया स्टार छाती
वैरी कोणआहे इथे कोण साथी
बीसीसीया कोणता झेंडा घेऊ हाथी

आज स्पॉट फिक्सिंग उद्या मॅच फिक्सिंग
क्रिकेटचे इथे धिंडवडे निघती
खेळ रितंरितं बघूनी उमगलं, कुंपण इथं शेत खाती
दरवेळी भक्ताच्या कपाळी वेगळीच माती, झेंडे येगळे,
येगळ्या फ्रेंचाईजी
पैश्याचीच भक्ती टीआरपीचीच प्रीती #बीसी सीया कोणता झेंडा घेऊ हाती….

-अभिजित पानसे

Thursday, 22 March 2018

एकमेकां सहाय्य करू

सध्या वेगळेच वारे वाहताय. एकाच पेशातील मोठे लोक एकमेकांचं कौतुक करत एकमेकांसोबत काम करताहेत. तैमुर जननी करीना क. एका साबणाच्या जाहिरातीत दिपूडीचं कौतुक करतेय.
दिपूडी आलियाचं कौतुक करतेय. तिघी सोबत मिळून साबणा विकताहेत..

दुसऱ्या एका पुरुष सौंदर्यपोषक लेपाच्या जाहिरातीत जॉन अब्राहम आणि बिबळ्या श्रॉफ एकाच जाहिरातीत काम करताय.

तिकडे  उ. प्र. मु. मं. योगी नॉर्थ ईस्टच्या निवडुकांसाठी प्रचाराला  गेले होते.

हवापाणी बदल रहा है!

सोशिअल मीडियावरील लिखाण चोरी

लहानपणी मुलं पळवुन नेणारी टोळीवरून नेहमी भीती वाटायची. बऱ्याच जुन्या चित्रपटांमध्ये लहानपणी मुलांना कोणीतरी पळवून, चोरून नेत, मग संपूर्ण चित्रपटात हरवले ते गवसले का सुरू व्हायचं.

अगदी अपत्य समोर आलं तरी त्याची ओळख करणे कठीण व्हायचं..मग कुठेतरी कुंभमेळ्यात हातावर, पायावर काहीतरी गोंदवलेली खूण दिसायची..आणि हरवलेलं अपत्य गवसायचं..

सगळ्यात वाईट दुःख म्हणजे आपलं अपत्य समोर दिसतंय, पण कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये..याहून वाईट म्हणजे आपल्या अपत्याला कोणी गुंड, एखाद्या ‘बस्ती’ का दादा पळवून आणलेल्या अपत्याला आपलंच अपत्य सांगून सरळ त्याच्यावर स्वतःचाच हक्क दाखवायचा.

किती वाईट वाटत असेल चित्रपटातील बिचाऱ्या त्या पालकांना!

च्या मारी असंच फिलिंग येतं जेव्हा कोणी तुमचं #पोस्टापत्य कॉपी पेस्टरूपी चौर्यकर्म करून त्यावर खऱ्याखुर्र्या पोस्टकर्त्याचं..पालकाचं नाव कट करून सगळीकडे पाठवतात.

कुठेतरी हॅशटॅगचं गोंदण सापडतं. आणि हरवलेल्या पोस्टापत्याचा पत्ता लागतो.

किँवा बहुतेकवेळा काही सदवृत्तीचे लोक चोरीचा माल लक्षात आणून देतात.

पण कुठल्या तरी ‘पेज’ ‘ग्रुप’ च्या बस्ती, झोपडपट्टीचा दादाने ते पळवलं असतं. तो त्यावर आपला हक्क सांगत असतो. स्वतःचं नाव दिलेलं असतं.

कुठे वॉट्सपअप रुपी खिडक्यांमधून त्याला राउंड अँड राउंड अँड राउंड  फिरवलं जातं.

काहीजण, अचानक अनपेक्षितपणे बाळ सापडलं   म्हणून बाहुबलीला पाळणाऱ्या पालकांप्रमाणे आपलं नाव देतात. कोणी प्रामाणिकपणे हे आमचं बाळ नव्हे आम्हाला ते नदीकाठी, जंगलात, दारात मिळालं असं प्रामाणिकपणे “ Copied & pasted” “Forwarded as received” सांगतात.

कॉपीराईट © चं कितीही राक्षणात्मक कवच दिलं तरीही पोस्टमार ती चोरतातच.

शेवटी या पोस्टापत्यचोर टोळीपासून सावधान राहण्यासाठी एक अत्यन्त संरक्षणात्मक असं ब्लॉगघर देणंच श्रेयस्कर राहील असं वाटतं.

हे आकाशातील जिझसा यांना माफ करू नकोस कारण त्याना माहिती आहे ते काय करताय..

पालकाचे नाव काढून ते पोस्टापत्य व्हायरल करणाऱ्याला व्हायरल फिवर होऊ दे रे जिझस महाराजा!

फेसबुकवर फेसबुकच्याच , लाईक्स, पोस्ट्स,  कमेंट्स, सेलेब्स, कंटेटच्या रडक्या गोष्टी करून कधीही इश्यू न करणारा

Abhijeet Panse

हे म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडा खाये काफिर!

सोशील मीडिया लिखाण चोरी

लहानपणी मुलं पळवुन नेणारी टोळीवरून नेहमी भीती वाटायची. बऱ्याच जुन्या चित्रपटांमध्ये लहानपणी मुलांना कोणीतरी पळवून, चोरून नेत, मग संपूर्ण चित्रपटात हरवले ते गवसले का सुरू व्हायचं.

अगदी अपत्य समोर आलं तरी त्याची ओळख करणे कठीण व्हायचं..मग कुठेतरी कुंभमेळ्यात हातावर, पायावर काहीतरी गोंदवलेली खूण दिसायची..आणि हरवलेलं अपत्य गवसायचं..

सगळ्यात वाईट दुःख म्हणजे आपलं अपत्य समोर दिसतंय, पण कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये..याहून वाईट म्हणजे आपल्या अपत्याला कोणी गुंड, एखाद्या ‘बस्ती’ का दादा पळवून आणलेल्या अपत्याला आपलंच अपत्य सांगून सरळ त्याच्यावर स्वतःचाच हक्क दाखवायचा.

किती वाईट वाटत असेल चित्रपटातील बिचाऱ्या त्या पालकांना!

च्या मारी असंच फिलिंग येतं जेव्हा कोणी तुमचं #पोस्टापत्य कॉपी पेस्टरूपी चौर्यकर्म करून त्यावर खऱ्याखुर्र्या पोस्टकर्त्याचं..पालकाचं नाव कट करून सगळीकडे पाठवतात.

कुठेतरी हॅशटॅगचं गोंदण सापडतं. आणि हरवलेल्या पोस्टापत्याचा पत्ता लागतो.

किँवा बहुतेकवेळा काही सदवृत्तीचे लोक चोरीचा माल लक्षात आणून देतात.

पण कुठल्या तरी ‘पेज’ ‘ग्रुप’ च्या बस्ती, झोपडपट्टीचा दादाने ते पळवलं असतं. तो त्यावर आपला हक्क सांगत असतो. स्वतःचं नाव दिलेलं असतं.

कुठे वॉट्सपअप रुपी खिडक्यांमधून त्याला राउंड अँड राउंड अँड राउंड  फिरवलं जातं.

काहीजण, अचानक अनपेक्षितपणे बाळ सापडलं   म्हणून बाहुबलीला पाळणाऱ्या पालकांप्रमाणे आपलं नाव देतात. कोणी प्रामाणिकपणे हे आमचं बाळ नव्हे आम्हाला ते नदीकाठी, जंगलात, दारात मिळालं असं प्रामाणिकपणे “ Copied & pasted” “Forwarded as received” सांगतात.

कॉपीराईट © चं कितीही राक्षणात्मक कवच दिलं तरीही पोस्टमार ती चोरतातच.

शेवटी या पोस्टापत्यचोर टोळीपासून सावधान राहण्यासाठी एक अत्यन्त संरक्षणात्मक असं ब्लॉगघर देणंच श्रेयस्कर राहील असं वाटतं.

हे आकाशातील जिझसा यांना माफ करू नकोस कारण त्याना माहिती आहे ते काय करताय..

पालकाचे नाव काढून ते पोस्टापत्य व्हायरल करणाऱ्याला व्हायरल फिवर होऊ दे रे जिझस महाराजा!

फेसबुकवर फेसबुकच्याच , लाईक्स, पोस्ट्स,  कमेंट्स, सेलेब्स, कंटेटच्या रडक्या गोष्टी करून कधीही इश्यू न करणारा

Abhijeet Panse

हे म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडा खाये काफिर!

Tuesday, 2 January 2018

आमच्या येथील माती दुर्गा मातेला चालते पण समाजाला नाही..!


"हमारे यहा की मिट्टी माँ दुर्गा को चलती है लेकिन समाज को नही.."

जसा जसा सूर्य पश्चिमेच्या क्षितीजाकडे कलु लागतो..सावळी सांज आकाशात  दिवा लावत जाते..हळुहळु आकाशातील तारेही विश्वाचं आळसावलेलं रूप पाहुन सुखावतात..सामान्यत: आपल्या पांढरपेशा समाजाचे दैनंदिन व्यवहार रात्रीच्या दहाच्या ठोक्याला निवृत्त होतात. परंतु शहरातील काही वस्तींमध्ये जशी जशी रात्र अधिकाधीक गहिरी होत जाते तसा तेथील व्यवहारांचा "लाल" रंग अधिक गडद होत जातो..

स्त्रीला दुर्गेचे आदिशक्तिचे रूप आपल्या समाजात मानले जाते. लक्ष्मी पार्वती..सौम्या रौद्रा..निरनिराळे रूपं देवी महात्म्यात सांगितलेय. समाजात जगताना स्त्रीचे अनेक रूप बघायला मिळतात.

पण फक्त उदरभरणासाठी जेव्हा स्त्रीला याच देवीच्या रूपाला रात्री रस्त्याच्या कडेला "उभं" राहावं लागतं. तेव्हा अंतर्मुख करणाऱ्या या दुर्गेच्या रूपाला "वारांगना" म्हणतात..आणी रात्रीच्या वाढत्या काळ्या रंगाबरोबर ज्या वस्तीचा "लाल" रंग चेहऱ्यावर लावलेल्या लालीसकट गडद होत जातो त्या भागाला म्हणतात रेड लाइट एरिआ!

जेव्हा व्यवसायाचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे भांडवल! परंतु जेव्हा उदर भरणासाठी कुठलंही भांडवलच मिळत नाही तेव्हा या वारांगनांना "स्व देहाचे" भांडवल करून त्यालाच व्यवसायाचे साधन करावे लागते.
जिथे व्हाइट कॉलर समाजासाठी रात्र ही निवृत्तीची वेळ असते तिथे या स्त्रियांसाठी  त्यांच्या  अर्थाजनाच्या दिवसाची सुरवात असते.
वाढत्या रात्रीच्या काळोखासोबत वर्षांनुवर्षे यांच्या जीवनातील काळोखही कायम आहे. त्याला शेवट नाही.

कोणी नाट्यकार "वसंतसेना" नामक पात्र रचुन वारांगनेला एक "उत्सव"मुर्ती ग्लॅमरस लूक देतो. परंतु प्रत्यक्शात मात्र या कमर्शिअल सेक्स वर्कर्सच्या आयुष्यात दु:ख वैषम्य गरिबी पिळवणुक रोगराई याशिवाय काहीच नसतं.

दोन वर्षापुर्वी आम्ही ४५ मित्र मैत्रिणी पुण्याला ट्रिपला गेलेलो असताना , उशीरा परताना बुधवार पेठेतील लक्ष्मी रोडवरील "लाल" माहोल पाहुन मी पुर्ण अंतर्मुख झालो. इतर मित्रांसाठी तो टेहाळणीचा उत्सुकतेचा विषय होता. पण माझं डोकं विचारांनी आक्रंदुन गेलं होतं. 'बारा' वर्षांपासुन 'साठ' वर्षांपर्यंत प्रत्येक वयोगटातील 'स्त्री' स्वदेहाचा लिलाव करत होती. उजेडात एरवी उथळ माथ्याने वावरणारे सुटाबुटातील तथाकथित शुभ्र कॉलर माणसे तिथे 'भाव' करत होते. वरवरून भडक वर्तवणुक करणाऱ्या या वारांगनांच्या डोळ्याच्या आड मात्र प्रचंड दु:ख जाणवलं. ज्या  समाजात स्त्रीला दुर्गेचे रूप समजले जाते त्या समाजात हाता तोंडाची गाठ पडण्यासाठी स्त्रीला देह विक्रय करावा लागतो हे आपल्या समाजाचे दुर्दैव्य.

मी समोरच्या दगडुसेठ गणपतीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात कुठलेच भाव नव्हते. तो निर्विकार दृष्टीने समोर पाहात होता.
देव इतका अलिप्त कसा काय राहु शकतो? की फक्त देवच इतका अलिप्त..'अलुफ' राहु शकतो! कर्म आणि प्रारब्ध यात त्याची स्वत:ची काहीच भुमिका नसते का? असे शेकडो अनेक विचारांनी डोक्यात वादळ उठलं होतं. त्या वेळी प्रथमच त्या प्रसिद्ध गणपतीचं दर्शन घेत होतो पण कुठलाच आनंद होत नव्हता.

रात्रभर मी झोपू शकलो नाही. डोळ्यांसमोर रस्त्यावरच ते चित्र येत होतं. मनात शेकडो विचार येत होते. दुःख वाईट वाटत होतं. पाहिल्यादाच सुरक्षित घराच्या वातावरणातून बाहेर येऊन जगाची हि काळी लाल बाजू पहिली होती. मन वेदनांनी भरून गेलं होतं.

वर्षानवर्षे ह्या वारांगना गरिबीच्या घाणीच्या साम्राज्यात शरीराला झीजवत खितपत पडलेल्या असतात. जो पर्यंत शरीर तरूण आहे तो पर्यंत हाता तोंडाची गाठ पडते. समस्या व दु:ख अपमान यांच्या पाजविलाच पुजले असतात. पोलीसांचे हप्ते त्यांच्याकडुन होणारी पिळवणुक खोलीचे भाडे मधल्या दलालांची वसुली लैंगिक रोग यांच्या समस्यांना अंत नसतो.

भौगोलीक अंतरानुसार या समाजाची वस्ती आपल्या पांढरपेशा वस्तीपासुन फार दुर नसते. परंतु मुळ प्रवाहापासुन मात्र हा समाज पुर्णपणे कोसो मैल दुर आहे.
प्रत्येक मानव प्राण्याची मुलभूत  मानसिक गरजा म्हणजे प्रेम आदर काळजी..यापैकी कोणतीही गरज या स्त्रीयांची कधीच पुर्ण होत नाही.

स्त्रीचे मातृत्व हे तर विधात्याचेही आहे. प्रत्येक स्स्त्री ही मुळात अनंत काळची माता असतेच. छोटी मुलगीसुद्धा तिच्या बाहुलीला प्रेमाने थापटते..खाउ घालते. पण स्त्रीचे हे बेसिक इंस्टिक 'मातृत्व' सुद्धा या कमनशिबी वारांगनांना 'परवडत' नाही. कारण गर्भवासातील त्या महिन्यांमुळे व्यवसायावर परिणाम होतो. आणि जगायचे तर असते....
ह्या वारांगना "वोट बँक" नसल्याने कुठलिही राजकीय कृपा यांना मिळत नाही.

"मुलगी झाली हो..!" म्हणताना अजुनही काही पुरातन मनोवृत्तीचा उत्साह ओसरतो. जेथे आपल्या पांढरपेशांच्या समाजात "मुलाच्या" हव्यासापोटी स्त्रीभुणहत्या केली जाते. तेथे वारांगनांच्या वस्तीमध्ये मात्र "कन्या रत्नाचं" देवी रूपाचं सहर्ष मनापासुन स्वागत केलं जातं. तिथे एक "मुलगी" आपल्या "अम्माचा" आपल्या घराचा भार समर्थपणे वाहते.कारण तीच त्यांची "कुलदिपीका" असते. कदाचीत म्हणुनच या वारांगना आत्मिक पातळीवर देवीच्या अधीक जवळ वाटतात.

हाय सोसायटीतील पार्ट्यांमध्ये 'रूचीपालट' म्हणुन  wife/husbnd swapping प्रकार घडतात तेेव्हा मुळात खऱ्या वेश्या कोण हा प्रश्न पडतो.
  नृृत्यांगना प्रोतिमा बेदी जी गोव्याला कलंगुट बीचवर नग्नावस्थेेत मॉर्निंग वॉक घ्यायची(reff श्री प्रमोद नवलकराचं मासीक) ती आपल्या इंटरव्युहमध्ये म्हणली होती "जेव्हा माझी कार कामाठीपुऱ्याजवळील फोरास रोडवरून जाते तेव्हा माझ्यात एक वेश्या संचारते...त्या वेश्यावस्तीतील पान दुकानावरील पान खाण्याची व लोकांनी माझ्याकडे 'त्या' नजरेने पाहावे असे खुप वाटते!"

एक कादंबरी वाचण्यात आली होती; त्यात एका गोष्टीत समोरासमोरील घरांमध्ये एका घरात एक लग्न झालेली स्त्री आपल्या नवऱ्यासोबत राहात असते. तर समोरील घरात एक वारांगना. कालांतराने दोघेही मृत्युमुखी पडतात. पहिल्या घरंदाज स्त्रीला नरकप्राप्ती होते तर वारांगनेला स्वर्ग प्राप्ती. तेव्हा चित्रगुप्त सांगतो; पहिली लग्न झालेली स्त्री रोज रात्री समोरच्या वारांगनेला पाहुन "मत्सर" करायची तर वारांगना त्या पतिव्रतेला पाहुन रोज मनोमन नमस्कार करीत.

यावरून एक पटतं वेश्यावृत्ती ही एक मनोवृत्ती 'प्रवृत्ती' असते. मग ती स्त्रीची असो वा पुरूषाची. वेश्या बनायला "रेड लाइट" एरिआतच राहवे लागते असे नाही.

एकीकडे वारांगना उदर भरणासाठी;घऱ चालवण्यासाठी लज्जेचा त्याग करून "देहदान" करते.तर दुसरीकडे फक्त एन्जॉयमेंट म्हणुन वा उच्चभ्रु आयुष्य जगता यावे म्हणुन एक कॉलेज गर्ल कॉलगर्ल होते. वा जस्ट एन्जॉयमेंट म्हणुन स्वैराचार करतेे.

अल्ट्रा मॉडर्न समजणारे तरूण तरूणींचे फ्रेंड्स गृप "गृप सेक्स" पार्टीज फ्लँटमध्ये आयोजीत करतात.मग अशा समाजातील 'वेश्याप्रवृत्तीपेक्षा' त्या रेड लाइट एरिआमधील 'अधिकृत' वारांगना पटीने पवीत्र वाटतात.

दुर्गा देवीचा उत्सव नवरात्र सुरू आहे. दुर्गा देवीची मातीची मुर्ती तयार करताना त्या मातीत वारांगनांच्या वस्तीतील थोडी माती मिसळली जाते. पश्चिम बंगालमधील कुंभार वेश्यावस्तीतुन माती आणुन त्यापासुन दुर्गा देवीची मुर्ती तयार करतात. कारण Durga is an eternal mother of the universe & these commercial sex workers representing procreation. पण या वारांगनाचं म्हणनं असतं "हमारे यहॉं की मिट्टी मॉ दुर्गा को चलती है पर समाज को नही."

पायातील वाहणसुद्धा एअऱ कंडिशन्ड शोरूम्समधुन विकली जाते. पण ते म्हणतात ८३ लक्ष योनीनंतर मनुष्य देह प्राप्त होतो, तो मनुष्य देह मात्र रस्त्यावर कवडीमोलात विकला जातो. हे आपल्या समाजाचं विडंबन.

गौरांगप्रभुंनी पिंगळा नामक वेश्येचा उद्धार केला.परंतु या अहिल्यांचा उद्धार करण्यासाठी राम कधी येणार याचे उत्तर त्या दुर्गा देवीलाच माहित.

(१४ ऑक्टोबर 2007, लोकसत्ता)

-अभिजित पानसे

Sunday, 31 December 2017

थर्टी फस्ट पार्टी आणि उपवासाचा गोंधळ! सो मेसी!

आज
चहा टपरीवर कानावर पडलं एक जण म्हणत होता की उद्या त्याचा सोमवारचा उपास असल्याने आज रविवारी 31 डिसेंबर च्या पार्टीला रात्री बारा पर्यंतच दारू पिणार तो!

त्यामुळे काही वर्षांपुर्वीचा प्रसंग आठवला. तेव्हा 31dec #गुरुवारी होता.
माझ्या एका मित्राने त्याला उपास असल्याने रात्री येताना घरून साबुदाण्याची खिचडी आणली होती. आणि सर्व जण चिकन हादडत असताना तो दुसऱ्या खोलीत जाउन खिचडी खात होता !

पण जसे रात्रीचे बारा वाजले तसा ''हा संपला गुरूवारचा उपास! ''हर्षोन्मादाने आरोळी ठोकत सव्वा बाराला त्याने कोंबडीच्या मांडीचे लचके तोडायला सुरवात केली!!

कारण याआधीच तो दुसऱ्या खोलीतुन
 ''माझ्यासाठी चिकन ठेवा बे! संपवू नका!!
'' हे साबुदाण्याची खिचडी खाताना सतत ओरडत होता!

यावरून तेव्हा हसायलाही येत होतं पण हा मुर्खपणा आहे हेही कळत होतं.

कारण कशाला इतका घोळ करायचा!
आता उपासाचा उपचार आहे हिंदु शास्त्रानुसार !
थर्टी फस्ट आहे हा इंग्रजी वर्षानुसार!
इंग्रजी दिवस सुरू होतो रात्री बारा वाजता! तर हिंदू शास्त्रानुसार नवा दिवस ,रात्री बारा वाजता नाही तर   दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयाला सुरू होतो !
मग तेव्हाच उपवास संपतो असा अर्थ होतो!

आता लोकांचे उपास काही रेल्वेचं वेळापत्रक नाही!रात्री बाराला संपण्यासाठी!
दिवस बदलण्यासाठी!!

शेवटी अस्सल आणि अट्टल खाण्याऱ्यांनी घड्याळाच्या काट्यांची तमा बाळगायचीच
कशाला मग!!

"खाण्याऱ्याने खात जावे..पिण्याऱ्याने पीत जावे...खाता पिता..बाटलीच्या 'बुडाला उर्ध्व' करावे!"

"BOTTOM UP"!

-अभिजित पानसे🤓

Thursday, 28 December 2017

प्र.से. मोदी जा.रा. पवार भेट जणू हरिहर भेटच जणू! 😜😜😛




नरेंद्र शरद भेट जणू हरीहर भेट

13 नोव्हेंबर 2016

आज कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे "हरीहर भेटीचा" दिवस. आज शंकर आणि विष्णू  त्यांच्या रोजच्या डेली हेक्टिक शेड्युल, ऊप्स सध्या स्केड्युल म्हणण्याचं "फ्याशन" आहे; तर आपल्या ;प्रार्थनेच्या फायली रिसिव्ह करणं,त्या चेक करून काहींवर सह्या करून त्या स्यांक्शन करणं,काही स्टँड बाय ठेवणं,तर बऱ्याच रिजेक्ट करणं इ. 24/7 बिझी हेक्टिक स्केड्युल  मधून आज वेळ काढून शंकर आणि विष्णू एकमेकास गळाभेट करतात!
 त्यांच्या मैत्रीला आज इतकं  इतकं उधाण येतं की आजच्या दिवशी शंकराला तुळस आणि विष्णूला "बेलपत्र" वाहिल्या जातं.
एकमेकास हॅंडशेक करू अवघे धरू सुपंथ !

आज नरेंद्र भाई मोदी द लॉयन आणि पवार साहेब ,द पावर हाऊस आज आपल्या याच मुहूर्तावर भेटलेत!😉😛
 "मी शरदरावांकडून राजकारण शिकलो इति नरेंद्र भाई मोदी,प.पु.प्र.
"मोदींनी पाचशे आणि हजार च्या नोटा रद्द करून योग्य केलं.मोदी देशाकरिता चोवीस तास काम करतात!इति मोठे सायेब जाणता अजाणता राज्जा!!!

हे म्हणजे फेसबुकीय संप्रदायाप्रमाणे झालं,"एकमेकांस लाईक करू अवघे धरू सुपंथ"

"बराबर छे ना शरद भाय!आव एक सेल्फी आपडु छे!!"

"अगदी बरोबर नरेंद्र भौ!! बरं आपलं ते राष्ट्रपती पदाचं बघा की आता !"

(Tek it on the light "Pink NOTE"😛)

-अभिजित पानसे

Wednesday, 27 December 2017

व्हेंटिलेटर चित्रपट आणि जयललिता यांचे शेवटचे क्षण

5 डिसेंम्बर 016

एकजण- "जयललिता अनंतात विलीन!"
दुसरा-(आपले 'अपडेटत्व' दाखवत) अरे कसली घाई आहे!धीर धरा!अजून हॉस्पिटलकडून कन्फर्म व्हायचंय!चुकीच्या बातम्या पसरवू नका!"

तिसरा-(आपली पिंक टाकत)"अहो जाणारच उद्या पर्यंत!संपत्तीची विल्हेवाट लावण्याचं काम आटोपलं की काढतील व्हेंटिलेटर!
खरं तर आता काढायला हवाच!! उगाच लोकांना,न्युज चॅनेलवाल्याना आणि आम्हाला टांगणीवर!
तिकडे त्यांच्या अम्मावरच्या स्टोऱ्या ताटकळत असतील!तेही वाटच बघताहेत न्यूजची!!"

पहिला पुन्हा-"अहो संपत्तीचं कसलं काय घेउन बसलाय!अम्मा काय उठून सर्वाना सूचना देऊन पुन्हा कोमात जाणार का?
एकदा चेन्नईचा बंदोबस्त पूर्ण झाला की माझ्या मते व्हेंटिलेटर काढायला हरकत नाही.

दुसरा ,पाहिल्याची चूक पकडल्याच्या असुरी आनंद लपवत) "कोणि सांगितलं तुम्हाला जयललिता कोमात आहे म्हणून!
आणि माझी तर खात्री आहे ती ऑलरेडी ऑफ झालेली आहे!ते लोक फक्त कधी डिक्लिअर करायचं ठरवताहेत!!"

तिसरा -" बरं त्या काळया चष्म्यावाल्याची काही न्यूज!त्याची काय रिअक्शन? म्हाताऱ्याला रात्रीतून झोपेतून उचलला होता अम्मानं!
.............. .............. ................... ............ .......

एकंदर  'व्हेंटिलेटर' चित्रपट किती रिअलिस्टिक होता.हे पुन्हा दिसतंय.तामिळ राजकीय व्हेंटिलेटर व्हर्जन सुरु.

जयललिता अम्मा मात्र घेता येईल तितका श्वास घेत आता (तरी) मनाने या सर्वांच्या ,किंतु परंतुच्या पलीकडे असतील!!(असतील का??)

"मरणारा पाळतो दुसऱ्यांच्या वेळा;
दुःख राहते बाजूला उरतो तो सोहळा!"

-अभिजीत पानसे


आई बाबा मला मारू नका


ऑक्टोबर 2006 लोकसत्ता

10 ऑक्टोबर 2016

 * आई बाबा मला मारू नका *

आज पुन्हा उल्हासित सकाळ झाली !!आई बाबांनी मला गुडमॉर्निंग केल्याने मला जाग आली!सध्या माझ्या घरचे सगळेजण माझ्यामुळे खूप आनंदात उत्साहात आहेत!

बाबांना तर काय करू काय नाही असे झालेय!बाबा ऑफिसला जायच्या आधी माझा पापा घेतात.दिवसातून कित्येक वेळा फोन करून माझी चौकशी करतात!आत्त थोड्यावेळापूर्वीच आईबाबांनी माझ्याशी खूप लाडिवाळपणे गप्पा केल्या!

आई माझी दिवसभर काळजी घेत असते.
 बाबांना तर काय करू काय नाही असं झालंय!आई बाबा रोज माझे खूप लाड करतात !मला जे हवं असतं ते मी त्यांना सांगण्यापूर्वीच ते मला खाऊ घालतात.

आई माझी दिवसभर खूप काळजी घेत असते!मला थोडाही धक्का लागू देत नाही!
ते माझ्यावर इतकं प्रेम करतात  की माझी कोणतीही इच्छा त्यांना ना सांगताच कळून जाते!
परवा मला आइस्क्रीम खावेसे वाटले तर बाबांनी ताबडतोब माझी इच्छा पूर्ण केलीसुद्धा!

आणि काल तर मज्जाच आली! संध्याकाळी बाबांनी घरी येताना खुपसारी खेळणी माझ्यासाठी आणलीत!संपूर्ण घर खेळ णया  नी भरलं!आईने म्हटलं "अहो कशाला....इतके सारे..?"
तेव्हा बाबानी आईकडे पाहून फक्त हसलेत व तिला शांत राहण्यास सांगितले...

खरंच कित्ती प्रेम करतात माझ्यावर!!

"अरे आजी आजोबा आलेत वाटतं!रोज सकाळी ते फिरायला जातात ना!फिरून आल्यावर माझ्याशी गप्पा करतात माझी काळजी चौकशी करतात!आजी आजोबांना तर आकाश ठेंगण झालंय सध्या!
माझी आजी तर आई आणि माझी दोघांचीही खूप काळजी घेते ,मला हवं नको ते बघते!
ती मला रामायणाच्या, शिवाजी महाराजांच्या छान छान गोष्टी ऐकवते!

आजोबा मला  रामरक्षा म्हणून दाखवतात!

या सगळ्यांचं माझ्यावरचं  प्रेम बघून मला खूप आनंद होतो मी कित्ती नशीबवान आहे

 मला इतका छान कुटुंब लाभले !खरंच किती प्रेमळ आहेत माझे आई बाबा आजी आजोबा !सगळेजण..!
मी खूप खूप सुरक्षित आहे इथे!

पण..पण.. आता मला राहवतच नाहीये!असं वाटतं आत्ता ,अगदी आत्ताच टुमकन उडी मारून बाहेर यावं....आणि सगळयांना प्रेमाने बिलगावं!!सगळ्यनाशी खूप बोलावं!

मग नाही तर काय!
" मी अजून माझ्या आईच्या पोटातच आहे ना!
मी माझ्या आईच्या  पोटातूनच बोलतेय तुमच्याशी!!

आईच्या प्रेमाची ऊब,बाबांची काळजी,अजीआजोबांचा उत्साह मला येथून जाणवतो! कारण मला सगळं कळतं!! मला सगळं कळतं!!
मी खूप सुरक्षित आहे इथे!इतके प्रेम करणारे व काळजी घेणारे आहेत जे माझ्याभोवती!!!

.............…......................................

आज पुन्हा सकाळ झाली....मला जग आली!!
पण हे काय..??कुठेतरी उदासीनता #जाणवतेय मला! रोज सकाळी बाबांच्या गुडमॉर्निंगने जागी होणारी मी,आज आईच्या हुंदक्यांमुळे जागी झाले!बाबा आईला काहीतरी कठोर शब्दात समजावून सांगत होते!

मी कान देऊन ऐकू लागले...!

"तू आजच डॉक्टरकडे जाऊन ये!
मला मुलगी नकोय!बरं झालं वेळच्या आत कळलं!...लवकरात लवकर सर्व आटोपायला हवं..मला मुलगी नकोय!!!!

माझ्यावर तर आभाळच कोसळले!!यांना.. यांना माझ्या येण्याचा काहीच आनंद झाला नाही का???मग माझ्या जन्मानंतर तरी मला हे स्वीकारतील का!मला कशी वागणूक देतील!माझा राग करतील का!!

आई हुंदके देऊन रडत होती.बाबा पुढे बोलू लागले..

"मला मुलगाच हवा आहे!माझ्या सर्व मित्रांना भावांना मुलंच आहेत!!
तू अबोर्शन करून घे!मी सर्व बंदोबस्त केलाय!!कोणाला काहीही कळणार नाही!!"

..............

आता मला भीषण परिस्थितीचा अंदाज आला आहे!!हेच का ते माझे आईबाबा जे माझ्यावर एवढं प्रेम करायचे! आणि मी मुलगी आहे कळल्यावर त्यांना माझा इतका तिटकारा यावा!!??
त्यांचे प्रेम क्षणात आटून तेथे तिरस्कार निर्माण व्हावा!आणि हे काय!!!!!
आजी आजोबा काय म्हणताहेत!!!!कमीत कमी ते तरी....!!!

"आम्हाला वंशाचा दिवा हवाय सुनबाई!" तू आजच गर्भपात करून घे!!आम्हला नातू हवाय नातू!!

आजी आजोबा ,बाबांनी मिळून सगळयांनी आईवर खूप दबाव आणला आणि शेवटी आईसुद्धा नाईलाजाने तयार झाली!..
माझ्या काळजात धस्स झाले!!आता मला वास्तव परिस्थितीची दाहक जाणीव झाली!
या लोकांना मी नकोच आहे तर!!

 मी फक्त आवडली नाहीये तर ते मला मारूनच टाकणार आहेत!!आता मला बाबांच्या 'बंदोबस्त' शब्दाचा खरा अर्थ कळला!कालपर्यंत मला जीव की प्राण समजणारे आजच माझ्याच जीवावर उठले आहेत....!! केवळ मी मुलगी आहे म्हणून???

इतके दिवस स्वतःच्या पोटात काळजीने प्रेमाने मला वाढवणारी माझी आई जिच्या हृदयाशी मी जोडल्या गेलेय

 तीच माझी आई स्वतःच्या पोटच्या गोळ्यालाच संपवणार आहे!!पण या सगळ्यात माझी काय चूक काय???
प्लिज आईबाबा मला मारू नका!!
तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का??
तुम्हाला माहिती आहे का मला इथून सर्व कळतंय!!

प्लिज आईबाबा मी तुम्हला विनंती करतेय मला मारू नका!!!!

#मला_सगळं_कळतंय_तुमचं!!

कालपर्यंत मला माझे वाटणारे आज हे सगळे जण मला अनोळखी दृष्ट वाटताहेत!या सगळ्यांमध्ये मी खूप एकटी आहे!मला खूप भीती वाटतेय!!!!मी खुप असुरक्षित आहे इथे!!खरच मी किती दुर्दैवी की मला अशा कुटुंबात जन्म मिळावा!!

तुम्ही लोक "देवीचं नवरात्र" साजरं करताय आणि तिच्याच रुपाला मारून टाकता आहात!!
माझ्या  काहीही चूक नसताना स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोक माझा जीव घेणार आहेत मग नकळतपणे माझ्या हृदयातून निघणाऱ्या शपवाणीमुळे यांचे कधीतरी भले होऊ शकेल का!!???

10 ऑक्टोबर 2006
लोकसत्ता
-अभिजित दिलीप पानसे

आयपीएल फायनल वरून 'बावळट' राडा


21 मे 2007

 मी खूप गांभीर्याने आजच्या आयपीएल फायनल मध्ये पुणे किंवा मुंबई ला सपोर्ट करणार आहे कारण प्रत्येक खेळाडू त्यांना मिळणाऱ्या धन राशीचा अर्धा भाग महाराष्ट्रातील जल शिवार योजनेसाठी, रस्ते दुरुस्ती, पाटबंधारे विभागाला देणार आहेत.

मुंबई इंडियन्स चे खेळाडू मिठी नदी स्वच्छतेसाठी आणि येऊ घातलेल्या पावसाळ्यात आपल्या लाडक्या शहरवासीयांना त्रास नको म्हणून नाले, गटारे सफाई साठी रक्कम देऊन "करून दाखवलं" म्हणणार आहेत.

पुणे जायंट्स खेळाडू पुण्यात मेट्रो आलीच पाहिजे चे नारे देत सरकारी कामकाज पाहता स्वतः कमावलेल्या रक्कमेतून मेट्रो निधी उभारणार आहेत.
हे सगळं ते करणार आहेत कारण
कारण दोन्ही टीमच्या विदेशी खेळाडू आणि इतरही OMS खेळाडू पैश्यांसाठी खेळत नसून मराठी माणसाच्या 'जाज्वल्य' अभिमानाठी खेळताहेत. माहिनाभर मराठी मातीत खेळून " छाती ला माती" लावून , मराठी संस्कृतीचा अभ्यास केला आहे ते पूर्णतः मराठमोळे झाले आहेत.

 राखीव दिवसात स्टीव्ह स्मिथ आदी विदेशी खेळाडू पुण्यात ज्ञान प्रबोधिनीत जात. वसंत व्याखान मालेतील सर्व व्याख्याने त्यांनी ऐकलीत.
स्टीव्ह स्मिथ , डु प्लेसिस , मिचेल मार्श यांना आळंदीमध्ये गोपीचंदन लावून ,वासुदेवाच्या वेशात टाळ वाजवत बघितल्या गेलंय.

'मुंबईचा' पोलार्ड तर रात्री मुंबईत पायी फिरून आपल्या मुम्बैवासीयांचे दुःख जाणून घेतो आणि तिथल्या तिथे आर्थिक मदतही करतो. हां कधी तो फोरस रोडवर दिसतो पण तिथे तो फक्त मसाला पान खायला जातो. असं म्हण्टात.

 स्टीव्ह स्मिथ ने मराठी आपली प्रथम भाषा मानायला लागले आहेत आणि ऑस्ट्रेलियात सिडनी आणि मेलबर्नमध्ये मराठीचा प्रचार ,प्रसार करण्यासाठी मराठी संस्कृती केंद्र उघडणार आहे. तसेच प्रमाण मराठी भाषेचा प्रसार करणार आहे.

इतकच नाहीतर स्टीव्ह स्मिथने आणि केरन पोलार्ड यांनी पुणे , मुंबई कचेरीत ऍफेडेवीट करून आपापले नावं बदलून अनुक्रमे " सतीश् सोनारे " आणि "किरणराव पोलार्डेकर ही नावे वापरायला सुरवात केली आहे.

किरणराव पोलार्डेकर चाही वेस्ट इंडिजमध्ये "मराठी सांस्कृतिक मंडळ " काढण्याचा मानस आहे पण वेस्ट इंडिजच्या जमैका की त्रिनिनाद कोणत्या बेटावर मराठी भाषा केंद्र उघडावे या गोंधळात आहे. लवकरच तो ; मागील महिन्यात एका मराठी वर्तमानपत्रात गाजलेल्या प्रमाण मराठी भाषेवरील लेखाला आणि स्टीव्ह स्मिथ उर्फ श्री सतीश सोनारे यांना प्रत्युत्तर देणार आहे.

सर्व विदेशी खेळाडूंना चुलीवरील मटन, कोंबडी वडे इतके आवडले की मराठी आचाऱ्याला ते सोबत नेणार आहेत. यानंतर चुलीवरील बर्गर , चुलीवरीलपिझ्झा, पास्ता त्यांना खाण्याची इच्छा आहे.

सर्व विदेशी खेळाडूं सकाळी उठून तुकाराम महाराजांचे अभंग गातात , मुंबईचे खेळाडू पसायदान म्हणतात.

डुप्लेसिस आणि मार्शची मोबाईल कॉलर ट्यून " मराठी पाऊल पडते पुढे"..'' वेडात वीर दौडले एकसाथ.."
तर मिचेल जॉन्सन ची " जय जय महाराष्ट्र माझा..." ही आहे . #लासीथमलिंगा ने मात्र खास "अजय अतुल" कडून  " रम्य ही स्वर्गाहुनी मुंबा...." हे गाणं रेकॉर्ड करून घेतले आहे. तीच त्याची कॉलर ट्यून आहे.

शिवाय सतीश सोनारे पूर्वाश्रमीचे स्टीव्ह स्मिथ प्रत्येक वेळी टॉस नंतर, मॅच सुरु होताना मैदानावर प्रेझेन्टेशन मध्ये, जय शिवाजी जय भवानीची आरोळी देतात!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजची फायनल मुंबई इंडियन्स चे सर्व खेळाडू 'मुंबईचा डबेवाल्याच्या " पेहरावात खेळणार आहे.

सतीश सोनारे aka स्टीव्ह स्मिथ यांनीही "पुणेरी पगडी" घालून खेळण्याचा हट्ट केला पण काही सामाजिक संघटनांनी यात सतीश सोनारेंचा ब्राह्मणी कावा असल्याचे सांगून विरोध केल्यावर तो रद्द केला .शिवाय पुणेरी पगडी धावताना कधी ही पडू शकते हे ही त्यांना जाणवलं.

जस्टीन बार्बर च्या एका दिवशीच्या कार्यक्रमावरून, तिकिटांचे दरावरून मी टीका केली , हे पैसे शेतकऱ्याना द्यावे वगैरे ठेवणीतले कार्ड वापरले पण दरवर्षी लाखो रुपये विदेशी खेळाडुना इथे दिले जातात , मी दरवर्षी तिकिटे काढून आयपीएल मॅचेस बघतो कारण या दोन टीम्समध्ये जाज्वल्य मराठी अभिमान आहे शिवाय या दोन्ही टीमचे खेळाडू पूर्णतः मराठी संस्कृतीमय झाले आहेत आणि सामाजिक कामात ते मदत करतात.
तेव्हा आज मी ज्या माझ्या आवडत्या टीमच्या विरुद्ध टीमच्या सपोर्टर्स ची खूप टिंगल टवाळी करणार!
कारण तो "माझ्या" शहराच्या इभ्रतीचा प्रश आहे!!!

मुंबई इंडियन्स आणि पुणे जायंट्स या टीम चा खरच माझ्या आवडत्या मुबई आणि पुणे शहराशी  संबंध आहे हा या त्रिकालाबाधित सत्यावर माझा डोळे मिटून विश्वास आहे.

माझ्या आवडत्या शहराचं नाव असलेल्या टीमला मी सपोर्ट करिनच शिवाय विरुद्ध टीम च्या समर्थकांची शाब्दिकरित्या खांडोळी खांडोळी करेन!!

आणि हो मी अत्यंत हुशार व्यक्ती आहे.

जय हायपीएल
जय मुम्बै
जय पुणे
जय 'श्रीकिरणरावपोलार्डेकर'!! जय म्हाराष्ट्र

- अभिजित पानसे

Tuesday, 26 December 2017

सुमोना चक्रवर्ती ..सिगरेट..वायरल व्हिडीओ

27 जुलै 2016

काही दिवसांपासुन दैनिक भास्करच्या अॅपवर सुमोना चक्रवर्तीची एक न्युज फिरतेय "देखिए कपिल शर्माके कॉमेडी शो की बिवी के सिगरेट पिते हुए व्हिडीयो.. फोटोज!"

मिडीयाच्या आणि आपल्या प्रेक्षकवर्ग समाजाच्या घसरलेल्या जाणिवेचं; अभिरूची;मानसिकतेच्या स्तराचं हे एक उत्तम उदाहरण.

सुमोना चक्रवर्ती स्मोकिंग करो वा दारू पियो...ती तिची वैयक्तिक बाब आहे.जोवर ती पब्लिक प्लेसमध्ये उघडपणे हे करत नाही.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती सार्वजनिक स्थळी सिगरेट ओढत नाहीए.
सेटवर कोण्या मुर्खाने लपुन ते शुट केलं आहे.

फक्त ती "स्त्री" आहे आणि पब्लिक फिगर; सेलिब्रिटी आहे म्हणुन त्याची असली स्वस्त न्युज करायची!!!
Sheer disgusting!

पुरूष सिगरेट दारू ड्रग्स काहीही करो ते नॉर्मल मानलं जातं.पण तेच स्त्रीने केलं तर त्याची आंबट बातमी करायची!!
वाचक प्रेक्षक गोळा करण्याची स्वस्त न्युज!!!

ती किंवा कोणीही actor  actress सार्वजनिक ठिकीणी सिगरेट ओढताना आढळला असता तर ती न्युज नक्कीच झाली असती!

मुख्य म्हणजे इतर न्युज चॅनल्स हे एकता कपुरच्या  डेली सोपसारखे उथळ आणि कर्कश झालेले आहेतच पण दैनिक भास्करसारख्या ब्रँन्डेड वर्तमानपत्रानेही अश्याप्रकारे खालच्या दर्जावर जावं!
फक्त एक स्त्री आहे म्हणुन ती न्युज करावी!!

 टिआरपी के हमाम मे सब नंगे!

पण ते असं करू शकतात कारण त्यांना भारतीय पुरूषांची ..समाजाच्या मानसिकतेची जाणिव आहे.

हिरोज ने सिगरेट ओढत इंटरव्यू केला तरी तो कूल ठरतो पण फिमेल एक्ट्रेसने ने सिगरेट ओढली तर ती आंबट बातमी!!

(त.टी.-इथे स्मोकिंगला पाठिंबा नाही.मी आजवर एकदाही स्मोक केलेलं नाही.
फक्त एक स्त्री त्यातही सेलेब आहे म्हणुन त्याची न्युज करावी.याचा धिक्कार!
SMOKING IS INJURIOUS TO HEALTH)

Monday, 25 December 2017

मास्टर हु सोल्ड हिज फरारी

25 जुलै 2017
द मास्टर हू सोल्ड हिज फरारी
The Master who sold his Ferrari

उच्च पदावर पोहचलेल्या,लोकांचे आर्दश असलेल्या सेलिब्रिटिंच्या वागण्यातुन, कृतीतुन संदेश दिला जातो ज्याचा प्रभाव समाजावर वा त्यांना  #follow करणाऱ्यांवर काही प्रमाणात तरी नक्कीच होतो.

पण बरेचदा लोक आपल्या आवडत्या आर्दशांना त्यांच्या क्षेत्रापुरतीच मर्यादीत न ठेवता मुळ आयुष्यात वा सर्वच व्यासपीठावर त्याला देवत्व बहाल करत सिंहासनावर बसवुन त्याच्या पादुका आपल्या डोईवर वाहु लागतात.
मग बऱ्याचवेळा हे लादलेलं देवत्व त्या सिंहासनाधिष्ठीताला पेलवत नाही.

 महान खेळाडुचं 'मैदानावरील' देवत्व मैदानापुरतीच न राहता आउट आॅफ द स्टेडियम,आॅफ द ग्राउंडही त्याला दैवत्व बहाल केलं जातं.बऱ्याचदा हे देवत्व त्या सिंहासनाधिष्ठीताला पेलवत नाही. हेच भारतरत्न सचीन तेंडुलकरसोबत आता आणि यापुर्वीही झालेलं आहे.

 सचिन तेंडुलकरने मित्राच्या अनधिकृत बांधकामासाठी संरक्षण मंत्र्यांकडे वशिला लावला.त्यात त्याचा; त्याच्या म्हणण्याप्रमाणे आर्थीक संबंध नसेलही पण #भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीने मैत्रीसाठीहे करावं का!

सचिन तेंडुलकरने यापुर्वी कॅप्टन असताना आपल्या मैत्रीखातर  विनोद कांबळीसारख्या सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह टेंडंसी असलेल्या नमुन्याला परत खेळण्यासाठी मदत केली,अजित आगरकरला टीममध्ये आणले,कॅप्टन नसतानाही रोमेश पवारलाही संधी मिळवण्यासाठी मदत केली.हरभजन सिंगला मंकी गेट प्रकरणात आउट आॅफ द वे हेल्प केली.याबद्दल कोणालाही चुकीचं वाटलं नाही कारण हे सर्व टीम संबंधीत आॅन द ग्राउंड  होतं.

पण आॅफ द ग्राउंड सचिन यापुर्वीही  एक भारतीय म्हणुन चुकीचा वागला आहे आणि त्याच्या फॅन्सने त्यावर टीका केली आहे.
2011 मध्ये पनवेल भागात वन बीएच के फ्लॅट घेण्यासाठी त्याने 25 लाखाचं कर्ज घेतलं होतं.मुळ कारण होतं इन्कम टॅक्स मध्ये सुट मिळावी म्हणुन.
त्याच्या काळातील सर्वात जास्त कमवत्या खेळाडुने असं वागणं चुकीचा संदेश देतं.

त्यापुर्वीही त्याने जाहिरातींतुन कमावलेल्या पैश्यात टॅक्समधुन सुट मिळावी असा अर्ज केला होता कारण दिले होते की ते पैसे त्याने खेळाडु म्हणुन नाही तर 'अभिनेता' म्हणुन कमावले आहेत.असले "चिकि सिंगल्स" सचिनने आॅफ द ग्राउंड घ्यावेत का?

2009 मध्ये त्याच्या आर्थिक सल्लागाराने ने त्याला इन्कम टॅक्समधुन सुट मिळावी 30,000चं कर्ज काढायला सांगितलं होतं.ती बातमी तत्कालीन स्टार माझावर दिवसभर होती पण त्यानंतर काढुन टाकण्यात आली होती.

श्वास मराठी सिनेमा आॅस्करसाठी नाॅमिनेट झाल्यावर त्याला मदत म्हणुन त्याने आपल्या बॅट्सचा लिलाव करत ते पैसे श्वास टीमला दिले होते.तेव्हाही त्याच्यावर टीका झाली की बॅट्स विकुन पैसे दान दिल्यापेक्षा तो ते स्वत:च्या पैश्यातुनही करू शकला असता.

डाॅन ब्रॅडमनच्या 29 शतकांशी बरोबरी केल्यावर मायकल शुमॅकरने सचिनला #फेरारी गिफ्ट केली होती.तेव्हाही  ती भारतात आणताना इंम्पोर्ट ड्युटी माफ व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती.शेवटी त्याची इम्पोर्ट ड्युटी रक्कम फियाट इंडिया कंपनीने दिली होती.

पुढे काही वर्षांनी ती फेरारी त्याने सुरतच्या एका व्यापाऱ्याला विकुनही टाकली.
हे म्हणजे वाणात,लग्नात वगैरे मिळालेल्या साड्या, ब्लाउज पिसेस, पंचा, नारळं दुकानात जाउन विकणे!!!
सामान्य व्यक्तीही ''सप्रेम भेटी'' दुकानात विकणार नाही!!मग आदर्श देवाने असं करावं?  Master who Sold his Ferrari

काही वर्षांपुर्वी सचिनने Mumbai belong to everyone'' म्हटल्यावर #बाळसाहेब_ठाकरेंनी त्याच्यावर 'सचिन लेफ्ट हिज क्रीज' 'म्हणत टीका केली होती.

भारतरत्न सचीनने आता मित्राच्या अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी वशिला लावल्यावर बाळसाहेब ठाकरेंचे शब्द पुन्हा म्हणावेशे वाटताय सचिन लेफ्ट हिज क्रीज अगेन.

-अभिजित पानसे

मराठी दीन की दिन

'सत्तावन' म्हणजे सेवंटी वन का??''
असं विचारणाऱ्या मराठी लहान मुलांकडे आणि काही तरूण तरूणींकडे मी दयार्द्र दृष्टीने पाहुन हसण्यावर नेतो.

भारतीय शब्दांचा उच्चार करताना इंग्रजांची जीभ वळत नव्हती म्हणुन त्यांनी मद्रासचं चेन्नई,कोलकाताचं कलकत्ता वगैरे आणि इतर अनेक शब्दांचं त्यांच्या 'सोयीसाठी 'रुपांतर केलं.
पण साहेब गेल्यावरही त्यांनी मागे टाकलेलं त्यांचं उष्टं खरकटं चिवडताना; 'अजिंठा- वेरूळ' लेण्यांना साधं बोलतानाही सतत Ajanta& Ellora म्हणण्यात गर्व बाळगणाऱ्या अर्ध्या हळकंडाने पिवळे होणाऱ्यांची कीव येते.

पण गंगा नदीला Ganges ,ग्यांजेस म्हटल्यावर मात्र तळपायाची आग मस्तकात जाते.

आणि जेव्हा कोणी मराठी व्यक्ती मुंबईला '#बाॅम्बे' म्हणतं तेव्हा मात्र त्याचा मानसीक रोग आता मर्यादेच्या पलीकडे गेला असुन त्याला उपचाराची नाही तर प्रार्थनेची गरज आहे असं खुशाल समजावे आणि त्याला त्याच्या प्राप्त अवस्थेत तसेच सोडुन द्यावे.

(त.टी-ह्यात इतर कुठल्याही भाषेबद्दल वा भाषिकांबद्दल  आकस राग दुर दुर नाही.
हे फक्त उथळ मराठी लोकांसाठीच.)
इंग्रजीसहित सर्व भाषांचा चाहता,सर्वांच्या 'मातृभाषेचा' आदर करणारा आणि मराठीवर प्रेम करणारा

-अभिजित पानसे

आमिर जातोय आपुल्या गावा त्याचा राम राम घ्यावा

23 नोव्हेंबर 2015

आमिर खान सहकुटुंब, जाता जाता सगळ्यांची माफी मागत गीत आळवतोय-

आम्ही जातो ''आमुच्या देशा''
आमुचा खुदा हाफिज घ्यावा । 1।

तुमची आमची हे चि भेटी
येथुनिया जन्मतुटी ।2।

आता असो द्यावी दया
तुमच्या लागतसे पाया ।3।

येता ''सौदी''धामी कोणी
अल्लाह अल्लाह बोला वाणी ।4।

''ओ तेरी'' मुखी बोला
आमीर चालला इसिस धामा ।5।

- ''असहिष्णु''अभिजीत पानसे.

(आमीर खानचा आजन्म चाहता अभिजीत पानसे)

Saturday, 23 December 2017

आपला तो अज्या दुसऱ्याचा तो जस्ट्या

12 may 2017

लहानपणी शाळेत पाचवी सहावीत बँड पथकात बासरीच्या कळपात मी होतो.दरवर्षी15 ऑगस्ट 26 जानेवारी च्या काही दिवस अगोदर बँड बासरीचा सराव होत असे. पण राष्ट्रगीत बासरीवर वाजवणं मला कधीच जमलं नाही. पण ते मी सरांना कधीच कळू दिलं नाही कारण इतर पोरांच्या बासरी वादनात मी फक्त तोंडात स्टीलची बासरी धरून न वाजवता छिद्रांची उघडझाप करीत असे.
स्वातंत्र्य ,प्रजासत्ताक दिन आला की सकाळी उठून शुभ्र अर्धी चड्डी आणि शर्ट घालून वर डोक्यावर स्कॉउट सारखी आडवी गोल नेवी ब्लु रंगाची टोपी तीत वर कोंबडीच्या पिसाला लाल गुलाबी रंग दिलेला तुरा घालून आमचं प्रथम झेंडावंदन आणि नंतर सगळ्यात समोर बँड बासरी पथकाच्या मागे इतर सर्व पोट्टे सोट्टे अशी प्रभात फेरी निघत असे. 

मला ते मार्चिंग चं बासरी वादन येत असूनही कंटाळा यायचा आणि राष्ट्रगीताप्रमाणेच संपूर्ण प्रभात फेरीत मी फक्त तोंडात बासरी ठेऊन इतरांच्या वादनात मिसळून फसफसा फक्त हवा सोडत असे पण कोणास कधी कळले नाही. गुरुजी जर मधेच समोर आले की स्वतःच्या नाकाच्या शेंड्याकडे बघत इतरांच्या वादनात स्वतःची बासरी सिंक करत माझी #म्युट बासरी अगदी तन्मयतेने राष्ट्रगीत ,व मार्चिंग संगीत वाजवण्याचा हुबेहूब अभिनय करत असे.

मुद्दा हा आहे की असेच लोक पुढे जाऊन "जस्टीन बिबर " होतात.

*AdventureOfTinTin-Justin*

#आपला_तो_अज्या_दुसऱ्याच_तो_जस्ट्या

एप्रिल फूल

*एप्रिल फूल*

1 एप्रिल 017

रोज डे ला ज्या गुलबकावलीवर मी गुलाबाची फुलं उधळलीत,कालपर्यंत जिने माझ्याशी प्रेमाच्या गुलुगुलू गप्पा केल्यात  तिने आज मला सरळ फ्रेंडझोन करून 'वी आर ओन्ली गुड फ्रेंड्स म्हणून मला पूर्णपणे  'फूल' बनवलं.
किमान 'वी आर जस्ट गुड फ्रेंड्स " असं "नरो वा कुंजरो वा .." सारखं निसरडं ,लवचिक वाक्य तरी म्हणायला हवं होतं ,एक चटोर आशा तरी जिवंत राहिली असती.

अच्छा सिला दिया तुने मेरे फुल का यार ने ही बना दिया ब्लडीफूल यार!!

एक फ्रेंन्झोन्ड 'फूल'



              ***


इथे (म्हणजे प्रत्यक्ष जगात) प्रत्येक जण दुसऱ्यास फूल बनवत असतो.  फूल बनवणाऱ्यालाही "फुलास सव्वाफुल" भेटून त्याचाही फूल होतो
फूल बनलेल्यासाठीही दयास्पद भाव ठेवायची गरज नाही .जो फूल बनला तो " Karma will serve him/her right.. " वगेरे कर्म सिद्धांतांच्या फुंकर स्वतःच्या जखमांवर घालून स्वतःलाच फुल बनवत असतो ,आणि तो स्वतःच दुसऱ्याला फूल बनवण्याच्या फूल शिकारीवर निघतो. फुल बनलेला तो दुसऱ्याला फूल बनवतो. तेव्हा तो स्वतःच्या जखमांवर घातलेली फुंकर विसरून गेला असतो.

"एकमेकांस फूल बनवू अवघे बनु मूर्ख" हे 'फूलांचे' रहाटगाडगे या जगण्याच्या राहाटगाडग्यासोबत पूर्वीही असेच सुरु होते. सुरु राहणार.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- Abhijeet Panse

कब्बी खुशी कब्बी गम ट्रॅजेडी

"कब्बी खुशी कब्बी गम" चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झालीत म्हणून फार उत्सव साजरा करणे सुरू आहे! पण मी अजून याच प्रश्नात अडकलोय की गोल चेहऱ्याचा, काळया डोळ्यांचा 'लड्डू ' , घाऱ्या डोळ्यांचा रोहन - रितीक रोशन कसा झाला!
आणि लहानपणीची घाऱ्या डोळ्यांची पूजा, मोठी झाल्यावर डार्क ब्लॅक-ब्राऊन डोळ्यांची "पू- करीना कपूर" कशी काय झाली!

दोघांच्याही "रम्य ते बालपण" आणि "पोस्ट पिंपल्स पिरेड" मध्ये काहीही साम्य नाही!

बरं रीतिक रोशन -रोहन कोणतीही प्रवेश परीक्षा ना देता, लंडनमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए ऍडमिशन मिळवतो! बरं ते ही शक्य एक वेळेस म्हणा! शेवटी रायचंदस होते ते! मॅनेजमेंट कोट्यातून घेतली असेल ऍडमिशन! बक्कळ पैसा बापाकडं!

पण पंधरा वर्षे होऊनही, गलेलठ्ठ लड्डू चा हँडसम हंक रोहन होतो ,पण इतक्या काळात पुलाखालून थेम्स नदीचं पाणी वाहूनही राहुल्या शाहरूख जशाचा तसाच दिसतो!

इतक्या वर्षांनंतरही लड्डू रोहनला बूटांच्या लेसेस बांधता येत नसतील तर कॉलेजटीमकडून क्रिकेट खेळताना लड्डू रोशन काय टीममेट्सकडून किंवा अंपायरकडून बुटांच्या लेसेस बांधून घ्यायचा!!!

"चांदनी चौक मे चाचा ने चाची को ..चटणी चटाई" हे म्हटल्याबरोबर या एका कोडवर्ड्स ने पंधरा वर्षापूर्वीची पोरगी पुन्हा पटते हे कळल्यावर , मीसुद्धा चांदनी चाळ (आपल्याकडे चाळ असते म्हणून) चांदीचा चमचा, चाचा.. चटणी "कोड वर्ड" वापरून बघितला , तर ती पोरगी तिच्या 2 वर्षाच्या लहान बाळाला म्हणाली "बेटा मामाला बाय कर!"

अश्या असतात हिंदी मुविज!
येथे ओशाळतात दक्षिणात्य चित्रपटही

-अभिजीत पानसे

Friday, 22 December 2017

"अश्या चिंब वेळी नाकास तुझ्या रुमाल हवा!"


10 जुलै 2007
लोकसत्ता

पावसाळा सुरू झाला आहे तेव्हा आमच्या आजवरच्या पावसाळ्यांच्या स्वानुभवांवरुन खालील विशेष काळजी प्रत्येकाने घ्यावी.

(1) पावसाळ्यात संडास बाथरूमच्या दरवाज्यांना सुज येते..ते फुगल्यामुळे नीट बंद होत नाहीत.तेव्हा आतमध्ये हिशेब चुकता करत बसले असताना जोरात नळ सुरू ठेवणे.नाहीतर फजितीचा बाका प्रसंग 'गुदरू' शकतो.
ही काळजी मुख्यत्वे  होस्टेलाईट्स जीवांसाठी.

(2) GF किंवा BF धारकांनी भर पावसात दुर कुठे एकांतात फिरायला जाणं टाळा.ओलेत्या वातावरणात पाय घसरण्याचा' संभव असतो.

 (3) उन्हाळ्यात कितीही पाणी प्यायले तरी काही प्रश्न नसतो पण पावसाळ्यात थोडेही पाणी प्यायल्यास रात्री बेरात्री झोप मोड होउन सतत विसर्जनासाठी जावं लागतं.तेव्हा योग्य प्रमाणात (आणि गरम करून पाणी पिणे.ही एक टिपीकल पावसाळी काळजी असते.)

(4) उन्हाळ्यात देवदर्शनाला वगैरे बाहेर गेले असाल.तिथे तीर्थ प्रसाद हातावर घेतला की पुसला हात डोक्याला!!
ही सवय आता टाळा.पावसाळी कुंद हवेत केस वाळत नाहीत त्यामुळे तुमच्या चिकट केसांना मुंग्या,मुंगळे लागतील.

(5) बालकनी,किचन ते हाॅलपर्यंत कितिही दोऱ्या बांधुन कपड्यांचे तोरणं बांधली तरिही कुंद आर्द हवेत कपडे वाळत नाही.त्यातल्या त्यात सर्वसाधारण वरचे कपडे थोडा भाव खाउन निमुटपणे काही तासाने वाळतात तरी.पण ती शिष्ठ अंतर्वस्त्रे मात्र अशावेळी फार अॅटिट्युड दाखवतात.लवकर वाळत नाही.अशावेळी कोण्या बहाद्दराने तेच ओलसर अंर्तवस्त्र परिधान करून गेल्यास मग मात्र त्याची काही खाज....खैर नाही!!

(6) ''...खेलेंगे प्रेम गेम आॅन द रूफ इन द रेन''ही असली 'मीतगिरी' टिव्हीवरच बरी दिसते तुम्ही असली 'मस्ती' करायला गेलात तर रूफवरुन खाली पडुन तुमचं मणका मोडु शकतं.

(7) (पुन्हा एकदा) GF आणि BF धारकांनी पावसाळ्यात बागेत वा शहराबाहेर कुठे झाडा झुुडपांमागे कुठल्याही प्रकारच्या क्रीडेसाठी जाउ नये.बिळात पाणी गेल्याने साप,इंगळ्या, विंचु बाहेर अालेले असतात.त्यामुळे तुम्ही चंबाचुंबीत मग्न असताना एखादा सरपटणारा वा नांगीधारक जीव तुमच्या पायाचे 'चुंबन' नक्की घेउ शकतो.

(8) हेसुद्धा GF/BF धारकांसाठीच!
पावसाळी कुंद हवेत जिवाणु विषाणुंची संख्या आधीच वाढली असते.त्यामुळ कदाचीत दोघंही सर्दी पडश्याने त्रस्त असु शकाल.तेव्हा प्रणयक्रिडेत दोघांची मुखे एकमेकांजवळ आलेली असतानाच; शत्रुसोबत पण न होवो  असं पण नेमकी त्याक्षणी तिच्या किंवा त्याच्या फुफ्फुसात उदान वायुचा क्षोभ होउन तिला/त्याला जोरदार शिंक आलीच!तेव्हा भरलेल्या नाकातुन वायु त्याचा मार्ग काढणारच!शेवटी वायुच तो !उर्ध्वगत वा 'अधोगत'; वायु आपल्या मार्गाने बाहेर पडतोच!
त्यामुळे  येथे उदान वायु जोराने उर्ध्वगत होउन सोबत नाकातील सर्व द्रवमय..सेमीसाॅलीड पदार्थ आपल्यासोबत वाहुन नेणारच! तेव्हा ''अशा चिंब वेळी तुझा हात हाती हवा''!
 म्हणण्याचा ऐवजी ''अशा चिंब_वेळी नाकास तुझ्या रूमाल हवा!!'' म्हणावं लागेल.
त्यामुळे अशी जीवघेणे खजिल करणारे पेचप्रसंग टाळण्यासाठी पावसाळ्यात प्रणय टाळावा.

(9) पावसाळ्यातील अत्यंत मोहक व फसव्या महत्वाच्या गोष्टीची काळजी घेणं म्हणजे ते पावसात "मिर्ची भजी" वा तत्सम बेसनाचे तळलेले पदार्थ फक्त फेसबुकवर फोटो टाकण्या पुरतेच आणि ''हॅपीनेस इज पावसात गरम मिर्ची भजी! वाह!!''
हे असले स्टेटसे फक्त लिहिण्या वाचण्यातच मजा असते.

 प्रत्यक्षात  पावसाळ्यात पचनसंस्था कमकुवत झाली असल्याने 'ढगाळ' वातावरणात मिर्ची भजे वगैरे खाल्ले असता 'ढाळ' लागुन विचारगृहाकडे सतत धाव घ्यावी लागते.आणि मग आत ढर्रर्रर्रर्र.....पर्रर्रर्र.......

असो.पावसाळ्यातील काळजी; ही ढगाळ वातावरण.. ढाळ ते..ढर्रर्र..पर्यंत येउन पोहचल्याने आता यावर आणखी काही बोलावं वाटत नाही.

''सो गप्पी मासे पाळा हिवताप टाळा हॅपी पावसाळा!!''

- अभिजित पानसे

Thursday, 21 December 2017

दोन भाऊ

15 ऑगस्ट 2017

दोघांचाही जन्म खूप गरिबीत झाला. दोघांच्या जन्मात फक्त 24 तासांचं अंतर. 24 तासानंतर जन्मलेल्याने लवचिक, मोठे विचार ठेवलेत, हळूहळू प्रगती करत गेला, शहरात ,आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाला. वेळ पडल्यास अडचणीच्या काळात गरीब शेजाऱ्यांनाही थोडीफार आर्थिक मदत केली. कोणाही शेजाऱ्यांसोबत उगीच संबंध खराब न करण्याची वृत्ती , नियमितपणे व्यायाम करत बलदंड झाल्याने कोणी उगीच खुसफट काढल्यास त्याच्या कानफटात देऊन स्वतःचा स्वतंत्र बाणा कायम ठेवला. निरुपद्रवी ,शांत समंजस व्यक्ती म्हणून समाजात मान मिळवला आणि आपल्या #मोहल्ल्यात बडा प्रस्थ बनला.

24 तासाच्या आधी जन्मलेला मात्र जन्मपासूनच कुत्सित, सतत आधीच्याचा जळफळाट करणारा , अत्यन्त ठिसूळ जुनकट विचारांचा , शेजाऱ्यांना त्रास देणारा, नशेबाज ,लपून छपून सतत दुसऱ्याच्या घरात घुसून त्रास देणारा, आणि मुळात अत्यन्त भेकड , डोळे वटारले तरी शेपूट वर करून पळणारा झाला. सतत जळफळाट , भांडणे करणारा, त्रासदायी असल्याने स्वतःच्या घरातील लोकही सतत दुःखी, कष्टी, उपाशी..
बड्या शेजाऱ्यांकडे जाऊन सतत भीक मागणारा त्यामुळे समाजात त्याची अत्यन्त खराब प्रतिमा निर्माण झाली आणि आता तो ज्या बड्या श्रीमंत शेजाऱ्याकडून सतत आर्थिक, इतर भीक घेत राहिल्याने तो आता त्याचा अप्रत्यक्ष गुलाम होण्याच्या मार्गावर आहे.

असा तो आज #सत्तर वर्षाचा झाला पण कुठलंही शहाणपण न आल्याने शहरात, समाजात आणि स्वतःच्या मोहोल्ल्यात एक अत्यन्त वाईट , त्रासदायी माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला.
आज त्याचा वाढदिवस.

दोघेही आता सत्तरीत गेले. आज एक कुठे आणि दुसरा कुठे आहे!

Independence(?))day of pakistan.



एकमेकां साह्य करू; मुंबई स्पिरिट

30 ऑगस्ट 2017

विनोदी वृत्ती असणे वेगळे आणि कुठेही फिदीफिदी करणे वेगळे ..कोट्या करणे वेगळी गोष्टआणि फक्त आपल्या अजागळ व्यक्तिमत्वचे अवेळी काटे टोचणे वेगळी.
कधी, कुठे ,कोणावर, तर कधी स्वतःवर हसायचं याचं 'तारतम्य' असणे याला विनोदी 'बुद्धी' म्हणतात. जसा कॉमन सेन्स असणे कॉमन नसतो तसंच ही बुद्धीही असणे अनकॉमन आहे.
कुत्सितपणे बोलणे आणि कोणाच्या जीवावर, मालमत्तेची हानी होऊ घातलेल्या संकटावर, त्यातील त्यांनी दाखवलेल्या 'स्पिरिट' वर कुत्सितपणे हसणाऱ्यांची  दयाही येउ शकत नाही.

आपले फालतू शहरी पर्सनल स्कोर सेटल करण्यासाठी आयपीएल फायनल सारख्या टुकार गोष्टीवरुन कोट्या विनोद समजण्याजोगे पण स्वतः काठावर रिकामे बसून बुडणाऱ्यांवर हसणे, त्यांच्या #स्पिरीट ची टर उडवणाऱ्यांचं स्वतःचं स्पिरिट ..आत्मा किती अर्धमेला झालाय हे दिसून येतं.

इतरांच्या "सर्वायवल स्पिरिटवर" हसणाऱ्या अश्या अर्धमेलेल्या स्पिरीटांना स्पोर्टमन स्पिरिट म्हणजे कशाशी खातात कळणार नाही.

निसर्ग अत्यंत बेभरवशाचा असतो. उद्या हे लोक अश्या नैसर्गिक संकटात अडकले तर!
तरीही हे आकाशातील बापा यांना माफच कर जरी त्यांना माहिती आहे ते काय करत आहेत.

- Abhijeet Panse